ADVERTISEMENT
home / Natural Care
घरच्या घरी करा ब्लीच आणि जाणून घ्या नैसर्गिक ब्लीचबद्दल

घरच्या घरी करा ब्लीच आणि जाणून घ्या नैसर्गिक ब्लीचबद्दल

चेहऱ्यावर इस्टंट ग्लो येण्यासाठी आणि चेहऱ्यावरील बारीक केस लपवण्यासाठी अनेकींना ब्लीचमुळे मदत होते. कारण पार्टीला किंवा लग्नाला जायचं असेल आणि कमी वेळ असल्यास चेहऱ्यावरील ग्लोसाठी आणि बारीक केस झटपट लपवण्यासाठीचा हा एक झटपट उपाय आहे. ब्लीचमुळे आपली त्वचा मऊ बनवण्यासोबतच तिचं पोषणही होतं. हो, ब्युटी एक्सपर्ट्स ही मानतात की, ब्लीच योग्य प्रमाण आणि योग्य वेळ ठेवल्यास ते चांगला रिझल्ट देतं. ब्लीच करण्यासाठी पार्लरलाच जायला हवं असं काही नाही. तुम्ही घरच्या घरीही ब्लीच करू शकता. कारण ब्लीच केल्यावर दिसणाऱ्या डागविरहीत आाणि चमकदार चेहऱ्यामुळे महिलांच्या कॉन्फिडन्समध्येही कमालीचा फरक पडतो. चला जाणून घेऊया ब्लीचबाबतच्या सर्व बाबी ज्या प्रत्येकीला माहीत असल्या पाहिजेत.    

ब्लीच म्हणजे काय आणि त्याचा उपयोग

ब्लीचला ब्लीचिंग एजंट म्हणून ओळखलं जातं. जे एक प्रकारचं केमिकल असतं. याचा वापर हा मुख्यतः चेहऱ्यावरील केसांचा रंग हलका करण्यासाठी, त्वचा स्वच्छ आणि चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी केला जातो. या पूर्ण प्रोसेसला ब्लीचिंग असं म्हटलं जातं. ब्लीचिंग फक्त चेहऱ्याची सुंदरता वाढवण्यासाठी वापरलं जात असं नाहीतर याचा उपयोग अन्य ठिकाणीही केला जातो. जसं कागदाला पांढर शुभ्र बनवण्यासाठी, दातांच्या स्वच्छतेसाठी किंवा वस्तू स्वच्छ आणि चमकदार बनवण्यासाठी केला जातो.

ब्लीचचे मुख्य रूपात दोन प्रकारात आढळतं. Types Of Bleach In Marathi

Types Of Bleach In Hindi

जर आपण ब्लीचबाबत जाणून घेत आहोत तर आपल्याला हे माहीत असलं पाहिजे की, बाजारात ब्लीचचे मुख्यतः दोन प्रकार मिळतात.

ADVERTISEMENT

पावडर ब्लीच – हे ब्लीच पावडरच्या रूपात उपलब्ध असतं. हे खूपच परिणामकारी असतं. हे कपड्यावरील डाग घालवण्यासाठी आणि दुर्गंधी दूर करण्यासाठी वापरलं जातं.

क्रीम ब्लीच – या ब्लीचचा वापर त्वचेसाठी केला जातो. जास्तकरून महिला किंवा मुली फेशिअल आधी ब्लीच करणं पसंत करतात. यामुळे चेहऱ्याचा ग्लो अजूनच वाढतो. काहीजणी हाताला वॅक्स करण्याऐवजी ब्लीच करून घेता. थ्रेडींग ज्यांच्या नाजून त्वचेला जमत नाही त्यांनी अप्पर लीप्स किंवा हातावरील वॅक्ससाठी ब्लीचचा पर्याय करून पाहायला हरकत नाही. पण हे करण्याआधी पॅच टेस्ट नक्की करून पाहा.

ब्लीचचा वापर करण्याची स्टेप बाय स्टेप योग्य पद्धत How To Use Bleach On Face In Marathi

How To Use Bleach On Face In Hindi

स्टेप 1 – सर्वात आधी चेहरा फेसवॉशने स्वच्छ धुवून घ्या.

ADVERTISEMENT

स्टेप 2 – त्यानंतर चेहऱ्यावर ब्लीच लावण्याआधी प्री-ब्लीच क्रीमने मसाज नक्की करा.

स्टेप 3 – आता एका बाऊलमध्ये चेहऱ्याच्या त्वचेनुसार  2 ते 3 चमचे ब्लीचिंग क्रीम घ्या आणि त्यात एक्टीव्हेटर (ब्लीचिंग पावडर) 1 ते 2 चिमूट घालून चांगलं मिक्स करून घ्या. आता लक्षात ठेवा की, एक्टीव्हेटरच प्रमाण हे संतुलित असलं पाहिजे नाहीतर त्वचेला नुकसान होऊ शकतं.

स्टेप 4 – आता ब्रशच्या मदतीने पूर्ण चेहऱ्यावर आणि मानेवर हे मिश्रण लावा आणि लक्षात ठेवा की, ब्लीच आयब्रोला लागता कामा नये. नाहीतर तेही गोल्डन रंगाचे होतील.

स्टेप 5 – ब्लीच लावून झाल्यानंतर ते कमीत कमी 10 ते 15 मिनिटं तसंच ठेवा. जळजळ झाल्यास मात्र लावलेला भाग चेक करून पाहा किंवा लावण्याआधी पॅच टेस्ट घ्या. .

ADVERTISEMENT

स्टेप 6 – आता स्पंज किंवा टिश्यू पेपरच्या मदतीने ब्लीच स्वच्छ करून घ्या आणि चेहरा थंड पाण्याने धुवा.

स्टेप 7 – यानंतर चेहरा स्वच्छ पुसून त्यावर पोस्ट-ब्लीच क्रीम लावून मसाज करा.

ब्लीच करण्याआधी आणि नंतर  या गोष्टी लक्षात ठेवा Bleach After Before Care Tips In Marathi

– ब्लीचिंग क्रीम नेहमी तुमच्या त्वचेनुसारच निवडा.

– जर तुमची त्वचा खूप कोमल आणि सेन्सेटीव्ह असेल तर ब्लीचिंग क्रीम लावण्याआधी ते कानाच्या मागे किंवा आपल्या हाताच्या कोपरावर लावून पॅच टेस्ट नक्की करा आणि पाहा की, जळजळ किंवा रॅश तर येत नाही.

ADVERTISEMENT

– ब्लीच करण्याआधी थ्रेडींग किंवा वॅक्स करू नका.

– ब्लीचिंग क्रीम लावण्याआधी तुमचा चेहरा चांगला स्वच्छ करून घ्या.

– गरम पाण्याने आंघोळ केल्यानंतर लगेच चेहऱ्यावर ब्लीच लावू नये.

– ब्लीचिंग पेस्ट चेहऱ्यावर लावण्यासाठी आणि काढण्यासाठी हातांचा वापर करू नका. कारण आपल्या हातावर कीटाणु किंवा जीवाणु असू शकतात. त्यामुळे ब्रश किंवा स्टीकचाच वापर करा.

ADVERTISEMENT

– ब्लीच केल्यानंतर लगेच प्रखर उन्हात किंवा बाहेर जाऊ नका. अगदीच जायचं असल्यास चेहरा स्वच्छ कपड्याने व्यवस्थित कव्हर करूनच बाहेर पडा.

– ब्लीच केल्यानंतर फेशिअल किंवा क्लीन-अप केल्यास चेहऱ्यावरील ग्लो अजूनच वाढतो.

– चेहरा पाण्याने स्वच्छ धुवून आणि पुसून घेतल्यावर कोल्ड क्रीमने हलक्या हाताने मसाज करा.

– ब्लीच नंतर चेहऱ्यावर एस्ट्रिंजंट लोशन लावल्यास त्वचेवर रॅशेस येत नाहीत आणि जळजळही होत नाही.

ADVERTISEMENT

ब्लीच लावण्याचे फायदे Benefits Of Bleaching Face In Marathi

Benefits Of Bleaching Face In Hindi

चेहऱ्यावर येतो ग्लो

ब्लीच लावल्याने त्वचेच टेक्स्चर बदलतं. ब्लीचमुळे त्वचेवरील काळेपणा दूर होतो, ज्यामुळे चेहऱ्यावर ग्लो येतो. ब्लीच हे त्वचेतील मेलनिनचा स्तर कमी करतं. ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील ग्लो भरपूर वेळ कायम राहतो.

डेड स्कीनची सफाई

paan leaf pimples benefits

धूळ-माती आणि प्रदूषणामुळे आपल्या प्रत्येकीची त्वचा शुष्क आणि कोरडी होते. ज्यामुळे चेहऱ्यावर डेडस्कीन जमा होते. ब्लीच केल्याने डेड स्कीन निघून जाते आणि त्वचा चमकदार होते.

ADVERTISEMENT

डागांपासून सुटका

ब्लीच लावल्याने चेहऱ्यावरील डाग आणि पिगमेंटेशनची समस्या दूर होते. खरंतर ब्लीचमध्ये त्वचेशी निगडीत समस्या दूर करण्याचे अनेक गुण उपलब्ध आहेत. हे त्वचेच्या प्रत्येक छिद्रात आणि कोशिकांमध्ये जाऊन अशुद्धी आणि मेलनिनचं प्रमाण कमी करण्यास मदत करतं.

टॅनिंग होईल दूर

आपली त्वचा फार नाजूक असते आणि जास्त वेळ उन्हात फिरल्यास सन टॅनिंगचा त्रास होतो. टॅन दूर करण्यासाठी ब्लीचचा उपाय हा उत्तम आहे आणि आपल्यापैकी बऱ्याच जणी याचा टॅन घालवण्यासाठी वापरही करत असतीलच.

चेहऱ्यावरचे बारीक केस लपवण्यासाठी

चेहऱ्यावरच्या बारीक केसांमुळेही आपला चेहरा कधी कधी सावळा दिसतो. ब्लीचमुळे त्वचेवर ग्लो तर येतोच पण चेहऱ्यावरील बारीक केसही लपून जातात. चेहऱ्यावरील केस लपवण्याचा हा सर्वोत्तम आणि सोपा पर्याय आहे. कारण वॅक्सिंगमुळे त्वचा खेचली जाते आणि सैल पडते.

ब्लीच करतेवेळी या गोष्टी लक्षात ठेवा

ब्लीच क्रीममध्ये एक्टिव्हेटर मिक्स केल्यानंतर लोखंडाच्या चमच्याचा वापर करू नका.

ADVERTISEMENT

जर तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स किंवा पुरळ असेल किंवा कोणत्याही प्रकारची जखम झाली असेल तर ब्लीच लावू नका.

ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की, बॉडी ब्लीच आणि फेस ब्लीच हे दोन्ही प्रकार वेगवेगळे आहेत. कारण चेहऱ्याचं ब्लीच बॉडीवर आणि बॉडी ब्लीच चेहऱ्यावर कधीही वापरू नये.

जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचं स्कीन इन्फेक्शन असेल किंवा तुमची त्वचा खूपच सेन्सेटीव्ह असेल तर ब्लीचचा वापर करू नका.

जर ब्लीच लावल्यावर जळजळ झाल्यास त्या ब्लीचमध्ये पावडरचं प्रमाण कमी करून क्रिमचं प्रमाण वाढवा.

ADVERTISEMENT

नेहमी चांगल्या कंपनीचं ब्लीचच वापरा.

नॅचरल ब्लीच करण्याचे घरगुती उपाय Home Remedies For Natural Bleach In Marathi

Home Remedies For Natural Bleach In Hindi

जर ब्लीच करण्यासाठी तुम्ही कोणत्याही केमिकल प्रोडक्टचा वापर करण्यास घाबरत असाल तर नो प्रोब्लेम. तुम्ही हवं असल्यास नॅचरल हर्बल पद्धतीचाही वापर करू शकता. तसं तर बाजारात असे अनेक ब्रँड आहेत जे दावा करतात की, त्यांचं प्रोडक्ट पूर्णतः हर्बल आहे. पण तरीही शंका येण साहजिक आहे. चला जाणून घेऊया असे काही घरगुती उपाय ज्यांच्या वापराने तुम्ही ब्लीच करू शकता आणि तेही कोणत्याही साईड ईफेक्ट्सशिवाय –

लिंबू आणि मध

ADVERTISEMENT

तसं पाहता लिंबााला नैसर्गिक ब्लीच म्हणूनच ओळखलं जातं. लिंबाचा रस आणि मध सम प्रमाणात घ्या आणि त्याची पेस्ट करा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. 15 मिनिटापर्यंत सुकू द्या आणि त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. आठवड्यातून कमीत कमी एक ते दोन वेळा याचा वापर करा. तुम्हाला लवकरच फरक जाणवू लागेल.  

टोमॅटोने करा ब्लीच

टोमॅटोमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमीन सी असतं. जे तुमच्या त्वचेसाठी उत्तम मानलं जातं. टोमॅटोचा ब्लीच म्हणून वापर करण्याआधी टोमॅटो कापून घ्या आणि तो वाटून घ्या आणि त्यातील बिया काढण्यासाठी गाळण्याने गाळून घ्या. मग या ज्यूसमध्ये एक चमचा दही चांगलं मिक्स करून घ्या. आता हे टोमॅटो ब्लीच चेहऱ्यावर लावा आणि सुकेपर्यंत वाट पाहा. मग कोमट पाण्याने धुवून टाका.

संत्राच्या सालीचं ब्लीच

ADVERTISEMENT

संत्र्यामध्ये ब्लीचचे सर्व गुण आढळतात. त्यामुळे ब्लीचिंगसाठी संत्र्याच्या सालीचा खूप उपयोग होतो. सर्वात आधी संत्र्याचं साल उन्हात सुकवून घ्या. कडक झाल्यावर ते मिक्सरमध्ये वाटून त्याची पावडर करून घ्या. आता या पावडरमध्ये मध आणि गुलाबपाणी मिक्स करून ब्लीच म्हणून चेहऱ्यावर लावा. जेव्हा ही पेस्ट सुकेल तेव्हा चेहरा पाण्याने धुवून घ्या. यामुळे तुमची त्वचा हेल्दी होईल, तसंच चेहऱ्यावरील बारीक केसही लपतील.

बटाट्याने करा ब्लीच

बटाटा आपल्या प्रत्येकाच्या घरी उपलब्ध असतोच. जर तुम्ही कोणत्या पार्टी किंवा फंक्शनला जाणार असाल तर तुम्हाला ब्लीचची आवश्यकता लागेलच आणि जर तुम्हाला पार्लरला जायला वेळ नसल्यास बटाटा सहज उपलब्ध होईल. बटाट्याने ब्लीच करण्याआधी बटाटा धुवून घ्या आणि त्याच साल काढून किसून घ्या. आता त्यात गुलाबपाणी आणि मध घाला. चांगल मिक्स करून मग चेहऱ्यावर लावा. जर तुमची त्वचा तेलकट असेल तर यामध्ये लिंबाचा रसही घालू शकता. पेस्ट सुकल्यावर पाण्याने चेहरा धुवा. तुम्हाला लगेच फरक जाणवेल.

त्वचेनुसार करा ब्लीचची निवड  Choose Bleach According To Skin Type In Marathi

Choose Bleach According To Skin Type In Hindi

ADVERTISEMENT

ब्लीच करण्याआधी तुमच्या त्वचेचा प्रकार जाणून घेणं महत्त्वाचं आहे. ज्यामुळे तुमच्या त्वचेला ते ब्लीच सूट करेल. कारण प्रत्येक चेहऱ्यावर एकाच प्रकारच ब्लीच क्रीम लावणं योग्य नाही. त्यामुळे कोणतंही केमिकल चेहऱ्यावर लावण्याआधी तपासून पाहा. चला जाणून घेऊया कशी करावी त्वचेनुसार ब्लीचची निवड –

सेन्सिटीव्ह त्वचा – सेन्सिटीव्ह त्वचेसाठी लॅक्टो ब्लीच बेस्ट आहे ज्याचा परिणाम लगेच होत नाही आणि साईडईफेक्ट्सही होत नाहीत.

नॉर्मल त्वचा – ज्यांची त्वचा नॉर्मल असते आणि ज्यांना कोणत्याही प्रकारची त्वचेची समस्या नसते त्यांच्यासाठी ऑक्सी ब्लीचचा पर्याय चांगला आहे.

फेअर स्कीन टोन – या प्रकारचा स्कीन टोन असणाऱ्या लोकांनी सॅफ्रन ब्लीच वापरणं चांगलं.

ADVERTISEMENT

डार्क स्कीन टोन – सावळी त्वचा असणाऱ्यांनी त्वचेवर ग्लो येण्याकरिता पर्ल ब्लीच वापरावे. यामुळे चेहऱ्यावर इन्स्टंट ग्लो येतो.

ब्लीच लावण्याचे तोटे Side Effect Of Bleach In Marathi

असं नाही की, ब्लीच वापरण्याचे फक्त फायदेच आहेत. याचे काही तोटेही आहेत. ब्लीच ही एक अशी प्रक्रिया आहे जी तुमच्या त्वचेवरील केसांच्या रंगात मिसळून चेहऱ्याला ग्लो देते. पण ब्लीचमध्ये केमिकल असल्याने अनेकदा यामुळे फायद्याऐवजी नुकसानही होते. चला जाणून घेऊया ब्लीचिंगमुळे होणाऱ्या तोट्याबद्दल –

Side Effect Of Bleach In Hindi

– ब्लीच केल्याने स्कीनचा नैसर्गिक ग्लो कमी होतो.

ADVERTISEMENT

– ब्लीचिंगमुळे कधी कधी चेहऱ्यावर काळे डागही पडतात.

– ब्लीचिंगमुळे डोळ्यांची जळजळ आणि लालसरही होऊ शकतात.

– एक्सपर्ट्स सांगतात की, ब्लीचच्या जास्त वापराने ऑस्टियोपोरोसिससारखी समस्याही उत्पन्न होऊ शकते.

– अनेक वेळा ब्लीचमधील  एक्टीव्हेटरच्या चुकीच्या प्रमाणामुळे त्वचेचं नुकसानही होऊ शकतं आणि एलर्जीही होऊ शकते. एवढंच नाहीतर सेन्सेटीव्ह त्वचा असल्यास त्वचा भाजण्याचीही भीती असते.

ADVERTISEMENT

ब्लीचबाबत विचारले जाणारे प्रश्न FAQS

1. ब्लीच लावल्यावर त्वचा कशी जळू शकते?

त्वचा जळणं हे तुम्ही ब्लीच क्रीममध्ये किती प्रमाणात एक्टीव्हेटर मिक्स करता त्यावर अवलंबून आहे. जर तुमची त्वचा सेन्सेटीव्ह असेल तर कमीत कमी प्रमाणात एक्टीव्हेटरचा वापर करा.

2. ब्लीचिंगमुळे चेहऱ्यावरील केसांची वाढ जलद होते का?

यात काहीही तथ्य नाही. ब्लीचिंग केल्याने तुमच्या चेहऱ्यावरील बारीक केस लपतात आणि त्यांचा रंग चेहऱ्याच्या रंगात मिसळून जातो. यानंतर ब्लीचचा प्रभाव कमी होऊ लागतचा केस परत काळे दिसू लागतात आणि असं वाटतं की, केसांची वाढ लवकर होतेय.

3. फेशिअल आणि ब्लीचमध्ये काय फरक आहे?

फेशिअलचा वापर चेहरा सुंदर आणि त्वचा ग्लो करण्यासाठी केला जातो. तर ब्लीचचा वापर हा चेहऱ्याचा रंग उजळण्यासाठी आणि टॅनिंग दूर करण्यासाठी केला जातो.

4. थ्रेडिंग किंवा वॅक्सिंगनंतर ब्लीच का करू नये?

थ्रेड आणि वॅक्स केल्यानंतर आपली त्वचा फारच सेन्सेटीव्ह होते. अशा त्वचेवर ब्लीचचा वापर केल्यास ते त्वचेसाठी हानिकारक ठरू शकतं. कारण ब्लीचमध्ये काही केमिकल्स असतात जे त्वचेसाठी नुकसानकारक असतात. त्यामुळे थ्रेडींग किंवा वॅक्सिंगनंतर त्वचेवर ब्लीचचा वापर करू नये.

ADVERTISEMENT

5. ब्लीच लावल्यावर जळजळ होत असल्यास काय करावे?

त्वचेवर जास्त जळजळ जाणवत असल्यास ते ब्लीच सर्वात आधी पुसून घ्यावं आणि ब्लीच लावलेली जागा थंड पाण्याने धुवून घ्यावी. नंतर उरलेल्या ब्लीचच्या मिश्रणात क्रीमचं प्रमाण वाढवावं. मग ते ब्लीच लावावं. ब्लीच कधीही डोळे, आयब्रो, ओठ आणि केसांना लागू देऊ नये. जर चुकून लागल्यास ते लगेच पाण्याने धुवून टाकावं, नेहमी चांगल्या क्वालिटीचं ब्लीच वापरा.

हेही वाचा –

घरगुती फ्रूट फेसपॅक वापरून आणा त्वचेवर ग्लो 

उन्हाळ्यात तेलकट त्वचेसाठी निवडा ‘हे’ बेस्ट सनस्क्रिन लोशन

ADVERTISEMENT

म्हणून आलिया भट दिसते इतकी सुंदर, जाणून घ्या रहस्य

चेहऱ्यांवरील मुरुमांपासून कशी होणार सुटका – घरगुती उपाय, आहार आणि बरंच काही

14 Apr 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT