ऋतूत बदल झाला की वातावरणात देखील प्रचंड बदल होतात. एप्रिल महिना सुरू झाला की ऊन्हाची काहिली वाढत जाते. सहाजिकच वाढत्या उन्हाचा तुमच्या आरोग्यावर विपरित परिणाम होऊ लागतो. या दिवसांमध्ये आरोग्यासोबत त्वचेची काळजी घेण्याची देखील फार गरज असते. कारण उन्हाळ्याच त्वचा काळवंडणे, त्वचेवर काळे डाग अथवा चट्टे पडणे, सनटॅन होणे, त्वचा तेलकट अथवा कोरडी पडणे, त्वचेवर पुरळ येणे, घामोळे येणे अशा अनेक सौंदर्य समस्या निर्माण होतात. उन्हाळ्यात त्वचेची विशेष काळजी घेण्याची गरज असते. यासाठी उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी ही माहिती जरूर वाचा.
उन्हाळ्यात सुर्यकिरणे प्रखर असकात. त्यामुळे अशा सुर्यकिरणांच्या संपर्कात आल्यामुळे तुमच्या त्वचेवर काळे चट्टे अथवा डाग पडू शकतात. शिवाय उन्हामुळे त्वचा लवकर डिहायड्रेट होते. यासाठी गरज नसताना उन्हातून घराबाहेर पडू नका.
प्रखर उन्हातील तीव्र सुर्यकिरणांचा त्वचेवर लगेच परिणाम होतो. सनबर्न टाळण्यासाठी घराबाहेर पडताना तोंडावर एखादा कॉटनचा स्कार्फ जरूर गुंडाळा. ज्यामुळे तुमच्या त्वचेवर थेट सुर्यकिरणे पडणार नाहीत.
Also Read : त्वचेच्या काळजीसाठी घरगुती उपचार
खरंतर कोणत्याही ऋतूत घराबाहेर पडताना सनस्क्रीन लावणे फार गरजेचे आहे. कारण सनस्क्रीन लोशन लावल्यामुळे त्वचेचा थेट सुर्यकिरणांसोबत संपर्क होणे टाळता येते. मात्र लक्षात ठेवा उन्हाळ्यात नेहमी चांगल्या कंपनीचे आणि एपीएफ 30 पेक्षा जास्त एसपीएफ असलेले सनस्क्रीन लोशन लावा. घरा बाहेर पडण्यापूर्वी कमीत कमी पंधरा ते वीस मिनीटे आधी सनस्क्रीन लोशन लावणे गरजेचे आहे.
उन्हाळ्यात हेवी मेकअप करणे टाळा. कारण उन्हाळ्यात तुम्हाला भरपूर प्रमाणात घाम येतो. घामामुळे मोकळ्या झालेल्या त्वचेच्या छिद्रांमध्ये मेकअपचा थर जातो. ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील छिद्र ब्लॉक होतात. त्वचेच्या आतील भागाचा संपर्क केमिकलयुक्त मेकअपच्या थरासोबत झाल्यामुळे त्वचा समस्या निर्माण होतात.
शरीर हायड्रेट राहण्यासाठी शरीराला पुरेश्या पाण्याची गरज असते. उन्हाळ्यात वाढलेल्या तापमानामध्ये शरीर नियंत्रित ठेवण्यासाठी शरीरातून भरपूर प्रमाणात घाम बाहेर पडत असतो. ज्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी अनियंत्रित होते. उन्हाळ्यात पुरेसे पाणी न पिल्यास तुमचे शरीर आणि त्वचा लवकर डिहायड्रेट होते. कोरड्या त्वचेमुळे अनेक त्वचा समस्या निर्माण होतात. शिवाय डिहायड्रेशनमुळे तुम्हाला उष्माघाताचा त्रास देखील होऊ शकतो. यासाठी उन्हाळ्यात शरीर आणि त्वचेची काळजी घेण्यासाठी सतत थोडे थोडे पाणी प्या. त्वचा नितळ आणि चमकदार दिसण्यासाठी उन्हाळ्यात दररोज नारळपाणी, लिंबूपाणी, कोकमाचे सरबर, आवळा सरबत अथवा वाळ्याचे सरबत पिण्यास काहीच हरकत नाही.
