राखी करणार लॉस एंजेलिसमध्ये दीपक कलालशी लग्न

राखी करणार लॉस एंजेलिसमध्ये दीपक कलालशी लग्न

राखी सावंत आणि कल्ला हे तर समीकरणच आहे. सध्या बॉलीवूडमध्ये लग्नाचे वारे वाहत आहेत. राखी म्हणजे वाहत्या गंगेत हात धुवून घेणारं व्यक्तीमत्त्व. नाना आणि तनुश्री दत्ताच्या प्रकरणातही राखीने तेच केलं आणि आता दीपिका आणि रणवीर, प्रियांका - निकच्या लग्नांच्या सोशल मीडियावर येणाऱ्या बातम्यांमध्ये पुन्हा एकदा राखीनेही उडी मारलेली दिसून येत आहे. सध्या लग्नाचा हंगाम असून आपणही लग्न करणार असल्याचं राखीनं सोशल मीडियावर घोषित केलं असून मजेशीर गोष्ट ही आहे की, राखीने निवडलेला जोडीदार हा दुसरा - तिसरा कोणी नसून दीपक कलाल आहे. दीपक कलाल सध्या ‘इंडियाज गॉट टॅलेंट’मध्ये दिसत असून सोशल मीडियावर त्याचे भन्नाट व्हिडिओजदेखील आहेत. पण दीपक ज्या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे त्याला राखीच योग्य जोडीदार आहे असं म्हणावं लागेल. कारण दोघेही प्रसिद्धीसाठी हपापलेल्या लोकांपैकी आहेत. मात्र हादेखील राखीचा कोणतातरी पब्लिसिटी स्टंट असावा अशीच सध्या चर्चा आहे.

45347354 411036649435831 3565049109162384594 n
राखीने सोशल मीडियावर प्रसिद्ध केली लग्नपत्रिका


राखीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर दीपक कलाल आणि आपल्या लग्नाची पत्रिका पोस्ट केली आहे. 31 डिसेंबरला लॉस एंजेलिसमध्ये संध्याकाळी 5.55 वा. आपण लग्न करत असल्याचं यामध्ये म्हटलं आहे. त्यानंतर राखी दीपकचे वेगवेगळे व्हिडिओजदेखील इन्स्टावर पोस्ट करून खूपच मजेशीर कॅप्शन्स लिहित आहे. एका पोस्टमध्ये तर ‘मला नवरा हवा आहे, डान्स मास्टर नको, कसं होणार माझं देवा’  अशा तऱ्हेची कॅप्शन राखीने लिहिली आहे. तर दीपिका आणि रणवीरचा एक फोटो एडिट करून स्वतःचा आणि दीपकचा चेहरा फोटोशॉप करून पोस्ट केला आहे. राखीने स्वतः आपण लग्न करणार असल्याचं मीडियाला सांगितलं असलं तरीही यापूर्वीही राखीने स्वतःच्या स्वयंवरमध्ये इलेशला पसंत करूनही नंतर लग्न मोडलं होतं. त्यामुळे राखीवर विश्वास ठेवायचा की नाही हादेखील एक प्रश्नच आहे. तसंच दीपक कलालकडे पाहता राखी नक्की त्याच्याशी लग्न करेल का हादेखील एक प्रश्न आहे. दरम्यान दुसऱ्या बाजूला दीपकनेही आपल्या आईवडिलांचा एक संदेश राखीसाठी फोटोसह पोस्ट केला आहे, ‘राखी सावंत, दीपकला खूष ठेव बेटा, आई - बाबा तुझी लॉस एंजेलिसमध्ये वाट पाहात आहेत’.


mom - dad


दीपक कलाल आहे कोण?


दीपक कलाल सध्या ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ या शो मध्ये दिसून येत आहे. मात्र त्यापूर्वी दीपकचे अनेक विचित्र व्हिडिओज युट्यूब आणि इन्स्टावर आले असून दीपकचे व्हिडिओज मोठ्या प्रमाणात पाहिले जातात. हे व्हिडिओ आणि दीपकचं वागणं यामध्ये विचित्र असलं तरी एखाद्याला हसायला मात्र नक्कीच येतं. त्यामुळे दीपकचे चाहते आहेत की नाही यापेक्षा त्याच्या व्हिडिओजना व्ह्यू जास्त प्रमाणात मिळतात हे जास्त महत्त्वाचं आहे. दीपक कलाल मूळचा पुण्याचा असून त्याचं केवळ 10 वी पर्यंत शिक्षण झालं आहे.आर्थिक परिस्थितीमुळे त्याला शिक्षण सोडावं लागलं. मात्र त्यानं मुंबईतील वांद्रा येथे एक लहानसा हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स पूर्ण केला आणि त्यानंतर एका 3 स्टार हॉटेलमध्ये त्यानं रिसेप्शनिस्टची नोकरी केली. पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये दीपकचे व्हिडिओ अतिशय प्रसिद्ध असल्याचा दावा दीपकने केला असून त्याला भारतातही प्रसिद्धी मिळवायची आहे. दीपकने बिग बॉससाठी ऑडिशनही दिली होती. मात्र नंतर त्याने आलेली ऑफर स्वीकारली नाही असं सांगितलं होतं. 2011 मध्ये दीपकचा एक व्हिडिओ समोर आला ज्यामध्ये त्याने ‘मोदीजी मैं आपको पप्पी दूंगा’ म्हटलं होतं आणि त्यानंतर त्याला प्रसिद्धी मिळायला सुरुवात झाली.


45363661 195040144767696 30915713731825875 n
 

 

 


View this post on Instagram


 

 

Saram nahi aati meti ma ki bra chori ki teri ma ki bra pahen depu darling u r to much


A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511) on
राखी आणि दीपक या दोन्ही अशा व्यक्ती आहेत ज्यांच्यावर विश्वास ठेवणं फारच कठीण आहे. प्रसिद्धीसाठी या दोन्ही व्यक्ती काही करू शकतात हे सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे आता 31 डिसेंबरला संध्याकाळीच या नाटकावरील पडदा उघडेल हे नक्की.


इमेज सोर्स - इन्स्टाग्राम


POPxo is now available in six languages: English, Hindi, Tamil, Telugu, Marathi and Bangla.


AWESOME NEWS! POPxo SHOP is now Open! Get 25% off on all the super fun mugs, phone covers, cushions, laptop sleeves, and more! Use coupon code POPXOFIRST. Online shopping for women never looked better!