जाणून घ्या प्रत्येकजण आपल्या राशीनुसार कसं व्यक्त करतात 'प्रेम'

जाणून घ्या प्रत्येकजण आपल्या राशीनुसार कसं व्यक्त करतात 'प्रेम'

कित्येकवेळा आपल्याला जे आवडतात त्यांना आपल्या मनातलं सांगणं शक्य होत नाही. बरेचदा असंही होतं की आपण कोणाला तरी आवडत असतो पण ते आपल्याला आवडत नाहीत. गुलाबाच्या पाकळ्यांशी He/she loves or he/she loves me not हा खेळ खेळताना तुम्ही कधीकधी निराशही होत असाल की, तुमच्या पार्टनरचं नक्की तुमच्यावर प्रेम आहे की नाही. मग चला पाहूया राशीनुसार तुमच्या पार्टनरशी तुमची किती कम्पॅटीबिलिटी आहे आणि कोणत्या पद्धतीने तो त्याचं प्रेम तुमच्याजवळ व्यक्त करेल.


मेष (21 मार्च - 19 एप्रिल)


BuHT


रोमान्स किंवा रिलेशनशिपच्याबाबतीत मेष राशीची लोक खूप बोल्ड आणि बिनधास्त असतात. ही लोक आपल्या भावना हरप्रकारे आपल्या पार्टनरपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करतात. जर तुमचा पार्टनर किंवा आवडती व्यक्ती या राशीची असेल त्यांचं तुमच्यावर प्रेम असेल तर ती समोरून तुम्हाला प्रपोज करेल आणि अजिबात वेळ घालवणार नाही.


वृषभ (20 एप्रिल - 21 मे)


tumblr onrhsr1Uaf1qayehlo1 500


वृषभ राशीची लोक खूप प्रॅक्टीकल असतात. पण यांचा प्रेम व्यक्त करण्याचा अंदाजच हटके असतो. आपल्या प्रामाणिकपणाने तुम्हाला ते इंप्रेस करतात. त्यांचं निर्मळ मन आणि चांगला स्वभावाने ते तुम्हाला कधी आवडू लागतील, हे तुम्हाला कळणारही नाही. जर ते तुमच्यावर खरंच प्रेम करत असतील तर तुमच्यासोबत जास्तीतजास्त वेळ घालवतील. तुमची प्रत्येक गोष्ट लक्ष देऊन ऐकतील. तुमची प्रत्येक ईच्छा त्यांना पूर्ण करावीशी वाटेल. या राशीचं प्रेम हे खरं आणि त्यागपूर्ण असतं.


मिथुन (21 मे - 21 जून)


tenor


मिथुन राशीच्या लोकांना समजून घेणं थोडं कठीण आहे. तसंच हेही समजून घेणं कठीण आहे की, त्यांचं तुमच्यावर प्रेम आहे की नाही. एकीकडे या राशीची लोकं तुमच्याशी फ्लर्ट करतील तर दुसरीकडे तुमच्यापासून थोडा दुरावा ही कायम ठेवतील. जेव्हा यांच्या मनातील तुमच्याविषयीच्या शंका दूर होतील, तेव्हाच ते तुमच्या जवळ येतील आणि पूर्णतः तुमचे होतील. कधीकधी या राशीचं प्रेम समजून घ्यायला एखादा क्षणही पुरेसा असतो.  


कर्क (22 जून - 22 जुलै)


tumblr static tumblr static dzdxavvdkpskk0wgkcgookcs4 640


कर्क रास असलेल्या व्यक्ती या अगदी फणसासारख्या असतात, वरून काटेरी आणि टणक पण आतून एकदम भावनाप्रधान असतात. जर यांचं तुमच्यावर प्रेम असेल तर ते त्या क्षणापासूनच तुमच्यासोबत पूर्ण आयुष्य कसं व्यतीत करणार यांचा विचार करतात. तुम्ही अपेक्षा करू शकता की, या राशीच्या लोकांचा विचार तुमच्याबरोबर अफेअर किंवा इतर कोणत्याही रिलेशनशिपचा नसतो. उलट मैत्रीच्या सुरूवातीलाच ते तुम्हाला लग्नासाठी प्रपोज करू शकतात.


आपल्या राशीनुसार करून पाहा या सेक्स पोझिशन (Sex Position)   


सिंह (23 जुलै- 22 ऑगस्ट)


giphy 2


या राशीच्या लोक जेव्हा प्रेमात पडतात, तेव्हा त्यांचं वागणं एकदम उत्साही आणि भारावलेलं असतं. जर तुमच्या आयुष्यातही सिंह राशीचा पार्टनर असेल तर तुम्ही त्याच्याकडून भरपूर गिफ्ट्स आणि रोमँटीक डेट्स एक्सपेक्ट करू शकता. जर तसं असेल तर तुम्ही समजून जा की, ते तुमच्यावर प्रचंड प्रेम करतात. या राशीच्या लोकांना आपल्या प्रेमाचा अत्यंत अभिमानही असतो आणि अभिमान तेव्हा अजूनच वाढतो. जेव्हा त्यांचा पार्टनर लव्ह प्रपोजन एक्सेप्ट करतो.


कन्या (23 ऑगस्ट - 22 सप्टेंबर)


giphy


कन्या राशीची लोक सहज स्थिरावत नाहीत. या राशीची लोकं आपल्या मनातील भावना लवकर व्यक्त ही करत नाहीत. जर ते तुमच्यासोबत बऱ्याच काळापासून आहेत तर समजून जा की, हाच त्यांच्या प्रेम व्यक्त करण्याचा अंदाज आहे आणि ते तुमच्यावर भरपूर प्रेमही करतात.


या राशींचे जोडीदार असतात जास्तच केअरिंग, प्रत्येक लहानसहान गोष्टींची घेतात काळजी


तूळ (23 सप्टेंबर - 22 ऑक्टोबर)


original


या राशीची लोक ही एकदम परफेक्ट लव्ह मटेरियल असतात. या राशीच्या लोकांचं रिलेशनशिप हे फक्त फिजीकल नसतं. तर यांना वेगवगळ्या प्रकारे आपलं प्रेम आणि रिलेशनशिपमध्ये रोमान्स वाढवायला आवडतो. तूळ राशीच्या व्यक्ती या त्यांचं प्रेम प्रामाणिकपणे निभावतात. कधी कधी ते त्यांचा रागही व्यक्त करतात. पण तोही त्यांच्या प्रेमाचाच भाग असतो.  


वृश्चिक (23 ऑक्टोबर - 21 नोव्हेंबर)


ezgif.com-resize %282%29


वृश्चिक राशीच्या लोकांचं प्रेम करण्याची पद्धत थोडी वेगळी असते. जर त्यांचं तुमच्यावर प्रेम असेल तर ते तुमच्याजवळ येण्यासाठीही एखाद्या कारणाची वाट बघतात. या राशीच्या लोकांना प्रत्येक गोष्टींच्या मुळापर्यंत जाण्याची सवय असते. जर या राशीचा तुमचा/तुमची पार्टनर असेल तर त्यांच्या सान्निध्यातच तुम्हाला त्यांच्या भावना कळतील.  


वार्षिक भविष्य वृषभ (Taurus) राशी : गतवर्षाचा आनंद नववर्षात अधिक द्विगुणीत होईल


धनु (22 नोव्हेंबर - 21 डिसेंबर)


giphy dip


या राशीचं लोक मात्र त्यांचं प्रेम अगदी उघडरित्या व्यक्त करतात. जर या राशीचा पार्टनर तुमच्याबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवत असेल तर समजून जा त्याचं तुमच्यावर प्रेम आहे. तुम्हाला चांगल वाटावं म्हणून तो काहीही करेल. धनु राशीची लोक प्रामाणिकपणे आणि खऱ्या मनाने आपल्या पार्टनरसोबत राहतात.  


मकर (22 डिसेंबर - 19 जानेवारी)


CrazyFlickeringIndianskimmer-size restricted


मकर राशीच्या व्यक्ती या प्रेमाच्या भावनेला हलकं मानत नाहीत. जर त्यांचं तुमच्यावर खरंच प्रेम असेल तर ते तुम्हाला पुर्णपणे साथ देतात. तुमचं कुटुंब, तुमचं आयुष्य या सगळ्यांमध्ये त्यांना पूरेपूर रस असतो. त्यांचा तुमच्याकडे असलेला ओढा आणि काळजी तुम्हाला जाणीव करून देईल की, त्यांचं तुमच्यावर किती प्रेम आहे.


कुंभ (20 जानेवारी - 18 फेब्रुवारी)


giphy %282%29


या राशीची लोकं त्यांचं तुमच्यावर असलेलं प्रेम व्यक्त करू शकतात. पण ते स्वभावाने मात्र फारच अनरोमँटीक असतात. तुम्हाला त्यांच्यासोबत वेळ घालवणं खूप आवडेल. कारण त्यांच्या डोक्यात एकच गोष्ट असते की, तुमच त्यांच्यावर प्रेम आहे आणि त्यांचं तुमच्यावर मग हे प्रेम अजून वेगळ्या पद्धतीने सांगण्याची काय गरज आहे.


मीन ( 19 फेब्रुवारी - 20 मार्च)


tumblr ofj5gfz18C1ushjquo2 500


मीन राशीच्या पार्टनर हे तुमचं त्यांच्यावर प्रेम आहे किंवा नाही हे अगदी सहज ओळखतात. तुम्ही न बोलताही त्यांना तुमच्या मनातली गोष्ट आणि भावना कळतात. या राशीच्या लोकांच्या डोळ्यातले भाव बघून तुम्हाला कळेल की त्यांचं तुमच्यावर किती प्रेम आहे. या राशीच्या लोकांची प्रेम करण्याची पद्धत फारच सुसंस्कृत असते,जे त्यांच्या रोजच्या वागण्यातून समोर येतं.