ADVERTISEMENT
home / आरोग्य
सिद्धा वॉक

मानसिक आरोग्य आणि ताणावर फायद्याचा आहे सिद्ध वॉक, जाणून घ्या फायदे

मानसिक आरोग्य राखणे हे आपल्या हातात आहे. पण अनेकदा अशी परिस्थिती निर्माण होते की, आत्मपरिक्षण करायची इच्छा असली तरी देखील तसे होत नाही.अशावेळी वेगवेगळे उपाय सुचवले जातात. व्यायाम हा त्यापैकी एक उपाय आहे. ज्यावेळी आपण व्यायाम करतो त्यावेळी आपल्या मनातील घालमेल कमी होण्यास मदत मिळत असते. जर व्यायाम शक्य नसेल तर किमान चाला असे सांगितले जाते. चालणे हा सगळ्यात उत्तम असा व्यायाम आहे जो सगळ्यांनीच करायला हवा. त्यातल्या त्यात मानसिक ताण आणि उत्तम आरोग्यासाठी सिद्ध वॉक (Siddha walk) हा एकदम उत्तम आहे असे सांगितले जाते. आता सिद्ध वॉक ( Siddha walk) मध्ये  असं वेगळं आहे तरी काय की ज्यामुळे आपल्याला फायदा मिळतात. चला जाणून घेऊया सिद्ध वॉकचे फायदे नेमके आहे तरी काय?

सिद्ध वॉक कसा करतात?

आठ आकाराचा असतो सिद्धा वॉकचा ट्रॅक

सिद्ध वॉक ( Siddha walk)  हा नावावरुन वेगळा वाटतो. हे चालणे तसे वेगळेही आहे याचे कारण असे की, सिद्ध वॉक ( Siddha walk) मध्ये आपल्याला 8 च्या आकड्यानुसार चालावे लागते. असे मानले जाते की, हा आकार तुमच्या मनातील  वेगवेगळ्या विचारांना जागा मोकळी करुन देतो. त्यामुळे तुम्हाला आत्मपरिक्षण करण्यास मदत मिळते. सिद्ध वॉकिंग तुम्हाला अगदी खोलीतल्या खोलीतही करता येते.  त्यासाठी तुम्हाला खूप मोठी जागा हवी असे नाही. हे चालणे केवळ नियमबद्ध चालणे असल्यामुळे ती शिस्त मात्र तितकी आपल्याला पाळणे फार जास्त गरजेचे असते. तरच त्याचे फायदे आपल्याला मिळण्यास मदत मिळते. सिद्ध वॉक ( Siddha walk)  ला  इन्फिनिटी वॉकिंग किंवा 8 वॉकिंग असेही म्हटले जाते.  

सिद्ध वॉक ( Siddha walk)  करण्याचे हे आहेत फायदे

सिद्ध वॉक ( Siddha walk) 

सिद्ध वॉक ( Siddha walk)  हा अनेक फायद्यांसाठी प्रसिद्ध आहे. तुम्ही जर हे नित्यनेमाने केले तर तुम्हाला काही फायदे होण्यास नक्कीच मदत मिळते. चला जाणून घेऊया याचे फायदे नेमके आहेत तरी काय

  1. सिद्ध वॉक ( Siddha walk)  हा उत्साहवर्धक असा आहे. अशाप्रकारे आकड्यात चालल्यामुळे तुम्हाला दिवसभर उत्साह आणि उर्जात्मक राहण्यास मदत मिळते. 
  2. सिद्ध वॉक ( Siddha walk)  हे एक नियमबद्ध चालणे असल्यामुळे यामुळे मेंदूला चालना  मिळण्यास मदत मिळते. 8 च्या आकड्यात चालायचे काम हे अजिबात सोपे नाही. त्यामुळे होते असे की, आपले सगळे लक्ष तो 8 चा आकडा बनवण्यात जाते.  त्यामुळे मानसिक विचारांना अर्थात एक फुलस्टॉप मिळतो. मुळातच मन प्रसन्न असेल तर आपल्याला इतर कोणत्याही वाईट गोष्टी आठवण्याची गरज भासत नाही.
  3. अनेक शोधांती असे दिसून आले आहे जे नित्यनेमाने सिद्ध वॉक ( Siddha walk)  करतात. त्यांना पोटाच्या समस्या अजिबात होत नाही. त्यांच्या पोटाचे आरोग्य हे कायम चांगले राहण्यास मदत मिळते. 
  4. चालण्याचे असेही अनेक फायदे आहेत. ज्यावेळी तुम्ही चालता त्यावेळी तुमच्या रक्तातील साखर नियंत्रित राहते. त्यामुळे मधुमेहींनाही याचा फायदा होतो. 
  5. वातावरण बदलामुळे अनेक जण आजारी पडतात. अशावेळी तंदरुस्त राहण्यासाठी जर तुम्ही सिद्ध वॉक ( Siddha walk)  केले तर प्रतिकारशक्ती चांगली राहण्यास नक्कीच मदत मिळते. 

आता मानसिक आरोग्य आणि निरोगी आरोग्यासाठी नियमित करा सिद्ध वॉक ( Siddha walk) . ही माहिती इतरांना द्यायलाही विसरु नका. 

ADVERTISEMENT
03 Aug 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT