प्रत्येकाचं एक मॉर्निंग रूटीन असतं. दिवसभर फ्रेश दिसण्यासाठी काहीजणी योगासनं करतात, काहींना पोटभर नास्ता केल्यावर फ्रेश वाटतं, तर काहीजणी सुंदर दिसण्यासाठी ठराविक ब्युटी रूटीन्स फॉलो करावी असं वाटतं. काही जणी निरनिराळी हेअरस्टाईल करतात, टापटीप दिसण्यासाठी निरनिराळ्या स्टाईलचे कपडे घालतात अथवा परफेक्ट मेकअप करण्यावर भर देतात. सुंदर दिसण्यासाठी हे सगळं करणं जितकं गरजेचं आहे तितकंच गरजेचं आहे तुमच्या त्वचेची काळजी घेणं. कारण जर तुम्हाला नॅचरल ब्युटी हवी असेल तर त्वचा नितळ आणि चमकदार असायला हवी. पण आजकालच्या धावत्या जीवनशैलीमुळे आणि वाढत्या प्रदूषणामुळे तुम्हाला तुमच्या त्वचेची विशेष काळजी घेणं अवघड जातं. याचा परिणाम तुमच्या चेहऱ्यावर दिसू लागतो. रात्री झोपताना तुम्ही तुमच्या त्वचेची काळजी नक्कीच घेता मात्र सकाळी उठल्यावरदेखील तुम्ही त्वचेची तितकीच निगा राखता का… नसेल तर आम्ही तुम्हाला त्वचेची काळजी घेण्यासाठी काही मॉर्निंग ब्युटी केअर रूटीन टीप्स – Skin Care Routine in Marathi देत आहोत ते अवश्य फॉलो करा. यासोबतच वाचा उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी | Summer Skin Care Tips In Marathi
मॉर्निंग स्कीन केयर रूटीन – Morning Skin Care Routine In Marathi
जर तुम्ही सकाळी उठल्यावर या ब्युटी टीप्स फॉलो केल्या तर तुमची त्वचा दिवसभर फ्रेश दिसेल. कारण सकाळी आपल्या त्वचेवर नैसर्गिक चमक असते आणि जसा जसा दिवस पुढे जाऊ लागतो तसा तसा तुमचा चेहरा निस्तेज आणि कोरडा दिसू लागतो. जर तुम्ही सकाळी उठल्यावर काही गोष्टींची काळजी घेतली तर सकाळचे नैसर्गिक तेज तुमच्या चेहऱ्यावर दिवसभर राहू शकते. दिवसभर चेहऱ्यावर ग्लो हवा असेल तर या या मॉर्निग ब्युटी टीप्स तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. काही स्कीन केअर स्टेप्स (Skin Care Routine in Marathi) फॉलो करून तुम्ही तुमच्या दिवसाची सुरूवात फ्रेश करू शकता.
सुरुवात करा क्लिंझिंग ऑईलने – Start With A Cleansing Oil
सकाळी उठल्यावर केवळ पाण्याने तोंड धुतल्याने चेहरा स्वच्छ होतोच असं नाही. कारण त्यामुळे तुमची त्वचा वरवर स्वच्छ दिसते. मात्र त्वचेच्या आतमधील धुळ आणि प्रदूषण तसेच राहिल्यामुळे ती पुन्हा निस्तेज दिसू लागते. त्वचा मुळापासून स्वच्छ करण्यासाठी केवळ फेसवॉशने चेहरा धुणे पुरेसे नाही. यासाठी एखाद्या चांगल्या क्लिंजिंग ऑईलने चेहरा स्वच्छ करा. ज्यामुळे तुमच्या त्वचेवरील डेडस्कीन, धुळ, टॅनिंग स्वच्छ होईल. मायग्लॅमचे सुपरफूड वॉटरमेलन अॅंड रसबेरी फेसवॉश तुम्ही यासाठी वापरू शकता. यात नैसर्गिक घटकांचा वापर करण्यात आलेला असल्यामुळे तुमच्या त्वचेचं नुकसान होत नाही. यासोबतच वापरा हे कोरड्या त्वचेसाठी उत्तम क्लिंन्झर (Best Cleanser For Dry Skin In Marathi)
वॉटरबेस क्लिंझरचा वापर करा – Use Water Based Cleanser
जर तुमची त्वचा संवेदनशील असेल आणि तुम्हाला बाजारात मिळणारं क्लिंजर वापण्याची भीती वाटत असेल तर तुम्ही वॉटरबेस क्लिंजरचा वापर करू शकता. तेलकट नसलेलं आणि त्वचेवरील अतिरिक्त तेल कमी करणारं हे क्लिंझर तुमच्या उपयोगी पडेल. मायग्लॅमच्या युथफुल हायड्रेटिंग फोम क्लिंझरमध्ये वॉटर बेस टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आलेला आहे. म्हणूनच हे तुमच्या त्वचेसाठी बेस्ट ठरेल. यासाठी हे क्लिंझर थोडं हातावर घ्या आणि चेहऱ्यावर लावा. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा आणि चेहरा टॉवेलने टिपून घ्या.
टोनर वापरा – Use A Toner
चेहरा क्लिंजरने स्वच्छ केल्यावर तुम्ही त्वचेला टोनिंग करणे फार गरेजेचे आहे. कारण यामुळे तुमच्या त्वचेवर जमा झालेले अतिरिक्त तेल कमी होते. शिवाय टोनिंग केल्यामुळे तुमची त्वचा चमकदार दिसू लागते. त्वचा टोन करण्यासाठी क्लिंजींग केल्यावर लगेच त्यावर गुलाबपाणी, काकडीचा रस अथवा बटाट्याचा रस लावू शकता. ऑर्गेनिक हारवेस्टच्या व्हिटॅमिन सी फेस टोनरचा तुमच्या त्वचेला चांगला फायदा होईल. कारण यात वापरण्यात आलेले घटक शंभर टक्के नैसर्गिक आहेत. अकाई बेरी आणि डेझी फ्लॉवर्सच्या अर्कापासून हे टोनर तयार करण्यात आलेलं आहे. ज्यामुळे तुमच्या त्वचेचं ओपन पोअर्स बंद होतातच शिवाय त्वचेचं पी एच संतुलन उत्तम राखलं जातं.
सीरम वापरण्यास विसरू नका – Don’t Forget The Serum
त्वचेची निगा राखणे – Skin Care Routine in Marathi साठी क्लिंजींग, टोनिंग आणि मॉईस्चराइझ करणं त्वचेसाठी फार गरजेचं असतं. मात्र टोनिंग केल्यावर त्वचा मॉइस्चराईझ करण्यापूर्वी त्वचेवर एक उत्तम सीरम लावण्याची सवय हातांना लावा. कारण निरोगी त्वचेसाठी फक्त मॉईस्चराइझर क्रीम पुरेसं नाही. म्हणून दररोज अंघोळ केल्यावर तुमच्या त्वचेला एखादं चांगलं सीरम लावत जा. सीरम लावल्यामुळे तुमची त्वचा हायड्रेट राहण्यास मदत होईल. सीरम अप्लाय केल्यामुळे तुमचा मेकअपदेखील जास्त वेळ टिकू शकतो. शिवाय सीरममुळे तुमची त्वचा दिवसभर उजळ आणि चमकदार दिसते. यासाठी वापरा ऑर्गेनिक हारवेस्टचं ब्लश शाईन अॅंड ग्लो सीरम… कारण शंभर टक्के नैसर्गिक घटक असलेल्या या उत्पादनात वापरलेलं आहे. आयरीश मुळांचा अर्क, ज्यामुळे तुमच्या त्वचेवरील सुरकुत्या कमी होतातच शिवाय तुमची त्वचा हायड्रेट राहिल्यामुळे मऊ आणि टवटवीत होते. चिरचरूण राहण्यासाठी आणि एजिंग मार्क्स कमी करण्यासाठी तुम्ही या सीरमचा वापर करू शकता.
त्वचा खोलवर मॉईस्चराईझ करा – Moisturize Well
त्वचेची काळजी घेण्यामध्ये सर्वात महत्वाची स्टेप आहे ती म्हणजे त्वचा मॉईस्चराईझ करणे. त्वचा मऊ राहण्यासाठी एखादं चांगलं मॉईस्चराझर क्रीम त्वचेवर अप्लाय करा. ज्यामुळे तुमची त्वचा दिवसभर मऊ राहील आणि तुम्ही फ्रेश दिसू शकाल. लक्षात ठेवा चेहऱ्याप्रमाणेच संपूर्ण शरीराच्या त्वचेला मॉईस्चराईझ करण्यासाठी गरज आहे. त्यामुळे सकाळी त्वचेवर मॉईस्चराईझिंग क्रीम लावण्यास मुळीच विसरू नका. नियमित त्वचा मॉइस्चराईझ केल्यामुळे तुमच्या त्वचेवरील डाग, पिंपल्स आणि ब्लॅकहेड्स कमी होऊ लागतात. त्वचा मॉईस्चरईझर केल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर लवकर सुरुकुत्या पडत नाहीत. त्वचा मऊ ठेवण्यासाठी आणि एकसमान दिसण्यासाठी तुम्ही सिरोनाचं व्हिटॅमिन सी फेस क्रीम वापरू शकता. सूर्यप्रकाशात राहिल्यामुळे तुमच्या त्वचेवर निर्माण झालेले काळे डाग, एजिंग मार्क्स, केलोजीन कमी झाल्यामुळे त्वचेवर आलेला निस्तेजपणा यामुळे कमी होतो.
सनस्क्रीन वापरा – Use A Sunscreen
संपूर्ण शरीराच्या त्वचेला मॉश्चराईझ केल्यावर त्वचेवर सनस्कीन लावण्याय विसरू नका. सनस्क्रीन लावल्यामुळे तुमची त्वचा टॅन होत नाही. मॉश्चराईझ केल्यावर त्वचेवर दहा मिनीटांनी एखादं चांगलं सनस्क्रीन लावा. उन्हाळ्या व्यतिरिक्त पावसाळा आणि हिवाळ्यातही त्वचेला सनस्क्रीन लावण्याची तितकीच गरज असते. उन्हाळ्यात मात्र चेहऱ्यासोबत, मान आणि हात अशा इतर भागांवरील त्वचेलाही सनस्क्रीन लावा. त्वचेसाठी कोणतं सनस्क्रीन वापरावं या चिंतेत असाल तर वापरा ऑर्गेनिक हारवेस्टचं सनस्क्रीन एपीएफ 50 कारण कारण यात असं टेकनीक वापरण्यात आलं आहे. ज्यामुळे सूर्यप्रकाशासोबतच गॅझेटमधून येणाऱ्या ब्लू लाईटपासूनही तुमच्या त्वचेचं संरक्षण होऊ शकतं.
आयक्रीमने करा डोळे सुरक्षित – Protect With An Eye Cream
Skin Care Routine in Marathi मध्ये टाळली जाणारी गोष्ट म्हणजे डोळ्यांखाली त्वचेची निगा, म्हणूनच डार्क सर्कल्सची समस्या अनेकींना जाणवते. सकाळी उठल्यावर नेहमी तुमच्या डोळ्याच्या खालील त्वचा सुजल्याप्रमाणे दिसत असते. ज्याला आपण पफीनेस असंहा म्हणतो. हा पफीनेस कमी दिसण्यासाठी एखादं चागलं आयक्रीम अथवा जेल तुमच्या डोळ्याखाली लावायला हवं. म्हणून रात्री झोपतानाच नाही तर सकाळी उठल्यावरही आयक्रीमचा वापर करायला विसरू नका. यासाठी तुम्ही ऑर्गेनिक हारवेस्टचं अंडर आय जेल वापरू शकता. यात नैसर्गिक घटकांचा वापर करण्यात आलेला असून त्यामुळे तुमच्या डोळ्यांचा पफीनेस, डोळ्यांखालचा काळेपणा कमी होतो आणि तुम्ही फ्रेश आणि आकर्षक दिसता. त्यासोबतच अंडरआय बॅग किंवा डोळ्याखालील सूज कमी करण्याचे घरगुती उपाय| How To Reduce Under Eye Bags In Marathi
लिप बाम (Lip Balm)
चेहऱ्याकडे पाहिल्यावर सर्वात आधी डोळे आणि ओठ याकडे लगेच लक्ष जातं. त्यामुळे डोळ्यांप्रमाणे तुम्ही तुमच्या ओठांचीदेखील तितकीच काळजी घेणं गरजेचं आहे. हिवाळ्याप्रमाणे सर्वच ऋतूंमध्ये ओठांना लिपबाम लावण्याची गरज असते. त्यामुळे ओठांना मॉश्चराईझ करण्यासाठी सकाळी त्यांच्यावर लिपबाम लावण्यास विसरू नका. लिपबाम लावल्यावर मग त्यावर तुमच्या आवडीची लिपस्टिक तुम्ही नक्कीच लावू शकता. ज्यामुळे तुमचे ओठ कोरडे दिसणार नाहीत. तसंच गुलाबासारखे ओठ हवे तर मग वापरा मायग्लॅमचं सुपरफूड कलर पॉप गुलाबाचं लिप बाम, यात आहे रोझ ऑईलचा अर्क, अव्हॉकेडो बटर ज्यामुळे तुमचे ओठ होतात मऊ आणि गुलाबी. शिवाय यामध्ये एसपीएफ 20 असल्यामुळे तुमच्या ओठांचे सूर्यप्रकाशातील हानिकारक घटकांपासून संरक्षणही होतं.
निरोगी त्वचेसाठी घरगुती टिप्स – Tips To Maintain Healthy Skin
एक ग्लास कोमट पाणी प्या (Drink Warm Water Every Morning)
दररोज सकाळी उठल्यावर एक ग्लास कोमट पाणी प्या. जरी तुम्हाला कोमट पाणी पिण्यास आवडत नसलं तरी त्याचे अनेक आरोग्य फायदे आहेत हे जरूर लक्षात ठेवा. कोमट पाण्यामुळे तुमचं शरीर डिटॉक्स होतं. शरीरातील अशुद्धता बाहेर टाकण्यासाठी कोमट पाणी वरदान ठरू शकतं. सकाळी पाणी प्यायल्याने तुमच्या घामावाटे शरीरातील अशुद्धता बाहेर टाकली जाते आणि दिवसभर तुम्ही फ्रेश दिसता.
दररोज सकाळी चेहरा धुवा (Wash Your Face With Water)
दररोज सकाळी उठल्यावर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. ज्यामुळे चेहऱ्यावरील धुळ आणि प्रदूषण कमी होईल. सकाळी चेहरा धुताना साबण अथवा फेसवॉश वापरण्याऐवजी तुम्ही नैसर्गिक क्लिंजरचा वापर करू शकता. बेसण, दही, दूधाने चेहरा स्वच्छ केल्यास तुमची त्वचा मऊ आणि चमकदार दिसेल.
नियमित व्यायाम करा (Exercise Regularly)
त्वचा नितळ दिसण्यासाठी दररोज सकाळी एक्सरसाईज करण्यासाठी वेळ काढी. धावपळीच्या रुटीनमधून यासाठी वेळ काढणं कठीण असलं तरी अशक्य नक्कीच नाही. त्यामुळे दररोज सकाळी कमीतकमी तीस मिनीटे व्यायाम करा. तुम्ही यासाठी योगासने, प्राणायम, स्ट्रेचिंग, धावणे असे व्यायामप्रकार करू शकता. ज्यामुळे तुमचं रक्ताभिसरण सुधारेल. त्वचेला ऑक्सिजनचा पुरवठा झाल्यामुळे तुम्ही दिवसभर फ्रेश दिसाल.
हेल्दी नाश्ता करा (Eat Healthy Breakfast)
सकाळचा नास्ता तुमच्या आरोग्यासोबत त्वचेसाठीदेखील अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र घाईगडबडीत तुम्ही नास्ता घेण्याची टाळटाळ करता. सकाळी पौष्टिक नास्ता केल्यामुळे तुम्ही दिवस फ्रेश राहता. शरीरात पुरेशी उर्जा असेल तर तुमचा चेहरादेखील टवटवीत दिसतो. यासाठी सकाळी कमी मसालेदार आणि पौष्टिक अन्न खा. दररोज सकाळी फळे अथवा फळांचा रस घेण्यास मुळीच विसरू नका. दिवसभर न थकता फ्रेश दिसण्यासाठी हे मॉर्निंग रुटीन अवश्य फॉलो करा.
चांगलं बीबी क्रीम वापरा (Use Good BB Cream)
सकाळी घराबाहेर पडताना मेकअपमधील फॉऊंडेशन ऐवजी एखादं चांगलं बीबी क्रीम वापरा. यामुळे तुम्हाला मॉश्चराईझर, सनस्क्रीन आणि फाऊंडेशन या तिन्ही गोष्टींचा इफेक्ट मिळेल. चेहऱ्यावर पफच्या मदतीने बीबी क्रीम लावा आणि अक क्लीन लुक मिळवा. मात्र लक्षात ठेवा बीबी क्रीम आणि सीसी क्रीम या दोन वेगवेगळ्या क्रीम आहेत. बीबी क्रीम एक मल्टीटास्किंग स्कीन केअर उत्पादन आहे आणि सीसी क्रीम डस्की कॉम्बिनेशनला फेअर इफेक्ट देण्यासाठी वापरण्यात येणारं सौंदर्य उत्पादन आहे.
दिवसभर स्वतःला हायड्रेट ठेवा (Keep Yourself Hydrate Throughout The Day)
जर तुम्हाला नितळ आणि सतेज त्वचा हवी असेल तर दिवसभर भरपूर पाणी प्या. दिवसभरात कमीतकमी आठ ग्लास पाण्याची शरीराला गरज असते. भरपूर पाणी पिण्यामुळे त्वचेवर चांगला परिणाम होतो, यासाठीच त्वचा निरोगी राहण्यासाठी भरपूर पाणी पिणं गरजेचं आहे. यासाठी त्वचा समस्यांपासून सुटका मिळविण्यासाठी सतत थोडं थोडं पाणी प्या.
मॉर्निंग स्कीन केअर रूटिन – FAQs
प्रश्न – दिवसभरात किती वेळ मॉर्निंग स्कीन रूटिनसाठी खर्च करावा ?
उत्तर – त्वचेची निगा राखण्यासाठी तुम्हाला दिवसभरातून खूप वेळ काढण्याची गरज नाहीत नियमित पाच ते दहा मिनीटे तुम्ही स्कीन केअर रूटिनसाठी काढू शकता.
प्रश्न – मॉर्निंग स्कीन केअर रूटिनमधील काही स्टेप्स नाही केल्या तर चालेल का ?
उत्तर – मॉर्निंग स्कीन केअर रूटिन फॉलो करण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. त्यामुळे तुम्ही काही मिनीटांमध्ये सर्व स्टेप्स करू शकता. कारण या सर्व स्टेप करणं गरजेचं आहे असं आम्हाला वाटतं.
प्रश्न – मेकअप न करताही सुंदर दिसण्यासाठी काय करू ?
उत्तर – जर तुम्हाला मेकअप न करता सुंदर दिसायचं असेल तर त्वचेची काळजी घ्या. मॉर्निंग स्कीन केअर फॉलो केल्यास तुमच्या चेहऱ्यावर एक नैसर्गिक ग्लो येईल ज्यामुळे तुम्हाला मेकअप करण्याची मुळीच गरज नाही. उन्हात फिरताना उन्हात फिरताना सनस्क्रीन लावायला मात्र विसरू नका. शिवाय प्रत्येकवेळी थंड पाण्याने चहऱ्या धुतल्यावर मॉश्चराईझर क्रीम अवश्य लावा.
प्रश्न – दररोज सकाळी चेहरा धुणे गरजेचे आहे का ?
उत्तर – होय, दररोज सकाळी उठल्यावर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. कारण रात्री झोपल्यावर बेड आणि उशीवरील धुळ आणि प्रदूषण तुमच्या चेहऱ्यावर लागण्याची शक्यता असते. ज्यामुळे त्वचा समस्या निर्माण होऊ शकतात.
प्रश्न – चेहरा नैसर्गिक पद्धतीने स्वच्छ कसा करावा ?
उत्तर – मजर तुम्हाला बाजारातील क्लिंजर वापरायचे नसेल तर तुम्ही चेहरा क्लिंजींग करण्यासाठी कच्चे दूध आणि टोनिंग करण्यासाठी गुलाबजल वापरू शकता.