उशांमुळे घराला आणा वेगळा ‘लुक’

उशांमुळे घराला आणा वेगळा ‘लुक’

आपलं घर इतरांपेक्षा वेगळं कसं दिसेल याचा विचार आपण नेहमीच करत असतो. तर कामावरून घरी थकून आल्यानंतर आपल्याला सर्वात महत्त्वाचं वाटतं ते आपल्या घरातील बेडरूममध्ये अथवा सोफ्यावरील उशीवर डोकं ठेऊन शांत राहणं. त्यासाठी आपण वेगवेगळ्या गोष्टी करत असतो. प्रत्येक सणाला किंवा प्रत्येक घरच्या कार्यक्रमाच्या वेळी आपण घरचं फर्निचर अथवा इतर गोष्टी नक्कीच बदलू शकत नाही. मग घराला वेगळा आणि काहीतरी हटके लुक द्यायचा असेल तर तुम्ही वेगवेगळ्या संकल्पना राबवू शकता. घरात उदासीनतेच्या वातावरणापेक्षा आपली बेडरूम अथवा आपलं घर अगदी वेगळ्या आणि रंगबेरंगी तऱ्हेने सजवणं कधीही चांगलं. ही कला आपण जर आत्मसात केली तर नक्कीच आपल्याला फायदा होतो. आपल्या घरामध्ये अशा अनेक गोष्टी असतात ज्या आपण टाकून देत असतो. असे बरेच कपडे असतात जे फाटल्यानंतर त्यांचा काहीच उपयोग नसतो. अशा कपड्यांना शिवून आपण आपल्या घरातील उशांना कव्हर करू शकतो आणि त्यामुळे घरातील सोफ्याला आणि बेडला वेगळेच रूप येते आणि आपल्यालाही फ्रेश वाटते.


PHOTO-2018-08-16-12-28-15 %282%29


कसा करावा उशांचा वापर


उशी ही घरातील अशी वस्तू आहे जिचा आपण सतत आणि कधीही कुठेही वापर करत असतो. अगदी नुसतं सोफ्यावर बसायचं असेल तरीही आपण अंगावर उशी घेऊन बसतो. कधीतरी डोक्याखाली उशी घेऊन टीव्ही बघण्यात आपल्याला बरं वाटत असतं. अर्थात ही उशी सर्वांनाच जवळची असते. या उशीच्या मदतीने तुम्ही तुमच्या घराचा कायापालट नक्कीच करू शकता. त्यासाठी ‘वा’ कॉर्पोरेशनचे संचालक अमित आचरेकर यांनीही काही टीप्स दिल्या आहेत. डिजीटल कुशन कव्हर, प्रिंट कुशन कव्हर, फॉईल कुशन कव्हर, डक फॅब्रिक प्रिंट यासारखे कुशन कव्हर तुम्हाला बाजारामध्ये तर उपलब्ध आहेतच. पण त्याशिवाय तुमच्या घरातील जुन्या साड्या आणि ड्रेस यांचे व्यवस्थित नियोजन करूनही तुम्हाला उशींचे कव्हर्स बनवता येतात.


1. सोफ्यावरील कुशन - सणांच्या दिवसांमध्ये आपल्या हॉलमधील सोफ्यावर कुशनसाठी सोनेरी, पिवळसर सोनेरी, निळा, सफेद अशा रंगांचा वापर करा. तसेच खणाच्या कापडाचा वापर करूनसुद्धा तुम्ही तुमच्या हॉलमध्ये वेगळा आणि ग्लॅमरस लुक देऊ शकता. इतकंच नाही तर तुमच्या सोफ्याच्या आणि बैठकीच्या आकारानुसार तुम्ही तुमच्या कुशनचा आकार ठरवायला हवा. म्हणजे जास्त बेढब अथवा खराब वाटणार नाही. शिवाय जास्त कुशन तुम्ही तुमच्या हॉलवरील सोफ्यावर वापरल्यास अधिक उठावदार दिसतात.


PHOTO-2018-08-16-12-33-30


2. लहान मुलांच्या रूममधील कुशन - लहान मुलांच्या आजूबाजूला आनंदी आणि प्रसन्न वातावरण असणं गरजेचं असतं. मुलांनी सतत हसतखेळत राहायला हवं असं प्रत्येकालाच वाटतं. बऱ्याच घरांमध्ये लहान मुलांची स्वतःची अशीदेखील रूम असते. ती रूम कशी ठेवावी याचंही भान आपल्याला असायला हवं. घरातील भिंतींच्या रंगांबरोबरच लहान मुलांच्या रूममधी कुशन नक्की कसे असावे याकडेदेखील लक्ष देणं गरजेचं आहे. आजकाल आपल्याला मार्केटमध्ये अनेक फ्रूट्स आणि प्राण्यांच्या आकाराचे कुशन सहज उपलब्ध होत असतात. त्यामुळे त्यांना आवडणाऱ्या फ्रूट्स आणि प्राण्यांचे कुशन्स तुम्ही घेऊ शकता. तसेच त्यांच्यासाठी नेहमी त्यांना आवडणारे रंग घ्यावेत ज्यामुळे मुलं नेहमी आनंदी राहतात. शिवाय या उशांमुळे मुलांच्या मानेला त्रास होत नाही ना हेदेखील पाहणं आवश्यक आहे. कारण मुलांची मान अतिशय नाजूक असते. त्यामुळे या सर्व गोष्टींचा नीट विचार करून आपल्या मुलांसाठी कुशन्स घ्या.


हेदेखील वाचा - 


वास्तू टीप्स: चूकून ही तुमच्या बेडजवळ ‘ह्या’ वस्तू ठेऊ नका, होऊ शकतं नुकसान


 


PHOTO-2018-08-16-12-30-13


3. बेडरूमधील कुशन - दिवसभरात दमल्यानंतर निवांत क्षण घालवण्याची जागा म्हणजे बेडरूम. दिवसभर धावाधाव करून सर्वात जास्त आराम मिळतो तो बेडरूमधील उशीवर डोकं ठेवल्यानंतर. पण त्या उशीचं कव्हरदेखील तितकंच चांगलं असेल तर अजून बरं वाटतं. बेडरूममध्ये नेहमी साधी उशी ठेवावी. पण त्याचं कव्हर आपल्याला हवं तसं वापरावं. तुमच्या बेडरूममध्ये साधेपणा टिकून राहिला तर नक्कीच तुम्हाला फ्रेश वाटेल.


PHOTO-2018-08-16-12-28-16 %281%29


4. पॉम पॉम कुशन - तुम्ही तुमच्या साध्या उशीलादेखील डेकोरेटिव्ह करू शकता. सध्या बाजारामध्ये पॉम पॉम कुशन ट्रेंडिंगमध्ये आहेत. या उशांनी तुम्ही तुमचा सोफा सहज सजवू शकता. या उशी अतिशय मऊ असतात. त्यामुळे थकून आल्यानंतर आरामदायी वाटतात.


PHOTO-2018-08-16-12-28-18


5. 3 डी कुशन - आजकाल लोकांमध्ये खूप जास्त थ्री डी ची क्रेझ आहे. त्यामुळे ज्यांना अशी क्रेझ आहे त्यांना आपल्या घरामध्ये थ्री डी कुशन कव्हरसह डेकोरेट करता येऊ शकेल. थ्री डी कुशन ट्रेंडिंग असल्यामुळे तुमच्या घरामध्ये या कुशनने चांगली शोभा येऊ शकते.


6. लेदर कुशन कव्हर्स - सोफ्यावरील उशांना कव्हर्स लावण्यासाठी लेदर हा उत्कृष्ट पर्याय आहे. तुम्ही वेगळ्या रंगाचे कुशन कव्हर्स तुमच्या कुशन्ससाठी वापरू शकता. तुमचा सोफा गडद असल्यास, तुम्ही लाईट रंगाची कव्हर्स घ्यावीत आणि जर सोफा लाईट असेल तर गडद रंगाचे कुशन कव्हर्स वापरावेत. यामुळे तुमचा सोफा आणि कुशन कव्हर्स दोन्ही उठावदार दिसतात.


7. ट्रेडिशनल कुशन - घराला थोडा वेगळा आणि रॉयल लुक द्यायची तुमची इच्छा असल्यास, तुम्ही अशा स्वरुपाच्या ट्रेडिशनल कुशनचा वापर करू शकता. घराची सजावट करण्यासाठी असे कुशन कव्हर्स नेहमीच उपयोगी येतात. राजस्थानी प्रिंट कव्हर कुशन कव्हर्स तुमच्या उशांना नक्कीच वेगळी चमक देतात.


PHOTO-2018-08-16-12-33-25


अशा वेगवेगळ्या उशांचे कव्हर्स वापरून तुम्ही नक्कीच आपल्या घरांची वेगळी आणि सुंदर सजावट करू शकता. जेणेकरून तुमच्या घराला एक वेगळा लुक मिळेल. तसंच तुम्हाला बाजारामधील पर्याय निवडयाचे नसतील आणि तुमच्याकडे वेळ असेल आणि तुमची कला दाखवण्याचीही तुम्हाला आवड असेल तर तुम्ही घरच्या घरी देखील उरलेल्या कपड्यांमधून उशांची कव्हर्स तयार करू शकता.