सुंदर, नितळ त्वचा कोणाला आवडत नाही. जर तुमची त्वचा जन्मत: चांगली नसली म्हणून काय झाले. तुम्ही तुमच्या त्वचेची नीट काळजी घेतली तर तुमची त्वचा ही अगदी छान तजेलदार दिसून शकते. पण जसे मी म्हटले की, तुम्हाला तुमच्या त्वचेची काळजी घ्यायची आहे म्हणजे काही गोष्टींचे पालन हे तुम्ही केलेच पाहिजे तरच तुम्हाला हवी असलेली त्वचा तुम्हाला मिळू शकेल. या शिवाय तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार आम्ही काही प्रोडक्टही तुम्हाला सुचवणार आहोत. आता ही काळजी कशी घ्यायची हे जाणून घेण्याआधी आपण त्वचा नेमकी कशामुळे खराब होते, त्वचेची समस्या काय ते जाणून घेऊया. कारण त्या पासूनच तुम्हाला चांगल्या सवयींची सुरुवात करायची आहे. स्किन केअर टिप्स Skin Care Tips In Marathi जाणून घेत तुम्ही चांगली त्वचा मिळवू शकता.
त्वचेसाठी बेस्ट स्किनकेअर टिप्स – Overall Skin Care Tips In Marathi
त्वचेची काळजी कशी घ्यायची असा विचार करत असाल तर तुम्ही साध्या सोप्या अशा काही टिप्स फॉलो करायला हव्यात. या टिप्स सोप्या आणि अगदी सहज करता येतील अशा आहेत.
- सकाळी उठल्यानंतर चेहऱ्यावर पाणी मारुन चेहरा स्वच्छ करा. चेहऱ्यावर कधीही साबण लावू नका. फेसवॉश लावून चेहरा स्वच्छ करा. थंड पाण्याचा उपयोग हा त्वचेसाठी उत्तम असतो.
- आंघोळीनंतर चेहऱ्याला मॉश्चरायझर लावल्यामुळे त्वचा हायड्रेट राहते
- नुसत्या त्वचेवर कधीही मेकअप लावू नका. कारण हा मेकअप पोअर्सच्या आत जातो. ज्यामुळे स्किन डॅमेज होऊ शकते.
- मेकअपचा बेस चेहऱ्यावर लागत नसेल तर तुम्ही मॉश्चरायझर घेऊन त्यात फाऊंडेशन घाला आणि मग तो लावा. बेस अधिक चांगला बसतो.
- त्वचेसाठी एकावेळी वेगवेगळे प्रयोग करणे टाळा. कारण त्यामुळे त्वचा डॅमेज होते.
- त्वचा चांगली राहावी असे वाटत असेल तर तुम्ही त्वचेला सनस्क्रिन लावायला अजिबात विसरु नका.
- त्वचेला पिंपल्स आले असतील तर त्याला सतत हात लावू नका. कारण हाताची उष्णता लावून ते वाढण्याची शक्यता असते.
- आठवड्यातून एकदा चेहऱ्याला छान वाफ घ्या. वाफ घेतल्यामुळे त्वचेचे पोअर्स ओपन होतात. त्यानंतर तुम्ही चेहऱ्यावरील ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स काढून घ्या. त्वचेवर बर्फ फिरवा.
- त्वचेवर कधीही थेट लिंबाचा रस अजिबात लावू नका. कारण लिंबामध्ये असे काही घटक असतात.
- तेलकट त्वचा असणाऱ्यांनी कधीही त्वचेवर दही, तेल असे घटक लावू नये कारण त्यामुळे त्वचेवर पिंपल्स येऊ शकतात.
- त्वचेसाठी सीरम हे देखील फार महत्वाचे असते. तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार तुम्ही सीरम निवडायला हवे. सीरम लावले तर तुम्हाला त्वचेवर इतर काहीही लावावे लागत नाही.
- रात्री झोपताना मेकअप काढल्यानंतर चेहऱ्याला बर्फ लावायला विसरु नका. त्यामुळे त्वचेचे पोअर्स मिनिमाईज करण्यास मदत करतात.
- त्वचेच्या प्रकारानुसार योग्य असे क्लिन्झर निवडणे गरजेचे असते. तरच त्वचा स्वच्छ होण्यास मदत मिळते.
- रात्री झोपताना चेहऱ्याला काहीही लावू नका असे सांगितले जाते. पण रात्री मॉश्चरायझर लावणे हे फारच जास्त गरजेचे असते. त्यामुळे रात्री नुसता चेहरा धुवून झोपू नका.
- चेहऱ्यासाठी पाणी पिणे हे खूपच जास्त गरजेचे असते. दिवसातून 8 ते 10 ग्लास पाणी प्यायला अजिबात विसरु नका.
- त्वचा खराब झाली असे वाटत असले तरी देखील तुम्ही सतत फेसवॉश वापरणे चांगले नाही. फेसवॉशच्याऐवजी तुम्ही पाण्याने सतत चेहरा धुणे उत्तम
- चेहऱ्यासाठी कोलॅजन हे उत्तम असते. कोलॅजन बुस्ट करणाऱ्या गोष्टी आहारात अधिकाधिक असतील त्वचा आतून चांगली होण्यास मदत मिळते
- केमिकल स्किन पीलिंग हा देखील एक चांगला पर्याय आहे. त्यामुळे त्वचा चांगली होण्यास मदत मिळते. याचा आधारही तुम्ही घेऊ शकता.
- त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी हल्ली शीट मास्क देखील मिळतात. हे शीट मास्क तुमच्या त्वचेला हायड्रेट ठेवण्याचे काम करतात.
- केवळ चेहराच नाही तर त्वचेची काळजी घेताना मान आणि पाठ यांची स्वच्छताही गरजेची असते. त्यामुळे तुमचे स्किनकेअर प्रॉडक्ट मानेला लावायला अजिबात विसरु नका.
- चेहऱ्यावर खूप मेकअप केला असेल तर तो मेकअप योग्य पद्धतीने काढा. त्यासाठी मिस्लिअर वॉटरचा उपयोग करा.
- चेहऱ्यावर कोणतेही तेल लावताना विचार करा. काही त्वचेच्या प्रकाराला तेल अजिबात सूट होत नाही.
- महिन्यातून एकदा फेशिअल करायला विसरु नका. फेशिअलमुळे त्वचा टाईट होण्यास मदत मिळते.
- टोमॅटोचा रस चेहऱ्याला लावा. त्यामुळे त्वचा हायड्रेट होते इतकेच नाही तर त्वचेला लकाकी मिळते.
- रात्री झोपताना त्वचेवर मॉश्चराईजर लावून मसाज करायला अजिबात विसरु नका. त्यामुळे त्वचा टोन्ड होण्यास मदत मिळते.
त्वचेच्या प्रकारानुसार घ्या काळजी – Skin Care According To Skin Type
त्वचेच्या प्रकारानुसार त्वचेची काळजी घेणे गरजेचे आहे. जर त्वचेचा प्रकार कोणता हे माहीत असेल तर तुम्ही तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार त्वचेची काळजी घेतली तर त्वचा अधिक चांगली राहण्यास मदत मिळते. skin care tips in marathi मध्ये वेगवेळ्या त्वचेच्या प्रकारानुसार टिप्स देण्यात आल्या आहेत.
तेलकट त्वचेसाठी स्किनकेअर टिप्स (Oily Skin Care Tips In Marathi)
तुमची त्वचा तेलकट त्वचेमध्ये मोडत असेल तर तुमच्यासाठी स्किनकेअर रुटीन हे थोडे वेगळे असायला हवे. त्यासाठीच काही oily skin care tips in marathiतून
- तेलकट त्वचेवर चकाकी असते. पण ही चकाकी पिंपल्समध्ये बदलू नये असे वाटत असेल तर तुम्ही चेहरा वेळोवेळी स्वच्छ ठेवा.
- तेलकट त्वचेवर तैलीय घटक असलेले कोणतेही प्रॉडक्ट वापरु नका. कारण अशा घटकांचा तुमच्या त्वचेवर विपरित परिणाम होऊ शकतो.
- तेलकट त्वचा असेल तर अशांनी मेकअप योग्य वेळी काढून टाकणे कधीही चांगले असते.
- तेलकट त्वचेसाठी टोनर हे फारच उत्तम असते. त्वचेच्या प्रकारानुसार टोनर निवडणे कधीही चांगले
- तेलकट त्वचा असणऱ्यांना गरम पाण्याने चेहरा धुणे फायद्याचे ठरते कारण त्यामुळे त्वचेवर साचलेले तेल निघून जाते.
कोरड्या त्वचेसाठी ब्युटी टिप्स (Dry Skin Care Tips In Marathi)
तुमची त्वचा कोरडी असेल तर अशा कोरड्या त्वचेसाठी काही खास स्किनकेअर रुटीन फॉलो करणे गरजेचे असते.
- कोरड्या त्वचेची पहिली समस्या म्हणजे त्वचा सतत कोरडी होणे त्यामुळे ती निस्तेज दिसणे अशी त्वचा असणाऱ्यांनी त्वचेला चांगल्या प्रतीचे मॉईश्चरायझर लावायला हवे.
- कोरडी त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी त्वचेला टोनर आणि मॉश्चरायझर लावायला अजिबात विसरु नये.
- कोरड्या त्वचेसाठी बदामाचे तेल वरदान आहे ते त्वचेला लावून मसाज केल्याने त्वचा चांगली दिसते.
- दही हे या त्वचेला हायड्रेट करण्याचे काम करते.
- कोरडी त्वचा असणाऱ्यांनी जास्तीत जास्त पाण्याचे सेवन करावे
मिश्र त्वचा स्किनकेअर (Mix Skin Care Tips)
ज्यांची त्वचा मिश्र स्वरुपातील आहे अशांनी त्वचेची काळजी घेताना काही Skin Care Tips In Marathi विचारात घ्यायला हव्यात त्या कोणत्या हे जाणून घेऊया
- मिश्र त्वचेला कोरड्या आणि तेलकट त्वचेच्या दोन्ही समस्या असतात. त्यामुळे त्यांनी प्रॉडक्ट निवडताना काळजी घ्यायला हवी.
- फेसमास्कचा वापर या त्वचेसाठी फारच फायद्याचा ठरतो. चांगला फेस मास्क तुमची त्वचा अधिक सुंदर करु शकतो.
- ही त्वचा संवेदनशील असते त्यामुळे स्क्रब करताना हळुवारपणा असावा
- तेलाच्या घटकांपासून दूर राहणे या त्वचेसाठी खूपच चांगले असते
- त्वचेसाठी चांगले क्लिन्झर हे फारच गरजेचे असते. त्यामुळे योग्य त्या प्रॉडक्टची निवड करा.
बदलत्या ऋृतूनुसार घ्या त्वचेची काळजी – Skin Care Tips According Climate
बदलत्या ऋतूनुसार त्वचेमध्ये अनेक बदल होत असतात. वातावरणानुसार घाम येणे, त्वचा कोरडी होणे असे बदल झाल्यामुळे त्वचेसंदर्भातील काळजीही बदलत जाते. बदलत्या ऋतूनुसार Skin Care Tips In Marathi जाणून घेतल्या तर तुमची त्वचा अधिक चांगली राहील.
उन्हाळ्यातील त्वचेची काळजी (Summer Skin Care Tips In Marathi )
उन्हाळ्यात वातावरणात इतका उष्मा असतो की, त्यामुळे त्वचेवर खूप घाम येतो. या दरम्यान शरीरातील उष्णता वाढते त्यामुळे कोणतेही हार्ड प्रॉडक्ट त्वचेवर लावून चालत नाही. या दिवसात Summer Skin Care Tips In Marathi काय असायला हवे जाणून घेऊया.
- उन्हाळ्यात त्वचेचे पोअर्स ओपन झालेले असतात. अशावेळी त्वचेवर खूप जास्त प्रमाणात मेकअप किंवा प्रॉडक्ट लावू नयेत.त्यामुळे त्वचा अधिक खराब होऊ शकते.
- उन्हाळ्यात खूप जणांच्या आहारात आंबा असतो. त्यामुळे उष्णता वाढून मोठे फोड येऊ शकतात. त्यामुळे यासाठी आहार योग्य असू द्या.
- उन्हाळ्यात सनस्क्रिन लावायला अजिबात विसरु नका.
- मॉश्चरायझर निवडताना ते तेलकट नसावे नाहीतर ते त्वचेवर टिकणार नाही.
- ज्या मेकअपमध्ये SPF असेल असे मेकअप या काळात निवडा
पावसाळ्यात त्वचेची काळजी (Rainy Season Skin Care Tips In Marathi)
पावसाळ्यात वातावरणात थंडावा आलेला असतो. अशावेळी खूप जणांची त्वचा ही अधिक चांगली राहते. अशा वातावरणात त्वचेची काळजी कशी घ्यावी हे जाणून घेऊया.
- पावसाळ्यातही त्वचेला एक्सफोलिएशनची गरज असते. ते करायला विसरु नका.
- कमीत कमी मेकअप हे या ऋतूसाठी उत्तम असते.
- पावसात त्वचा चांगली असते ती अधिक चांगली दिसावी यासाठी उत्तम फेसपॅक वापरायला विसरु नका.
- पावसात चेहऱ्याला पावडर लावताना ती अँटी फंगल असावी
- व्हिटॅमिन सी चे सेवन केल्यामुळे या दिवसात त्वचा अधिक चांगली राहते
- वातावरणातील थंडाव्यामुळे खूप जण तेलकट पदार्थांचे सेवन करतात. पण असे पदार्थ टाळलेले बरे
हिवाळ्यात त्वचेची काळजी (Winter Skin Care Tips In Marathi)
हिवाळ्यात वातावरणात थंडावा आल्यामुळे त्वचेमध्ये बदल होऊ शकतो. या काळात त्वचेची काळजी कशी घ्यावी ते जाणून घेऊया.
- हिवाळ्यात त्वचा कोरडी झाली असेल तर तुम्ही मॉश्चरायझर वापरायला विसरु नका.
- हिवाळ्यात ओठ फाटणे, त्वचा फुटणे असे त्रास होतात अशावेळी तुम्ही त्याठिकाणी पेट्रोलिअम जेली लावायला विसरु नका.
- हिवाळ्यात पाणी पिण्याची इच्छा होत नाही पण असे करु नका.कारण त्वचेसाठी पाणी फारच जास्त गरजेचे असते.
- हिवाळ्यात त्वचेसाठी गरम पाण्याचा वापर टाळा त्यामुळे त्वचेचे मॉईश्चर कमी होऊ शकते.
- ज्यावेळी तुम्हाला तुमची त्वचा कोरडी वाटेल.त्या त्या वेळी तुम्ही मॉईश्चरायझर लावा.
उत्तम त्वचेसाठी या गोष्टी टाळाव्यात – Causes Of Skin Damage
त्वचा खराब होण्याचीही काही कारणे आहेत. सर्वसाधारणपणे तुमची त्वचा या काही कारणांमुळे खराब होत असते ही कारणे कोणती ती जाणून घेऊया.
उन्हात सतत वावरणे (Sun Exposure)
काहींना कामाच्या स्वरुपामुळे उन्हात सतत वावरावे लागते. उन्हामुळे तुमची त्वचा काळवंडते हे खरे असले तरी त्याहूनही अधिक गंभीर परिणाम तुमच्या चेहऱ्यावर होतात. उन्हात वावरल्यामुळे तुमच्या त्वचेवर सुरकुत्या लवकर येतात. चेहरा निस्तेज आणि सुकलेला दिसू लागतो. त्यामुळे त्वचा खराब होण्याचे पहिले कारण म्हणजे उन्हात सतत वावरणे. त्यामुळे तुम्ही उन्हात बाहेर जात असाल तर तुम्ही तुमच्या त्वचेची अधिक काळजी घेणे गरजेचे आहे, वापरा सोप्या ब्युटी टिप्स.
फक्त उन्हाळ्याच्या दिवसातच नाही. तर सगळ्याच ऋतुमध्ये तुम्ही उन्हापासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी स्कार्फ घेतला पाहिजे किंवा सनस्क्रिन लावायला हवे.
चुकीच्या खाण्याच्या सवयी (Wrong Food Habits)
चुकीच्या खाण्याच्या सवयींचा परिणाम तुमच्या त्वचेवर होत असतो हे अगदी खरे आहे. पेराल तसे उगवते ही म्हण आहे ती तुमच्या खाण्याच्या सवयीबाबत अगदी तंतोतंत लागू पडते. अधिक चटकदार, चमचमीत, तिखट, तेलकट पदार्थ तुमच्या पोटात गेले तर त्याचे परिणाम तुमच्या चेहऱ्यावर चटकन दिसून येतात. तुमची त्वचा अधिक तेलकट वाटू लागले आणि तुमच्या त्वचेवर मुरुम यायला सुरुवात होते. शिवाय अशा खाण्यामुळे तुम्हाला पोट साफ न होण्याच्या तक्रारी देखील उद्भवतात. त्याचा परिणाम त्वचेवरच होतो. चमकणार्या त्वचेसाठी उच्च फायबरयुक्त आहार घ्या
उदा. काहींना चायनीज भेळ, भजी, वडापाव खायची सवय असते. तुम्ही तुमची त्वचा आरशात नीट निरखून पाहा. तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर पुळ्या आलेल्या दिसतील. शिवाय सतत तेलकट पदार्थांचे सेवन केल्यामुळे तुमची त्वचा तेलकट दिसू लागते आणि मग अन्य तक्रारी उद्भवतात.
झोपेची कमतरता (Lack of Sleep)
झोप कमी करण्यामध्ये तुमच्या हातातील मोबाईलचा मोठा वाटा आहे. सतत फोनवर असण्याची सवय तुमच्या झोपेवर परिणाम करत असते. तुमची झोप पूर्ण झाली नाही तर त्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होतो. झोप पूर्ण नसेल तर तुमची पचनक्रिया बिघडते. तुम्हाला विष्ठेला त्रास होऊ शकतो. पोट साफ झाले नाही तर मग तुम्हाला त्वचेच्या तक्रारी उद्भवू लागतात.
मद्यपानाची सवय (Alcohol Consumption)
मद्यपान, धुम्रपान करणे हे शरीरासाठी हानिकारक आहे. हे माहीत असूनही अनेक जण ओकेजनी म्हणत या गोष्टी करतात. पण सतत मद्यपानाची सवय तुम्हाला भारी पडू शकते. कारण मद्यपानामुळे तुमच्या त्वचेवरील ओलेपणा निघून जातो. तुमची त्वचा थकलेली, कोरडी आणि अधिक वयस्क दिसू लागते.
उदा. तुम्ही जर स्मोकिंग करत असाल तर तुम्ही तुमचा चेहरा नीट पाहा. अशा त्वचेला कालांतराने सुरकुत्या पडू लागतात.
न्युट्रिशनची कमतरता (Lack of Nutrition)
तुम्ही किती खाता यापेक्षाही महत्वाचे आहे तुम्ही काय खाता? हे पाहणे महत्वाचे असते. तुमच्या शरीराला आवश्यक असलेली पोषक तत्वे तुम्हाला तुमच्या जेवणातून मिळत असतील तर तुमच्या शरीरासोबत तुमची त्वचाही चांगली राहते. त्यामुळे ग्लोइंग त्वचेसाठी तुमचा आहार हा चौकस हवा.
