सुंदर दिसणे हा तर प्रत्येक मुलीचा हक्कच आहे, मग तिचा रंग कोणताही असो. बऱ्याचदा तुमच्या चेहऱ्याचा रंग काय आहे? यापेक्षा तुमची त्वचा किती चांगली आणि किती चमकते आहे हे जास्त गरजेचे असते. तुमची त्वचा चांगली राहण्यासाठी तुमचे खाणे – पिणे अगदी चांगले असायला हवे आणि त्याचबरोबर तुम्ही खूप पाणीदेखील प्यायला हवे. शरीरातून तुमची त्वचा चांगली राहण्यासाठी नक्कीच याची मदत होते. मात्र सुंदर, स्वस्थ आणि तजेलदार त्वचेसाठी केवळ इतक्याच गोष्टी असून फायद्याचे नाही. जितकी आपल्याला आतून काळजी घ्यावी लागते तितकीच त्वचेची काळजी बाहेरूनदेखील घ्यावी लागते. बाहेरून त्वचा सुंदर दिसण्यासाठी आपण नेहमी फेशियलचा आधार घेतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का? फेशियल म्हणजे नक्की काय असते आणि याची का गरज भासते? किंवा फेशियल करण्याचे योग्य वय काय आहे आणि फेशियल करताना नक्की कोणकोणत्या गोष्टीची काळजी घ्यायला हवी? तुमच्या या सर्व प्रश्नांची उत्तरे या लेखामध्ये तुम्हाला सापडतील. चला तर मग, जाणून घेऊया घरगुती फेशियल कसे करतात आणि त्याची माहिती.
Table of Contents
फेशियलचे प्रकार (Types Of Facial In Marathi)
सर्वात पहिल्यांदा फेशियल नक्की किती प्रकारचे असते, हे आपल्याला माहीत असायला हवे, त्याप्रमाणेच आपण आपल्यासाठी कोणते फेशियल योग्य आहे ते निवडू शकतो. मुखत्वे १० प्रकारचे फेशियल असतात…
1. गोल्ड फेशियल
गोल्ड फेशियल चेहऱ्यासाठी अतिशय उपयुक्त असते. हे चेहऱ्याचे रक्ताभिसरण सुधारण्यासह सर्व बॅक्टेरिया आणि चेहऱ्यावरील घाण बाहेर फेकण्यासाठी उपयुक्त असते. तसेच ऊनापासून आलेल्या किरणांपासून बचाव करण्यासाठी या गोल्ड फेशियलचा उपयोग होतो. घरामध्ये एखादा कार्यक्रम असल्यास, गोल्ड फेशियलाला प्राधान्य देण्यात येते.
2. सिल्व्हर फेशियल
याच्या नावावरूनच कळून येते की, चांदीसारखा रंग अर्थात गोरी त्वचा मिळवण्यासाठी याचा उपयोग करण्यात येतो. सिल्व्हर फेशियल विशेषतः उष्णतेच्या हंगामात जास्त प्रमाणात वापरले जाते. हे त्वचेच्या आतल्या स्वच्छतेसह त्वचा चांगली ठेवण्यासाठी मदतही करते. सिल्व्हर पार्टिकल्सना त्वचेसंबंधी समस्या सोडविण्यासाठी याचा वापर करण्यात येतो. सिल्व्हर फेशियल केल्यानंतर तुमची त्वचा अधिक उजळ आणि गोरी दिसण्याचे हेच एक महत्त्वाचं कारण आहे.
3. डायमंड फेशियल
डायमंड फेशियलमध्ये डायमंड पार्टिकल्सचा वापर करण्यात येतो, जो चेहऱ्याचे रक्ताभिसरण वाढविण्यास मदत करतो. आपल्या रक्तामध्ये त्वचेसाठी आवश्यक असणारी सर्व पोषक सत्त्व असतात आणि जेव्हा रक्ताभिसरण वाढते तेव्हा चेहऱ्यावरील येणाऱ्या सुरकुत्यांची समस्या यामुळे दूर होते. डायमंड फेशियल त्वचा आणि चेहऱ्याच्या मांसपेशींनाही मजबूत बनवते आणि त्वचेमध्ये एक वेगळी चमक निर्माण करते.
4. फ्रूट फेशियल
फ्रूट फेशियल हे सर्व प्रकारच्या त्वचेसाठी उपयोगी ठरते. याची विशेषतः आहे की, फ्रूट फेशियल फक्त कोणत्याही क्रीमवर अवलंबून नसते. तर ताज्या फळांनीदेखील फ्रूट फेशियलमध्ये मसाज करता येऊ शकतो. ताज्या फळांनी मसाज करताना तुम्ही तुमच्या त्वचेला लागू होत असेल असेच फळ निवडावे. ज्यांची त्वचा कोरडी आहे, त्यांनी केळं, तर तेलकट त्वचा असणाऱ्यांनी संत्र, अगदीच कोरडी त्वचा असणाऱ्यांनी स्ट्रॉबेरी आणि पिगमेंटेशन असणाऱ्या त्वचेसाठी पपया वापरावा. तुम्हाला या फळांचा अगदी जसाच्या तसा वापर करायचा नसल्यास, बाजारामध्ये या फळांचेच फ्रूट फेशियल क्रीमदेखील उपलब्ध असते.
5. हर्बल फेशियल
या प्रकारच्या फेशियलमध्ये झाडांच्या पानांपासून बनविण्यात आलेले क्रीम आणि फेसपॅकचा वापर करण्यात येतो. याचा सर्वात जास्त प्रयोग हा तेलकट त्वचेसाठी करण्यात येतो. हर्बल फेशियलमध्ये लिंबू पावडर, कोरफड, अवोकाडो, हळद आणि ओटमिलयासारख्या नैसर्गिक हर्बल्सचा वापर करण्यात येतो.
6. चॉकलेट फेशियल
चॉकलेट फेशियल तुमच्या चेहऱ्यावर एक चमक आणते. याचा सुगंध खूपच चांगला असल्यामुळे जास्त लोक चॉकलेट फेशियल करण्याला प्राधान्य देतात. त्वचेवर पडलेले डाग आणि आलेल्या पुळ्या यामुळे कमी होतात. तसेच त्वचेवरील सुरकुत्या कमी करण्यासाठी याचा चांगला उपयोग होतो. या फेशियलमध्ये कोको पावडर, ब्राऊन शुगर, मध या वस्तूंचा समावेश असतो.
7. अँटी- एजिंग फेशियल
वाढत्या वयाच्या त्वचेवर लगाम लावण्यासाठी या फेशियलचा वापर करण्यात येतो. आजच्या काळात वाढता तणाव आणि प्रदूषण आपल्या त्वचेवर खूपच वाईट परिणाम करत आहे. यामुळे वयाच्या आधीच त्वचेवर सुरकुत्या यायला सुरुवात होते. त्यासाठी अँटी – एजिंग फेशियल करण्यासाठी वयाच्या चाळीशीची वाट पाहू नका, वयाच्या ३० व्या वर्षीच या फेशियलची सुरुवात करा. चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करण्यासाठी हा चांगला उपाय आहे.
8. डी- टॅन फेशियल
डॉल्यानंतर त्वचेचा रंग अचानक बदलतो. त्याला आपण टॅन म्हणतो. उष्णतेमध्ये बाहेर फिरताना किंवा अगदी समुद्रकिनारीदेखील आपल्या शरीराच्या उघड्या भागावर टॅनिंगचा परिणाम होत असतो. डी – टॅन हायड्रेटिंग फेशियल आपल्या चेहऱ्यावरील टॅनिंग दूर करते.
9. अॅक्ने फेशियल
अॅक्ने फेशियल हे मुख्यत्वे चेहऱ्यावर मुरूमं वा पुळ्या असणाऱ्या त्वचेसाठी वापरण्यात येते. या फेशियला मूळ उद्देश चेहऱ्यावरील डाग काढून त्वचा चांगली करण्याचा असतो. चेहऱ्यावरील आलेले जास्त तेल वा घाण हटवून चेहरा साफ करण्याचे काम या फेशियलमधून करता येते.
10. वाईन फेशियल
वाईन फेशियल सध्या जास्त प्रमाणात प्रसिद्ध आहे किंवा सध्या वाईन फेशियल ट्रेंडमध्ये आहे असे म्हटले तर जास्त सोयीस्कर ठरेल. या फेशियलमुळे फक्त त्वचला डी – टॅनच नाही केले जात तर त्वचेवर एक वेगळी चमकही येते. या फेशियलमध्ये रेड वाईन, स्ट्रॉबेरी, द्राक्ष आणि इसेन्शियल ऑईलचा समावेश असतो.
घरी फेशियल करण्याच्या पद्धती (Facial Steps In Marathi)
पार्लरमध्ये जाऊन महाग फेशियल करण्यापेक्षा घरी स्वतः फेशियल करणे अतिशय सोपे आहे. आम्ही तुम्हाला घरी कशा प्रकारे फेशियल करायचे याची इत्यंभूत माहिती देत आहोत.
1- फेशियल करताना तोंडावर केस येऊ नयेत यासाठी सर्वात पहिले तुमचे केस बांधून घ्या. यासाठी तुम्ही हेअरबँडदेखील वापरू शकता.
2- सर्वात पहिल्यांदा चेहरा साफ करण्यासाठी क्लिन्झिंग करावे. घरी क्लिंजर बनविण्यासाठी एका वाटीत २ चमचे दही आणि १ चमचा मध घ्यावा. आता चेहऱ्यावर हा लेप लावून कमीत कमी ५ मिनिट ठेवावे. त्यानंतर चेहरा साफ करून घ्यावा.
3- क्लिन्झिंगनंतर चेहऱ्यावरील स्क्रब करण्याची गरज असते. त्यासाठी तुम्ही बाजारामध्ये मिळणाऱ्या स्क्रबरचा वा घरी स्वतः बनविलेल्या स्क्रबरचा वापर करू शकता. घरी स्क्रबर बनविण्यासाठी एक केळं मिक्सरमध्ये १ चमचा दूध, दोन चमचे ओट्स आणि एक चमचा मधाबरोबर वाटून घ्यावे. आता हे तुमच्या चेहऱ्यावर १० मिनिट्सपर्यंत हळूहळू स्क्रब करत राहावा आणि नंतर चेहरा थंड पाण्याने धुवून घ्यावा.
4- स्क्रबिंगनंतर चेहऱ्यावर मॉइस्चराईज्ड करण्यात येते, त्यामुळे तुमचे पुढचे पाऊल हे मॉइस्चराईज करणे आहे. स्क्रबिंग केल्यानंतर त्वचेची छिद्र उघडली जातात. त्यानंतर मॉईस्चराईजर त्वचेच्या आत जाऊन त्वचेला मऊ आणि मुलायम बनवते. त्यासाठी तुम्ही व्हिटामिन ए आणि एफ असलेल्या बटरचा वापर करू शकता. मात्र चेहऱ्यावर लावण्यापूर्वी याची एक्स्पायरी तारीख नक्की काय आहे याची पडताळणी करून पाहावी. चेहऱ्यावर अब्सॉर्ब होईपर्यंत मसाज करत राहावा.
5- यानंतर फेस-पॅक करण्याची वेळ येते. तसे तर बाजारामध्ये तुम्हाला तुमच्या त्वचेनुसार अनेक फेसपॅक मिळतात मात्र तुम्ही घरीच तयार करणे जास्त सोयीचे आहे. कारण घरी बनवलेला फेसपॅक हा ताजा तर असतोच पण त्यामध्ये नैसर्गिक गुणदेखील जास्त असतात. त्यामुळे घरी पपईमध्ये थोडेसे मध घालून पॅक बनवून घ्यावा किंवा ३ चमचे बेसनमध्ये थोडीशी हळद घालून आणि एक चमचा दूध घालून फेसपॅक बनवू शकता.
6- तुमचा फेसपॅक सुकल्यानंतर, थंड पाणी आणि स्पंजच्या सहाय्याने साफ करून घ्यावा. जर थंडीमध्ये फेशियल करत असाल तर पाणी थोडे कोमट असू द्यावे.
7- फेशियल झाल्यानंतर चेहऱ्यावर मॉईस्चराईजर नक्की लावावे. त्यासाठी तुम्ही रोज वापरत असलेल्या मॉईस्चराईजरचादेखील उपयोग करू शकता.
बाजारात मिळणारे उत्कृष्ट फेशियल किट (Best Facial Kit In Marathi)
खरंतर बाजारामध्ये खूप सारे ब्रँड्स आहे ज्याचे फेशियल किट उपलब्धल आहेत. मात्र आम्ही तुम्हाला इथे ५ असे ब्रँड्स सांगणार आहोत, ज्याचे फेशियल किट खरेदी करून तुम्ही पार्लरमध्ये न जाता घरच्या घरी आपले फेशियल (gharguti facial) करू शकता.
1. वीएलसीसी फेशियल किट (VLCC Facial Kit)
वीएलसीसी ब्रँडमध्ये तुम्हाला गोल्ड, सिल्व्हर, डायमंड, पर्ल, फ्रूट, पपई, इन्स्टंट ग्लो इत्यादी व्हरायटी मिळते. याच्या एका किटमध्ये क्लिन्झर, स्क्रबर, जेल, मसाज क्रीम, पॅक आणि आफ्टर फेशियल जेल इतक्या वस्तू असतात. तसेच फेशियल कसे करायचे याच्या सूचनादेखील दिलेल्या असतात. तुमची आवड आणि त्वचेनुसार तुम्ही याची खरेदी करू शकता.
2. लोटस हर्बल फेशियल किट (Lotus Herbal Facial Kit)
लोटस ब्रँड हा जास्त हर्बल उत्पादनांसाठी प्रसिद्ध आहे. हर्बल असल्यामुळे याचे फेशियल किट सर्व प्रकारच्या त्वचेसाठी उपयुक्त असतात. तसेच याचा परिणाम बऱ्याच कालावधीपर्यंत राहातो. पॅकवर दर्शविण्यात आलेल्या सूचनांप्रमाणे तुम्ही घरच्या घरी स्वतःचे फेशियल (gharguti facial) करू शकता.
3. O3 फेशियल किट (O3 Facial Kit)
O3 चे फेशियल किट हे पूर्वी फक्त पार्लरमध्ये मिळायचे, मात्र आता याचा वापर करण्यासाठी तुम्हाला पार्लरमध्ये जाण्याची गरज नाही. O3 चे सर्व फेशियल किट आता तुम्हाला ऑनलाईनदेखील मिळू शकतात. याचे फेशियल किट इतर ब्रँडच्या तुलनेत थोडे महाग असते मात्र फेशियलच्या बाबतीत तुम्हाला अजिबात हे किट निराश करत नाही.
4. नेचर्स इसेंस फेशियल किट (Natures Essence Facial Kit)
यामध्ये गोल्डपासून ते डायमंड, सिल्व्हर आणि पर्ल सर्व तऱ्हेचे फेशियल उपलब्ध असते. याच्या फेशियल किटची किंमत जास्त नसते. कमी बजेटमध्ये चांगला फेशियल ग्लो हवा असल्यास, नेचर्स हा एक चांगला ब्रँड आहे.
5. एरोमा मॅजिक फेशियल किट (Aroma Magic Facial Kit)
ब्लॉसम कोचर एरोमा मॅजिक फेशियल किटमध्ये तुम्हाला पर्ल, सिल्व्हर, चारकोल, स्किन ग्लो, ब्रायडल ग्लो आणि स्किन लायटनिंग यासारखे फेशियल किट मिळतात. तुमच्या आवडी आणि त्वचेच्या टोननुसार तुम्ही याची खरेदी करून वापरू शकता.
फेशियलबाबत विचारण्यात येणारे प्रश्न आणि त्यांची उत्तरे (FAQ’s)
1. फेशियल सुरु करण्याचे नक्की वय कोणते?
सध्या वाढता ताण आणि प्रदूषण लक्षात घेता २५ व्या वर्षीच फेशियल करायला सुरुवात केली पाहिजे.
2. वयानुसार, एक फेशियल झाल्यानंतर दुसऱ्या फेशियलसाठी साधारण किती अंतर असायला हवे?
तुमचे वय जर २५ ते ३० वर्षांदरम्यान असेल तरत तुम्ही महिन्यातून एक वेळा फेशियल करावे. तेच जर तुमचे वय ३० ते ३५ असेल तर साधारण २० दिवसांच्या अंतराने फेशियल करावे. ३५ पेक्षा जास्त वय असल्यास, त्वचेची जास्त काळजी घ्यावी लागते त्यामुळे दर १५ दिवसांनी फेशियल करावे.
3. फेशियल करते वेळी कोणत्या गोष्टी ध्यानात ठेवाव्या?
फेशियल नेहमी थंड पाण्यानेच करावे. कारण फेशियल करताना त्वचेमध्ये उष्णता निर्माण होते आणि त्यासाठी थंड पाणी जास्त चांगले असते. थंडीच्या दिवसात कोमट पाण्याचा वापर करू शकता. त्याशिवाय फेशियलसाठी चेहऱ्यावर नेहमी सर्क्युलर मोशनमध्येच हातांचा वापर करावा.
4. फेशियलनंतर लगेच त्वचेची काळजी कशी घ्यावी?
फेशियल केल्यानंतर त्वचेला नेहमी उन्हापासून संरक्षण द्यावे. तसेच आयब्रो अथवा अपरलिप नेहमी फेशियलच्या आधी करून घ्यावे याची काळजी घ्यावी. नंतर केल्यास, त्याजागी लाल निशाण वा हलक्या पुळ्या होण्याची शक्यता असते.