जेव्हा कोणत्याही मुलीच्या सौंदर्याबद्दल बोललं जातं तेव्हा तिच्या केसांबद्दल नक्कीच चर्चा होते. जेव्हा तुम्ही तुमच्या केसांची स्टाईल करण्यासाठी किंवा केस कापण्यासाठी पार्लर वा सलोनमध्ये जाता तेव्हा केवळ तुम्हाला किती लहान किंवा किती मोठे हवेत इतकंच जाणून घेणं पुरेसं नाही. कोणताही हेअरकट वा स्टाईल करण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या चेहऱ्याचा आकारसुद्धा जाणून घेणं गरजेचं आहे. असं केल्यामुळे तुम्ही केलेली हेअरस्टाईल तुम्हाला नक्की चांगली दिसेल. तुमचं कपाळ जर थोडं मोठं असेल तर जास्त मोठं वाटावं किंवा तुमचा चेहरा जास्त गोल दिसेल असं व्हावं असं तुम्हाला वाटतं का? आपल्या बेस्ट फिचर्सना सर्वांसमोर आणणं हेच खरं तर सुंदर दिसण्याचं सिक्रेट आहे. प्रसिद्ध कॉस्मोटोलॉजिस्ट, अॅस्थेटेशियन आणि एल्प्स कॉस्मेटिक क्लिनिकची संस्थापक, संचालिका भारती तनेजा तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर कोणत्या हेअरस्टाईल चांगल्या दिसतील किंवा तुमच्या चेहऱ्याचा आकार कसा आहे आणि त्यावर तुम्हाला कोणती हेअर स्टाईल चांगली दिसेल हे सांगत आहे.
हा एक आदर्श चेहरा असून या आकाराला परफेक्ट चेहऱ्याचा आकार मानला जातो. अशा चेहऱ्यावर कोणतीही हेअरस्टाईल तुमच्या आवडीनुसार करता येऊ शकते. तुमचा चेहरा हा प्रयोग करण्यासाठीच आहे. जर तुम्हाला एजी क्रॉप हेअरकट करायचा असेल तर काहीही विचार न करता नक्की करा. तुम्ही मोठे किंवा लहान केसांमधील लेअर्स बँग्ज, ब्लंट असे कोणतेही स्टाईल अतिशय चांगल्या रितीने कॅरी करू शकता. त्याशिवाय हेअर स्टायलिंगसाठी पोनी, कलर्सचादेखील तुम्ही प्रयोग करू शकता. फ्रेंच नॉट, मेसी बन, डच ब्रेड आणि साईड पोनी या सगळ्या स्टाईल्स करून तुम्ही तुमच्या चेहऱ्याचे फिचर्स अतिशय सुंदरपणे हायलाईट करू शकता आणि दुसऱ्या बाजूला रोज नवी स्टाईलसुद्धा करून नव्या अवतारात वावरू शकता.
अशा चेहऱ्याची लांबी आणि रुंदी ही एकसारखीच असते आणि कान आणि गालाच्या बाजूची जागा खूप मोठी असते त्यामुळे चेहऱ्याला थोडा उंच आणि बारीक दाखवण्यासाठी तुम्हाला गरज असते ती, कमी लांबीच्या हेअरकटची. सॉफ्ट लेअर्समध्ये कापलेले खांद्यापर्यंतचे केस या चेहऱ्यासाठी चांगले असतात. तसेच इनवर्ड कर्लमध्ये ब्लो ड्रायरपण तुम्ही करू शकता. पुढे थोडा उंच पफ बनवून तुम्ही तुमच्या चेहऱ्याला थोडं उंच दाखवू शकता किंवा गालांवर दोन्ही बाजूला फ्लिप ठेवूनही तुम्ही गालाचा चबीनेस कमी करू शकता. जमल्यास, गोलाकार चेहऱ्यावर अतिशय बारीक केस कापून घेऊ नये. स्ट्रेट बॉक्स फ्रिंज आणि ब्लंट कट गोलाकार चेहऱ्यावर चांगले दिसत नाहीत. जर तुम्ही खूपच बारीक केस कापलेत तर खूप साऱ्या चॉपी आणि स्पाईक लेअर्ससह पिक्सी कट तुमच्या चेहऱ्यावर चांगला दिसेल. तुमच्या केसांना अगदी टाईट आणि स्लीक पोनीटेलमध्ये बांधू नका, काही केस पुढच्या बाजूला थोडे मोकळे सोडा जे तुमच्या चेहऱ्याला चांगले दिसू शकतील.
ताजे हेअरकट स्टाईल मराठीमध्येही वाचा
शॉर्ट, लांब आणि मध्यम लांबीच्या केसांसाठी मराठीमध्ये ट्रेंडी केशरचना देखील वाचा
हा चेहरा साधारणतः अंडाकृती चेहऱ्याप्रमाणेच दिसतो मात्र त्यापेक्षा थोडा जास्त लांबट असतो. अशा चेहऱ्यांसाठी त्याची लांबी करून त्याची रुंदी वाढवेल अशा हेअरस्टाईलची गरज असते. लो-साईड बन किंवा विनापार्टिंगची फ्रेंच हेअरस्टाईलदेखील या चेहऱ्याला शोभा आणते. याशिवाय रेजर वा फेदर कटदेखील या चेहऱ्याला शोभा देतो.
कपाळ आणि जबड्याची लाईन साधारणतः एकसारखीच या चेहऱ्यामध्ये असते. त्यामुळे कानाच्या खालून देण्यात आलेले व्हेव्ज जबड्याच्या रुंदीला थोडं हलकं करतात. त्याशिवाय कलर्स, मेसी बन, शॉर्ट स्पायक्स कट या चेहऱ्यासाठी अगदी योग्य निवड आहे. हनुवटीच्या आजूबाजूला लाँग फ्लिक अथवा बॉब करून तुम्ही तुमच्या जबड्याकडे जाणारं लक्ष वळवू शकता. खूप लहान हेअरस्टाईल्स तुमच्या चेहऱ्याच्या फिचर्सना खूपच वाईट दिसतील आणि चौकोनी आकार अजूनच उठून दिसेल.
अशा चेहऱ्यावर टॉप नॉट फारच सुंदर दिसते. सेंटर फ्लिक आणि सेंटर पार्टिंगसुद्धा अशा चेहऱ्यावर साजेसे असतात. गालाच्या दोन्ही बाजूंनी थोडे मोठे कर्ल किंवा फ्लिक (जे हनुवटी कव्हर करणार नाहीत) अशा चेहऱ्यावर चांगले वाटतात आणि चेहरा अंडाकृती दिसतो. सेंटर पार्टिंग अर्थात मध्ये भांग पाडल्यास, तुमच्या कपाळाकडे लक्ष जाते आणि फेस फ्रेमिंग लेअर्सशिवाय मोठे केस बारीक हनुवटी प्रकर्षाने दर्शवतात त्यामुळे यापासून दूर राहणेच योग्य.
अशा चेहऱ्यावर वॉल्युम अधिक घालण्याची गरज असते. अशात केस तुम्ही लेअर्स या प्रकारामध्ये कापू शकता. यामुळे तुमचे केस घनघोर दिसतात आणि गालाची हाडं कमी दिसून येतात. त्याचबरोबर मल्टिपल लेअर कट आणि डिस्कनेक्शन कटदेखील अशा चेहऱ्यासाठी चांगला पर्याय असून त्याच्या लांबीची व्यवस्थित काळजी घेता येते. चेहऱ्याच्या आकारानुसार, छोटे - छोटे फ्लिकसुद्धा मिळतात आणि चेहऱ्यावर एक नवी स्टाईल दिसून येते. फेस फ्रेमिंग लेअर्सबरोबर शोल्डर लेंथ स्टाईलदेखील या चेहऱ्यावर चांगली दिसते. फ्रिंज आणि गर्ली ब्राईड्स खूपच चांगली स्टाईल असून यामध्ये तुमचे फिचर्स अगदी ठळक असतील तर ते सॉफ्ट करण्यासाठी मदत होते.
आपापल्या आवडीनुसार आपल्यावर नक्की काय चांगलं दिसेल हे प्रत्येकाला माहीत असतं. काही मुली नेहमीच आपले केस मोठे ठेवतात, तर काही मुलींना लहान केसच आवडतात. तुम्ही मोठे केस ठेवा किंवा लहान अर्थात ही तुमची आवड आहे. मात्र तुम्ही ठेवलेली हेअरस्टाईल तुमच्या चेहऱ्याला चांगली दिसत आहे का याची तुम्ही काळजी घ्यायला हवी. हेअरस्टायलिस्ट वा हेअर कटरच्या सांगण्यानुसार काही करू नका. सलोनमध्ये गेल्यानंतर हेअर कटिंगच्या पुस्तकामध्ये जी दिसेल ती स्टाईल तुम्हाला आवडली आणि तुम्ही हेअर कट करून आलात, असं कधीही करू नका. त्यामुळे तुम्हाला फारच वाईट अनुभवही येऊ शकतात.
तुम्ही शाळा किंवा कॉलेजमध्ये असता तेव्हा तुम्हाला कमीत कमी वेळामध्ये व्यवस्थित केस बांधून जाता येईल आणि स्टायलिशदेखील दिसता येईल अशा हेअर स्टाईलची गरज असते. अशा हेअर स्टाईल्समध्ये ब्रेड्स, बन किंवा मोकळे केस इतकीच हेअर स्टाईल होते. तुम्ही या व्हिडिओप्रमाणेही हेअरस्टाईल करू शकता.
ऑफिस ही अशी जागा आहे, जिथे तुम्ही सर्वात जास्त वेळ घालवता. तुम्ही ऑफिसध्ये प्रेझेंटेबल दिसण्यासाठी सर्वात जास्त गरजेचे आहे, ते म्हणजे तुमचा लुक परफेक्ट असणं. तुमचा ड्रेस असो वा तुमची हेअरस्टाईल दोन्ही योग्य दिसायला हवं. त्यामुळे तुम्ही वेगवेगळ्या हेअरस्टाईलचा प्रयोग करून बघायला हवा, ज्याने तुम्हाला ऑफिसमध्येसुद्धा वेगळं दिसता येईल. तसंच तुम्हालाही थोडं वेगळं वाटेल. या व्हिडिओमध्ये दाखविलेल्या हेअर स्टाईल्सदेखील तुम्ही नक्की करून पाहू शकता.
पार्टीमध्ये जाण्यासाठी तुम्हाला लागणाऱ्या हेअर स्टाईल्स या ट्रेंडी आणि जरा स्टायलिशच असायला हव्या. सध्या तर जास्त मुली पार्टीमध्ये जाण्यासाठी पार्लरमधूनच आपल्या केसांची स्टाईल बनवून जातात. मात्र पार्टीसाठी तुम्हाला स्वतःलाच हेअर स्टाईल करायची असेल तर या व्हिडिओमध्ये पाहून तुम्ही सहजरित्या स्टाईल्स करू शकता.
फ्रंट पफ डिझायनर लुकची सध्या चलती आहे. साईड व्हिक्टोरियन कर्ल्स, फ्रंट कर्ल ट्विस्टिंग सध्या ट्रेंडिंगमध्ये असून तुम्ही ही हेअरस्टाईल नक्की करून बघू शकता. पुढच्या बाजूला कास्केडिंग व्हेव्ह बनवणंदेखील बऱ्याच मुलींना आवडतं. तसंच याबरोबर क्राऊन एरियावर थोडं उंचवटा देऊन तुमच्या जाड चेहऱ्याला थोडा बारीक लुक देता येऊ शकतो. फ्रंट लुक डिझायनिंग करून क्राऊन एरियावर पफ बनवून त्याला उंच बनवू शकतो.
प्रत्येक नवरीला गजरा शोभून दिसतो आणि तिच्या सुंदरतेला एक शोभा आणतो. लग्नामध्ये भारतीय नववधू दिसण्यासाठी गजरा हा अतिशय चांगला पर्याय आहे. गजऱ्यासह किंवा गजऱ्यासारख्या दिसणाऱ्या कोणत्याही दागिन्यासह लग्नामध्ये हेअरस्टाईल करता येते. तुमचे केस लहान असल्यास, केसांना एक्स्टेंशन लावून वेणी घालून स्टाईल करता येते. सध्या ब्रेड ट्रेंड (वेणी) असल्यामुळे मोठ्या केसांसाठी बऱ्याच ब्रेड्स हेअरस्टाईल्स तुम्ही करू शकता. त्याबरोबरच साईड बनदेखील फॅशनमध्ये आहे, ज्यामध्ये कर्ल क्रिएट करून त्याला साईड बन म्हणून वापरू शकता अथवा कर्ल्स टियारा लुकमध्ये दाखवता येऊ शकते.
डिझायनर वेणी अर्थात ब्रेडवाले हेअरस्टाईल्स सध्या फॅशनमध्ये ट्रेंडिंग आहेत. मॅसी ब्रेड, फिश टेल, कर्ल क्राऊन ब्रेड्स याला सध्या मागणी आहे. आता पारंपरिक वेणी न घालता, लहान केसांना एक्स्टेंशन लावून त्याला पुढच्या बाजूला वेणी घालून डिझाइन करण्याचा ट्रेंड चालू आहे. याबरोबरच साईड बन अर्थात वेणीची फॅशनसुद्धा सध्या खूप चालू आहे. ज्यामध्ये कर्ल क्रिएट करून त्याला साईड बन म्हणून वापरू शकता अथवा कर्ल्स टियारा लुकमध्ये दाखवता येऊ शकते. तुमचे केस लहान असतील आणि तुम्हाला वेणी घालायची असेल तर तुम्ही हा व्हिडिओ पाहून त्याप्रमाणे वेणी घालू शकता.
पोनीटेल ही एक अतिशय सामान्य हेअरस्टाईल आहे, मात्र त्यामध्ये तुम्ही ट्विस्ट करून अतिशय सुंदर लुक मिळवू शकता. मसलन, ब्रेडेड पोनीटेल, कर्ली साईड पोनीटेल, फ्रिंज लो पोनीटेल, डबल पोनीटेल, हाय पोनीटेल या सर्व हेअरस्टाईल तुम्हाला करता येऊ शकतात. ब्रेडेड पोनीटेल बांधताना तुम्हाला अगदी साधी पोनीटेल बनवून त्यानंतर ब्रेड बनवायच असतात. तर कर्ली साईड पोनीटेल घालणं अतिशय सोपं आहे. त्यासाठी तुम्हाला एका बाजूला पोनी घालावी लागते.
अंबाडा ही हेअरस्टाईल आपल्या भारतीय सभ्यतेमध्ये साधारणतः महिलांकडून बनविण्याची खास पद्धत आहे. अंबाडा आता हेअरस्टाईलमध्ये गणला जातो. या लेखात आम्ही अंबाडा बांधायच्या अनेक पद्धती तुम्हाला सांगत आहोत, मात्र या व्हिडिओमध्ये बघून तुम्हाला अंबाडा घालायचा असेल तर यामध्ये तीन पद्धती देण्यात आल्या आहेत.
हो हे खरं आहे की, मोकळ्या केसांच्याही तुम्ही बऱ्याच तऱ्हेने स्टाईल्स करू शकता, जे आम्ही तुम्हाला या लेखामध्ये सांगत आहोत. अशा बऱ्याच हेअरस्टाईल्स असतात ज्या तुम्ही पिन्स लावून वा पिन्स न लावता अगदी सहजपणाने करू शकता. अशा हेअर स्टाईल्स अगदी सहजरित्या लगेच होतात.
ट्विस्ट बॅक हेअर स्टाईलसुद्धा तुमच्यासाठी परफेक्ट असू शकते. त्यासाठी तुम्ही तुमच्या केसांचे दोन भाग पाडायला हवेत. केसांच्या पुढच्या बाजूकडूनच त्यामध्ये ट्विस्ट बनवू शकता आणि चेहऱ्याच्या मागच्या बाजूला घेऊन नंतर टिकटॅक क्लिपने केस फिक्स करावे. केस दुसऱ्या भागातही तशाच पद्धतीने घ्यावे आणि हा लुक तुम्हाला अतिशय एलिगंट लुक देतो.
पुढच्या केसांमध्ये जेल लावून त्यांना व्यवस्थित सेट करून घ्यावे जेणेकरून पुढचे केस अजिबात चिकटलेले दिसणार नाहीत. त्यानंतर एका लेंथमध्ये सर्वच केसांना जेल आणि पाणी लावून घ्यावे त्यानंतर कॅप रोलर लावून केसांना काही वेळेसाठी तसेच ठेवून द्यावे. १ ते २ तासांनंतर या रोलर्सना काढून टाकावे. त्यानंतर तुमचे केस व्हेवी दिसतील आणि वेट लुक दिल्यामुळे केसांमध्ये चमक टिकून राहील आणि त्याचा रंगही बऱ्याच वेळापर्यंत टिकून राहिलेला दिसेल.
ब्रेडेड बँग्जसह अर्धे मोकळे केस तुमच्या लुकला ग्लॅमरस टच देतात. पुढच्या काही केसांना घेऊन वेणी घालावी आणि मागच्या बाजूला अर्ध्या केसांना घेऊन क्लच लावावा. या स्टाईलमुळे तुम्हाला एक नवा लुक मिळतो.
या स्टाईलमध्ये वरून केस लहान ठेवण्यात येतात ज्यामुळे कपाळावर बाऊन्स दिसून येतो आणि खाली केस जास्त ठेवण्यात येतात. केसांच्या या मिस-मॅचमुळे या स्टाईलला डिस्कनेक्शन स्टाईल म्हटलं जातं. ही हेअर स्टाईल सर्वांना चांगली दिसते आणि तुमच्या केसांच्या लेंथ व्यवस्थित ठेवून तुम्हाला ट्रेंडी लुक देते.
गायिका रिहानासारखी ही हेअर स्टाईल आहे ज्यामध्ये मागच्या बाजूला केस लहान तर पुढच्या बाजूला केस मोठे असतात. ही हेअर स्टाईल करून तुम्ही तरूण आणि बारीक दिसू शकता.
केस लांब ठेवून जर तुम्हाला कोणती हेअर स्टाईल करायची असेल तर तुम्ही ३ डी मॅजिक हेअर कट करू शकता. यामध्ये तुमचे वरील केस लहान, तर खाली केस मोठे असतात आणि मधले केस नेहमीच्या लेंथमध्ये असतात. यामध्ये अशा तीन प्रकारचे डायमेंशन दिसून येतात. या कटमुळे मोठे केस मोठे आणि घनघोर दिसतात. ही स्टाईल तुम्हाला स्मार्ट लुक देते. केसांचे टिप्स कलर्ड असल्यास, या हेअरकटची सुंदरता अजून उठून दिसते. ३ डी मॅजिक कटची जादू आधुनिक आणि पारंपरिक कपडे दोन्हीवर उठून दिसते.
वाचा - कोरड्या केसांसाठी 15 घरगुती हेअर मास्क
तुम्हाला तुमच्या लुकला क्लासी बनवयाचे असल्यास, बन हेअरस्टाईल हा उत्तम पर्याय आहे. ही हेअरस्टाईल तुम्ही कोणत्याही आऊटफिटवर कॅरी करू शकता. त्यासठी सर्वात पहिले तुम्हाला केसातील गुंता सोडवून त्याला जेल लावून नीट सेट करावे लागतील जेणेकरून ते सहजपणाने चिकटून राहतील. त्यानंतर एका बाजूला पार्टिशन करून पुढून फिंगर कोंब करावा आणि सर्व केसांना मागे घेऊन अंबाडा बांधावा आणि त्यानंतर बॉब पिनमध्ये फिक्स करावे. या अंबाड्याला हलकासा फॅशनेबल टच देऊन स्टायलिश एक्सेसरीजने त्याला सजवावे आणि मग कलरफुल पिन लावून सेट करावे.
आजकाल हाफ बन हेअरस्टाईल ट्रेंडिंगमध्ये आहे. ही करण्यासाठी तुम्हाला केसांच्या मधला भाग घेऊन मागच्या बाजूला अंबाडा बांधायचा आहे आणि तुमचे बाकीचे केस तसेच मोकळे सोडून ठेवायचे आहेत.
ऑफिसमध्ये काही खास मीटिंग असल्यास, ही हेअरस्टाईल करणे पुरेसे आहे. यासाठी तुम्हाला तुमच्या केसांना फक्त रॅप करायचे आहे आणि पिनअप करायचे आहे. यासाठी तुम्हाला सर्व केस एका बाजूला घेऊन कंगव्याने विंचरून एकत्र घ्यायचेत. त्यानंतर खालून बॉबी पिन्स आणि रबर लावायचे आहेत. केसांना रबर लावण्याच्या जागी पकडून ठेवावे आणि मग कंगव्याने विंचरावे. आता ज्या बाजूने तुम्ही केसांना एकत्र केले आहे त्याच्या विरुद्ध बाजूला ट्विस्ट करायचे. जसं तुम्ही केसांना डाव्या बाजूकडून उजव्या बाजूला घेतले असल्यास, केसांना खालून घेत उजव्या बाजूवरून डाव्या बाजूला रोल करत आणावे. खालून रोल करून वरपर्यंत आणावे आणि मग केसांना बॉबी पिन्स लावून रोलमध्ये पिनअप करावे.
केसांना डिव्हाईड करण्यासाठी सर्वात पहिले साईड पार्टिशन केले आहे आणि त्याबरोबरच इयर टू इयर पार्टिंग पण केले आहे. अाता ज्या बाजूला जास्त केस असतील त्याबाजूचे केस घ्यावेत आणि मग फ्रेंच वेणी घालून बाजूने ते केस पाठी घ्यावेत. दुसऱ्या बाजूला केसांना फ्रेंचसह मिसळून बाजूला आणावे आणि मग रोल्स बनवून ते एकत्र करावेत. मागे बनवलेली फ्रेंच नॉट चांगली दिसण्यासाठी ड्रेसला मॅचिंंग असणाऱ्या एक्सेसरीज लावाव्यात. ही हेअर स्टाईल प्रत्येक पार्टीसाठी योग्य आहे कारण फ्रंट आणि बॅक दोन्ही बाजूने बांधल्यामुळे ही हेअरस्टाईल स्टायलिश दिसते.
वेट लुकसाठी केसांमध्ये हेअर स्टायलिंग उत्पादनाचा वापर करावा लागतो. खरं तर अशा प्रकारच्या लुकसाठी हेअर जेल सर्वात जास्त चांगलं असतं. आपल्या लुकला स्लीक स्टाईल देण्यासाठी केस अगदी व्यवस्थित बांधलेले असणं आणि ते सतत चेहऱ्यावर न येणं गरजेचं आहे. त्यासाठी सर्वात पहिल्यांदा केसांना नीट विंचरून घ्यावं आणि जेल लावून सेट करावं जेणेकरून ते सहजपणाने चिकटून राहतील. त्यानंतर साईड पार्टिशन करून घ्यावं पुढून फिंगर कोंब करावं आणि मग सर्व केस मागे घेऊन त्याला बॉब पिनने फिक्स करावं. या अंबाड्याला हलकासा फॅशनेबल टच देण्यासाठी त्यावर स्टायलिश एक्सेसरीज लावाव्यात अथवा कलरफुल पिन सेट करावी.
मोठ्या केसांसाठी ही हेअरस्टाईल खूपच चांगली आहे. यामध्ये प्रत्येक केसाला कर्लिंग रॉडच्या मदतीने कर्ल करून घ्यावे मात्र कर्ल करण्यापूर्वी त्याआधी त्यात जेल लावून घ्यावे जेणेकरून कर्ल टिकून राहतील. तुमचे केस पातळ असल्यास किंवा लहान असल्यास, आर्टिफिशियल वेणीचे रोल्सदेखील तुम्ही केसांना जोडू शकता. आता साईड पार्टिशन करून एका बाजूला केस घेऊन या कर्ल्सना तुम्ही ट्विस्ट करून आतील बाजूने चिकटवत जा. फंकी लुकसाठी मधून कलरफुल हेअर एक्स्टेंशनचादेखील वापर करू शकता.
मेसी बनची हेअरस्टाईल पार्टी असो वा कँडल लाईट डिनर, प्रत्येक ठिकाणी चांगलीच दिसते. सर्वात चांगली बाब ही आहे की, तुम्हाला तुमच्या हेअरस्टाईल बनविण्यासाठी पार्लर जाण्याची गरज अजिबात भासत नाही. ही हेअरस्टाईल करणे खूपच सोपं आहे. त्यासाठी तुम्हाला सर्वात पहिले तुमच्या केसांचे कर्ल करण्याची गरज आहे. त्यानंतर एक एक कर्ली लट घेऊन मागे त्याला पिनअप करावे. सर्व केसांना पिन अप केल्यानंतर एक्सेसरीजने त्यांना शोभा आणावी. तुमचे केस पातळ असतील तर त्याला पहिल्यांदाच डोनट लावून घ्यावा.
ही हेअरस्टाईल अगदीच सामान्य आहे मात्र करण्यासाठी खूपच सोपी आणि कंफर्टेबल आहे. ही हेअरस्टाईल तुम्ही साडीवर अथवा कोणत्याही पारंपरिक अथवा स्टायलिश लुकसाठी वापरू शकता. ही करण्यासाठी तुम्हाला फक्त तुमच्या केसांवर एक क्राऊन एरियावर अंबाडा बांधून पिनअप करायचं आहे.
साध्या लुकसाठी ही हेअरस्टाईल चांगला पर्याय आहे. हो, साईड पोनीटेल तुमच्या साध्या लुकला अतिशय स्टायलिश बनवते. तुमचे केस जर नैसर्गिक कुरळे असतील, तर तुम्हाला एका बाजूला रबरबँड लावण्याची गरज आहे, जर तुमचे केस अगदी सरळ असतील तरत तुम्ही तुमच्या केसांना कलर करून घ्या. फ्रिंज लो पोनीटेल बनवण्यासाठी केसांचे दोन भाग पाडा त्यानंतर सर्वात पहिले खाली वेणी बांधा आणि मग इतर केसांच्या मदतीने क्राऊन बनवा. केसांना फ्रिंज लुक देण्यासाठी बॅक कोंब करणं विसरू नका. अशा तऱ्हेने तुम्ही तुम्ही नवी स्टाईल करून लोकांकडून कौतुक मिळवू शकता.
पोनीटेलच्या सर्व स्टाईल्समध्ये कर्ली साईड पोनीटेल बऱ्याच मुलींना आवडतं. कर्ली साईड पोनीटेल जीन्स टॉप अथवा सलवार - कमीज दोन्हीवर शोभून दिसतं. हे करण्यासाठी तुम्हाला तुमचे केस कुरळे करून घ्यायला हवेत. कर्ली साईड पोनीटेल बांधण्यासाठी केसांना बाजूला घेऊन वरून त्याला रबरबँड लावावा. केसांवर हेअरस्प्रे करणं किंवा जेल लावणं विसरू नका कारण ही पोनीटेल स्लीक लुकमध्ये जास्त चांगली दिसते.
तुम्हाला तुमचे केस मोकळे ठेवायचे नसतील तर, फिशटेल हेअरस्टाईल तुमच्यासाठी योग्य आहे. ही हेअरस्टाईल दिसायला अगदी स्टायलिश दिसते. ही हेअरस्टाईल कोणत्याही ड्रेसवर उठून दिसते. आधुनिक असो वा भारतीय असो क्लासिक फिशटेल हेअरस्टाईल दिसायला खूपच देखणी असते. ही बांधण्यासाठी तुम्हाला तुमच्या केसांचे दोन भाग करावे लागतात. उजव्या बाजूने अतिशय पातळ लेअर घेऊन डाव्या बाजूच्या केसामध्ये मिसळावे. तसंच डाव्या बाजूने पातळ लेअर घेऊन उजव्या बाजूच्या बटेत ते केस मिसळावे. अशाच तऱ्हेने दोन्ही बाजूने करत वेणी घालत राहावी. असं करता करता तुमची फिशटेल अर्थात खजूरवेणी तयार होईल. या वेणीला पुढच्या बाजूला ठेवून तुमच्या चेहऱ्याची शोभा तुम्ही अधिक वाढवू शकता.
फिशटेल अर्थात खजूर वेणी घालायला तर आम्ही तुम्हाला शिकवलंच आहे. तशाच प्रकारे तुम्ही तुमच्या केसांना पुढच्या बाजूने पार्टिंग करून मग उजव्या बाजूच्या केसांना ट्विस्ट करून मागे घेऊन या. त्यानंतर तुमच्या डाव्या बाजूच्या केसांनाही अशाच प्रकारे ट्विस्ट करून मागे आणा. त्यानंतर दोन्ही बाजूंच्या केसांना एक-दुसऱ्यावर ट्विस्ट करून ट्विस्टिंग रोल वेणी घालू शकता. तुम्हाला हवं असल्यास, दोन्हीच्या मध्ये दुसऱ्या रंगाचे हेअर एक्स्टेंशनदेखील तुम्ही वापरू शकता, ज्यामुळे तुमचा लुक अजून चांगला दिसेल.
सर्वात पहिल्यांदा प्रेसिंग करून केसांना स्ट्रेट लुक द्या आणि नंतर पुढच्या केसांना मधून घेऊन पफ बनवा. पफच्या चारही बाजूला दुसऱ्या रंंगाचे हेअर एक्स्टेंशन लावा. हेअर एक्स्टेंशनला केसांच्या मध्ये घातल्यानंतर एका बाजूला ट्विस्टिंग रोल वेणी घाला. केसांना नंतर साईड पार्टिंग करून नंतर पुढच्या काही केसांना मोकळे ठेवून मानेवर एक मोठी पोनी घाला आणि नंतर सर्व केसांना कर्लिंग रॉडने कुरळे करून घ्या. पुढच्या सोडलेल्या मोकळ्या केसांना ट्विस्ट करून मागून पिनअप करा. पोनीवर फेद अथवा तुमच्या आवडीचे हेअर एक्सेसरीज लावून घ्या.
हाफ क्राऊन ब्रेड हेअरस्टाइल बनवण्यासाठी दोन्ही बाजूला वेणी घालून घ्यावी आणि त्यानंतर मागच्या बाजूला दोन्ही वेण्या घेऊन पिनअप करावे. त्यानंतर तुम्ही पोनी घाला वा अंबाडा बांधा ही हेअरस्टाईल तुम्ही आधुनिक वा पारंपरिक दोन्ही वेशभूषांवर कॅरी करू शकता.
अंबाडा बांधून त्यावर अशा प्रकारे गजरा लावावा की जेणेकरून तुमचा अंबाडा गजऱ्यासह कव्हर होईल. लक्षात ठेवा की, तुम्हाला जर बऱ्याच वेळेपर्यंत तुमचा गजरा तुमच्या अंबाड्यामध्ये टिकून राहायला हवा असेल तर, सर्वात पहिले केस बॉबी पिनसह नीट घट्ट बांधून घ्या. त्यावर हेअरस्प्रे करावा. एका वेणीवर लावलेले बीट्स स्टाईल फ्लॉवर पुरेसे आहेत. त्यामुळे अॅट्रॅक्टिव्ह लुक येतो.
ब्रायडल लुकसाठी सर्वात पहिले केसातील गुंता नीट सोडवून केसावर आयर्न करून घ्यावे. त्यानंतर हेअरस्प्रे करावा आणि वेणी घालून घ्यावी. त्यानंतर क्राऊन एरियाच्या दिशेने गोल फिरून पिनअप करावं. सर्व केसांना एका हॉट रोलरने कर्व्ह करून घ्यावं. आता एका कानापासून दुसऱ्या कानापर्यंत केसांचे एक सेक्शन काढून मधून एक वेणी घालावी. या वेणीवर बाजारात मिळणाऱ्या खोट्या केसांना लावूनही तुम्हाला वरून डेकोरेट करता येऊ शकते.
केसांमध्ये फ्लेक्झिबल होल्ड स्प्रे लावून सर्व केसांना क्राऊन एरियाजवळ घेऊन यावं आणि मग पुढच्या बाजूने प्रेस करून पिनअप करावं. केसांना जेवढी उंची देता येईल द्यावी. त्यानंतर मागच्या केसांचे दोन भाग करून घ्यावे. आता या दोन्ही भागांना दोन सेक्शनमध्ये करून वेणी बांधावी. एका भागाला दुसऱ्या भागामध्ये मिसळून वेणी पूर्ण करावी. तशीच दुसरी वेणीदेखील बांधून घ्यावी. त्यावर नीट हेअरस्प्रे करावा जेणेकरून वेणी जास्त वेळ टिकून राहील. वेणीसह क्रिस-क्रॉसिंग स्टाईल गजरादेखील चांगला दिसतो. तुम्हाला वाटत असेल तर या स्टाईललादेखील तुम्ही तुमच्या ब्रायडल लुकसाठी वापरू शकता.
पुढच्या बाजूला काही केस मोकळे सोडून उरलेल्या केसांचे हॉट रोलर्सने कर्ल करून घ्यावे. आता पुढच्या केसांना ब्रशच्या सहाय्याने क्राऊन एरिया (कपाळाच्या मधोमध) जवळ घेऊन हलके ट्विस्ट करावे. (तुमच्या समोरच्या बाजूने केसांची पार्टिंग दिसणार नाही याची काळजी घ्यावी) पुढच्या बाजूला हलक्या हाताने प्रेस करून पिन लावून घ्यावे. मागच्या बाजूने पुढच्या बाजूला प्रेस करत हेअर पिन्स लावून घ्याव्यात. सॉफ्ट लुकसाठी चेहऱ्याच्या दोन्ही बाजूला पातळ बट तुम्ही काढू शकता. मागच्या उरलेल्या केसांची पोनी घालून त्याच्या मध्ये मध्ये बबल लावून नंतर थोडे केस मोकळे सोडून द्यावे.
पॅडल ब्रशने सर्व केसांना नीट विंचरून क्राऊन एरियापर्यंत घेऊन यावे. त्यानंतर केस नीट पिनअप करून पुढच्या बाजूला प्रेस करावे. त्यानंतर अतिशय काळजीपूर्वक केसांना दोन्ही भागांमध्ये वाटून घ्यावे आणि मग एक भाग ट्विस्ट करून उंच अंबाडा बनवावा. सेट करण्यासाठी वरून हेअरस्प्रे करावा. दुसऱ्या भागामध्ये साधी वेणी घालून घ्यावी आणि पुढच्या बाजूने ती तशीच ठेवावी. या वेणीवर तुम्ही वेगवेगळ्या एक्सेसरीजचा वापरदेखील करू शकता.
या वेणीसाठी तुमचे केस लांब असण्याची गरज आहे. सर्वात पहिल्यांदा केसांना नीट विंचरून घ्यावे. त्यानंतर त्यांची उंच पोनीटेल बांधावी आणि मग मागच्या केसांचे दोन भाग करावे. ब्रायडल लुकसाठी सर्वात पहिल्यांदा नीट केस विंचरून आयर्न करून घ्यावे. त्यानंतर हेअरस्प्रे करून पोनी बांधावी. त्यानंतर क्राऊनएरिया जवळ ते गोल फिरवून पिनअप करून घ्यावे. आता एका कानापासून दुसऱ्या कानापर्यंत केसांचे एक सेक्शन काढून मधून एक वेणी बनवावी. या वेणीवर फुलंदेखील चांगली शोभून दिसतील.
केसांना कंगव्याने तीन विविध पार्टमध्ये करून घ्यावे. तिन्ही पार्टिशन केलेले भाग नीट विंचरून घ्यावे. भारतीय वेणी अथवा याचा आधुनिक लुक अर्थात ज्याला आपण प्लेट्स वा ब्रेड म्हणतो, जी सध्या जागतिक फॅशन झाली आहे. भारतीय संस्कृतीमध्ये या वेणीला अतिशय सन्मानाचा दर्जा आहे. हॉलीवूड आणि बॉलीवूड अभिनेत्रीदेखील ही हेअरस्टाईल फॉलो करतात. कोणताही हंगाम असो ही हेअरस्टाईल नेहमीच चांगली दिसते. विशेषतः उष्णतेच्या दिवसात ही भारतीय वेणी अतिशय फायदेशीर ठरते.
सर्वात पहिले इअर टू इअर पार्टिंग करून मागच्या केसांची पोनी बांधून घ्यावी. त्यानंतर पुढच्या केसांचे फ्लिक्स सोडून बॅक कोम्बिंग करून स्प्रे करून घ्यावा आणि पफ बनवावा. त्यानंतरत पोनी बांधलेल्या केसांचे पाच भाग करावे. चार भागाचे चार रोल्स करून घ्यावे. एका भागात पातळ पातळ आठ वेण्या घालाव्या. रोल्सना कव्हर करताना पिनअप करावे. त्यानंतर फ्लिकला कपाळापासून कव्हर करून मागे आणत पिनअप करावे. त्यानंतर ड्रेसला मॅचिंग हेअर एक्सेसरीज वापराव्यात. ही हेअरस्टाईल केवळ लग्नातच नाही तर कोणत्याही पार्टीमध्येही चांगली दिसते.
सर्वात पहिले इअर टू इअर पार्टिंग करून मागच्या केसांची पोनी बांधून घ्यावी. बॅक कोम्बिंग करून पुढच्या केसांचा पफ बनवून घ्यावा. त्यानंतर मागच्या केसांचा एक लेअर घेऊन कपाळ कव्हर करावं. त्यानंतर पोनी बांधलेले केस कर्ल करून घ्यावे आणि त्यावर आवडणाऱ्या हेअर एक्सेसरीज लावून त्यांना डेकोरेट करावे. तुमचं कपाळ थोडं मोठं असल्यास, ही हेअरस्टाईल तुम्हाला खूपच चांगली दिसेल. ही हेअरस्टाईल करून तुम्ही कोणत्याही पार्टीमध्ये जाऊ शकता.
इअर टू इअर पार्टिंग करून घ्यावी. पुढच्या केसांची बॅक कोम्बिंग करून पफ बनवून घ्यावा. मागच्या केसांचे तीन भाग करून त्याच्या तीन वेण्या घालाव्यात. या सगळ्या वेण्या गोल गोल करून त्याचा अंबाडा घालवा. अंबाड्याच्या मध्यभागी छान हेअर एक्सेसरीजचा वापर करावा. अशा पद्धतीने तुम्हाला आणखी काही युनिक वेस्टर्न वेअरसाठी हेअरस्टाईल करता येतील. त्या देखील तुम्ही ट्राय करायला हव्यात
सर्वात पहिले इअर टू इअर पार्टिंग करून मागच्या केसांची पोनी बांधून घ्यावी. पुढच्या केसांना कपाळाच्या मध्यभागी बॉक्स लेअर काढून उरलेल्या केसांचे बॅक कोम्बिंग करून पफ करून घ्यावे. बॉक् लेअरच्या केसांना ३ भागांमध्ये करावे. प्रत्येक भाग ट्विस्टिंग करून मागच्या बाजूला घेऊन पिनअप करावे. पोनीवाले केस चार भागात विभागून बॅक कोम्बिंग करावे आणि स्प्रे करून लाँग नेटने त्याला कव्हर करावे. या चारही नेटवाल्या हेअर्सना व्हेव्सप्रमाणे पिनअप करावे. आता या स्टाईलवर तुम्हाला आवडणाऱ्या हेअर एक्सेसरीज लावाव्यात.