उदा. तुमच्या आहारात भाजी, पोळी, भाजी, भात, कोशिंबीर यांचा समावेश असावा. पालेभाज्या, कडधान्य, फळभाज्या यांचा समावेश असावा. त्यामुळे तुमच्या शरीराला पोषक तत्वे मिळतात. शिवाय तुमची अन्नप्रक्रियाही सुरळीत राहते
ताण-तणाव (Stress)
तुमच्या त्वचेसाठी आणखी एक हानिकारक गोष्ट आहे ती म्हणजे सततचा ताण. तुम्ही जर सतत ताण-तणावाखाली असाल तर तुमच्या रक्तपुरवठयावर त्याचा परिणाम होतो आणि मग त्याचा त्रास तुमच्या त्वचेवरही होतो. त्यामुळे एखाद्या गोष्टीचा खूप ताण घेण्यापेक्षा थोडे रिलॅक्स व्हायला शिका. ताण घेण्यापेक्षा तुम्ही तुमचे प्रश्न सोडवायला शिका.
चेहरा स्वच्छ करण्याची चुकीची पद्धत (Wrong Cleansing Method)
त्वचा चांगली ठेवण्यासाठी तुम्हाला त्याची काळजी घेणे गरजेचे असते हे तर आम्ही तुम्हाला सांगितलेच. काही जण दिवसभरातून घरी आल्यानंतर चेहऱ्यावरील मेकअप काढत नाही. तर थेट चेहरा फेसवॉशने किंवा क्लिन्झर धुतात. जी चांगली सवय नाही. त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर दिवसभरात साचलेली धूळ जात नाही.त्याचा परिणाम तुमच्या त्वचेवर अधिक होऊ लागतो. त्यामुळे तुम्हाला चेहरा स्वच्छ करण्याची योग्य पद्धतही माहीत असायला हवी. या शिवाय त्वचेची काळजी घेणारी उत्पादने ही माहीत हवीत.
अस्वच्छ हात (Dirty Hands On Face)
खूप जणांना अस्वच्छ हातच चेहऱ्याला लावण्याची सवय असते. म्हणजे काहीही खाल्ले तरी हात न धुता तेच हात चेहऱ्याला लावले जातात.
उदा. जर तुम्ही चीप्स खात असाल जरी ते तेलकट वाटत नसले तरी त्यावर असलेले तेल, मसाला तुमच्या चेहऱ्याला लावतो आणि तुमच्या त्वचेवर पुरळ यायला सुरुवात होते. त्यामुळे लक्षात ठेवा अगदी सुका खाऊ जरी तुम्ही खाल्ला असेल तरी तुम्हाला तुमचा हात धुतल्याशिवाय तुम्हाला तो तुमच्या चेहऱ्यावर लावायचा नाही.
प्रदूषण (Pollution)
वाढते प्रदूषणही तुमच्या त्वचेसाठी हानिकारक असते. धूळ, माती, उन तुमच्या चेहऱ्यावर परिणाम करत असते. प्रदूषणाचा परिणाम तुमच्या चेहऱ्यावर इतका होतो की, तुमची त्वचा वयाच्या आधीच जास्त वयस्क वाटू लागते. त्यामुळे प्रदूषणापासून तुमच्या त्वचेचे संरक्षण करणे आवश्यक आहे.
त्वचेसाठी उत्तम स्किनकेअर प्रॉडक्ट – Best Skin Care Products
तुमची त्वचा चांगली राहावी असे आम्हालाही वाटते यासाठी आम्ही निवडले आहेत आमचे बेस्ट स्किन केअर प्रॉडक्ट
MYGLAMM SUPERFOODS WATERMELON & RASPBERRY FACE WASH
त्वचेसाठी हा एक उत्तम असा फेसवॉश आहे. यामध्ये सुपरफुड्सचे घटक असल्यामुळे त्वचा हायड्रेट राहण्यास मदत करते. यामध्ये कलिंगड आणि रासबेरीचे घटक आहेत . जे त्वचेचा तजेला कायम ठेवण्याचे काम करतात.
GLOW IRIDESCENT BRIGHTENING TONER
त्वचेवरील पोअर्स मिनीमाईज करण्याचे काम टोनर करत असते. त्यामुळे तुमच्या स्किनकेअर रुटीनमध्ये ते असायलाच हवे. MyGlamm चे हे टोनर तुमच्या त्वचेला आवश्यक असलेला तजेला देऊन त्वचा अधिक तरुण दिसण्यास मदत करते.
GLOW IRIDESCENT BRIGHTENING MOISTURISING CREAM
त्वचेसाठी मॉश्चरायझर हे खूप महत्वाचे असते. त्वचा हायड्रेट ठेण्यासाठी तुम्ही हे ब्राईटनिंग मॉश्चरायझर लावायला हवे. त्यामुळे त्वचा ब्राईट आणि सुंदर दिसेल.
MYGLAMM SUPERFOODS CACAO & BERRIES DAY CREAM WITH SPF
सनस्क्रिन हे सगळ्या जास्त महत्वाचे आहे. अगदी कोणताही ऋतू असला तरी सनस्क्रिन लावायलाच हवे. तुमच्यासाठी बेस्ट आणि नैसर्गिक असे सुपरफूड यात असल्यामुळे ते त्वचेवर कोणताही विपरित परिणाम करत नाही.
MANISH MALHOTRA METHI FACE SCRUB GEL
त्वचेसाठी हे स्क्रब हे उत्तम असे स्क्रब आहे. याच्या वापरामुळे त्वचा अधिक सुंदर होण्यास मदत मिळेल. इतकेच नाही तर त्यामुळे त्वचा अधिक खुलून दिसते.
तुम्हालाही पडतात का हे प्रश्न (FAQs)
त्वचेनुसार घेतलेले प्रोडक्ट मला चालतात की नाही हे कसे ओळखावे?
अनेकांना ही भीती असते. जर तुम्ही घेतलेल्या प्रोडक्ट विषयी तुम्हाला शंका असेल तर तुम्ही तुमच्या मानेवर किंवा हातावर त्याचा प्रयोग करुन पाहा. जर तुम्हाला त्याचा त्रास झाला नाही. तर तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर अगदी कमी प्रमाणात सुरुवातीला प्रोडक्ट लावून पाहा. पण जर प्रोडक्ट लावताच तुम्हाला काही त्रास होऊ लागला तर तातडीने त्याचा वापर बंद करा. चेहऱ्यावर पाण्याचे हबके मारुन चेहरा स्वच्छ करा
हवामानानुसार प्रोडक्ट बदलायला हवे का?
आता हे सर्वस्वी तुमच्या चेहऱ्यावर अवलंबून आहे. कारण काही जणांच्या त्वचेत भरपूर फरक पडतो. म्हणजे काहींची त्वचा उन्हाळ्यात अधिक तेलकट होते.काहींची कोरडी होते.त्यामुळे हा बदल टिपून तुम्हाला प्रोडक्टची निवड करायची आहे.
चेहऱ्यावर मेकअप काढायचे राहून गेले तर काय होऊ शकते?
मेकअप तुमच्या चेहऱ्यावरील बारीक बारीक पोअर्स बंद करत असतात. दिवसभर मेकअपमध्ये वावरल्यानंतर किमान रात्रीच्यावेळी तरी तुमच्या चेहऱ्याला योग्य असा ऑक्सिजनचा पुरवठा व्हायला हवा. तुमच्या त्वचेने श्वास घ्यायला हवा. म्हणून मेकअप रोज काढलाच पाहिजे. जर तुम्ही सतत मेकअप काढणे टाळत असाल तर तुम्हाला त्याचे लगेच नाही पण कालांतराने तुमच्या त्वचेवर त्याचे गंभीर परिणाम जाणवू लागतील.