बॉयफ्रेंडला प्रपोज करण्याचे 'हे' हटके प्रकार तुम्ही पाहिलेत का (How To Propose A Guy In Marathi)

बॉयफ्रेंडला  प्रपोज करण्याचे 'हे' हटके प्रकार तुम्ही पाहिलेत का (How To Propose A Guy In Marathi)

प्रेम ही जगातील एक ‘अद्भूत’ गोष्ट आहे. प्रेमात पडल्यावर सारं जगच सुंदर दिसू लागतं. पण जेव्हा प्रेमात ‘प्रपोज’ करण्याची वेळ येते तेव्हा मात्र प्रत्येकीला ‘त्याने’च पुढाकार घ्यावा असं वाटत असतं. खरंतर मुली नेहमी सर्वच बाबतीत पुढे असतात. मग प्रेमासारख्या नाजूक गोष्टीत फक्त मुलांनीच पुढाकार घ्यावा असं का ? जर तुमचं खरंच त्याच्यावर मनापासून प्रेम असेल, त्याच्यासोबत लग्न करावसं वाटत असेल तर त्याला ही गोष्ट कळायलाच हवी. वास्तविक आपल्याकडे मुलींनी मुलांना कसं प्रपोज करावं याबाबत विशेष माहिती उपलब्ध  नाही. त्यामुळे प्रेमात पडल्यावर मुलींचा खूप मोठा गोंधळ होतो. पण काळजी करु नका कारण आम्ही तुम्हाला अश्या काही गोष्टी आणि प्रपोजचे प्रकार सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही प्रपोज करण्यासाठी नक्कीच पुढाकार घ्याल.


एक माणूस प्रस्तावित करण्याचा सर्वोत्तम मार्ग


एक माणूस प्रस्तावित कल्पना


FAQs


love


जोडीदाराला प्रपोज करण्याचा उत्तम मार्ग कोणता? (Best Way To Propose A Guy)


त्याच्या आवडी-निवडींमध्ये रस घ्या. (Analyze His Interests)


तुम्ही ज्याच्या प्रेमात आहात किंवा ज्याच्यासोबत तुम्हाला लग्न करावंस वाटतंय त्याला आधी समजून घ्या. ज्यामुळे प्रपोज करणं तुम्हाला अधिक सोपं जाईल. उदा. जर त्याला ट्रेकींग अथवा कॅम्पला जाण्याची आवड असेल तर त्यासाठी त्याला एखाद्या अॅडव्हेन्चर ठिकाणी प्रपोज करा. ज्यामुळे तो नक्कीच खूश होईल. पण जर तो फारच ‘फिल्मी’ वगैरे असेल तर मात्र तुम्ही त्याच्यासाठी काहीतरी खासच करणं गरजेचं आहे. जसं की त्याच्या आवडीचं एखादं ‘चॉकलेट’ अथवा ‘फुलं’ देऊन तुम्ही त्याला अगदी सिनेमात दाखविल्याप्रमाणे प्रपोज करु शकता.


तुम्ही प्रपोज करणार आहात याची कल्पना त्याला आधीच येईल असं काहीतरी करा. (Give Him Hints)


तुमच्या आवडत्या व्यक्तीला प्रपोज करण्याआधी त्याला याची कल्पना येईल अशा हिंट द्या. नाहीतर त्याला सरप्राईज देता देता तुम्हालाच धक्का बसण्याची शक्यता आधिक आहे. त्याला थेट प्रपोज करण्यापूर्वी तुम्हाला तो आवडतो व तुम्ही त्यासोबत आनंदी असता हे त्याला समजेल असं वागू लागा. जर तुम्हाला त्याची आयुष्यभराची साथ हवी असेल आणि तुम्ही त्याच्याशी लग्न करू इच्छित असाल तर हे फारच महत्वाचं आहे. कारण तो देखील तुमच्यासोबत आयुष्यभर एकत्र राहण्यास तयार आहे का हे यातूनच तुम्हाला समजू शकतं.


love 5


जर तुम्हाला एखाद्याला इनडायरेक्ट प्रपोज करायचं असेल तर या गोष्टी अवश्य करा. (How to Propose A Guy Directly)


  • तुमच्या आवडत्या व्यक्तीच्या बेस्ट फ्रेन्डला तुमच्या निर्णयाबाबत सांगा. बऱ्याचदा बेस्ट फ्रेन्ड एकमेकांशी सर्व गोष्टी शेअर करतात. त्यामुळे असं केल्याने नक्कीच काहीतरी चांगला मार्ग निघेल.

  • त्याच्या कुटूंबियांसोबत वेळ घालवा. विशेषतः त्याच्या भावंडांसोबत मैत्री करा. जर तुम्हाला त्याच्यासोबर खरंच लग्न करायचे असेल तर त्याच्यासाठी ही एक फार मोठी हिंट असू शकेल. शिवाय लग्न झाल्यावर त्याच्या कुटुंबासोबत निर्माण झालेलं हे बॉन्डींग तुम्हाला भविष्यात देखील फायद्याचंच ठरेल.

  • त्याला तुमच्या दोघांच्या भविष्याबाबत काय वाटतं ते विचारा आणि तुम्हालादेखील तुम्हा दोघांच्या भविष्याबद्दल काय वाटतं हे त्याच्यासोबत शेअर करा.


प्रपोज करण्यासाठी योग्य दिवस आणि वेळ निवडा (Pick The Right Time And Day)


बॉयफ्रेंडला लग्नासाठी मागणी घालताना तुमच्या आयुष्यातील काही खास दिवसांची निवड करा. जसे की ‘त्याचा वाढदिवस’ ‘तुमचा वाढदिवस’ किंवा ज्या दिवशी तुम्ही ‘पहिल्यांदा’ भेटला होतात तो दिवस अशा स्पेशल दिवसांची तुम्ही नक्कीच निवड करु शकता. शिवाय मागणी घालण्याआधी तुम्ही दोघंही आर्थिक आणि भावनिकरित्या या नात्यासाठी खरंच तयार आहात का हे अवश्य तपासा. लग्नाचा निर्णय घेण्यापूर्वी पुढील पाच वर्षांचं नियोजन करा. ज्यामुळे तुम्हाला लग्नाचा निर्णय घेणं अधिक सोपं जाईल.


Also Read: How To Propose A Guy In Marathi


मी त्याला ‘तू माझा होशील का?’ हे कसं विचारू (Ideas to Propose A Guy)


जेव्हा तुम्ही त्याला फक्त ‘रिलेशनशिप’ साठी प्रपोज करता (If You're Proposing To Him For A Relationship) 


तुम्ही काही काळासाठी फक्त ‘रिलेशनशिप’मध्ये राहून मग पुढे जाऊ शकता. कधीकधी हे थोडसं त्रासदायक असू शकतं पण त्यामुळे कदाचित तुम्ही एकमेकांना चांगल्याप्रकारे ओळखू लागाल. रिलेशनशिप मध्ये असताना तुम्हाला त्याचा मुळ स्वभावदेखील समजू शकेल. एकमेकांना समजून घेतल्यावर लग्नाचा निर्णय घेताना तुम्ही पुन्हा प्रपोज करुन डेटवरदेखील जाऊ शकता. प्रपोज करण्यासाठी  तुम्ही एखाद्या विकेंड रोड ट्रीपवर जाऊ शकता किंवा एखादा स्पेशल कॅन्डल लाईट डिनरदेखील प्लॅन करु शकता. थोडक्यात प्रपोज करण्यासाठी तुम्ही ‘ते’ सर्व काही करु शकता ज्यामुळे तुम्ही दोघं आयुष्यभर ‘या’ आठवणी विसरू शकणार नाही.


त्याला प्रपोज करण्यासाठी आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत. ज्या तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या आवडीनूसार निवडू शकाल.


1. रोमॅंटिक डिनर डेट (Romantic Dinner Date)


जर तुमचा बॉयफ्रेंड रोमॅंटिक असेल तर त्याला खूश करण्यासाठी तुम्ही कॅंडल लाईट डिनर प्लॅन करुन त्याला सरप्राईज देऊ शकता. यासाठी त्याच्या आवडीचंच रेस्टॉरंट बूक करा. सोबत एक शॅम्पेन ऑर्डर करा आणि त्याला प्रपोज करा. करन जोहर फॅन्टेसी असेल तुम्ही प्रपोज करताना ‘बॅकग्राऊंड म्युजीक’साठी व्हायोलिनवादकांना देखील अरेंज करू शकता.


2. एखादी साहसी ट्रीप प्लॅन करा (Plan An Adventure)


तुमच्या जोडीदाराला सतत बाहेर फिरण्यात रस आहे का ? मग त्याच्यासाठी एखादी साहसी ट्रीप नक्कीच ऑर्गनाईज करा. ज्यामध्ये त्याच्या आवडीच्या सर्व अॅक्टिव्हिटीज असतील. जसं की, कॅम्पींग किंवा ट्रेकींग वगैरे. अशा ठिकाणी जेव्हा तुम्ही फक्त ‘दोघं’च असाल तेव्हा त्याला प्रपोज करा. कारण जर या ट्रीपमध्ये तुमचे इतर मित्रमैत्रिणीदेखील सोबत असू शकतात. पण तरिही ‘या’ स्पेशल क्षणी तुम्ही नक्कीच आनंदी व्हाल.


3. सरप्राईज मुव्ही नाईट (Surprise Movie Night)


जर तुम्ही एखाद्या अशा मुलाला प्रपोज करताय जो खूप ‘फिल्मी’ आहे. तर मग त्याला त्याच्या आवडीच्या ठिकाणी घेऊन जा. एखाद्या लेटेस्ट मुव्हीसाठी तुम्ही थिएटरमध्ये जाऊ शकता. मात्र तुमच्या भावना व्यक्त करण्यासाठी एखाद्या रोमॅंटिक सीन पर्यंत जरुर थांबा. जर त्याला गर्दीच्या ठिकाणी जाणं आवडत नसेल तर त्याच्यासाठी घरीच एखादी मुव्ही डेट प्लॅन करा.


4. एखादा फन डे प्लॅन करा (A Fun Day Out)


जर प्रपोज करण्यापूर्वी तुम्हाला त्याला अगदी खास वागणूक द्यायची असेेल तर त्याच्यासाठी एखादा ‘फन डे’ प्लॅन करा. यामध्ये लेझर टॅग, पेंटबॉल, मिस्ट्ररी रुम, ट्रॅम्पोलाईन पार्क अशा अॅक्टिव्हिटीजचा तुम्ही समावेश करू शकता. शिवाय यासाठी तुम्ही एखाद्या अॅडव्हेन्चर पार्कमध्ये देखील जाऊ शकता. पण या सर्व गोष्टींचा आनंद लुटताना त्याच्या चेहऱ्यावर एक निरागस हास्य येण्याची वाट बघा. हाच तो क्षण हीच ती वेळ...या  आनंदी आणि अत्यंत ‘भावूक’ क्षणी आयुष्यभर असंच मजेत राहण्यासाठी मला तुझ्यासोबत लग्न करायचे आहे असं सांगून मोकळे व्हा.


5. इंटीमेट मेसेज करा (An Intimate Message)


“जर तुला मी आवडत असेन तर…” किंवा अशा प्रकारच्या प्रेम कवितांच्या ओळी लिहून सिक्रेट नोट्स तयार करा. या नोट्स तुम्ही त्याच्या फोनशेजारी, बॅगेत किंवा वॉलेटमध्ये ठेऊ शकता. ज्या त्याला दिवसभर सापडतील. या चिठ्या वाचून तो विचारमग्न असताना अचानक त्याला प्रत्यक्ष भेटा आणि प्रेमपत्र देऊन तुमच्या मनातील भावना व्यक्त करा.


love 4


6. त्याला चांगले वाटेल असं काहीतरी करा (Surprise Him)


यासाठी त्याला जे केल्याने आनंद होईल असं सारं काही करा. जसं की तुम्ही त्याच्यासाठी त्याची आवडती कार दिवसभरासाठी हायर करू शकता. असं केल्याने तो त्याची फेव्हरेट कार दिवसभर ड्राईव्ह करू शकेल. त्याच्या आवडत्या बॅन्डच्या कॉन्सर्टचं तिकीट काढा आणि त्याला सरप्राईज द्या. तुम्ही यासाठी त्याच्या आवडीच्या कोणत्याही गोष्टी करू शकता. थोडक्यात काय त्याला खूश करुन एखाद्या आनंदी क्षणी तुमच्या मनातल्या भावना व्यक्त करण्याची संधी शोधा.


love 3


जर तुम्ही त्याला लग्नासाठी मागणी घालणार असाल तर (If You’re Proposing To Him For Marriage)


जर तुमचं त्याच्यावर मनापासून प्रेम असेल तर त्याने पुढाकार घेण्याची वाट मुळीच बघत बसू नका. मात्र “तू माझ्यासोबत लग्न करशील का ?” असं थेट विचारण्यापूर्वी काही गोष्टींचं योग्य प्लॅनींग करा. लक्षात ठेवा तुम्ही कसं प्रपोज करत आहात हे खूप महत्वाचं आहे. सर्व गोष्टी त्याच्या व्यक्तिमत्वाला साजेश्या असायला हव्या.


तुमच्या बॉयफ्रेन्डला लग्नासाठी प्रपोज करताना या सर्व गोष्टी अवश्य समजून घ्या.


1.एखादं ग्रॅन्ड प्रपोजल प्लॅन करा (Plan A Grand Proposal)


जर तुम्ही त्याची अगदी जवळची मैत्रीण असाल तर त्याला प्रपोज करण्यासाठी काहीतरी ‘हटके’ गोष्ट करा. जसं की पाच हजार गुलाबांचा बुके द्या, एखादी रींग द्या, तलावाशेजारी फॅन्सी डिनर अरेंज करा. तुम्ही तुमच्या मनातील भावना शब्दातून देखील त्याच्यासमोर व्यक्त करू शकता. आम्हाला खात्री आहे या गोष्टी त्याला  नक्कीच आवडतील.


2. जास्त गाजावाजा करु नका (Keep It Small)


जर तुमच्या बॉयफेंडला खाजगी गोष्टी जगजाहिर करणं आवडत नसेल तर हे रोमॅंटिक क्षण तुमच्या दोघांमध्येच राहतील असं काहीतरी करा. एखादी मुव्ही नाईट अरेंज करा आणि त्याच्या आवडीचं स्नॅक्स मागवा. जसं की कॅन्डी किंवा पॉपकॉर्न वगैरे. त्या पॉपकॉर्नमध्ये त्याच्यासाठी आणलेली रींग लपवा. ‘ती’ त्याच्या हाती लागल्यावर हळूच त्याला लग्नासाठी विचारा.


3. रींग देऊन थेट मागणी घाला (Pop The Ring)


पारंपरिक स्टाईलने मागणी घालणं नेहमीच फायद्याचं ठरतं. प्रेमाची कबुली देण्यासाठी त्याला डेटवर न्या. त्याच्यासमोर गुडघ्यावर बसा व रींंग देऊन तुमचं त्याच्यावर किती प्रेम आहे ते त्याला सांगा. या प्रकारामुळे त्याला कदाचित आश्चर्य वाटेल पण तो खूश नक्कीच होईल हे खरं .काळजी करू नका तुमच्या मनातील भावना प्रामाणिकपणे आणि मनापासून सांगा.


4. या गोड क्षणी त्याच्या प्रिय व्यक्तींना सामील करुन घ्या (In the presence of Loved Ones)


जे आधीपासून लॉंग टर्म रिलेशनशिप मध्ये आहेत त्यांच्यासाठी हे ‘प्रपोजल’ नक्कीच फायद्याचं ठरेल. कारण तुम्ही आधीपासून त्याच्या मित्रांना आणि कुटुंबाला चांगले ओळखत असालच. यासाठी घरी एखादं  फॅमिली गेट-टूगेदर अरेंज करा. ज्यामुळे या खास क्षणांमध्ये तुम्ही त्यांच्या जवळच्या व्यक्तींनादेखील सामील करुन घेऊ शकाल. त्याला रींग देऊन प्रपोज केल्यावर त्याचा फेव्हरेट केक दोघांनी मिळून कट करा. आम्हाला खात्री आहे यामुळे तो तुम्हाला नक्कीच हो म्हणेल.


love 2


5. अविस्मरणीय आठवणींना उजाळा द्या (Relive A Memorable Moment)


ही आठवण अगदी छोटी देखील असू शकते. जसं की तुम्ही पहिला कीस ‘जिथे’ घेतला होता ते ठिकाण, तुम्ही एकमेंकांना पहिल्यांदा ‘आय लव्ह यू’ असं ज्या दिवशी म्हणाला होतात तो दिवस किंवा तुमच्या रिलेशनशिपमधील एखादा महत्वाचा क्षण ही तुमच्यासाठी प्रपोज करण्याची एक भन्नाट कल्पना ठरू शकते. यासाठी तुम्ही पुन्हा त्याच रेस्टॉरंटमध्ये जाऊ शकता जिथे तुम्ही पहिल्यांदा भेटला होतात. पूर्वी गेलेल्या एखाद्या हॉलिडेची आठवण म्हणुन पुन्हा तिथेच जाऊ शकता. जेव्हा तुम्ही एखाद्याच्या प्रेमात असता तेव्हा त्याच्यासोबत पहिल्यांदा केलेल्या अनेक गोष्टींच्या ‘तारखा’ तुम्ही नक्कीच लक्षात ठेवता. त्याच क्षणांना उजाळा देत त्याला आता लग्नासाठी विचारा.


love 6


FAQs


जर ‘तो’ नाही म्हणाला तर काय करू?


लक्षात ठेवा आयुष्यात कोणतीच गोष्ट ‘सहज’ मिळत नाही. त्यामुळे जर तो तुम्हाला नाही म्हणाला तर काळजी करू नका. तुमच्यावर देखील ‘अफाट’ प्रेम करणारा कोणीतरी असेलच. असं म्हणतात की लग्नगाठी या स्वर्गात जुळतात. त्यामुळे तुम्ही प्रपोज केल्यावर तो तुम्हाला नाही म्हणाला तर समजा की तो तुमच्यासाठी कधी योग्यच नव्हता. नकार हा जीवनाचा एक भाग आहे आणि तुम्ही या गोष्टीसाठी तयार असायला हवं. त्यामुळे असं झालं तर त्या रिलेशनशिपमधून लगेच बाहेर या. नाहीतर त्याला विचार करायला अजून थोडा वेळ द्या. कारण कधीकधी मुलं पटकन लग्नाची जबाबदारी स्विकारायला तयार होत नाहीत.


मी प्रपोज करण्यासाठी प्रोफेशनल फोटोग्राफर बूक करू शकते का ?


हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे. जर या क्षणी तुम्ही फक्त दोघंच असणार असाल तर तुम्ही नक्कीच प्रोफेशनल फोटोग्राफरला बूक करू शकता. पण जर तुम्ही तुमच्या कुटुंब किंवा मित्रांसमोर त्याला प्रपोज करणार असाल तर चांगले इन्स्टास्कील असलेल्या एखाद्या तुमच्या मित्राला हा ‘क्षण’ कॅमेराबंद करण्यास सांगा.


पण ती वेळ नेमकी कशी असेल हे तुम्हाला माहित नसेल तर हा क्षण जपून ठेवण्यासाठी एखाद्या चांगल्या प्रोफेशनल फोटोग्राफरचं सहकार्य घेणं ही चांगली कल्पना ठरेल. ज्यामुळे तुम्हाला दुसऱ्या कोणावर तरी या फोटोंसाठी अवलंबून राहावं लागणार नाही.


मी त्याच्या कुंटुंबाला याबाबत आधीच सांगू शकते का?


तुमचं रिलेशनशिप कसं आहे आणि तुम्ही त्याच्या कुंटुंबाला किती ओळखता यावर हे अवलंबून आहे. जर तुम्हील त्याच्या आई-वडील आणि भावंडांना ओळखत असाल तर त्यांना विश्वासात घेणं ही एक चांगली कल्पना आहे. त्याच्या आईवडीलांना त्याच्या आवडी-निवडी चांगल्या माहित असतील त्यामुळे ते तुम्हाला नक्कीच मदत करतील.


मी त्याच्या मित्रमैत्रिणींची प्रपोज करण्यासाठी मदत घेऊ शकते का?


जर तुम्ही त्याच्या मित्रमैत्रिणींसोबत वेळ घालवला असाल आणि ते तुम्हाला चांगले ओळखत असतील तर असं करायला काहीच हरकत नाही. प्रपोज करण्यापूर्वी तुम्ही त्याच्या मित्रांची नक्कीच मदत घेऊ शकता. कारण मित्रमैत्रिणींच्या एखाद्या गेट-टूगेदर मध्ये त्याला प्रपोज करताना त्याच्या मित्रांची तुम्हाला चांगली साथ लाभेल. कदाचित त्यालाही मित्रांची मदत घेतलेली नक्कीच आवडू शकेल.


मैत्रिणीनों, थोडक्यात काय तर तुमच्या आवडत्या व्यक्तीला प्रपोज करण्यासाठी मुळीच संकोच करू नका...दिलखुलासपणे त्याला तुमच्या मनातलं गुपित सांगा आणि त्याच्यासोबत आनंदाने जीवन जगा...ऑल दी बेस्ट.


GIFS - Giphy