ADVERTISEMENT
home / लग्न फॅशन
दीपिका- रणवीरच्या लग्नाच्या कपड्यांची गोष्ट…

दीपिका- रणवीरच्या लग्नाच्या कपड्यांची गोष्ट…

नोव्हेंबर आणि डिसेंबर महिना म्हणजे लग्नाचा अगदी हंगामच आहे. मात्र यामध्ये सर्वात जास्त चर्चा झाली ती दीपिका – रणवीरच्या लग्नाची. येत्या काही दिवसातच प्रियांकाही निकबरोबर विवाहबद्ध होत आहे. हे सेलिब्रिटी लग्नामध्ये जे कपडे घालतात ते खूपच कलाकुसरीने बनवलेले असतात. बॉलीवूडमधील बऱ्याच अभिनेत्री या लग्नामध्ये डिझाईनर सब्यासाची मुखर्जीचे कपडे घालताना दिसत आहेत. मग ती अगदी बिपाशा असो, अनुष्का असो वा आता दीपिका पडुकोण. दीपिका आणि रणवीर लग्नामध्ये खूपच सुंदर दिसत होते. कोंकणी आणि सिंंधी पद्धतीने झालेल्या या दोन्ही लग्नांमध्ये दीपिका आणि रणवीरने सब्यासाचीने डिझाईन केलेले कपडे घातले होते. मात्र हे कपडे नक्की कसे तयार होतात याची तुम्हाला कल्पना आहे का? दीपिका-रणवीरच्या सिंधी पद्धतीने झालेल्या विवाहामध्ये दीपिकाने घातलेल्या लेहंग्याने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं होतं. आता स्वतः सब्यासाचीने हा लेहंगा आणि रणवीरची शेरवानी कसे तयार झाले याचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. आम्ही तुम्हाला या व्हिडिओबद्दल सांगणार आहोत.

deepveer

स्वप्नवत लग्न

इटलीच्या लेक कोमोच्या किनाऱ्यावर दीपिका आणि रणवीर विवाहबद्ध झाले. कोणत्याही मुला-मुलीसाठी हे लग्न स्वप्नवतच आहे. इतक्या निसर्गरम्य ठिकाणी आणि त्याला साजेसे कपडे हे सर्वच आपल्याला दोघांच्याही फोटोमधून दिसून येत आहे. दीपिकाने घातलेला लेहंगा हा खास बनवण्यात आला होता. त्यावर ‘सदा सौभाग्यवती भव’ असा भारतीय परंपरेतील महत्त्वाचा संदेशही कोरण्यात आला होता. दीपिकाच्या आनंद कराजसाठी या लेहंग्यावर हाती कलाकुसर करण्यात आली होती. इतकंच नाही तर तिच्या लेहंग्यावरील संपूर्ण कामकाज हे हाती करण्यात आलं होतं. यासंदर्भात व्हिडिओ सब्यासाचीने आता पोस्ट केला आहे. त्यामुळे दीपिकाच्या लेहंग्यासाठी कशाप्रकारे कलाकुसर करण्यात आली हे सर्वांनाच आता समजेल. दीपिका या कपड्यांमध्ये एखाद्या राजकुमारीपेक्षा नक्कीच कमी सुंदर दिसत नव्हती. भारतीय रिव्हायवल प्रोजेक्टअन्वये सब्यासाचीने हा लेहंगा बनवला आहे. दरम्यान दीपिकाच्या दुपट्ट्यावरील सर्वात जास्त चर्चिला गेलेला ‘सदा सौभाग्यवती भव’ देखील कशा प्रकारे हाती कलाकुसरीने गुंफण्यात आलं आहे हेदेखील या व्हिडिओमधून दिसून येत आहे. यावरील अतिशय बारीक कलाकुसर हीच या लेहंग्याची खासियत आहे. शिवाय हे सर्व कपडे भारतीय कारागिरांकडून करून घेण्यात येतात. त्यामुळे भारतीय पारंपरिकता या कपड्यांवर दिसून येते. तर रणवीरच्या कपड्यांचा व्हिडिओदेखील अशाच प्रकारे दाखवण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

दीपिका – रणवीरचं धुमधडाक्यात लग्न

दीपिका आणि रणवीरचं १४ आणि १५ नोव्हेंबरला लग्न झालं असून २१ तारखेला दोघांनीही दीपिकाच्या माहेरी अर्थात बंगलुरूमध्ये रिसेप्शन दिलं तर २८ तारखेला आपल्या मित्रांसाठी मुंबईमध्ये रिसेप्शन ठेवलं. या दोन्ही वेळेलाही रणवीर आणि दीपिकाने सब्यासाचीने डिझाईन केलेले कपडेच वापरले आहेत.

 

28 Nov 2018

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT