ADVERTISEMENT
home / आरोग्य
benefits of Infinity Walking in Marathi

ट्रेंडमध्ये आहे Infinity Walking, जाणून घ्या फायदे

निरोगी राहण्यासाठी व्यायाम खूप महत्त्वाचा आहे. यासाठी जाणून घ्या काही आरोग्यदायी टिप्स मराठी | Health Tips In Marathi आणि Vyayamache Mahatva | व्यायामाचे जीवनातील महत्त्व आणि फायदे दररोज तुम्हाला व्यायामासाठी पुरेसा वेळ काढता येत नसेल तर कमीत कमी चालण्याचा व्यायाम करा असं तज्ञ्ज सांगतात. चालण्यामुळे तुमच्या शरीराला चांगला व्यायाम मिळतो, शिवाय तुम्ही फिट देखील राहता. सकाळी चालण्याचे अप्रतिम फायदे (Morning Walk Benefits In Marathi) अवश्य वाचा. तसंच चालण्याचे अनेक प्रकार आहेत. मात्र सध्या Infinity Walking ची जास्त क्रेझ दिसून येते. वॉकिंग एक्सरसाइझ मध्ये इनफिनिटी म्हणजेच 8 शेप वॉकिंग आरोग्यासाठी खूप फायदेशीर असल्याचं सांगितलं जातं. यासाठी जाणून घ्या काय आहे हे इनफिनिटी वॉकिंग…

इनफिनिटी वॉकिंग (Infinity Walking) म्हणजे काय

इनफिनिटी वॉकिंग (Infinity Walking) ला सिद्धा वॉकिंग (Siddha Walking) अथवा 8 शेप वॉकिंग असंही म्हणतात. सिद्ध योगामधून निर्माण झालेला चालण्याचा प्रकार म्हणून या चालण्याला इनफिनिटी अथवा सिद्धा वॉकिंग असं म्हटलं जातं. भारतातील ऋषीमुनींनी ध्यानाचा एक भाग म्हणून या चालण्याचा शोध लावला होता. इनफिनिटी म्हणजे अनंत आणि सिद्ध म्हणजे अशी व्यक्ती जिने शारीरिक अक्षमतेवर विजय मिळवला आहे. म्हणूनच या चालण्याचा एक आध्यात्मिक पैलू देखील आहे. विशेष म्हणजे या चालण्यातून नकळत तुमचे मेडिटेशनदेखील होते. योगाभ्यासात लक्ष केंद्रित करणे अथवा ध्यान करण्याला खूप महत्त्व आहे. म्हणूनच जेव्हा तुम्हाला व्यायाम, योगसने करण्यासाठी पुरेसा वेळ नसतो. तेव्हा फक्त इनिफिनिटी वॉक करून तुम्ही शारीरिक आणि मानसिक आरोग्य साध्य करू शकता.

इनफिनिटी वॉकिंग (Infinity Walking)चे फायदे 

इनफिनिटी वॉक अथवा सिद्धा वॉक करण्याचे अनेक फायदे आहेत. ही एक चालण्याची अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये तुम्हाला आठ अंकाच्या दिशेप्रमाणे एकाच गतीत चालत राहायचे असते. तुम्ही तुमच्या घरात, बाल्कनीत हा चालण्याचा सराव करू शकता. यासाठी घरात अथवा बाहेर तुम्हाला आठ अंक जमिनीवर काढावा लागेल आणि त्या दिशेने चालावं लागेल. जाणून घ्या इनफिनिटी वॉकिंगचे फायदे

  • आठ अंकाच्या शेपप्रमाणे चालत राहिल्यामुळे तुमच्या शरीराला आठाच्या वळणाप्रमाणे वळावे लागते. ज्यामुळे तुमचे शरीर ट्विस्ट होते आणि शरीराला नकळत व्यायाम मिळतो, तुमचे लकचिक होण्यास मदत होते. 
  • इनफिनिटी चालण्यामुळे तुमचे मन एकाग्र होते ज्यामुळे मन हळू हळू शांत होण्यास मदत होते. ताणतणाव, चिंता दूर करण्यासाठी हा चालण्याचा व्यायाम फायदेशीर ठरतो.
  • डोकेदुखी, पचनाच्या समस्या, थायरॉईड, लठ्ठपणा, सांधेदुखी, मधुमेह, बद्धकोष्ठता अशा अनेक आरोग्य समस्या कमी होतात.
  • आठ या अंकाच्या शेपमध्ये एकाच गतीने चालण्यामुळे तुमची एकाग्रता वाढतेच शिवाय तुमच्या डोळ्यांच्या समस्या कमी होतात.
  • रक्तप्रवाह सुधारतो आणि रक्तदाबाच्या समस्या दूर होतात.
  • चालण्यात एकाच ठिकाणी मन एकाग्र झाल्यामुळे मनातील नकारात्मक विचार कमी होत जातात. 
  • व्यायाम आणि ध्यान अशा दोन्ही गोष्टी एकाच वेळी साध्य करण्यासाठी हे चालणे खूपच उपयुक्त आहे.
  • चालण्यासाठी तुम्हाला मोठं मैदान, जॉगिंग ट्रॅक अशा गोष्टींची गरज नाही. कमी जागेत करण्यासारखा चालण्याचा व्यायाम प्रकार आहे.
27 May 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT