ADVERTISEMENT
home / Bridal Makeup
नववधूला ब्रायडल मेकअप विषयी ‘या’ गोष्टी माहीत असायलाच हव्या (Bridal Makeup Things In Marathi)

नववधूला ब्रायडल मेकअप विषयी ‘या’ गोष्टी माहीत असायलाच हव्या (Bridal Makeup Things In Marathi)

प्रत्येक नववधूसाठी तिच्या लग्नाचा दिवस फार महत्त्वाचा असतो. त्या दिवशी आपण इतरांपेक्षा वेगळं आणि स्पेशल दिसावं अशी तिची इच्छा असते.लग्नसोहळ्यात वधूवस्त्र आणि ब्राइडल मेकअपमुळे तिच्या मुळ रुपात आणखी भरच पडते.  सध्या ब्रायडल मेकअपमध्ये विविध ट्रेंड उपलब्ध आहेत. अगदी पारंपरिक मराठमोळ्या लुकपासून ते अगदी बॉलीवूड ते वेस्टर्न ब्रायडल मेकअप पर्यंत अनेक मेकअपचे पर्याय तुम्ही लग्नासाठी निवडू शकता. तुम्ही लग्नात कोणता पेहराव, हेअरस्टाईल, दागदागिने घालणार आहात यावरून तुमचा मेकअप कसा असेल ते ठरवावं लागतं. आजकाल पारंपरिक लुकपेक्षा वेस्टर्न लुकला अधिक मागणी आहे. मात्र नववधूचा मेकअप करताना काही गोष्टींची काळजी घेणं फार गरजेचं आहे. कधी कधी आकर्षक दिसण्याच्या प्रयत्नांमध्ये तुमचा संपूर्ण लुक खराब होऊ शकतो. यासाठी नववधूचा मेकअप करताना काही गोष्टींची काळजी अवश्य घ्या.

नववधूचा मेकअप करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्याल (Bridal Makeup Things In Marathi)

प्रकाशयोजनेचा विचार करा (Consider The Lighting)

Bridal Makeup Things In Marathi

लग्नात स्टेजवरील प्रकाशयोजना ही फार प्रखर असते. ज्यामुळे तुमचा लुक बदलू शकतो. अती प्रकाशात तुमच्या मेकअपमधील चुका अधिक उठून दिसू शकतात. यासाठी मेकअपची ट्रायल घेताना आणि लग्नाचा मेकअप करताना या प्रकाशयोजनेचा आधीच विचार करा.

मेकअपची ट्रायल घ्या (Take A Makeup Trial)

ब्रायडल मेकअपचं प्री-बुकींग करावं लागतं. कारण लग्नसराईमध्ये ब्युटीशिअन आणि मेकअप आर्टिस्ट यांच्याकडे बऱ्याच ऑर्डर असतात. त्यामुळे आधीच बुकींग केल्यास तुम्हाला मेकअप एक्पर्टची अपॉईंटमेंट मिळू शकते. शिवाय जर ऐनवेळी तुम्ही एखाद्या मेकअप आर्टिस्टला बुक केलं तर तुम्हाला प्री ट्रायल घेण्यासाठी वेळ मिळत नाही. प्री-बुकींग केल्यावर लग्नाच्या आधी काही दिवस तुमच्या संपूर्ण लुकची ट्रायल घ्या. मेकअपची ट्रायल घेतानादेखील स्टेजवरील प्रकाशयोजनेचा अंदाज घ्या.

Also Read Celebrity Bridal Looks In Marathi

ADVERTISEMENT

मेकअप आर्टिस्टचा सल्ला ऐका (Listen To Makeup Artist’s Advice)

मेकअप आर्टिस्टने सांगितलेल्या टीप्स अवश्य पाळा. कारण प्रोफेशनल आर्टिस्टनां अनेक नववधूंच्या मेकअपचा अनुभव असतो. लग्नासमारंभातील घाई, स्टेजवरील प्रकाशयोजना, तुमचा चेहरा, आऊटफिट यांचा अंदाज घेऊन ते तुम्हाला काही टीप्स देऊ शकतात. जर तुम्ही त्यांच्या टीप्स फॉलो केल्या तर तुमचा लुक नक्कीच आकर्षक दिसू शकतो.

