ADVERTISEMENT
home / लाईफस्टाईल
#StrengthOfAWoman – दाढीमिशा असूनही मुलींसाठी ठरत आहे ‘ही’ मुलगी प्रेरणा

#StrengthOfAWoman – दाढीमिशा असूनही मुलींसाठी ठरत आहे ‘ही’ मुलगी प्रेरणा

बहुतांश मुली आपण अशा बघतो की, चेहऱ्यावर जरा जरी ओरखडा आला किंवा डाग दिसला, अथवा जरा जास्त केस दिसू लागले तर अगदी आकाश पाताळ एक करतात. पण या जगात अशीही एक मुलगी आहे जी आपल्याला आलेल्या दाढी मिशीसह बिनधास्त जगासमोर फिरते आहे आणि तेही अगदी अभिमानाने. या मुलीला आपल्या दाढी – मिशांबद्दल किंवा आपल्या दिसण्याबद्दल लोकांना काय वाटतं याबद्दल काहीही वाटत नाही. लोक काय विचार करतात यापेक्षा तिला आपल्या दाढी – मिशा हा आपला अभिमान वाटतो. पंजाबमधील हरनाम कौर आपल्या वेगळ्या रूपासाठी प्रसिद्ध झाली आहे. इतकंच नाही तर तिला यासाठी गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्येही स्थान मिळालं आहे. जगभरात हरनामच्या नावाची चर्चा आहे आणि हरनाम मात्र आपला अभिमान उत्कृष्टरित्या सांभाळून ठेवत आहे.

हरनामला येते मुलांसारखी दाढी

bearded-woman-harnaam-kaur-instagram1 1

हरनामच्या केवळ चेहऱ्यावरच नाही तर संपूर्ण शरीरावर मुलांसारखे केस येतात. पण या गोष्टीसाठी तिने कधीही आपल्यातील आत्मविश्वास कमी होऊ दिला नाही. इतर मुलींप्रमाणे तिने या गोष्टी न लपवता जगाला तोंड दिलं. ही बाब तिने आपली कमतरता न समजता हीच गोष्ट आपली ताकद असल्याचं सिद्ध करत आज जगासमोर हरनामने स्वतःला सिद्ध केलं आहे. आता संपूर्ण जगात हरमन दाढी – मिशीवाली मुलगी अशाच स्वरुपात ओळखली जाते. इतकंच नाही तर हरनामने या दाढी-मिशांसह आता मॉडेलिंगच्या जगातही पाऊल ठेवलं आहे. असं करून तिने संपूर्ण जगातील पायंडा मोडत मुलींसाठी प्रेरणा निर्माण केली आहे.

ADVERTISEMENT

5 1473395680

तिचे फोटो पाहून तुम्ही नक्कीच तिच्या आत्मविश्वासाला सलाम कराल. कोणतीही लाज न बाळगता हरनाम अगदी आत्मविश्वासाने जगाला सामोरं तर जात आहेच. शिवाय मुलींसमोर एक योग्य ध्येय आणि प्रेरणा तिने उभी केली आहे.

दाढी आणि पगडीच आहे ओळख

pagdi

ADVERTISEMENT

हरनामची दाढी-मिशी आणि पगडीच तिची खरी ओळख आहे. सर्वात कमी वयाची दाढी आणि मिशी असलेली महिला अशी तिची गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद झाली आहे. तिच्यासाठी आणि अगदी तिच्यासारख्या अनेक मुलींसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. हरनामला पी.सी.ओ.डी. अर्थात पॉलीसिस्टिक ओवरी सिंड्रोम हा आजार आहे. त्यामुळेच तिच्या शरीरावर आणि चेहऱ्यावर जास्त प्रमाणात केस येतात असंही तिने एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं.

या गोष्टींमुळे होती हैराण

Iceland women-3-2

या सगळ्या गोष्टी नक्कीच अचानक झाल्या नाहीत. तर एक काळ असाही होता जेव्हा हरनाम या सर्व गोष्टींमुळे आणि केसांमुळे हैराण होती. हे केस जाण्यासाठी आणि काढून टाकण्यासाठी हरनामने अनेक प्रयत्न केले पण एक वेळ अशी आली की, हे केस जाणं शक्यच नव्हतं आणि हे हरनामला कळल्यानंतर तिने या गोष्टीला धैर्याने सामोरं जायचं ठरवलं. तिने या सगळ्या गोष्टी स्वीकार करत आपले केस न कापण्याचा आणि त्यांना जपण्याचा निश्चय केला आणि आज त्यामुळेच ती अतिशय आत्मविश्वासाने वावरू शकत आहे.

ADVERTISEMENT

हरनाम आता प्रोफेशनल मॉडेल

Harnaam-Kaur

हरनाम आता एक प्रोफेशनल मॉडेल म्हणून काम करत असून अतिशय सामान्य जीवन जगत आहे. ती जेव्हा 11 वर्षांची होती तेव्हाच तिच्या आयुष्यात या समस्येला सुरुवात झाली होती. तिला संपूर्ण अंगावर केस येऊ लागले होते. इतकंच नाही तर तिच्या छाती आणि चेहऱ्यावर संपूर्ण केस यायला सुरुवात झाली होती. या सगळ्यामुळे तिच्या घरातील लोकांनाही खूप काळजी होती.  शाळेमध्येदेखील तिला मिशीवाली मुलगी म्हणून चिडवायचे. तिच्याबरोबर कोणालाही बोलायलासुद्धा आवडत नसे असंही तिने एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं. पण हरनामने आपल्या मनाशी पक्क ठरवलं की, ज्या गोष्टीमुळे आपल्यापासून माणसं दूर जात आहेत, त्याच गोष्टीमुळे आपल्यावर गर्व वाटावा असं काम करून दाखवायचं. हरनाम आता 24 वर्षांची आहे आणि तिला जगभरात लोक याच तिच्या वैशिष्ट्यामुळे ओळखतात आणि तिच्या या आत्मविश्वासाला लोक सलाम करतात.

फोटो सौजन्य 

ADVERTISEMENT

हेदेखील वाचा – 

#StrengthOfAWoman : ‘या’ आहेत बॉलीवूडच्या सुपरवुमन ज्यांनी स्वबळावर केले चित्रपट सुपरहिट

#StrengthOfAWoman या आहेत भारतातील नवदुर्गा

#StrengthOfAWoman : दीपिका पादुकोण, सोनम कपूरसारख्या अनेक बॉलीवूड अभिनेत्रींचा आहे वेगळा बिझनेस

ADVERTISEMENT
07 Mar 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT