ADVERTISEMENT
home / Breast Cancer
मुंबईतील या 5 बाजारांमध्ये मिळतात स्वस्त आणि मस्त इनरवेअर्स

मुंबईतील या 5 बाजारांमध्ये मिळतात स्वस्त आणि मस्त इनरवेअर्स

मुंबईत तुम्हाला एखादी गोष्ट मिळत नाही असे होत नाही. मुंबईतील बाजारांमधून फेरफटका मारत असताना अशी काही दुकाने दिसली की, ज्यामध्ये तुम्हाला हवे तसे इनरवेअर्स मिळू शकतात आणि तेही अगदी माफक दरात. आता तुम्हाला वाटेल रस्त्यावर इनरवेअर घेऊ नका असा सल्ला देताना या बाजारातून स्वस्त इनरवेअर्स का घ्यायची. पण तुमच्या इनरवेअरमध्ये केवळ ब्रा आणि पँटी या बेसिक गोष्टी येत नाहीत. तर हल्ली प्रत्येक कपड्यांवर वेगवेगळ्या प्रकारच्या इनरवेअर घालायचे असतात अशावेळी नेहमीच महागडे इनरवेअर घेणे परवडत नाही त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी मुंबईतील 5 मार्केट शोधून काढले आहेत. जिथे तुम्ही शॉपिंग करु शकाल. 

कपाटात कपडे कोंबण्यापेक्षा असे कार ऑरगनाईज

वांद्रे लिंकीग रोड(Linking Road, Bandra) 

 bandra linking road

शॉपिंग करणाऱ्यांना वांद्रा लिंकिंग रोड माहीत नाही असे होणार नाही. या बाजारात तुम्हाला ठिकठिकाणी वेगवेगळ्या स्टॉल्सवर इनरवेअर्स मिळू शकतील. यामध्ये प्रामुख्याने तुम्हाला तुमच्या बॅकलेस ड्रेसवर घालण्यायोग्य चांगले इनरवेअर्स या ठिकाणी मिळू शकतील. या शिवाय तुम्ही शॉर्ट पँटस घालणारे असाल तर तुम्हाला चांगल्या बॉय शॉर्टसही या मार्केटमध्ये मिळू शकतील.

ADVERTISEMENT

ऑफिसमध्ये घाला असे परफेक्ट कपडे

कसे जाल?

जर तुम्ही ट्रेनने जाणार असाल तर तुम्हाला पश्चिम रेल्वेवरील वांद्रे स्थानकात उतरायचे आहे.

वांद्रे स्थानकात उतरल्यानंतर तुम्हाला पश्चिमेकडे येऊन तुम्हाला लिंकिंग रोडला जाण्यासाठी शेअर ऑटो मिळेल.

ADVERTISEMENT

  इर्ला मार्केट (Irla Market)

irla market

पार्ले आणि अंधेरीमध्ये इर्ला मार्केट आहे. मुंबईतील इर्ला  मार्केट हे देखील कपड्यांसाठी प्रसिद्ध आहे. येथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारातील कपडे पाहायला मिळतात इर्ला मार्केटमध्ये अनेक लहान- मोठी दुकानं आहेत. त्यात तुम्हाला चांगले इनरवेअर मिळू शकतात. जर तुम्हाला उघड्यावर इनरवेअर घ्यायला लाज वाटत असेल तर इर्ला मार्केट तुमच्यासाठी एकदम परफेक्ट आहे. दुकान असले म्हणून काय झाले तुम्हाला इथे अगदी होलसेल दरात इनरवेअर मिळू शकतात.

 कसे जाल?

तुम्हाला पार्ले किंवा अंधेरी पश्चिमेला उतरुन इर्ला मार्केटसाठी थेट रिक्षा करता येईल.

ADVERTISEMENT

उन्हाळ्यात हे कपडे ठेवतील तुम्हाला कूल आणि ट्रेंडी

 कुलाबा कॉझवे (Colaba causeway Maket)

दक्षिण मुंबईतील कुलाबा कॉझवे हे देखील एक फॅशन मार्केट आहे. ऑक्साईड दागिने, कपडे, बॅगा, ड्रेसेस असे बरेच काही मिळते. शिवाय या ठिकाणी तुम्हाला हव्या असलेल्या सेक्सी लाँजरेज देखील मिळतात. पण या बाजाराचे एक विशेष आवर्जून सांगावेसे वाटेल ते म्हणजे जर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या ब्रा घालण्याची आवड असेल तर तुम्ही या मार्केटमध्ये एक फटका मारायलाच हवा.

कसे जाल?

तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर उतरायचे आहे. तेथून तुम्हाला बस किंवा शेअर टॅक्सी मिळू शकतात.

ADVERTISEMENT

बाजार फिरुन झाल्यानंतर तुम्ही मस्त गेट वे ऑफ इंडियाही फिरु शकता.

भुलेश्वर मार्केट (Bhuleshwar Market)

bhuleshwar

भुलेश्वर मार्केट हे देखील मुंबईतील एक बेस्ट मार्केट आहे. मूळ मुंबईपासून अगदी जवळ असलेले हे मार्केट म्हणजे अलिबाबाची गुहा आहे. तुम्हाला या मार्केटमध्ये बऱ्याच गोष्टी मिळू शकतात. तुम्हाला जर होलसेल भावात इनरवेअर घ्यायच्या असतील तर येथे अनेक छोटी- छोटी दुकाने आहेत. जिथे तुम्हाला अगदी बेसिक इनरवेअरपासून ते हटके इनरवेअर मिळू शकतात

कसे जाल?

ADVERTISEMENT

चर्नी रोड स्टेशनवरुन  उतरुन तुम्हाला टॅक्सीने सहज भुलेश्वर मार्केटला जाता येईल.

क्रॉफर्ड मार्केट (Crawford Market)

crowford market

तुम्ही सीएसएमटीला गेलात आणि क्रॉफेड मार्केटमध्ये गेला नाही तर काय उपयोग? क्रॉफर्ड मार्केटमध्येही वेगवेगळ्या कपड्यांची खरेदी तुम्हाला करता येऊ शकते. अगदी सेक्सी लाँजरेपासून ते रोजच्या कॉटनच्या इनरर्सपर्यंतचे सगळे चांगले पर्याय तुम्हाला रस्त्यांवरील दुकानात मिळू शकतात. याठिकाणी स्कर्ट किंवा तत्सम कपड्यांच्या आत घालता येईल अशा स्पँडेक्स मटेरिअलमधील परफेक्ट बॉडी शेप घेणारे इनर्स मिळतात.

कसे जाल?

ADVERTISEMENT

मस्जिद आणि सीएसटी या दोन्ही स्टेशनवरुन तुम्हाला या ठिकाणी चालत जाता येऊ शकते.

 तर मुंबईतील ही काही ठिकाणं आहेत जिथून तुम्ही चांगल्या इनरवेअर्स विकत घेऊ शकता.

(फोटो सौैजन्य- Instagram)

16 Apr 2019
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT