फॅशन आणि फिटनेसबाबत बी टाऊन असो वा एम टाऊन सगळेच सेलेब्स आजकाल याबाबत सजग आहेत. एवढंच नाहीतर आपल्या फॅन्सनाही ते फॅशन आणि फिटनेसबाबत वेळोवेळी गाईड करतात.
मिस केरला, नेव्ही क्वीन 2013, इंडियन प्रिन्सेस 2104 आणि फेमिना मिस इंडिया स्पर्धक यांसारख्या ब्युटी पॅजंट्समध्ये आपल्या सौदर्यांची जादू दाखवल्यानंतर अभिनेत्री दीप्ती सती आता जियाच्या रूपात मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे.
तब्बल 96 मुलींच्या ऑडिशन्सनंतर आगामी ‘लकी’ चित्रपटासाठी दीप्तीची निवड केली असल्याचं स्वतः दिग्दर्शक संजय जाधव यांनी POPxoमराठीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. चला तर मग जाणून घेऊया अभिनेत्री दीप्ती सतीबद्दल
मुंबईकर दीप्ती सती
दीप्ती सती ही मूळ मराठी भाषिक नाही. टॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडल्यावर दीप्ती लकी चित्रपटातून मराठीत इंडस्ट्रीत येत आहे. मुंबईतच शिक्षण झाल्यामुळे लकी साठी जियाची भूमिका करणं दीप्तीला फारसं कठीण गेलं नाही (हे आम्हाला तिची मुलाखत घेताना ही कळलं). मुख्यतः मल्याळम सिनेमांमध्ये काम केल्यावर दीप्तीने साऊथमधील जवळजवळ सर्वच भाषांमध्ये काम केलं आहे आणि आता लकीमुळे ती मराठीतही झळकणार आहे.
दीप्तीचा फॅशन मंत्रा
‘लकी’मधील जिया हे हॉट कॉलेज गोईंग मुलीची भूमिका साकारणारी दीप्ती खऱ्या आयुष्यातही तितकीच फॅशनेबल आहे. लकी चित्रपटाच्या प्रत्येक फंक्शनला तिचा ग्लॅमरस अवतार दिसलाय. ड्रेसअप करण्याबाबत दीप्ती सांगते की, टप्रत्येकाची पर्सनॅलिटी वेगळी असते. त्यामुळे नेहमी तुमच्या पर्सनॅलिटीप्रमाणे ड्रेसअप करा. तसंच ते तुमच्या बॉडी टाईपलाही सूट झालं पाहिजे. जे तुम्ही घालता त्यात तुम्हाला कंफर्टेबल वाटलं पाहिजे.’
लकी या सिनेमात तिने बिकनी सीनही दिला आहे. मराठीमध्ये आतापर्यंत सई ताम्हणकर, नेहा पेंडसे आणि स्मिता गोंदकर यांसारख्या अभिनेत्रींनीच बिकिनी घालून प्रेक्षकांसमोर येण्याचं धाडस केलं आहे.
वार्डरॉब मस्टबाबत सांगताना दीप्ती म्हणाली की, प्रत्येकाच्या वॉर्डरॉबमध्ये एक चांगल्या फिटींगची जीन्स, एखादी शॉर्टस्, पांढरा शर्ट किंवा टीशर्ट आणि ब्लॅक किंवा व्हाईट रंगाचे स्नीकर्स असलेच पाहिजेत.
दीप्तीचं फिटनेस रूटीन
सकाळी उठल्याउठल्या मी कोमट पाणी पिते आणि घरचा पौष्टीक नाश्ता करते. पण मी डाएट करू शकत नाही. कारण मी खूप फूडी आहे. माझा एकच मंत्रा आहे, मी भरपूर खाते पण हेल्दी खाते. जसं बर्गरऐवजी मी सँडविच खाते किंवा भाताऐवजी क्विनोआ खाते.
फिटनेसमध्ये तिचं रोल मॉडेल कोण असं विचारलं असता तिने सांगितलं की, मला फिटनेसमध्ये सई ताम्हणकर खूपच आवडते. ती खाण्यापिण्याच्या बाबतीत खूपच पर्टीक्युलर आहे. नुकत्याच एका इंव्हेटला आम्ही एकत्र गेलो होतो. तेव्हा मला डोनट खाण्याची इच्छा झाली आणि मी ते घेतलं. पण सईने मात्र त्याकडे पाहिलंही नाही. कारण शेवटी जे तुम्ही खाता ते तुमच्या शरीरावर दिसतं. त्यामुळे नेहमी खाताना हेल्दी खायचा प्रयत्न करा. सुरूवातीला कठीण वाटेल पण नंतर तुम्हाला नक्कीच सवय होईल. तसंच फिटनेसच्या बाबतील मला दीपिका पदुकोण ही खूप आवडते.
वर्कआऊटबाबत दीप्ती म्हणाली की, ‘मी गेल्या वर्षीपासून प्रोपर वर्कआऊट करत आहे. मी योगा करते आणि जिम्नॅस्टीक्ससुद्धा करत आहे. तसंच मला कराटेमध्ये ब्लॅक बेल्टही मिळाला आहे.’
काय आहे अभिनेत्री स्पृहा जोशीचा डाएट फंडा
दीप्ती आणि जिया
दीप्ती ही मराठी नसल्याने जियाच्या भूमिकेसाठी तयारी करताना तिने खासकरून मराठी डिक्शनवर मेहनत घेतली. तसंच दिग्दर्शक संजय जाधव यांनी चित्रपटाआधी सर्व कलाकारांचे वर्कशॉप्सही घेतल्यानेही तिला बरीच मदत झाली.
‘लकी’मध्ये जिया या बबली मुलीची भूमिका करणाऱ्या दीप्तीला रिअल लाईफमध्ये हॉरर, कॉमेडी, अॅक्शन आणि रोमान्स या प्रकारचे सिनेमा आवडतात. तसंच ती देशभक्त असल्याने नुकत्याच कंगना रणौतच्या मणिकर्णिकातील राणी लक्ष्मीबाईसारखी भूमिका करायला आवडेल असं ती म्हणाली.
आता साऊथमध्ये आपला झेंडा रोवल्यावर दीप्तीला मराठी प्रेक्षकांकडून कशी प्रतिक्रिया मिळते हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. पण एक खरं आहे की, दीप्तीच्या रूपात एम-टाऊनला अजून एक ग्लॅमरस चेहरा नक्कीच मिळाला आहे.
ऑल द बेस्ट दीप्ती.
हेही वाचा –
ग्लॅमरस आणि स्टायलिश कॉमेडी क्वीन श्रेया बुगडेचा ‘फॅशन फंडा’