हल्लीचा काळ हा वेबसिरीजचा असला तरी मालिकांची क्रेझ अजूनही आहे. विशेषत: जुन्या मालिका साधारण 90 च्या काळातील या मालिका त्या काळातील सुपरडूपर हिट अशा मालिका होत्या. पण आजही त्यांचे काही एपिसोड युट्युबवर पाहिले की, आवर्जून म्हणावेसे वाटेल की, ‘वा वो भी क्या दिन थै’ आज आपण हिंदीतील अशा 5 मालिका पाहणार आहोत. त्यांची नावंच सांगितल्यानंतर तुम्हाला त्या मालिका पटकन आठवतील.
देख भाई देख
दूरदर्शनवरील ही मालिका अनेक कुटुंबाची आवडती मालिका होती. 6 मे 1993 रोजी ही मालिका प्रदर्शित करण्यात आली. आनंद महेंद्रो दिग्दर्शित आणि जया बच्चन निर्मित ही मालिका कॉमेडी स्वरुपातील होती. या मालिकेतील कलाकारांची फळी ही तितकीत तगडी होती. मालिकेत मुख्य भूमिकेत शेखर सुमन, नवीन निश्चल. फरिदा जलाल, भावना भावसार, विशाल धिंगरा, अमर उपाध्याय, विशाल धिंगरा अशी स्टारकास्ट होती. ही मालिका टीव्हीवर साधारण एक वर्ष सुरु होती. या मालिकेचे एकूण 65 भाग प्रदर्शित करण्यात आले. फॅमिली कॉमेडीमध्ये मोडणारी ही मालिका एकदम धम्माल होती. आजही या मालिकेचे टायटल ट्रॅक अनेकांच्या लक्षात आहे.
खिचडी फेम रिचा भद्रालाही आला #MeToo चा अनुभव
तू तू मै मै
सासू- सुनेच्या नात्यातील गोडवा आणि भांडण दाखवणारी मालिका म्हणजे तू तू मैं मै. 26 जुलै 1994 रोजी ही मालिका दूरदर्शनवर प्रदर्शित करण्यात आली. तुम्ही ही मालिका पाहिली असेल तर तुम्हाला बहुराणी…. हा शब्द नक्कीच आठवेल. रिमा लागू आणि सुप्रिया पिळगावकर या मालिकेत मुख्य भूमिकेत होते. ही मालिका सचिन पिळगावकर यांनी दिग्दर्शित केलेली होती. 9 ऑक्टोबर 2000 रोजी या मालिकेचा शेवटचा एपिसोड टेलिकास्ट झाला. तब्बल 6 वर्ष ही मालिका सुरु होती. या मालिकेला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.या मालिकेतील सासू-सुनेची जोडी पुन्हा बघायला अनेकांना आवडेल हे नक्की
वाचा – Lata Mangeshkar Marathi Songs
श्रीमानजी श्रीमतीजी
दूरदर्शन आणि सोनी नेटवर्कवर लागणीप ही मालिका 1994 रोजी सुरु झाली ते 1999 पर्यंत ती सुरु होती. या मालिकेतील केकूजी तुम्हाला आठवले की नाही? जतीन कनराकारीया, रिमा लागू, अर्चना पुरणसिंग आणि राकेश बेदी या मालिकेत मुख्य भूमिकेत होते. अर्चना पुरणसिंगने यामध्ये प्रेमा शालिनी नावाची भूमिका साकारली होती. जी एक अभिनेत्री असते. जिच्या मागे केशव म्हणजेच जतीन कनकारीया लागलेला असतो. प्रेमाला पटवण्यासाठी केशव फार प्रयत्न करत असतो. पण दिलरुबा म्हणजे प्रेमा शालिनीचा नवरा त्याला चांगलाच पुरुन उरत असतो. अशी एकूणच कॉमेडी स्वरुपातील ही मालिका होती.
प्रियांका चोप्राचा सासुरवास काही कमी होईना, आता सासरच्यांनी दिले टोमणे
हम पाच
हम पाच ही मालिका माहीत नसेल असे अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच असतील. कारण या मालिकेची मजाच वेगळी होती. 1995 साली या मालिकेचा पहिला एपिसोड आला. त्यानंतर 2006 पर्यंत ही मालिका सुरु होती. आनंद माथुर ( अशोक सराफ) यांच्या 5 मुली आणि त्यांची दुसरी पत्नी यांची ही मालिका होती. या मालिकेतला ट्विस्ट असा होती की, त्यांची पहिली पत्नी प्रिया तेंडुलकर जिचे निधन झाले आहे. पण ती तरीही तिच्या फोटोतून बोलताना या मालिकेत दाखवण्यात आली आहे. या मालिकेत विद्या बालन, भैरवी रायचुरा,शोमा आनंद, वंदना पाठक, राखी टंडन, अमिता नगीना प्रमुख भूमिकेत आहे.
शूटर आजीच्या रुपात तापसी आणि भूमी मारणार ‘सांड की आँख’
कॅप्टन व्योम
जर तुम्ही मिलिंद सोमणचे चाहते असाल तर तुम्हाला मिलिंदची ही मालिका नक्कीच माहीत असेल. 1998 साली ही मालिका सुरु झाली. साधारण एक वर्ष ही मालिका सुरु होती या मालिकेचे एकूण 54 एपिसोड प्रदर्शित करण्यात आले. सायन्स फिक्शनवर आधारीत अशी ही मालिका होती. त्यामुळेच ती अनेक लहानमुलांना आवडणाऱ्या मालिकांमध्ये या मालिकेचा समावेश होता.
(फोटो सौजन्य- Instagram)