त्वचेचे अनेक प्रकार असतात. काहींची त्वचा तेलकट असते तर काहीची कोरडी. काही जणींची त्वचा संवेदनशील असते तर काहींची नॉर्मल. यासाठीच आम्ही तुम्हाला विविध त्वचा प्रकारानुसार उन्हाळ्यात कशी काळजी घ्यावी हे सांगत आहोत. यानुसार काळजी घेतल्यास उन्हाळ्यात देखील तुमची त्वचा फ्रेश आणि सुंदर दिसू लागेल.
पावसाळ्यात त्वचा मऊ ठेवण्यासाठी फॉलो करा हे स्किन केअर रूटीन
जर तुमची त्वचा नॉर्मल असेल तर तुम्हाला फार काळजी करण्याचे काहीच कारण नाही. अगदी छोट्या छोट्या टीप्स फॉलो करून तुम्ही तुमच्या त्वचेची सहज काळजी घेऊ शकता.
दिवसभरात कमीत कमी दोन ते तीन वेळा चेहरा स्वच्छ पाण्याने धुणे फार गरजेचे आहे. चेहरा धुण्यासाठी चांगल्या प्रतीचे फेस वॉश वापरा. यामुळे तुमच्या त्वचेवरील धुळ आणि प्रदूषण निघून जाईल. त्वचा स्वच्छ झाल्यामुळे त्वचेला पुरशा ऑक्सिजनचा पुरवठा होईल आणि तुम्ही दिवसभर फ्रेश दिसाल. नॉर्मल त्वचेची काळजी घेण्यासाठी आम्ही तुम्हाला काही बेस्ट सौंदर्य उत्पादने सूचवत आहोत.
हिमालया ब्रॅंडची सौंदर्य उत्पादने अधिक लोकप्रिय आहेत. या फेसवॉशमनध्ये वापरण्यात येणारा आर्युर्वेदिक कडुलिंबाचा फॉर्म्युला त्वचेवर फारच परिणामकारक ठरू शकतो. 192 रू. मध्ये तुम्ही ते खरेदी करू शकता. हे फेस वॉश खरेदी करण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा
लॅक्मेची सौंदर्य उत्पादने अनेक जणी वापरणं पसंत करतात. जर तुम्हाला तुमच्या त्वचेसाठी कोणते सनस्क्रीन वापरावे असा प्रश्न पडला असेल. तर लॅक्मेचे हे सनस्क्रीन लोशन तुम्ही नक्कीच वापरू शकता. 281 रू. मध्ये तुम्ही ते खरेदी करू शकता. हे सनस्क्रीन खरेदी करण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा.
काही घरगुती उपचार देखील त्वचेची नियमित काळजी घेण्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरू शकतात. वास्तविक नॉर्मल त्वचेच्या लोकांना अनेक घरगुती उपचार करता येऊ शकतात.
एक चमचा मुलतानी माती आणि एक चमचा गुलाबाची पावडर घ्या. या दोन्ही गोष्टी तुम्हाला कोणत्याही आयुर्वेदिक औषधांच्या दुकानात सहज उपलब्ध होऊ शकतात. या दोन्ही पावडर एकत्र करा. त्यामध्ये कच्चे दूध अथवा गुलाबाचे पाणी मिसळून एक चांगली पेस्ट तयार करा. हा फेस पॅक चेहऱ्यावर लावा आणि वीस ते तीस मिनीटांनी चेहरा स्वच्छ धुवून टाका. महिन्यातून दोन ते तीन वेळा हा फेसपॅक तुम्ही चेहऱ्यावर लावू शकता.
वाचा - त्वचा कशामुळे तेलकट होते
गुलाबपाणी कोणत्याही त्वचेसाठी अगदी उत्तम असते. त्यामुळे रोज चेहऱ्यावर गुलाबपाणी लावा. रोज सकाळी वाटल्यावर अथवा रात्री झोपताना कापसाच्या मदतीने गुलाबपाणी लावा. अथवा एका रिकाम्या स्प्रेच्या बाटलीत गुलाबपाणी भरून ठेवा आणि दिवसभरात तीन ते चार वेळा ते पाणी चेहऱ्यावर स्रे करा. ज्यामुळे तुमची त्वचा फ्रेश दिसू लागेल.
उन्हाळ्यात तेककट त्वचेची काळजी घेणं फार गरजेचं असतं. कारण उन्हाळ्यात तुम्हाला सतत घाम येत असतो. घामामुळे चेहऱ्यावर तेल जमा होते. ज्यामुळे त्वचा नेहमीपेक्षा अधिक तेलकट दिसू लागते. यासाठीच आम्ही तुम्हाला उन्हाळ्यात तेलकट त्वचेची काळजी घेण्यासाठी काही टीप्स देत आहोत.
वाचा - तेलकट त्वचेसाठी घरगुती उपाय
घामामुळे त्वचा अधिक तेलकट होते. तेलकट त्वचेवर धुळ आणि प्रदूषण चिकटून राहते. सतत धुळीचा संपर्क त्वचेशी आल्यामुळे पिंपल्स आणि इतर त्वचा समस्या निर्माण होतात. यासाठी उन्हाळ्यात दर दोन ते तीन तासांनी चेहरा थंड पाण्याने स्वच्छ करा. ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील घाम, धुळ, प्रदूषण आणि अतिरिक्त तेल कमी होईल.
उन्हाळ्यात त्वचा फ्रेश आणि कोरडी ठेवण्यासाठी हे एक बेस्ट फेश वॉश आहे. कारण यामुळे तुमच्या त्वचेवरील अतिरिक्त तेल कमी होईल शिवाय स्ॉबेरीच्या अर्कामुळे तुम्हाला फ्रेश देखील वाटेल. 115 रू. मध्ये तुम्ही हा फेसवॉश खरेदी करू शकता. हा फेसवॉश खरेदी करण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा.
सौंदर्य उत्पादनांमध्ये लॅक्मे कंपनीचे उत्पादन लोकप्रिय आहेत. लॅक्मेच्या चांगल्या गुणवत्तेमुळे हे प्रॉडक्टस लोकांना आवडतात. भारतात ऊन नेहमीच असल्यामुळे लॅक्मेचे सनस्क्रिन भारतात सर्वत्र प्रमाणात उपलब्ध असतात. ही सनस्क्रिन क्रिम फारच हलकं असल्यामुळे ते लावल्यावर चिकटपणा जाणवत नाही. शिवाय यामुळे तुमच्या त्वचेचं सनटॅन, सनबर्न, काळे डाग, सुरूकुत्या या त्वचा समस्यांपासून रक्षण होतं. हे सनस्क्रिन कोणत्याही त्वचा प्रकारासाठी योग्य ठरू शकतं. या ठिकाणी क्लिक करून तुम्ही हे सनस्क्रीन खरेदी करू शकता.
Also Read: Sensitive Skin Care Tips In Marathi
कोरफडीचा गर हे एक नैसर्गिक मॉश्चराईझर आहे. कारण त्यामुळे तुमच्या त्वचेवरील धुण आणि तेलकटपणा कमी होतोच शिवाय त्वचा मऊ देखील होते. त्यामुळे आठवड्यातून एकदा त्वचेला कोरफडीचा गर लावा. यासाठी कोरफडीचा गर चांगला मऊ करून घ्या. चेहऱ्यावर त्याचा फेसपॅक लावून वीस मिनीटांनी चेहरा थंड अथवा कोमट पाण्याने धुवून टाका.
तेलकट त्वचेवर बेसण, हळद आणि गुलाबपाणी फारच लाभदायक ठरू शकते. यासाठी एका वाटीत एक चमचा बेसण, चिमुटभर हळद आणि गुलाबपाणी घ्या. या मिश्रणाचा फेस पॅक चेहऱ्यावर लावा. वीस मिनीटांनी चेहरा थंड पाण्याने स्वच्छ करा. तेलकट त्वचेसाठी या फेसपॅकमध्ये दूध अथवा दही मिक्स करू नये. मात्र हा फेस पॅक इतर त्वचेच्या लोकांसाठी देखील उपयुक्त असल्याने इतरांनी त्यात गुलाबपाण्याऐवजी दूध, मध अथवा दही मिक्स करण्यास काहीच हरकत नाही. आठवड्यातून एकदा हा फेसपॅक चेहऱ्यावर अवश्य लावा. उन्हाळ्यात चेहरा तेलकट होणे नक्कीच कमी होऊ शकेल.
कोरडी त्वचा उन्हाळ्यात जास्त प्रमाणात डिहायड्रेट होते. यासाठी कोरडी त्वचा असल्यास उन्हाळ्यात नियमित पुरेसे पाणी प्या. ज्यामुळे तुमची त्वचा हायड्रेट राहण्यास मदत होईल. त्वचा हायड्रेट राहण्यासाठी नियमित पाण्याचा अंश भरपूर असलेली फळे खा. कलिंगड, द्राक्षे, संत्री, टरबूज,ताडगोळे यासारखी फळे खाण्याने तुमची त्वचा फ्रेश दिसेल. यासाठी एखादे चांगले आणि सौम्य बॉडीवॉश आणि फेसवॉश वापरण्यास काहीच हरकत नाही. शिवाय हायड्रेट राहण्यासाठी उन्हाळ्यात देखील त्वचेला नियमित मॉश्चराईझर लावण्याची गरज आहे. यासाठी कोरड्या त्वचेसाठी असलेले एखादे चांगले मॉश्चराईझर लावा अथवा घरगुती होममेड मॉश्चराईझर देखील तुम्ही वापरू शकता. कोरडी त्वचा असल्यास कोणताही साबण वापरू नका कारण त्यामुळे तुमची त्वचा अधिक कोरडी होण्याचील शक्यता आहे. शिवाय कोरडी त्वचा असल्यास उन्हाळ्यात गरम पाण्याने मुळीच अंघोळ करू नका कारण यामुळे तुमची त्वचा अधिक कोरडी होईल.
हिमालयाचे हे फेसवॉश खास कोरड्या त्वचेसाठी तयार करण्यात आलेले आहे. यामुळे तुमची त्वचा अधिक मऊ आणि मुलायम होते. यामुळे त्वचा फार कोरडी देखील होत नाही. कोणत्याही हिमालयाच्या आऊटलेटमध्ये अथवा शॉपिंग मॉलमध्ये तुम्ही ते खरेदी करू शकता.
कोरड्या त्वचेसाठी हे सनस्क्रीन फारच उपयुक्त आहे. त्यामुळे जर तुमची त्वचा कोरडी असेल तर तुम्ही हे सनस्क्रीन नक्कीच वापरू शकता. हे सनस्क्रीन विकत घेण्यासाठी तुम्ही या ठिकाणी क्लिक करू शकता.
जर तुमची त्वचा उन्हाळ्यात देखील नितळ आणि चमकदार दिसावी असं वाटत असेल तर पपईचा गर नक्कीच उपयुक्त ठरू शकतो. यासाठी पिकलेल्या पपईचा गर काढा आणि तो स्मॅश करा त्यात एक चमचा मध मिसळा. हा फेसपॅक चेहऱ्यावर लावून वीस मिनीटांनी चेहरा थंड पाण्याने धुवून टाका. यामुळे तुमची त्वचा फ्रेश दिसू लागेल.
उन्हाळ्यात देखील तुमच्या त्वचेला मॉश्चराईझरची गरज असते. केळ आणि मध यामुळे तुमची त्वचा मऊ आणि मुलायम होते. यासाठी एक पिकलेले केळं व्यवस्थित स्मॅश करा यामध्ये एक चमचा मध घालून एक फेसपॅक तयार करा. हा फेस पॅक चेहऱ्यावर लावून वीस मिनीटांनी चेहरा थंड पाण्याने धुवून टाका.
जर तुमची त्वचा संवेदनशील असेल तर चेहरा स्वच्छ करण्यासाठी गुलाबपाणी अथवा कोणताही साबण थेट वापरू नका. कारण त्यामुळे तुमच्या त्वचेवर अॅलर्जी अथवा पुरळ येऊ शकते. शिवाय संवेदनशील त्वचेच्या लोकांना उन्हात गेल्यामुळेदेखील त्वचेवर पुरळ येण्याची समस्या निर्माण होते. यासाठी अशा त्वचेच्या लोकांनी नेहमी उन्हात जाताना काळजी घेणं गरजेचं आहे. उन्हात जाण्याची वेळ आल्यास कॉटनचा स्कार्फ अथवा छत्री जरूर घ्या. शिवाय संवेदनशील त्वचा असल्यास उन्हाळ्यातील समारंभांमध्ये मेकअप करणे टाळावे. जर मेक अप करण्याची वेळ आलीच तर अगदी हलका आणि सौम्य मेकअप करावा. मेकअप काढतानादेखील तो अगदी योग्य पद्धतीने काढावा. कारण असे न केल्यास तुम्हाला त्वचा समस्या निर्माण होऊ शकतात. यासाठी आम्ही दिलेल्या या टीप्स जरूर फॉलो करा.
संवेदनशील त्वचेच्या लोकांसाठी तयार करण्यात आलेले हिमालयाचे हे खास सनस्क्रिन तुमच्यासाठी अगदी उपयुक्त ठरू शकते. कारण यामध्ये वापरण्यात आलेल्या आर्युवेदिक फॉम्युलामुळे तुमची त्वचेला त्रास होणार नाही आणि सुर्यकिरणांपासून तुमचे संरक्षणदेखील होते. हे सनस्क्रीन खरेदी करण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा.
मेकअप काढताना तो योग्य पद्धतीने काढणे फार गरजेचे आहे. जर तुम्ही मेकअप काढण्यासाठी तुम्ही गार्निअरचे हे मेकअप रिमूव्हर नक्कीच वापरू शकता. कारण ते खास संवेदनशील त्वचेसाठीच तयार करण्यात आले आहे. हे उत्पादन तुम्ही या ठिकाणी क्लिक करून खरेदी करू शकता.
चंदन पावडर आणि गुलाबाच्या पाकळयांची पावडर मिक्स करून त्याच्या फेसपॅक चेहऱ्यावर लावल्याने तुमच्या चेहऱ्याला थंडावा मिळू शकतो. यासाठी या दोन पावडर समप्रमाणात घ्या आणि त्यात मध टाकून एक पेस्ट तयार करा. हा फेस पॅक चेहऱ्यावर लावा आणि वीस मिनीटांनी चेहरा धुवून टाका.
प्रत्येक त्वचेसाठी निरनिराळ्या सनस्क्रीनची गरज असते. त्यामुळे तुमची त्वचा कोणत्या प्रकारची आहे हे पाहून सनस्क्रीनची निवड करा. प्रत्येक उत्पादनावर ते कोणत्या त्वचाप्रकारासाठी योग्य आहे हे लिहीलेले असते. त्यामुळे एखादे उत्पादन खरेदी करण्यापूर्वी त्यावरील माहिती अवश्य वाचा. एसपीएफ 30 पेक्षा अधिक एसपीएफ असलेले सनस्क्रीन उन्हाळ्यात वापरणे गरजेचे आहे. आम्ही तुम्हाला त्वचेनुसार काही उत्पादने सांगितली आहेत याचा देखील तुम्हाला नक्कीच उपयोग होऊ शकतो.
उन्हाळ्यात त्वचा टॅन होण्याची समस्या फार मोठ्या प्रमाणावर जाणवते. जर तुम्हाला घरीच त्वचा डीटॅन करायची असेल तर त्वचेवर बटाट्याचा रस लावा. कारण बटाट्यामध्ये नैसर्गिक ब्लिचिंग घटक असतात. ज्यामुळे काळवंडलेली त्वचा उजळण्यास मदत होते.
साधारणपणे शरीराला दिवसभरात कमीत कमी आठ ग्लास पाणी पिण्याची गरज असते. मात्र उन्हाळ्यात शरीरातील तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी सतत पाणी पिणे गरजेचे आहे. यासाठी दर पंधरा मिनीटांनी थोडे थोडे पाणी पिण्यास काहीच हरकत नाही. पाणी पिण्याची आठवण होण्यासाठी कामाच्या ठिकाणी बाटली भरून ठेवा आणि दर पंधरा मिनीटांचा अलार्म लावा.
त्वचेची अशी काळजी घ्याल तर तुमची त्वचा ही राहील छान
फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम आणि शटरस्टॉक