ADVERTISEMENT
home / Breast Cancer
रेडिओलॉजिस्ट शिल्पा लाड सांगत आहेत निरोगी जीवनाचा ‘आरोग्यमंत्र’

रेडिओलॉजिस्ट शिल्पा लाड सांगत आहेत निरोगी जीवनाचा ‘आरोग्यमंत्र’

जागतिक महिला दिनानिमित्त जगभरातील अनेक कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात येत आहे. वैद्यकीय क्षेत्रात अशा अनेक महिला आहेत ज्यांनी प्रचंड मेहनत आणि बुद्धीमत्तेने समाजात स्वतःच एक विशेष स्थान निर्माण केलं आहे. आपण आज डॉ. शिल्पा लाड वैद्यकीय क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या रेडिओलॉजिस्ट यांच्या यशस्वी जीवनाचं रहस्य जाणून घेणार आहोत. 

डॉ. शिल्पा लाड यांच्याविषयी…

डॉक्टर शिल्पा लाड मुंबईच्या एन.एम मेडिकल सेंटरमध्ये ‘Breast Imaging And Intervention’ विभागाच्या प्रमुख कन्सल्टंट आहेत. यापूर्वी डॉ. शिल्पा लाड यांनी कॅनडामधील टोरंटो येथे फेलोशिप ट्रेनिंग आणि ओटावा विद्यापिठातील ओटावा हॉस्पिटलमध्ये Radiologist and Assistant Professor ही जबाबदारी उत्तमरित्या सांभाळली आहे. शिल्पा लाड यांनी Breast Imaging And Intervention  या विषयावर अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय वैद्यकीय परिषदेत जवळजवळ 250 हून अधिक व्याख्याने दिली आहेत. महिला दिनानिमित्त POPxo मराठीच्या वाचकांना रेडिओलॉजिस्ट डॉ. शिल्पा लाड सांगत आहेत निरोगी जीवनाचा ‘आरोग्यमंत्र’

dr shilpa lad 1 %282%29

ADVERTISEMENT

डॉक्टर होण्याचं स्वप्न

डॉ.शिल्पा लाड लहानपणापासून हुशार आणि बुद्धीमान होत्या. शिल्पा लाड यांना डॉक्टर होण्याची प्रेरणा त्यांच्या आईकडून मिळाली. डॉ. शिल्पा लाड यांची आईदेखील हुशार होती मात्र तिला तिच्या जीवनात करिअरच्या संधी कमी प्रमाणात उपलब्ध होत्या. मात्र शिल्पा लाड यांच्या आईने शिल्पामधील हुशारी आणि कौशल्य ओळखत या करिअरसाठी सर्व सोयी, प्रोत्साहन आणि संधी उपलब्ध करून दिल्या. कुटुंबाच्या प्रोत्साहनामुळेच शिल्पा लाड MBBS होऊ शकल्या. पुढे MBBS झाल्यावर डॉ. शिल्पा यांचं लग्न झालं आणि लगेचच त्यांना मुलंही झाली. मात्र संसार आणि मुलाची जबाबदारी सांभाळत त्यांनी त्यांचं MD चं शिक्षण पूर्ण केलं. शिल्पा लाड यांनी 2003 मध्ये टाटा मेमोरिअल हॉस्पिटलमधून Radio-Diagnosis मध्ये ‘एम.डी’चं शिक्षण घेतलं. शिवाय त्यानंतर शिल्पा यांनी कॅनडाच्या टोरंटो विद्यापिठातून तीन वर्षे ब्रेस्ट इमेजिंगसाठी फेलोशिप ट्रेनिंग घेतलं. या प्रशिक्षणानंतर कॅनडामधील ओटावा विद्यापिठातील ‘ओटावा हॉस्पिटल’मध्ये Radiologist and Assistant Professor या पदावर त्यांची नियुक्ती झाली. ओटावामधील पाच वर्षांच्या त्यांच्या कामगिरीमध्ये त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले आहे. आज त्या एन.एम मेडिकल सेंटरमध्ये Breast Imaging And Intervention विभागाच्या प्रमुख कन्सल्टंट या पदावर वैद्यकीय सेवा करत आहेत. या सर्व प्रवासामध्ये लग्नानंतर त्यांना पती आणि कुटूंबीयांची चांगली साथ मिळाली. डॉ. शिल्पा लाड यांचे  पती डॉ. विद्याधर लाड हे कोकिलाबेन धीरूबाई अंबानी हॉस्पिटलमध्ये नामांकित ‘कार्डिअॅक सर्जन’ आहेत. यशस्वी डॉक्टर असण्यासोबतच डॉ. शिल्पा लाड दोन मुलांची ‘आई’देखील आहेत.

वैद्यकीय सेवेतील आव्हाने

डॉ. शिल्पा लाड रेडिओलॉजिस्ट असल्याने ब्रेस्ट कॅन्सरचे निदान करण्यासाठी दररोज त्यांना अनेक महिला रुग्णांशी भेट घ्यावी लागते. वास्तविक कॅन्सर या आजाराविषयी आजही अनेकांच्या मनात गैरसमज आहेत. ‘कर्करोग’ हा नुसता शब्द जरी ऐकला तरी आयुष्य संपल्याची भावना अनेकांच्या मनात निर्माण होत असते. पण जर या आजाराचं निदान लवकर झालं तर तो पूर्ण बरा नक्कीच होऊ शकतो. मात्र कर्करोग हा एक सायलेंट विकारदेखील आहे. कारण कॅन्सरच्या सुरूवातीला  कोणत्याही वेदना जाणवत नाहीत. ब्रेस्ट कॅन्सरच्या बाबतीत सांगायचे झाल्यास अनेक महिलांना स्तनांमध्ये गाठ जाणवते मात्र ती सुरूवातीला दुखत नाही म्हणून त्या डॉक्टरांचा सल्ला घेत नाहीत. आजार बळावल्यावर मात्र त्यावर उपचार करणं आव्हानात्मक असतं. त्यामुळे लोकांमध्ये या आजाराबाबत जनजागृती करणं फार गरजेचं आहे. भारतात कॅन्सरबाबत जनजागृती कमी प्रमाणात आढळून येते. डॉ. शिल्पा लाड या जनजागृतीसाठी सतत प्रयत्नशील असतात. यासाठी जीवनविद्या मिशन या शैक्षणिक,सामाजिक आणि सेवाभावी संस्थेमार्फत ‘डॉक्टर तुमच्या भेटीला’ या उपक्रमातून त्या महिलांना मार्गदर्शन करतात. जीवनविद्या मिशनप्रमाणे सर्वच ठिकाणी सामाजिक स्तरावर अशी कर्करोगाबाबत जागृती होणं गरजेचं आहे.

ADVERTISEMENT

रुग्णांवर उपचार करताना डॉक्टरच्या मनात काय भावना असाव्या

सकारात्मक विचारसरणीने आणि योग्य वेळेत रुग्णांवर उपचार केले तर रुग्ण लवकर बरा होऊ शकतो. कोणत्याही डॉक्टरने रुग्णाच्या केवळ आजाराचा विचार न करता त्याच्या संपूर्ण आरोग्याचा विचार करणं फार गरजेचं  आहे.

dr shilpa lad 1 %283%29

शिल्पा लाड यांचा यशस्वी करिअरचा फंडा

ADVERTISEMENT

आपण निवडलेलं प्रोफेशनल काम आवडीने, प्रामाणिकपणे करणं हे खूप महत्त्वाचं आहे. शिवाय तुमच्या कामात सतत नवनवीन बदल करायला हवेत तरच तुम्ही यशस्वी होऊ शकता. यासाठी त्या कामातील नवीन कौशल आणि कलागुण आत्मसात करा ज्यामुळे तुमची प्रगती होत राहील. डॉ. शिल्पा यांच्या मते स्वतःच्या प्रगतीसोबत सहकारात्मक विचारसरणीने काम केल्यास तुम्हाला यश नक्कीच मिळू शकतं. कारण माणूस एकटा कधीच यशस्वी होऊ शकत नाही. माणसाला प्रत्येक गोष्टीसाठी इतरांच्या मदतीची गरज असते. त्यामुळे सर्वांच्या भल्याचा विचार केला तर तुम्ही तुमच्या जीवनात लवकर यशस्वी होऊ शकता. एक डॉक्टर या नात्याने आपल्या भारतात आपण चांगल्या वैद्यकीय सेवा, उपचार पद्धती कशा येतील याबाबत सतत विचार करणं महत्वाचं आहे. ज्यामुळे सर्वांची सर्वांगिण प्रगती होऊ शकेल. थोडक्यात डॉ. शिल्पा यांनी “Live Local but think global” असा सक्सेस मंत्र दिला आहे.

यशस्वी वाटचालीचं श्रेय

शिल्पा लाड त्यांच्या यशस्वी जीवनाचं श्रेय आई-वडिलांचं प्रोत्साहन, पतीची साथ आणि जीवनविद्या तत्वज्ञानाला देतात.

डॉ. शिल्पा लाड यांचा तरूण मुलींना करिअर निवडण्यासाठी सल्ला

ADVERTISEMENT

तुम्हाला ज्या क्षेत्रात काम करायला आवडेल ते क्षेत्र निवडा. मात्र जे काम तुम्ही कराल ते समाज उपयुक्त असणं फार गरजेचं आहे. त्यामुळे तुमच्या कामातूनच तुम्हाला समाजाचे ऋण फेडता येऊ शकतात. डॉ. शिल्पा लाड यांच्या मते परमेश्वर कृपेने त्यांनी निवडलेलं क्षेत्र समाजसेवेचं असल्याने त्यांना हे काम करताना समाजसेवेचा आनंद मिळतो. त्यामुळे  त्या इतरांनादेखील वैद्यकीय क्षेत्र निशंकपणे निवडण्याचा सल्ला देतात. शिवाय एक डॉक्टर या नात्याने शिल्पा यांच्या मते मुलींनी करिअरसोबतच स्वतःच्या बायालॉजिकल क्लॉककडेही व्यवस्थित लक्ष द्यावे. कारण आजकल अनेक मुली करिअरमागे धावताना लग्न आणि मुलांची जबाबदारी पुढे ढकलतात. मात्र शिल्पा लाड यांच्यामते निसर्गनियमानुसार करिअर, लग्न आणि आई होणं या गोष्टी वेळेत होणं तितकंच गरजेचं आहे.

dr shilpa lad

महिला दिनानिमित्त डॉक्टर म्हणून आज महिलांना आरोग्याबाबत सल्ला

महिलांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणं फार गरजेचं आहे. कारण जर तुम्ही निरोगी असाल तरच तुम्ही तुमच्या कुटूंबाची काळजी घेऊ शकता. महिला  कुटुंबाची काळजी घेण्यात स्वतःच्या आरोग्याकडे नेहमीच दुर्लक्ष करतात. वेळेवर उपचार मिळले तर कोणताही आजार पूर्ण बरा होऊ शकतो. त्यामुळे नियमित वैद्यकीय चाचणी करा. यासाठी चाळीशीनंतर महिलांनी दरवर्षी वाढदिवसाला स्वतःच स्वतःला वैद्यकीय चाचणीचे ‘आरोग्य गिफ्ट’ द्या असा सल्ला त्या देतात. दरवर्षी वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशी हेल्थ चेकअपसाठी जाण्याची सवय लावा. आजकाल अनेक कामाच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांसाठी हेल्थ चेकअपची सोय उपलब्ध असते. या सोयींकडे दुर्लक्ष करू नका त्याचा योग्य फायदा करून घ्या. ज्यामुळे सायलेंट विकारांचे वेळीच निदान होऊ शकेल.

ADVERTISEMENT

निरोगी राहण्यासाठी शारीरिक आणि मानसिक स्वास्थ गरजेचे

खरंतर मानवी शरीर ही एक अद्भूत गोष्ट आहे. मात्र निरोगी असताना निसर्गाने दिलेल्या या अनमोल भेटवस्तूची कोणालाच किंमत नसते. आजारी पडल्यावर शरीराचे मूल्य अनेकांच्या लक्षात येते. यासाठी निरोगी असतानाच शरीराची काळजी घ्या. मनात सतत नकारात्मक विचार असतील तर त्याचा परिणाम तुमच्या संपूर्ण आरोग्यावर होत असतो. बऱ्याचदा एखाद्या आजाराचे मूळ तुमच्या मनातील विचारांमध्ये दडलेले असते. यासाठी आनंदी रहा, सतत सकारात्मक विचार करा आणि शरीराची काळजी घ्या. नियमित व्यायाम आणि योग्य आहार शारीरिक स्वास्थासाठी महत्त्वाचं आहे.

घरातील पुरूषांनी महिलांच्या आरोग्याबाबत कशी घ्यावी काळजी

आजकाल महिला आणि पुरूष बरोबरीने करिअर करत असतात. त्यामुळे घरातील पुरूषांनी घरातील जबाबदाऱ्या महिलांसोबत वाटून घेणं गरजेचं आहे. ज्यामुळे महिलांना त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं सोपं जाईल. एकाच वेळी कामाच्या अनेक जबाबदाऱ्या स्वीकाल्यामुळे ताण-तणाव वाढून महिलांना आजारपणांना सामोरं जावं लागतं. जर त्यांना घरातील पुरूषांची योग्य साथ मिळाली तर संपूर्ण घरात आरोग्य नांदू शकतं.

ADVERTISEMENT

dr. shilpa lad 6 %281%29

करिअर करणाऱ्या महिलांनी वर्क लाईफ बॅलेंस (Work life balance) कसा सांभाळावा

जीवन जगत असताना अनेक महिलांना करिअर, कुटूंब आणि सामाजिक कार्य या तिन्ही जबाबदाऱ्या सांभाळाव्या लागतात. या तीन ठिकाणी समतोल राखणं म्हणजे दिवसभराच्या कामांना समान वेळेत वाटणं असं नाही. सहाजिकच तुम्हाला तुमच्या करिअरसाठी दिवसभरातील जास्त तास द्यावे लागतात. डॉ. शिल्पा लाड यांच्या मते तुम्ही जे काम करत असता ते त्या क्षणी पूर्ण मन लावून करा. कामात प्रामाणिक राहिल्यास कामाचा ताण तुम्हाला घरी आल्यावर येत नाही. ऑफिसचे काम करताना मनापासून ते काम करा ज्यामुळे घरी आल्यावर कुटुंबासाठी वेळ देणं तुम्हाला सोपं जाईल. शिवाय घरी असताना कामाचं टेन्शन घेण्यापेक्षा तुमच्या कुटूंबाला क्वॉलिटी टाईम द्या. मुलांशी गप्पा मारा, त्यांच्यासोबत बाहेर फिरायला जा. जेव्हा तुम्ही तुमचं प्रोफेशनच समाजउपयुक्त कामाचं निवडता तेव्हा ते काम प्रामाणिकपणे करतानाच तुमच्याकडून एकप्रकारे समाजसेवा घडत असते. शिवाय रिकामा वेळ अथवा सुटीचा वेळ तुम्ही एखाद्या समाजकार्यांसाठी नक्कीच देऊ शकता. थोडक्यात या तिन्ही स्तरावर बॅलेन्स साधण्यासाठी जे काम जेव्हा करत आहात तेव्हा ते एकाग्र चित्ताने आणि प्रामाणिकपणे करा.

यासोबतच POPxo मराठीच्या सर्व महिला वाचकांना डॉ. शिल्पा लाड यांनी महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

ADVERTISEMENT

अधिक वाचा

कॅन्सरवर मात करत अभिनेत्री सोनाली बेंद्रेचं पहिलं ‘फोटोशूट’

#StrengthOfAWoman – दाढीमिशा असूनही मुलींसाठी ठरत आहे ‘ही’ मुलगी प्रेरणा

 

ADVERTISEMENT

महिलांविषयी आदर हा कायमस्वरुपी असायला हवा – वैदेही परशुरामी

07 Mar 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT