ADVERTISEMENT
home / फॅशन
नेहा धुपियाच्या या १० फॅशन टिप्समुळे गरोदरपणातही दिसू शकता स्टायलिश

नेहा धुपियाच्या या १० फॅशन टिप्समुळे गरोदरपणातही दिसू शकता स्टायलिश

गरोदरपणाच्या काळामध्ये साधारणतः महिला आपल्या फॅशनसेन्स संदर्भात फारच द्विधा मनस्थितीमध्ये असतात. आपले जुने कपडे बघून हे कपडे सैल करून घ्यावे की, आपला वॉर्डरोब नव्या कपड्यांनी भरावा याबाबत त्यांना काहीच कल्पना नसते. गरोदरपणामध्ये या अशा अवस्थेतून प्रत्येक स्त्री जाते. मात्र नऊ महिने हा कालावधी कोणत्याही ताणतणावात घालवण्यापेक्षा अगदी हसत – खेळत तुम्ही आनंद घ्यायला हवा. तुम्ही गरोदर आहात याचा अर्थ असा अजिबात नाही की, तुम्ही स्टायलिय राहू नये अथवा सध्याच्या ट्रेंडसह स्वतःला अपडेट करू नये असेही नाही. या काळातही तुम्हाला स्टायलिश दिसायचे असेल तर आपल्या फॅशनसेन्ससह अजिबात तडजोड करू नका. बॉलीवूडच्या बऱ्याच अभिनेत्रींनी गरोदरपणामध्ये सामान्य महिलांसाठीही फॅशन गोल्स सेट केले आहेत. करीना कपूर खाननंतर नेहा धुपियानेदेखील आपला हा गरोदरपणाचा काळ खूपच आनंदाने घालवला. तुम्ही जर कर्मचारी महिला असाल अथवा लेटेस्ट फॅशन ट्रेंड अपडेट करत राहणाऱ्या असलात तर नेहा धुपियाच्या या १० प्रेगनन्सी लुक्सकडे नक्की तुम्ही पाहायला हवे. नेहाने नुकताच १८ नोव्हेंबरला गोंडस मुलीला जन्म दिला आहे आणि तिचं ‘मेहेर’ असं गोड नावं ही ठेवण्यात आलंय. 

1. 50 शेड्स ऑफ ग्रे

winter-pregnancy-fashion

हा रंग नेहमीच एव्हरग्रीन मानला जातो. याची फॅशन कधीही जात नाही आणि याचे वेगवेगळे शेड्स नेहमीच कोणत्याही स्किन टोनवर उठून दिसतात. तुम्हाला जर वेस्टर्न आऊटफिट घालणे आवडत असेल पण गरोदरपणात ते घालण्यासाठी तुम्हाला जर थोडा संकोच वाटत असेल तर नेहा धुपियाचा हा लुक तुम्हाला नक्कीच आत्मविश्वास देईल. नेहाने राखाडी आणि पांढऱ्या ड्रेसला एका गडद राखाडी रंगाच्या श्रगबरोबर अतिशय सुंदररित्या कॅरी केले आहे. या श्रगचे डिझाईन अतिशय स्टायलिश आहे आणि हा ड्रेस फॉर्मल इव्हेंट्समध्येही घालता येऊ शकतो.

ADVERTISEMENT

Also Read About प्रेरणादायक फॅशन कोट

2. रंगबेरंगी…

pregnancy-fashion-vibrant-color

तुम्हाला जर गडद रंगाचे वावडे नसेल तर तुम्ही नेहा धुपियाप्रमाणे पिवळा आणि पांढरा असे कॉम्बिनेशन असलेला ड्रेस घालू शकता. ब्रंच असो वा दुपारचे जेवण असो, तुमच्या बरोबर असणाऱ्या व्यक्तींना तुम्ही या ड्रेसने नक्कीच आपलेसे करू शकता. चांगली छाप पाडू शकता. यासह ब्राऊन अथवा काळ्या रंगाचे ब्रेसलेट वा दुसरी एक्सेसरीजदेखील तुमच्या लुकला एक वेगळी शोभा आणू शकतात. गरोदर महिलांनी आऊटफिटच्या रंगाबरोबर नक्कीच प्रयोग करायला हवेत. नीरस रंग घालण्याऐवजी असे गडद रंग निवडावे ज्यामुळे त्या आनंदी राहू शकतात आणि समोरच्या माणसालाही सकारात्मक भावना निर्माण होईल.

ADVERTISEMENT

3. मलमली ओढणी

ethnic-pregnancy-fashion

Also Read Dresses For Every Type Of Honeymoon In Marathi

गरोदरपणामध्ये घरामध्ये कोणती पूजा असेल वा अशा तऱ्हेच्या कोणत्या कार्यक्रमाला जायचे असल्यास, पारंपरिक कपडेच घालायचे असतील, तर नेहा धुपियाचा हा लुक तुमची नक्की मदत करू शकेल. तुम्हीदेखील नेहासारखा असा लाईट हिरव्या रंगाचा, पांढऱ्या आणि पीच शेडचा पंजाबी अथवा सूट घेऊ शकता. गरोदरपणानेे महिला थोडे ढगळ कपडे घालण्यासाठी प्राधान्य देतात आणि त्यांना त्यामध्ये अतिशय हलके वाटते त्यामुळे चुडीदार अथवा लेगिंगऐवजी प्लाझो, शरारा अथवा सलवार घालणेच योग्य. सलवार – सूटबरोबर फ्लॅट चप्पल घालावी आणि पारंपरिक दागिने घालून अशा पार्टीमध्ये वावरावे.  

ADVERTISEMENT

4. फिट आहे तर हिट आहे…

lack-pregnancy-fashion

गरोदरपणाच्या काळामध्ये आपली स्वतःची आणि बाळाची काळजी घेण्यासाठी आईने तंदुरुस्त असणे अतिशय गरजेचे आहे. योग, मेडिटेशन आणि हलकाफुलका व्यायाम करून आपली तब्बेत नीट ठेवू शकता. तुम्ही जर जिममध्ये जात असाल किंवा प्रेगनन्सी क्लब जॉईन केला असेल तर नेहा धुपियाप्रमाणे हा जिम लुकदेखील तुम्हाला योग्य दिसेल. काळा टीशर्ट आणि ट्राऊजर्ससह काळ्या आणि लाल रंगाच्या जॅकेटसह तुम्ही तुमचा जिम लुक ठेवू शकता. तुम्हाला काळा रंग घालायचा नसल्यास, दुसऱ्या रंगाचा वापरही तुम्ही करू शकता.

5. बेबीमूनची तयारी

ADVERTISEMENT

pregnancy-fashion-short-dress

आजकाल भारतात बेबीमून कल्चर खूपच हिट आहे. लग्नानंतर एकमेकांना जाणून घेण्यासाठी जोडीदार आपले हनीमून प्लॅन करतात. तशाच तऱ्हेने मूल जन्माला येण्याआधी बेबीमूनला जाण्याचा सध्या ट्रेंड आहे. बेबीमूनला जाणाऱ्या जोड्या या आपल्या आई – बाप होण्यापूर्वीचा काळ आनंदाने घालवतात आणि आपली नवी जबाबदारी निभावण्यासाठी स्वतःला सहजरित्या तयार करतात. तुम्हीदेखील तुमच्या नवऱ्यासह बेबीमूनची योजना आखत असाल तर नेहा धुपियाचा हा बीच लुक तुम्हाला नक्कीच आवडेल.

6. फॅशनचा जलवा

pregnancy-fashion-long-dress

ADVERTISEMENT

गरोदरपणाच्या नऊ महिन्याच्या काळामध्ये घर वा ऑफिस इतकेच जग नसते. त्यामुळे तु्म्ही नक्कीच कंटाळता आणि मग हा काळ तुम्ही आनंदाने घालवू शकत नाही. आजकाल शहरामध्ये मॉमी क्लब ही संकल्पना चांगली रूळली आहे. तुमच्याजवळ असा कोणताही क्लब नसल्यास, तुम्ही त्रास करून घेऊ नका. तुमचा नवरा अथवा तुमच्या मित्रमैत्रिणींसह फिरायला जाण्याची योजना करा. तुमच्या व्यग्र असणाऱ्या मित्रमैत्रिणींबरोबरही प्लॅन करा आणि आपला हा शॉर्ट आऊटिंग प्लॅन तुम्ही लाल आणि निळ्या फुल गाऊनसह मजेदार बनवू शकता.

7. साधा आणि सोबर नवा अंदाज

pregnancy-fashion-flowy-dress

गरोदर महिला स्वतःला अगदी सहज वाटावे असे आणि आपला बेबी बंप दिसावा अशा तऱ्हेचे कपडे गरोदरपणामध्ये घालण्यास प्राधान्य देत असतात. तुम्हालादेखील अशा लुकचा आऊटफिट हवा असेल, ज्यामध्ये तुम्ही सुंदर तर दिसालच पण अतिशय सहज वावरूही शकाल तर नेहा धुपियाचा या ब्राईट पिवळा मॅक्सी गाऊन योग्य आहे. या गाऊनसह नेहाने ओव्हरकोटदेखील कॅरी केला आहे. शिवाय सध्या गाऊन फॅशनमध्येही आहे आणि यामुळे साध्या आणि सोबर लुकमध्ये छान दिसू शकता.

ADVERTISEMENT

जर तुम्हाला ही लक्षणं जाणवत असतील तर तुम्ही प्रेग्नंट असू शकता (Pregnancy Symptoms In Marathi)

8. अदा आणि नखरे

summer-pregnancy-fashion

तुम्हाला जर एखाद्या मीटिंग, कॉन्फरन्स वा सेमिनारचा भाग व्हायचं असेल आणि तुमच्या फॅशनसेन्सबद्दल तुम्हाला द्विधा मनस्थिती असेल, तर तुम्ही तुमच जुने बिझनेस सूट्स बघून नका. जर तुमचं आयुष्य आता नवे आहे तर फॅशन जुनी कशाला? गडद हिरव्या रंगाचे आऊटफिट फॉर्मल मीटिंगसाठी योग्य आहे. यामध्ये गळ्यावर जे डिझाईन आहे, ते टाय वा स्कार्फचा लुक देत आहे. जर तुम्ही अशा तऱ्हेचा आऊटफिट कॅरी केला, तर नक्कीच सगळ्यांच्या नजरा तुमच्यावर खिळतील.

ADVERTISEMENT

9. रात्रीच्या पार्टीसाठी

classic-pregnancy-fashion

गरोदर आहात म्हणून पार्टीला जाणार नाही असे तर नक्कीच नाही. तुम्ही जर तुमच्या खाण्या-पिण्यावर व्यवस्थित नियंत्रण ठेवू शकत असाल तर कॉकटेल पार्टीला जाण्यापासून कोणीच तुम्हाला अडवू शकत नाही. अशा नाईट पार्टीमध्ये तुम्हाला जर काही इंडो – वेस्टर्न घालायचे असेल तर हा लाल आणि काळा ड्रेस नक्कीच स्टाईल स्टेटमेंट ठरू शकतो. जर थंडी असेल आणि तुम्हाला स्लीव्हलेस घालायचे नसेल तर या ड्रेसवर शॉर्ट जॅकेट अथवा स्टोल घेऊ शकता.

10. पारंपरिकतेमध्येच फॅशनचा रंग

ADVERTISEMENT

ethnic-fashion-in-pregnancy

प्रत्येक वर्षी सणांमध्ये आपण उत्साहाने सहभागी होत असतो. मात्र यावर्षी स्वतःला थोडा आराम द्या. आता आराम करण्याचा वेळ मिळालाच आहे, तर त्या वेळामध्ये फेस्टिव्ह वेअर नक्की काय करायचे ? यावरही विचार करा. यावर्षी नक्की सणासुदीला काय घालायचे आहे याचा विचार जर तुम्ही करत असाल तर, जांभळ्या आणि सोनेरी पारंपरिक पोशाखाबाबत नक्की तुमचे काय मत आहे सांगा. यासह टिपिकल प्लाझो, सलवार वा शरारा घालायचा नसल्यास, स्कर्टसहदेखील तुम्ही घालू शकता.

20 Nov 2018

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT