ADVERTISEMENT
home / Friends and BFFs
तुमचा बेस्टफ्रेंडच होऊ शकतो तुमचा बॉयफ्रेंड…कसं ओळखायचं?

तुमचा बेस्टफ्रेंडच होऊ शकतो तुमचा बॉयफ्रेंड…कसं ओळखायचं?

तो जर तुमचं फाल्तू बोलणंही रात्री दोन – दोन वाजेपर्यंत ऐकत असेल. तुमचे सर्व नखरे त्याला मान्य असतील आणि इतकं असूनही तो तुम्हाला समजून घेत असेल, तुम्हाला स्वतःला काहीही कळत नसतानाही त्याला मात्र तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे याची पूर्ण कल्पना असते….नेहमी फोन ठेवायच्या आधी ‘आय लव्ह यू/मिस यू’ सुद्धा म्हणतो…हे जर सगळं तुम्हाला तुमच्या बेस्टफ्रेंडमध्ये दिसून येत असेल तर तुमचा बेस्टफ्रेंडच तुमचा चांगला बॉयफ्रेंड असू शकतो. तुम्हाला कदाचित तुमच्या प्रेमाची कल्पनाही नसते. पण तो तुमची काळजी त्याच प्रेमापोटी करत असतो. बिनधास्त तुम्ही कोणतीही गोष्ट त्याच्याबरोबर शेअर करता. तुमचा मेल बेस्टफ्रेंड कधी तुमचा बॉयफ्रेंड बनायला लागतो हे जर तुम्हाला ओळखायचं असेल तर आम्ही तुम्हाला काही गोष्टी सांगतो, त्या तुम्ही तुमच्या बेस्टफ्रेंडबरोबर मॅच करून बघा आणि मग तुम्हाला कळेल की, तुमच्या बेस्टफ्रेंडवर तुमचं किती प्रेम आहे आणि तोच तुमचा बॉयफ्रेंड बनत आहे आयुष्यभरासाठी.

1. रात्रभर कोणत्याही गोष्टीवर बोलणं

119

तुम्हाला दोघांना रोज एकमेकांशी बोलायची सवयच होऊन जाते. एकमेकांशी बोलल्याशिवाय तुम्हाला अजिबात चैन पडत नाही. किती पण तुम्ही थकलेले असाल किंवा काहीही झालं असून जोपर्यंत तुम्ही त्याच्याशी बोलत नाही तुम्हाला अजिबात बरं वाटत नाही. दिवसभर एकत्र असो वा नसो त्याला सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगायच्या असतात.

ADVERTISEMENT

2. जेव्हा तुम्ही हँगआऊट करता पण ती ‘डेट’ असते
त्याच्याबरोबर तुम्ही दिवसभर फिरत असता. पण त्याच्याबरोबर फिरून तुम्ही परत घरी जावं असं तुम्हाला वाटत नाही. तुम्हाला जास्तीत जास्त वेळ त्याच्याबरोबर घालवायचा असतो. फक्त स्ट्रीट फूडच नाही तर वेगवेगळ्या हॉटेलमध्ये जाऊन डिनर करणं, तासनतास त्याच्याबरोबर गप्पा मारणं ही तुमची एक सवयच होते. तुम्हाला दोघांनाही एकमेकांविषयी मैत्रीपेक्षा जास्त भावना असतात हे यावरून तुम्हाला कळावं हवं. फक्त फिरून घरी गेल्यानंतरही तुमच्या मनात फक्त त्याचा विचार येतो हादेखील याच भावनेचा एक भाग आहे.

3. तुमचं कॉलेज किंवा जॉबच्या ठिकाणावरून रोज घ्यायला येत असेल

तुम्ही जिथे असाल तो तुम्हाला न्यायला येणारच. ही एक सवयच होऊन जाते. तुम्ही कॉलेजला असाल किंवा नोकरी करत असाल, तर तुम्हाला त्रास होऊ नये यायला जायला यासाठी रोज तो तुम्हाला न्यायला येत असेल.

वाचा – Love Tips: मुलीचा परफेक्ट ‘बॉयफ्रेंड’ बनायचं असेल, तर काय करायला हवं

ADVERTISEMENT

4. तुमची अतिशय काळजी करणारा आहे
तुम्ही रात्री कोणत्या गोष्टीसाठी घराबाहेर राहणार असाल, तर तुम्ही कोणाबरोबर आहात, वेळेवर जेवता की नाही ही सर्व चौकशी करत असेल आणि कितीही रात्र झाली तरीही तुमच्यासाठी वाट बघत असेल आणि तुम्ही असाल त्या ठिकाणावरून तुम्हाला न्यायला येऊन तुमच्या घरी सोडत असेल तर असा काळजी करणारा बेस्टफ्रेंड हा तुमचा बॉयफ्रेंड होतो आहे.

5. तो तुम्हाला जर खूपच प्रेमाने बघत असेल

बऱ्याचदा तुम्हाला दोघांनाही कळत नाही आणि नकळत तुम्ही एकमेकांना सतत बघण्याची संधी शोधत असता. त्याला न बघता तुमचा जीव वरखाली होत असतो.

6. जेव्हा तुमचे स्वतःचे वेगळेच कोडवर्ड्स असतात
तुम्ही जेव्हा पूर्ण ग्रुपमध्ये असता पण त्यावेळी असे काही शब्द एकमेकांशी बोलता ज्याचा अर्थ फक्त तुम्हाला दोघांनाच माहीत असतो आणि समजू शकतो.

ADVERTISEMENT

7. तुम्ही जर ‘कुछ कुछ होता है’ सारखे चित्रपट बघायला सुरुवात केली असेल

712
असे चित्रपट बघत असताना तुम्हालाही वाटू लागतं की, मैत्री म्हणजेच प्रेम आहे आणि तोच तुमचा खरा मित्र आणि खरं प्रेम आहे.

8. मैत्रीमधील मजामस्ती आणि चिडवणं..  
… आधी करत असणारी मस्ती एक वेगळीच मस्ती होते. त्याचाबद्दल वेगळं फिलिंग मनात येऊ लागतं. त्याने जवळ घेतल्यावरही मनात वेगळ्या भावना यायला लागतात आणि त्याचं चिडवणंही आवडू लागतं. त्याच्या भावनाही त्याच असतात हे त्याच्या बोलण्याचालण्यातूनही जाणवतं.

9. तुम्ही दुसऱ्या मुलाकडे जास्त लक्ष देत असल्यास,

ADVERTISEMENT

910
तुम्ही जर दुसऱ्या मुलाशी बोलत असाल आणि जास्तच प्रेमाने बोलत असाल, तर तो अतिशय चिडचिड करायला लागतो आणि ती चिडचिड त्याच्या वागण्यातूनही स्पष्ट जाणवत असते. (निदान आता तरी त्याचं तुमच्यावर आणि तुमचं त्याच्यावर प्रेम आहे हे मान्य करावंच लागेल)

वाचा – प्रेम करता? घरी सांगायचय? तुमच्यासाठी खास टीप्स

10. जेव्हा तो तुमच्याजवळ येतो

एका पार्टनरप्रमाणेच तो तुमच्या खांद्यावर हात वा डोकं ठेवतो आणि तो तुमच्याबरोबरच कायम असणार आहे हे तुम्हाला जाणवून देतो

ADVERTISEMENT

11. तुमच्या पालकांचाही आदर करतो
तुमचे पालक त्याच्याबद्दल नक्की काय विचार करतात हे त्याच्यासाठी खूप महत्त्वाचं असतं आणि तुमच्या पालकांना तो स्वतःचे आई-बाबाच मानतो आणि आदर करतो हेदेखील तुम्हाला जाणवेल.

12. तुम्ही सर्वात चांगली मुलगी असल्याची भावना तोच निर्माण करतो

124

फक्त ग्रुपमध्येच नाही तर जगात तुम्हीच त्याच्यासाठी सर्वात चांगली मुलगी असल्याची भावना त्याची असते आणि ती गोष्ट तो वेळोवेळी तुम्हाला जाणवून देत असेल तर तुम्हाला नक्की त्याचा पुन्हा एकदा विचार करायला हवा.

ADVERTISEMENT

13. शहरातून बाहेर गेला असेल तर सर्वात जास्त तुमची आठवण
तो कुठेही बाहेर गेला असेल तरी तो सर्वात जास्त तुमची आठवण काढतो आणि तुम्ही न सांगताही जिथे असेल तिथून तुमच्यासाठी खास गिफ्टही घेऊन येत असेल तर त्याला तुमची खूपच काळजी आणि आठवण आहे हे नक्की.

14. तुमच्या सगळ्या गोष्टी तो लक्षात ठेवतो

तुम्ही अगदी एक महिन्यापूर्वीही कोणता ड्रेस घातला होता किंवा तुमचं कोणाशी भांडण झालं, तुमचं कोणतं काम चालू आहे काय करत आहात या सगळ्या आणि लहानसहान गोष्टी जर तो लक्षात ठेवत असेल, तर नक्कीच तुमचा बेस्टफ्रेंड हा तुमचा बॉयफ्रेंड होत आहे हे लक्षात घ्या.

15. तुम्हाला फक्त भेटायला येत नाही

ADVERTISEMENT

152
तुमच्यासाठी तो आता जर रोज तयार होऊन यायला लागला असेल आणि एकत्र असताना बिल भरण्यासाठी पण तो जर वाद घालत असेल तर तुम्ही नक्की समजून जा. कारण मैत्रीमध्ये तर बिल तुम्ही अर्धे – अर्धे अथवा कधी तुम्ही आणि कधी तो भरूच शकतो. पण कायम जर त्यालाच बिल भरायचं असेल तर तो नक्कीच मैत्रीपेक्षा जास्त काही तुमच्यासाठी फील करत आहे.

16. तुम्हाला नक्की काय हवंय हे त्यालाच माहीत आहे

तुम्हाला कोणत्या वेळी काय हवंय हे फक्त त्यालाच माहीत असतं. अगदी तुमच्या प्रत्येक गोष्टीची काळजी तो करतो आणि तुमची प्रत्येक गोष्ट त्याच्या लक्षात असते. त्याला तुम्हाला कधी दुःखी झालेलं पाहायचं नसतं आणि त्यासाठी तो प्रत्येक प्रयत्न करतो.

वाचा – बॉयफ्रेंडला प्रपोज करण्याचे ‘हे’ हटके प्रकार तुम्ही पाहिलेत का

ADVERTISEMENT

17. प्रत्येक कार्यक्रमाला तुम्ही एकत्र

कुठल्याही कार्यक्रमाला जेव्हा आपल्याबरोबर आपल्याला कोणी हवं असतं तेव्हा आपल्यासमोर फक्त तोच दिसतो. शिवाय तो देखील कोणतीही कुरकूर न करता तुमच्याबरोबर तुमच्या आनंदासाठी येतो. अगदी तुमच्या घरातला कोणताही कार्यक्रम असला तरीही.

18. तुम्हाला आपल्या मैत्रिणीसाठी जर तो फिट वाटत असेल…

181

ADVERTISEMENT

तुमच्या मैत्रिणीच्या नावाने तुम्ही त्याला चिडवत असाल किंवा तिच्यासाठी तुम्ही त्याला फिक्स करत असाल तर त्याची चिडचिड वाढते. तो इतर किती जणांना आवडतो याची त्याला अजिबात चिंता नसते. तर तुम्हाला तो किती आवडतो या गोष्टी त्याच्यासाठी जास्त महत्त्वाच्या असतात. हिंमत करून तुम्ही जर एकमेकांना इतकं समजून घेत असाल तर नक्की आय लव्ह यू म्हणा आणि ते नातं मनापासून निभावण्याचा प्रयत्न करा. कारण हे नक्कीच एकतर्फी नसतं. तर अशी नाती मिळायलाही भाग्य लागतं. तुमच्याबरोबरही या सगळ्या गोष्टी घडत असतील तर नक्की समजून जा की, तुमचा बेस्टफ्रेंड हा नक्कीच तुमचा बॉयफ्रेंड होतोय. मैत्री आता कोणत्यातरी वेगळ्या वळणावर येतेय हे नक्की लक्षात घ्या आणि त्याप्रमाणे तुम्हीदेखील थोडा विचार करून एकत्र यायचा विचार नक्की करा.

20 

GIFs: Giphy, Tumblr

29 Jan 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT