How To Do Makeup At Home In Marathi - मेकअप करण्याची पद्धत आणि मेकअप साहित्य | POPxo

घरच्या घरी करा असा मेकअप जो तुम्हाला देईल प्रोफेशनल लुक (How To Do Makeup At Home In Marathi)

घरच्या घरी करा असा मेकअप जो तुम्हाला देईल प्रोफेशनल लुक (How To Do Makeup At Home In Marathi)

निमित्त कोणतेही असो आपण छान तयार झालो की, आपल्याला फोटो काढायचेच असतात. या फोटोसाठी सगळ्यात महत्वाचा असतो मेकअप. कारण तुमच्या कपड्यांना न्याय द्यायचे काम तुम्ही केलेला मेकअप करत असतो. प्रत्येकवेळी प्रोफेशनल मेकअप आर्टिस्टची मदत घेऊन मेकअप करणे शक्य नसते. कारण त्यासाठी चांगली किंमत मोजावी लागते. पण जर तुम्ही थोडासा मेकअप शिकलात तर तुम्हाला घरच्या घरीही अगदी प्रोफेशनल लुक देणारा मेकअप करता येऊ शकतो. मग करायची का सुरुवात ?


मेकअप साहित्य


मेकअप करण्याची पद्धत


मेकअपचे निमित्त


FAQs


मेकअप साहित्य (Makeup Essentials)


मेकअप करण्याआधी तुम्हाला मेकअपच्या साहित्याची जुळवाजुळव करायला नको का? प्रत्येकाकडे मेकअपचे बेसिक साहित्य तरी असायला हवे. मेकअपचे हे बेसिक साहित्य कोणते ते जाणून घेऊया.


विगन अथवा क्रुअल्टी फ्री मेकअपसाठी बेस्ट ब्रॅंड


फाऊंडेशन (Foundation)


मेकअपच्या बेसमधील सगळ्यात महत्वाचा भाग असतो तो म्हणजे फाऊंडेशन. जर तुमच्याकडे फाऊंडेशन असेल तर उत्तम आणि जर तुमच्याकडे फाऊंडेशन नसेल तर तुम्ही चांगल्या दर्जाचे लिक्विड फाऊंडेशन घ्या. कारण ते लावणे सोपे असते. फाऊंडेशन हा मेकअपचा बेस आहे त्यामुळे तुम्ही चांगले फाऊंडेशन घ्यायला हवे. तुम्हाला फाऊंडेशनबाबत काही शंका असतील तर तुम्ही हे काही ब्रँड ट्राय करु शकता


POPxo Recommends:


Maybelline New York Fit Me Matte + Poreless Foundation - 500 रुपये


Maybelline New York Fit Me Matte + Poreless Liquid Foundation Tube - 299 रुपये


Nykaa SKINgenius Sculpting & Hydrating Foundation - 575 रुपये


लूझ पावडर (Loose Powder)


फाऊंडेशन लावून झाल्यानंतर तुमचे फाऊंडेशन टिकून राहावे यासाठी लूझ पावडर लावली जाते. लूझ पावडर म्हणजे टाल्कम पावडर नाही. तुमच्या त्वचेच्या रंगाप्रमाणे तुम्हाला लूझ पावडर मिळतात. अशाच लूझ पावडरचा वापर तुम्हाला मेकअपमध्ये करायचा असतो


आयलायनर (Eyeliner)


मेकअपमधील आयलायनर ही अशी गोष्ट आहे जी तुमच्या मेकअपला खऱ्या अर्थाने न्याय देते. कारण डोळ्यांना आयलायनर लावल्यानंतर तुमचा मेकअप खुलून दिसतो. छोट्या डोळ्यांसाठी मेकअप टिप्स आणि वेगवेगळ्या प्रकारच्या आयलाइनरसाठी मोठ्या डोळ्या.


वाचा - आयलायनरचे हे प्रकार


काजळ (Kajal Pencil)


डोळ्यांच्या मेकअपमध्ये आणखी एक महत्वाची आणि बेसिक गोष्ट आहे ती म्हणजे काजळ. अनेकांना काजळ लावण्याची सवय असतेच. त्यामुळे तुमच्याकडे काजळ असेल असे आम्ही गृहीत धरतो.


POPxo Recommends:


Lotus Make-Up Ecostay Kajal - 345 रुपये


SUGAR Stroke Of Genius Heavy Duty Kohl - 01 Back To Black - 1298 रुपये


आयशॅडो (Eye Shadow)


डोळ्यांच्या मेकअपमधील आयशॅडोचे कामही फार महत्वाचे आहे. डोळ्यांच्यावर आयशॅडो लावण्यात येतात. तुमच्या आयलायनरला चांगला न्याय देण्याचे काम आयशॅडो करतात.

Subscribe to POPxoTV

महागड्या मेकअपचे डुप्लिकेट (Affordable Duplicate Makeup Products In Marathi)


मस्कारा (Mascara)


तुमच्या पापण्यांना अधिक गडद करण्याचे काम मस्कारा करत असते. तुमच्या पापण्या कितीही पातळ आणि लहान असल्या तरी देखील त्यांना उठावदारपणा आणून तुमच्या डोळ्यांचे सौंदर्य अधिक खुलवण्याचे काम मस्कारा करत असते.


POPxo Recommends:


Maybelline New York The Colossal Volum Express Mascara - 399 रुपये


Maybelline New York Volum Express Hyper Curl Mascara - Waterproof Very Black - 325 रुपये


Maybelline New York Lash Sensational Mascara - 500 रुपये


लिपस्टिक (Lipstick)


आता लिपस्टिकबद्दल काही सांगायलाच नको. मुलींच्या मेकअप बॉक्समध्ये किमान दोन ते तीन शेड्सच्या लिपस्टिक असतात. यात लाल, गुलाबी, चॉकलेटी असे काही शेड्स हमखास असतात.  


ब्लशर (Blusher)


तुमच्या गालांना लाली देऊन त्यांना चमकवण्याचे काम ब्लशर करत असते. हे जर तुमच्याकडे नसेल तर एखादे ब्लशर घ्यायला काहीच हरकत नाही.यातही तुम्हाला गुलाबी, गोल्डन असे काही शेड्स मिळतात. किंवा एकाचवेळी तुम्हाला ब्लशरचे पॅलेट मिळते. किंवा ब्राँझिंग पल्सदेकील खरेदी करु शकता.


वाचा - फेसशेपप्रमाणे मेकअप (Makeup According to Face Shape In Marathi)


मेकअप ब्रश (Makeup Brush)


मेकअपच्या इतर साहित्याव्यतिरिक्त मेकअप लावण्यासाठी तुमच्याकडे मेकअपचे काही ब्रश देखील असणे गरजेचे असते. अगदी महागडे प्रोफेशनल मेकअप नाही. पण तुमच्याकडे अगदी बेसिक मेकअप ब्रश किट असायला हवे. यामध्ये फाऊंडेशन ब्रश, हायलाईटर ब्रश, एअरब्रश मेकअप, लिपस्टिक ब्रश तर हवाच. 


तुमच्याकडे वरील साहित्यापैकी काय आहे? (What Materials Do You Have)


साधारण मेकअप करण्यासाठी तुम्हाला वरील साहित्याची गरज असते. पण सगळ्यात आधी तुम्हाला तुमच्या मेकअप किटमध्ये काय काय आहे ते तपासून पाहायचे आहे. यातील कोणत्या वस्तू तुमच्याकडे नाहीत त्या खरेदी करण्यास काहीच हरकत नाही. कारण याचा वापर तुम्हाला प्रत्येक कार्यक्रमादरम्यान करता येईल. जरी तुम्ही फार मेकअप करणारे नसाल तरी देखील त्याचा उपयोग तुम्हाला सोहळ्यादरम्यान करता येऊ शकतो.


मेकअपचे साहित्य एक्सपायर्ड झाले आहे हे कसे ओळखाल?


मेकअप करण्याची पद्धत (Makeup Tips In Marathi)


आता मेकअपचे साहित्य एकत्र करुन झाल्यानंतर तुम्हाला मेकअप कसा करायचा हे देखील माहीत हवे नाही का? म्हणूनच जाणून घेऊया मेकअप करण्याची पद्धत.


आता खऱ्या अर्थाने करुया मेकअपची सुरुवात (Lets Start With Real Makeup)


सगळ्यात आधी तुमचा चेहरा स्वच्छ धुवून घ्या आणि चेहऱ्याला  चांगले मॉश्चरायझर लावा (मॉश्चरायझर लावण्याचे कारण इतकेच की, तुमचा चेहऱ्याला थेट मेकअप लागत नाही.)


तुम्हाला मेकअप करण्याआधी चांगल्या लाईट असलेल्या ठिकाणाची निवड करायची आहे. त्यामुळे मेकअप कमी जास्त होण्याची शक्यता कमी होते.


मेकअपचे निमित्त (Makeup According To Occasion)


मेकअप करण्याआधी तुम्ही कशासाठी मेकअप करत आहात याचा. कारण तुम्हाला त्यानुसार मेकअपमध्ये व्हरायटी आणायची असते. आम्ही मेकअपचे काही प्रकार केले आहेत. त्यानुसार मेकअपमध्ये कशी व्हरायटी आणायची हे सांगितले आहे. जे तुम्हाला घरच्या घरी करणे शक्य आहे.


वाचा - ट्राय करु शकता हा ग्लिटरी मेकअप


लग्नासाठीचा मेकअप करताना (Wedding Party Makeup)


%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE %E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%85%E0%A4%AA - How To Do Makeup At Home In Marathi


  • लग्नाला जाताना आपण अगदी टिपटॉप असतो. लग्नासाठी खास ट्रेडिशनल वेअर अधिक वापरले जातात. त्यामुळे अशावेळी मेकअप करताना लक्षात ठेवण्याच्या गोष्टी

  • ट्रेडिशनल वेअरवरील मेकअप हा नेहमी ब्राईट आणि थोडा गडद असायला हवा.

  • चेहऱ्यावर फाऊंडेशनचा बेस लावल्यानंतर तुम्हाला लुझ पावडर लावायची आहे. त्यावर पाण्याचा स्प्रे फवारुन तुम्हाला चेहऱ्यावरील अतिरिक्त पाणी टिपून घ्यायचे आहे. हे करण्यामागे कारण इतकेच आहे की, त्यामुळे फाऊंडेशन चेहऱ्यावर चांगले बसते.

  • त्यानंतर तुम्हाला डोळ्यांच्या मेकअपकडे वळायचे आहे. तुम्ही साडी, पंजाबी ड्रेस, घागरा चोळी असा तत्सम प्रकार घातला असेल तर त्यातील जर कोणत्या रंगाची आहे हे पाहून तुम्हाला तुमचा आयशॅडोचा रंग निवडायचा आहे.


उदा. तुमचा ड्रेस पर्पल रंगाचा आहे.त्याला गोल्डन जर असेल तर तुम्ही तुमचा बेस तुमच्या कपड्यांच्या रंगानुसार आणि त्यावर गोल्डन रंग लावून तुम्ही दोन रंगामध्ये तुम्ही तुमच्या डोळ्यांना आयशॅडो लावायचा आहे.


  • आयशॅडोचा रंग जर गडद असेल तर तो खूप जास्त लावू नका कारण त्यामुळे तुमच्या सगळ्या मेकअपचा लूक बदलू शकतो. त्यामुळे खूप जास्त आयशॅडो लावू नका.


Makeup Tips In Marathi


  • पारंपरिक कपड्यांवर आयलायनर लावताना ते थोडे जाड लावल्यास चांगले दिसते. तुम्ही इतर कोणत्याही रंगाचे आयलायनर लावण्यापेक्षा काळ्या रंगाचे लायनर लावा. डोळ्याखाली थोडे जाड काजळ लावा. त्यामुळे तुमचे डोळे अधिक उठून दिसतात. लायनर लावताना तुम्हाला अधिक काळजी घ्यायची आहे. कारण ते जराजरी फिस्कटे तरी मेकअपचा लुक बदलतो.

  • त्यानंतर तुम्हाला तुमचे गाल अधिक उठावदार करण्यासाठी ब्लशर लावायचे आहे. हाच ब्लशर तुम्हाला तुमच्या नाकाच्या शेंड्यावर अगदी हलकाच लावायचा आहे.त्यामुळे तुमच्या नाकाचा शेंडा छान चमकेल.

  • आता मेकअपचा शेवट तुम्हाला लिपस्टिकने करायचा आहे. अशा पेहरावावर लाल रंगाच्या शेड अधिक उठून दिसतात. लिपस्टिक अधिक चांगली लावायची असेल तर ओठांच्या कडांना लिपलायनर फिरवून मग ब्रशने लिपस्टिक लावा. जर तुमच्याकडे लाल रंगामध्ये दोन तीन शेड्स असतील तर तुम्ही लिपस्टिकचे रंग मिक्सही करु शकता.


नेलपेंटचे हे दहा शेड तुमच्याकडे असायलाच हवे


बर्थडे पार्टीसाठीचा मेकअप (Birthday Party Makeup)


%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%A1%E0%A5%87 %E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE %E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%85%E0%A4%AA %E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF


  • बर्थडे पार्टीसाठी अनेकदा वेस्टर्न आऊटफिटची निवड केली जाते. म्हणजे एखादा गाऊन, मॅक्सी ड्रेस असे प्रकार घातले जातात. शिवाय बर्थडे पार्टी संध्याकाळीच असते.

  • लग्नापेक्षा थोडा वेगळा मेकअप या वेळी करायला हवा.कारण लग्नासाठीचा मेकअप फार गडद असतो. त्यापेक्षा कमी मेकअप तुम्हाला यामध्ये करायचा आहे.

  • अशा प्रकारच्या कार्यक्रमात तुमची त्वचा फ्रेश दिसणे जास्त महत्वाचे असते. त्यामुळे तुम्हाला तुमचा बेस अधिक उठावदार करायचा आहे. तुम्हाला फाऊंडेशन तुमच्या चेहऱ्यावर चांगले ब्लेंड करायचे आहे. जर तुमच्याकडे कंसिलर असेल तर ठिक नाहीतर फाऊंडेशन तुम्ही डोळ्याखाली व्यवस्थित लावले तरी चालेल. त्यावर लुझ पावडर लावायची आहे.

  • डोळ्यांना आयशॅडो लावताना तुमच्या स्किनटोनवर जास्त उठून दिसणार नाही. असा रंग निवडा.

  • डोळ्यांना अगदी पातळ लायनर आणि काजळ लावा. हो मस्कारा मात्र अगदी व्यवस्थित लावा. कारण तुम्ही जास्त मेकअप करणार नाही आहात. त्यामुळे डोळे खुलवण्याचे काम केवळ मस्कारा करु शकतो.

  • हायलायटर ही फार गुलाबी नको त्यापेक्षा गाल शाईन करु शकेल अशी शेड निवडा.

  • तुमच्या ड्रेसनुसार तुम्ही लिपस्टिक निवडा. म्हणजे अशा पार्टीजना तुम्ही गुलाबी रंगाचे शेड्स चांगले दिसतात.


वाचा - तसेच अंधुक त्वचेसाठी मेकअप टिप्स


ऑफिस पार्टीसाठी मेकअप (Office Party Makeup)


%E0%A4%91%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%B8 %E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80 %E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%85%E0%A4%AA %E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF


  • ऑफिसपार्टीसाठी कोणतीही थीम असली तरी तुम्हाला इतर दिवसांप्रमाणे मेकअप करता येत नाही. ऑफिससाठीचा मेकअप हा नेहमी डिसेंट असावा.

  • फाऊंडेशनचा बेस आणि लूझ पावडर लावल्यानंतर गाल हायलाईट करण्यासाठी तुम्ही छान लाईट रंगाचे ब्लशर वापरा

  • काजळ, लायनर आणि आयशॅडो यांचे संतुलन साधा.

  • लिपस्टिकचा रंग निवडताना न्यूड शेड निवडल्यास उत्तम


इनडोअर आणि आऊटडोअर मेकअप (Indoor and Outdoor Makeup)


इनडोअर आणि आऊटडोअर मेकअपमध्ये तुम्हाला काळजी घेण्याचे कारण इतकेच असते की, इनडोअर मेकअपमध्ये तुम्ही केलेला मेकअप अधिक उठावदार दिसण्यासाठी वेगवेगळ्या लाईट्स असतात. तर आऊडडोअरमध्ये कशाप्रकारची लाईट अरेंजमेंट असेल हे माहीत नसते. त्यामुळे आऊटडोअरचा मेकअप हा थोडा बँलन्स ठेवावा लागतो. तरच तुमचा मेकअप आणि लुक अधिक उठावदार दिसू शकतो. 


या व्यतिरिक्त तुम्हाला तुमचे आयब्रोज फिल करायलाही विसरायचे नाही. कारण हल्ली तो एक ट्रेंड आला आहे. जितके जाड आणि भरलेले आयब्रोज असतील तितकेच ते अधिक उठून दिसतील


वाचा - कोणत्याही हिटशिवाय केसाना कर्ल


मेकअप दरम्यान पडणारे प्रश्न? (FAQ)


फाऊंडेशन लावणे गरजेचे आहे?


अनेकांना फाऊंडेशन लावायला आवडत नाही हे खरे असले तरी तुम्हाला मेकअपमध्ये फाऊंडेशन लावणे हे मस्ट आहे. ते लावल्यानंतरच तुमचा चेहऱा एक सारखा दिसतो. फाऊंडेशनची निवड करताना तुम्हाला त्रास होत असेल तर एक्सपर्टचा सल्ला घ्या आणि योग्य फाऊंडेशनची निवड करा.


मेकअप ब्रश नसेल अशावेळी काय करावे?


तुम्ही सतत मेकअप करणारे नसाल तर तुमच्याकडे मेकअप ब्रश असेलच असे नाही. पण मेकअप ब्रशला अन्य कोणताही पर्याय असू शकत नाही. त्यामुळे तुम्हाला फाऊंडेशन, ब्लशर यांचे ब्रश विकत घ्यावेच लागतील.


मेकअपमधील नव्या वस्तू खरेदी करताना साधारण किती खर्च येऊ शकतो?


जर तुमच्याकडे मेकअपचे काहीच सामान नसेल आणि तुम्हाला नवीन साहित्य विकत घ्यायची इच्छा असेल तर तुम्हाला चांगल्या ब्रँडचे साहित्य घ्यायला साधारण 2000 ते 2500 रुपये इतका खर्च येईल. तुम्ही काय काम करता तुम्हाला मेकअपची गरज कधी लागू शकते. तुमचे वय या सगळ्याचा विचार करुन मेकअपच्या साहित्याची निवड करा.


आयलायनरचे वेगवेगळे प्रकार ट्राय करण्याची इच्छा आहे?


आयलायनरचे वेगवेगळे प्रकार ट्राय करायला काहीच हरकत नाही. पण जर तुम्हाला बेसिक आयलायनर येत नसेल तर थोडे थांबा. आम्ही तुम्हाला लायनर सोप्या पदधतीने कसे लावता येईल ते देखील शिकवू.


मेकअप मला सूट होतो की नाही हे कसे ओळखू?


अनेकांना मेकअप स्वत:हून करताना अनेक प्रश्न असतात. तुम्हाला मेकअपचा त्रास होतो की नाही हे तपासून पाहण्यासाठी तुमच्या चेहऱ्यावर मेकअपचा एखादा पॅच लावून पाहा. काही तास ठेवून मग मेकअप काढा. जर तुमच्या त्वचेला काहीच झाले नाही. याचा अर्थ या प्रोडक्टचा तुम्हाला त्रास होत नाही. फाऊंडेशनच्या रंगाबाबतही तुम्हाला अशीच शंका असेल तर तुम्ही शेड्स ही तशाच पद्धतीने ट्राय करु शकता. तुमची त्वचा दोन टोन उजळवेल तो शेड तुम्ही निवडला तर उत्तम


फोटो सौजन्य- Shutterstock, Youtube


You Might Like These:


सुलभ मेकअप टिप्स


उत्कृष्ट वॉटरप्रूफ आयलायनर


नो मेकअप लुकसाठी टिप्स


चेहऱ्यावर असतील वांग (Makeup For A Face With Freckles In Marathi)


Winter Makeup Tips Accorind To Skin Type In Marathi


प्राईमर वापरण्याचे फायदे आणि प्राईमर लावण्याची योग्य पद्धत कोणती


Lipstick Shades For Indian Skin Tone In Marathi


भारंभार मेकअप कशाला ‘न्यूड’ मेकअपनेही दिसाल सुंदर