ट्रायल घेताना तुमचा पेहराव सोबत न्या (Take Your Costume At Trial)

ब्रायडल मेकअपची ट्रायल घेताना तुमची लग्नातील साडी आणि लेहंगा सोबत जरूर न्या. कारण तुमच्या पेहरावाशिवाय जर तुम्ही ट्रायल घेतली तर तुमच्या लुकचा अचूक अंदाज तुम्हाला नक्कीच येत नाही. लग्नसोहळ्यात जर तुम्ही आधी ट्रायल न घेता मेकअप केला तर ऐनवेळी तुमची फजिती होऊ शकते.

वाचा – हिवाळ्यातही त्वचा चमकदार दिसण्यासाठी वापरा

लग्नाच्या दिवशी नवीन ब्रॅंडची उत्पादने वापरू नका (Don’t Use New Products On The Day Of Wedding)

2. Bridal Makeup Things In Marathi

लग्न समारंभात नववधू आणि नववराचा लुक हा सोहळ्याचा केंद्रबिंदू असतो. त्यामुळे नववधूने लग्नाच्या दिवशी कोणत्याही नवीन ब्रॅंडची मेकअप उत्पादने वापरू नयेत. जर एखादे उत्पादन तुम्हाला सूट नाही झाले तर त्यामुळे तुम्हाला त्वचा समस्या निर्माण होऊ शकतात.  यासाठी तुम्ही नेहमी वापरत असलेली मेकअपची उत्पादने वापरा. जर तुम्हाला एखादे नवे उत्पादन लग्नसोहळ्यासाठी वापरायचे असेल तर काही दिवस आधी त्या उत्पादनाची स्किन टेस्ट घ्या. जर ते तुम्हाला सूट होत असेल तर तुम्ही लग्नात त्या उत्पादनाचा वापर नक्कीच करू शकता.

ADVERTISEMENT

मेकअप करण्यापूर्वी क्लिंझर आणि मॉश्चराईझर जरूर वापरा (Use Cleanser And Moisturizer Before Makeup)

कोणताही मेकअप करण्यापूर्वी चेहरा स्वच्छ करण्याची नितांत गरज असते. त्यामुळे तुम्ही नेहमी वापरत असलेल्या क्लिंझरने चेहरा क्लिन करून घ्या. क्लिझिंग केल्यावर चेहऱ्यावर तुमचे नेहमी वापरात असलेले आणि तुमच्या त्वचा प्रकाराला सूट होईल असे मॉश्चराईझर लावा. कारण ब्राइडल मेकअप दिवसभर तुमच्या चेहऱ्यावर असणार आहे. शिवाय लग्नातील मेकअप हा नेहमी हेव्ही मेकअप असतो. जास्त वेळ टिकण्यासाठी त्यामध्ये विविध प्रकारच्या केमिकल्सचा वापर केला जातो. अशा  प्रकारच्या मेकअपमुळे त्वचेला अधिक काळजी आणि पोषणाची गरज असते. चांगले मॉश्चराईझर वापरल्यामुळे तुमच्या त्वचेचे नुकसान होत नाही.

चांगल्या दर्जाचे प्रायमर वापरा (Use Good Quality Primer)

मेकअप करण्याआधी चेहरा क्लिझिंग आणि मॉश्चराईझ केल्यावर एखादे चांगले प्रायमर चेहऱ्यावर लावायला विसरू नका. कारण त्यामुळे तुमचा मेकअप जास्त वेळ टिकण्यास मदत होते. प्रायमर न लावल्यास चेहऱ्यावरील ग्लो लवकर निघून जातो.

योग्य शेडचं फाऊंडेशन वापरा (Use The Right Shed Foundation)

3. Bridal Makeup Things In Marathi

जर तुम्ही मेकअप करताना चुकीच्या शेडचं फाऊंडेशन वापरलं तर तुमचा संपूर्ण लुक बिघडू शकतो. मेकअपमध्ये फाऊंडेशन फार महत्वाचे असते. मान आणि चेहऱ्याचं कॉम्पेलेक्शन एक सारखं असतं. त्यामुळे ब्रायडल मेकअपची ट्रायल घेताना फाऊंडेशन मानेवर लावून त्याची आधी एक स्किन टेस्ट घ्या. योग्य शेडचं फाऊंडेशन लावल्यामुळे मेकअप पॅची दिसत नाही. नाहीतर तुमच्या शरीरावरील इतर त्वचा आणि चेहरा मानेवरील मेकअप केलेली त्वचा वेगळी दिसते. लग्नसमारंभात तुमचा लुक साजेसा हवा असेल तर फाऊंडेशन सावधपणे निवडा.

ब्रायडल मेकअपसाठी SPF फाऊंडेशन वापरू नका (Don’t Use SPF Foundation For Bridal Makeup)

ब्रायडल मेकअप करताना कधीच SPF फाऊंडेशन वापरू नका. कारण या फाऊंडेशनमुळे तुमचे फोटो खराब होऊ शकतात. लग्नाचे फोटो हे तुमच्यासाठी फार महत्वाचे असतात. कारण त्यामुळे आयुष्यभर तुमच्या लग्नाच्या आठवणी तुम्हाला साठवून ठेवता येतात.

ADVERTISEMENT

ब्रायडल मेकअप करताना काळ्या रंगाची आयब्रो पेन्सिल वापरू नका (Don’t Use Black Eyebrow Pencil)

लग्नातील लुक जितका नॅचरल दिसेल तितकं तुमचं सौंदर्य अधिक खुलून येईल. कधी कधी काळ्या रंगाच्या आयब्रो पेन्सिलमुळे तुमचा लुक बिघडू शकतो. यासाठी तुम्ही ज्या रंगाची आयशॅडो वापरणार आहात त्याच रंगाची आयपेन्सिल वापरा. ब्रायडल मेकअपसाठी ब्राऊन अथवा ग्रे शेडची आयपेन्सिल वापरणं योग्य ठरू शकेल.

कलरफुल आयशॅडोचा वापर कमी करा (Reduce The Use Of Colorful Eyeshadows)

4. Bridal Makeup Things In Marathi

Also Read: Makeup Tips In Marathi

जर ब्रायडल मेकअपसाठी तुम्ही कलरफुल आयशॅडोज वापरली तर तुमचं मुळ सौंदर्य त्यामुळे झाकलं जाईल. शिवाय लग्नात तुम्हाला फॅशन डिझास्टरचा टॅग नको असेल तर  असे करणं टाळा. लग्नातील तुमच्या पोशाखानुसार तुम्ही गोल्डन, ब्राऊन अथवा कॉपर कलरची आयशॅडो वापरू शकता. सध्या स्मोकी आईजचा मेकअपदेखील ट्रेंडमध्ये आहे.

ब्रायडल मेकअपसाठी एकाच आयलिडवर डार्क मेकअप करणं टाळा (Avoid Doing Dark Makeup)

डेली रूटीन मेकअपसाठी अनेकींना एका साईडच्या आयलिडवर डार्क मेकअप करण्याची आवड असते. मात्र लग्नाच्या मेकअपसाठी आयलिडच्या दोन्ही बाजूंना समान मेकअप करा. ज्यामुळे तुमच्या डोळ्याचे सौंदर्य अधिक खुलून दिसेल.

ADVERTISEMENT

पूर्ण चेहऱ्यावर प्लशर फिरवू नका (Do Not Rotate Plusher On Full Face)

मेकअप करताना अनेकजणी संपूर्ण चेहऱ्यावर ब्लशर लावतात. मात्र ब्रायडल मेकअप करताना असे करू नका. त्याऐवजी थोडसं हसून गालावर ब्लशर लावा. यामुळे तुमच्या चेहऱ्यावर एक साजेसा ग्लो येईल. शिवाय संपूर्ण लग्नसमारंभात आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी, प्रत्येक क्षणी फोटोग्राफरला पोज देण्यासाठी तुम्हाला सतत हसावं लागणार. अशा प्रकारे ब्लशर लावल्यामुळे तुमचा सतत चेहरा हसरा आणि फ्रेश दिसेल.

हायलायटर चा वापर योग्य पद्धतीने करा (Use A Highlighter Properly)

ब्रायडल मेकअपमध्ये हायलायटर योग्य पद्धतीने न लावल्यास नववधूचा लुक बिघडण्याची शक्यता अधिक असते. चुकीच्या पद्धतीने हायलायटर लावल्यामुळे नववधूचे फोटो अती चमकदार दिसतात. त्यामुळे चांगल्या लुकसाठी हायलायटर व्यवस्थित ब्लेंड होईल याची काळजी घ्या.

लिपस्टिक लावण्यापूर्वी लिपलायनरचा वापर करा (Use A Lipliner Before Applying Lipstick)

5. Bridal Makeup Things In Marathi

लिपस्टिक हा  मेकअपचा आत्मा आहे. कारण लिपस्टिक लावल्यावरच तुमचा कोणताही मेकअप पूर्ण होतो. लिपस्टिक कशी लावली आहे हे देखील मेकअपमध्ये खूप महत्त्वाचं आहे. लग्नाचा मेकअप करताना लिपस्टिक लावण्यापूर्वी त्या रंगसंगतीचे लिप लायनर जरूर लावा. कारण त्यामुळे तुमच्या ओठांचा शेप चांगला दिसेल आणि लिपस्टिक जास्त वेळ टिकेल. शिवाय लिपस्टिकचा शेड तुमच्या पेहरावाच्या रंगसंगतीला मॅच होत आहे याची काळजी नक्की घ्या.

लग्नसोहळ्याच्या कमीतकमी चार दिवस आधी इतर ब्युटी ट्रिटमेंट घ्या (Beauty Treatment Four Days Before Wedding)

लग्नसोहळ्यात सुंदर दिसण्यासाठी नववधूला केसांपासून पायांच्या नखांपर्यंत अनेक ब्युटी ट्रिटमेंट दिल्या जातात. हेअर स्पा, ब्लिच, फेशिअल, वॅक्सिंग, मेनिक्युअर, पेडीक्युअर, बॉडी स्पा अशा अनेक ब्युटी ट्रिटमेंटमुळे तुमचं सौंदर्य अधिक खुलून दिसतं. मात्र या ब्युटी ट्रिटमेंट सोबत तुम्हाला आराम आणि रिलॅक्स राहण्याची देखील फार गरज असते. कारण कितीही ब्युटी ट्रिटमेंट केल्या पण तुम्ही दगदगीमुळे थकलेल्या असाल तर नवरीचा ग्लो तुमच्या चेहऱ्यावर दिसणार नाही. शिवाय लग्नाच्या आधी दोन-तीन दिवस तुम्हाला मेंहदी, हळदी समारंभ, संगीत अशा अनेक कार्यक्रमांसाठी सज्ज राहावे लागणार असते. यासाठी लग्नाच्या आधी कमीत कमी आठवडाभर आधी ऑफिसमधून सुट्टी घ्या आणि इतर ब्युटी ट्रिटमेंटसाठी वेळ द्या. ज्यामुळे लग्नाच्या दिवशी तुम्ही नक्कीच फ्रेश आणि सुंदर दिसाल.

ADVERTISEMENT

डोळ्यांवर वॉटरप्रूफ मेकअप करा (Waterproof Makeup On Eyes) 

6. Bridal Makeup Things In Marathi

लग्नानंतर तुमच्या सुखी संसाराला सुरूवात होणार असली तरी त्यासाठी तुम्हाला काही गोष्टी मनाविरूद्ध कराव्या लागतात. लग्नानंतर तुम्हाला तुमच्या आई-वडील आणि माहेरच्या मंडळीना सोडून नव्या घरी जावं लागतं. हा क्षण प्रत्येकीसाठी प्रंचड हळवा आणि त्रासदायक असतो. त्यामुळे लग्नानंतर सासरी जाताना होणाऱ्या भावनिक क्षणांची आधीच काळजी घ्या. कारण त्यावेळी तुमचे अश्रू अनावर होतात आणि तुमचा लुक खराब होतो. त्यानंतर लगेच तुम्हाला नव्या घरात होणाऱ्या स्वागतासाठी सज्ज व्हावं लागतं. तेव्हा संसाराची सुरूवात करताना जर तुम्हाला तुमचा लुक चांगला ठेवायचा असेल तर लग्नात डोळ्यांवर वॉटरप्रूफ मेकअप करायला विसरू नका.

भरपूर पाणी प्या (Drink Plenty Of Water)

बऱ्याचदा लग्नसोहळे एप्रिल आणि मे महिन्यात ठरवले जातात. लग्नसोहळा जरी एसी हॉल अथवा हॉटेलमध्ये असला तरी तुम्हाला सतत थोडं थोडं पाणी पिण्याची फार गरज आहे. कारण लग्नासाठी किमान आधीचे आणि नंतरचे तीन-चार दिवस तुमची दगदग होणार असते. त्यामुळे उन्हाच्या काहिलीमुळे तुम्ही त्वचा आणि शरीर डिहायड्रेट होऊ शकते. यासाठी सतत पाणी अथवा फळांचा रस प्या ज्यामुळे तुम्ही लग्नात फ्रेश दिसाल. खरंतर लग्न ठरल्यापासूनच तुम्ही तुमच्या शरीर आणि मनाची व्यवस्थित काळजी घ्यायला हवी. कारण आहार अथवा इतर गोष्टींकडे नीट लक्ष न दिल्यास लग्नाच्या गडबडीत तुम्ही आजारी पडू शकता.

मेकअप किट तयार ठेवा (Keep The Makeup Kit Ready)

लग्नासाठी तुमचं एक छानसं मेकअप किट तयार ठेवा. लग्नसोहळ्यातील विविध विधींसाठी मेकअपसाठी तुमचे मेकअप आर्टिस्ट तुम्हाला मदत करतात. मात्र लग्नानंतर काही दिवस तुम्हाला तुमचं नववधूचं रूप सुंदर दिसेल याची काळजी घ्यावी लागते. जरी तुम्हाला मेकअपची विशेष आवड नसेल तरी एखादा पारंपरिक पेहराव केल्यावर त्यासोबत हलकासा मेकअप करणं गरजेचं असतं. मेकअपशिवाय पारंपरिक अथवा अॅथलिक पोशाख साजेसे वाटत नाहीत. यासाठी तुमचं एखादं बेसिक मेकअप किट तयार ठेवा. ज्यामध्ये तुमच्या नेहमीच्या वापरातील क्लिंझर, फेशवॉश,  गुलाबपाणी, सनस्क्रीन, योग्य शेडचं फाऊंडेशन आणि कंसिलर, कॉटन पॅड, प्रायमर, कॉम्पॅक्ट पावडर, ब्लशर, आय लायनर, आय पेन्सिल, मस्कारा, काजळ, बेसिक शेडच्या आयशॅडो, चार पाच लाईड आणि ब्राईट शेड्सच्या लिपस्टिक आणि लिप लायनर, पाच-सहा रंगाच्या नेलपॉलिश, मेकअपसाठी लागणाऱ्या ब्रशचा सेट, नेल रिमूव्हर, परफ्युम, मेकअप रिमूव्हर, टिश्यू पेपर या गोष्टींचा समावेश असेल. या सोबतच लग्नाआधी बेसिक मेकअप करण्याचं टेकनिक देखील शिकुन घ्या. ज्यामुळे लग्नानंतर कोणत्याही क्षणी बाहेर फिरायला जाण्यासाठी अथवा एखाद्या खास प्रसंगी तुम्ही तुमचा मेकअप स्वतःच करू शकता.

तुमचा विवाह सोहळा अविस्मरणीय व्हावा आणि लग्नातील तुमचा लुक अप्रतिम दिसावा यासाठी आम्ही या तुम्हाला काही सोप्या टीप्स सांगितल्या आहेत. या टीप्स तुम्हाला कशा वाटल्या आणि त्याचा तुम्हाला काय फायदा झाला हे आम्हाला कंमेट बॉक्समध्ये अवश्य कळवा.

ADVERTISEMENT

You Might Like These:

नववधूच्या बॅगेत ‘या’ गोष्टी असायलाच हव्या

लग्नसराईमध्ये या 15 गाण्यांनी मोहरेल नववधूचे मन (Marathi Wedding Songs)

नववधूंनी नक्की ट्राय करा ‘खास’ सेलिब्रिटी ब्रायडल मेकअप लूक्स

ADVERTISEMENT

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम आणि शटरस्टॉक

29 Apr 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT