तुम्हाला व्हजायना यीस्ट इन्फेक्शन होण्याची नक्की कारणं माहीत आहेत का? कारण बऱ्याचदा लक्षणं माहीत नसल्यामुळे ही गोष्ट व्हजायनल यीस्ट इन्फेक्शन आहे हेच काही महिलांना कळून येत नाही. तुमच्या व्हजायनामध्ये खाज, जळजळ आणि अगदी चिकट सफेद डिस्चार्ज येत असेल किंवा काही वेळेस तुमच्या पँटीला सफेद पनीरप्रमाणे डिस्जार्च लागलेला दिसत असेल तर याला व्हजायनल यीस्ट इन्फेक्शन असं म्हणतात. बऱ्याच महिलांमध्ये हे इन्फेक्शन होणं अतिशय कॉमन आहे. पण याला व्हजायनल यीस्ट इन्फेक्शन म्हणतात आणि यामुळे आपल्या शरीराचं काही नुकसान होऊ शकतं हेच महिलांना माहीत नसतं. प्रत्येक महिलेला हे इन्फेक्शन कधी ना कधीतरी होतंच. याकडे दुर्लक्ष करून उपयोग नाही. कारण हे इन्फेक्शन वाढल्यास, तुमच्या व्हजायनामधील बॅक्टेरियाचा बॅलेन्सदेखील वाढतो हे लक्षात घ्यायला हवं.
तुम्हाला जर यीस्ट इन्फेक्शन वरचेवर होत असेल तर नक्कीच याचं काहीतरी कारण असणार. आम्ही तुम्हाला या लेखाद्वारे अशी काही कारणं सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला व्हजायनल यीस्ट इन्फेक्शनची नक्की काय कारणं असतात ते कळेल. हे वाचल्यानंतर तुम्ही या गोष्टी करणं टाळा जेणेकरून तुम्ही व्हजायनल यीस्ट इन्फेक्शनपासून दूर राहाल.
व्हजायनल यीस्ट इन्फेक्शन म्हणजे नक्की काय? (What is Vaginal Yeast infection)
आपण नेहमी हा शब्द ऐकत असतो. पण नक्की याचा अर्थ काय याची माहिती खूपच कमी जणांना असते. त्यामुळे आम्ही तुम्हाला व्हजायनल यीस्ट इन्फेक्शन म्हणजे नक्की काय ते सांगणार आहोत. हे अतिशय कॉमन आहे. हा कोणताही आजार नाही. ही नॉर्मल कंडिशन आहे. पण व्हजायनल यीस्ट इन्फेक्शन म्हणजे जेव्हा व्हजायनामध्ये बॅक्टेरिया आणि यीस्टचं संतुलन बिघडतं तेव्हा हा त्रास महिलांना सुरू होतो. यामुळे खाज येणं, जळजळ होणं अथवा व्हजायनाला सूज येणं यासारखे प्रकार होत असतात. तसंच तुम्हाला जेव्हा असा त्रास असतो त्यावेळी शक्यतो सेक्स करणं टाळायला हवं. कारण त्यावेळी सेक्स केल्यास, तुम्हाला तर त्रास होतोच. पण तुमच्या जोडीदाराही याचं इन्फेक्शन होण्याची शक्यता असते.
वाचा – Hookworm ची लक्षणं आणि त्यावरील उपाय
व्हजायनल यीस्ट इन्फेक्शनची कारणं (Vaginal Yeast Infection Causes)
व्हजायनल यीस्ट इन्फेक्शनची सहा महत्त्वाची कारणं आपण पाहूया. या कारणांंमुळे तुम्हाला व्हजायनल यीस्ट इन्फेक्शनचा त्रास होण्याची शक्यता असते.
1. आपलं सॅनिटरी पॅड योग्य वेळी न बदलणं (Sanitary Pads)
न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीमध्ये असणाऱ्या स्त्रीरोगतज्ज्ञ तारेने शिराजियान यांनी सांगितल्याप्रमाणे दमटपणा अथवा मॉईस्चर असणाऱ्या वातावरणामध्ये यीस्ट इन्फेक्शन जास्त प्रमाणात वाढतं आणि तुमचं सॅनिटरी पॅड अथवा टॅम्पून या अशा गोष्टी आहेत, ज्यामध्ये जास्त मॉईस्चर असतं. त्यामुळे अधिक वेगाने यीस्ट वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे आपलं पॅड जेव्हा जास्त ओलं वाटू लागेल तेव्हा अर्थात साधारण चार ते पाच तासाने बदलायला हवं. अन्यथा तुम्हाला यीस्ट इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त असते.
युरिन इन्फेक्शन होण्याची मुख्य कारणं (Causes Of Urine Infection)
2. अँटिबायोटिक्स घेणं (Use of Antibiotics)
तुम्ही एखाद्या आजारामुळे अथवा एखाद्या इन्फेक्शनमुळे काही अँटिबायोटिक्स घेत असाल तर तुमच्या शरीरावर अर्थात तुमच्या खासगी इकोसिस्टिमवर याचा वाईट परिणाम होतो. अँटिबायोटिक्स व्हजायनामधील सर्व चांगले बॅक्टेरिया संपुष्टात आणून यीस्ट वाढवण्यास अधिक बढावा देतात असं डॉ. कॅथरीन बॉयलिंग यांनी सांगितलं आहे. त्यांनी सांगितलेल्या उपायाप्रमाणे व्हयाजनामधील चांगल्या बॅक्टेरियांची वाढ करण्यासाठी आणि इन्फेक्शन न होऊ देण्यासाठी अँटिबायोटिक्ससह प्रोबायोटिक सप्लीमेंटदेखील अवश्य घ्यायला हवी. ज्या प्रोबायोटिक सप्लीमेंटमध्ये लेक्टोबॅसिलस असतील असेच घेणं योग्य आहे. कारण हे व्हजायनाच्या चांगल्या आरोग्यासाठी आवश्यक असतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही औषधाच्या रूपात हे घेण्यापेक्षा चांगल्या अन्नपदार्थांमधून याचा पुरवठा झालेला कधीही चांगला. यासाठी दही खाणं हादेखील चांगला उपाय आहे.
3. उच्च मधुमेह असणं (Diabetes)
तुम्हाला मधुमेह अथवा प्री डायबेटिस आहे का? तर सर्वात आधी तुमचं रक्त तपासून पाहा. यीस्ट इन्फेक्शनला साखरेमुळे अधिक एनर्जी मिळते आणि परिणामी यीस्ट व्हजायनामध्ये वाढू लागते, त्यामुळे इन्फेक्शन होते. तुमची साखर तुमच्या नियंत्रणात नाही असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही वेळेवर डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि लवकरात लवकर साखर नियंत्रणात आणा. साखर नियंत्रणात आणण्यासाठी योग्य आहार घ्या आणि तेदेखील डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे.
4. इन्फेक्शन झालेल्या जोडीदारासह सेक्स (Sex)
हो, अर्थातच हे इन्फेक्शन दुसऱ्यालाही आपल्यामुळे होऊ शकतं. ज्या जोडीदाराला हे इन्फेक्शन आहे त्याच्या सान्निध्यात आल्यावर अर्थात सेक्स केल्यानंतर तुम्हालाही हे होऊ शकतं. तुम्ही पेनिसद्वारे सेक्स करा अथवा तोंडाद्वारे तरीही याचा परिणाम तुमच्यावर होतो. पुरुषांमध्ये हे अतिशय कॉमन आहे. कारण पेनिसच्या पुढच्या त्वचेवर हे अधिक प्रभावी आहे. इतकंच नाही जर तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर प्रमाणापेक्षा जास्त सेक्स केलं, तर तुमच्या जोडीदाराला इन्फेक्शन नसलं तरीही तुम्हाला यीस्ट इन्फेक्शन होऊ शकतं. हे टाळायचं असेल तर सेक्स केल्यानंतर पडून न राहता तुम्ही लगेचच टॉयलेटमध्ये जाऊन व्हजायना साफ करायला हवी.
5. टाईट अंडरगारमेंट्स घालणं (Use of Tight Undergarments)
तुमचे अंडरगारमेंट्स खूपच टाईट आणि सिंथेटिक फॅब्रिकचे असल्यास, त्यातून हवा जाण्यास वाव राहात नाही. त्यामुळे व्हजायनाच्या जागी अतिशय दमट वातावरण तयार होतं ज्यामुळे यीस्ट इन्फेक्शन होतं. यापासून वाचण्यासाठी रात्री झोपताना अंडरगारमेंट्स न घालता झोपा. रोज असं झोपता येत नसेल तर निदान आठड्यातून किमान दोन वेळा तरी असं करा. त्यामुळे व्हजायना निरोगी राहील आणि त्यातून नैसर्गिक हवा येण्याजाण्यास वाव मिळेल. याशिवाय अंडरगारमेंट्स निवडताना योग्य निवडा. कॉटनचे आणि घाम शोषून घेणारे अंडरगारमेंट्सच वापरा.
POPxo Recommandation: Jockey Modal Bikini Panties, Rs. 209
6. सुवासिक हायजीन प्रॉडक्ट्सचा वापर (Use Vaginal Spray & Other Products)
तुम्हाला व्हजायना नेहमी सुवासिक ठेवण्याची आवड असेल आणि त्यासाठी तुम्ही नेहमी हायजीन प्रॉडक्ट्सचा वापर करत असाल तर, यीस्ट इन्फेक्शनचं हे महत्त्वाचं एक कारण आहे. लक्षात ठेवा की, सेंटेड स्प्रे, वाईप्स, व्हजायना वॉश आणि सुवासिक बबल बाथ सोपदखील तुमच्या व्हजायनाची अॅसिडिटी लेव्हल खाली उतरवू शकतात जे यीस्ट इन्फेक्शनसाठी कारणीभूत ठरू शकतं. तुम्हाला तुमची व्हजायना निरोगी ठेवायची असल्यास, या सर्व गोष्टींऐवजी तुम्ही साध्या साबणाचा वापर करा आणि व्हजायना क्लीन करण्याबद्दल विचारही करू नका. कारण व्हजायनाला स्वतःचा असा सुगंध असतो.
व्हजायनल यीस्ट इन्फेक्शनची लक्षणं (Symptoms of Vaginal Yeast Infection)
नक्की यीस्ट इन्फेक्शनची लक्षणं कोणती आहेत याची माहिती आपण घेऊया. कारण बऱ्याचदा आपल्याला यीस्ट इन्फेक्शन झालं आहे हेच कळत नाही. याची लक्षणं अतिशय कॉमन आहेत. पण याकडे दुर्लक्ष करू नका. अशी लक्षणं जाणवल्यास, त्वरीत डॉक्टरांना भेट द्या. पाहूया काय आहेत लक्षणं –
- व्हजायनामध्ये खाज येणं
- व्हजायनाच्या आजूबाजूच्या भागात सूज येणं
- सेक्स करताना व्हजायनामध्ये जळजळ होणं
- सेक्स करताना दुखणं
- व्हजायनाच्या आजूबाजूला रॅश येणं
- लालसरपणा आणि सूज असणं
- व्हजायनामध्ये कोरडेपणा जाणवणं
यीस्ट इन्फेक्शसाठी काही टिप्स (Yeast Infection Prevention Tips)
व्हजायनल यीस्ट इन्फेक्शन झाल्यास, नक्की काय करायला हवं हे बऱ्याचदा कळत नाही. त्यामुळे काय करायला हवं आणि काय टाळायला हवं हे आपण पाहूया –
काय करायला हवं (Do’s)
- नेहमी व्यवस्थित डाएटनुसार खायला हवं
- नियमित दही अथवा त्याप्रमाणे काही अन्न तुमच्या शरीरात जायला हवं
- कॉटन, लीनन आणि सिल्क हे नैसर्गिक आणि तलम कपडे सहसा घाला
- तुमची अंडरवेअर नेहमी गरम पाण्यात धुवा
- तुम्ही वापरणारी उत्पादनं नेहमी बदलत राहा
- गुप्तांगावरील केस काढणे
काय टाळायला हवं (Dont’s)
- टाईट पँट्स, टाईटहोझ, पँटी अथवा लेगिंग्ज घालणं टाळा
- सेंटेड अंडरवेअर, टँपोड्स अथवा पँट्स घालणं टाळा
- ओल्या कपड्यांनी अथवा ओल्या अंगावर तसंच बसणं टाळा
- सतत गरम पाण्यात अथवा हॉट टब्समध्ये बसून राहणं टाळा
- खाज येत असल्यास खाजवणं टाळा
व्हजायनल यीस्ट इन्फेक्शनवर घरगुती उपाय (Home Remedies for Vaginal Yeast Infection In Marathi)
यावर डॉक्टरांचं औषध तर असतंच. पण तुम्हाला काही कारणाने शक्य नसेल तर तुम्ही घरच्या घरी यावर उपाय करू शकता. हे अतिशय सोपे आणि कोणतीही हानी न पोहचवणारे उपाय आहेत. जाणून घेऊया काय आहेत उपाय –
नारळाचं तेल (Coconut Oil)
नारळाचं तेल हे खरं तर बऱ्याच गोष्टींंसाठी औषध म्हणून वापरलं जातं. यामध्ये अँटिफंगल गुण आढळतात. यासाठी तुम्हाला वेगळं काही करायची गरज नाही. तुम्ही एक ऑर्गेनिक नारळाच्या तेलाचा वापर करा आणि त्यामध्ये कोणतीही गोष्ट मिक्स न करता व्हजायनल यीस्ट इन्फेक्शच्या ठिकाणी तुम्ही लावा. तुम्हाला आठवड्याभरातच फरक आढळतो. नारळ तेल हा यावरील नैसर्गिक उपचार आहे.
टी ट्री ऑईल क्रिम (Tea Tree Oil Cream)
फंगल, व्हायरस आणि बॅक्टेरियावरील घरगुती उपायांसाठी हा उत्तम उपाय आहे. फंगल इन्फेक्शनवरील घरगुती उपायांमध्ये हा उपाय तुम्ही वापरू शकता. यामध्येदेखील अँटिफंगल गुण आढळतात जे तुम्हाला व्हजायनल यीस्ट इन्फेक्शनपासून दूर ठेवण्यासाठी उपयोगी आहेत. टी ट्री ऑईल हे अतिशय पॉवरफुल आहे. तसंच व्हजायनाचा भाग हा अतिशय संवेदनशील असतो. त्यामुळे तुम्हाला त्यावर कोणतंही तेल लावून चालत नाही. तसंच याचा वापर तुम्ही सतत करू नका. जेव्हा तुम्हाला व्हजायनल यीस्ट इन्फेक्शचा त्रास होत असेल तेव्हाच तुम्ही वापरा.
लसूण (Garlic)
लसूण वाचल्यावर तुम्हाला वाटेल की, याचा नक्की कसा काय उपयोग करायचा? तर जरा थांबा. काही ठिकाणी असं सांगितलं जातं की, लसूण व्हजायनामध्ये काही वेळ ठेवावी. पण त्याने खूप त्रास आणि जळजळ होते. पण त्यापेक्षा तुमच्या खाण्यात तुम्ही लसूण जास्त प्रमाणात खा. त्यानेदेखील तुम्हाला नक्की आराम मिळेल.
बोरीक अॅसिड (Boric Acid)
बोरीक अॅसिड हे अतिशय उपायकारक आणि अप्रतिम अँटिसेप्टिक आहे. पण हे वापरण्याची पद्धत तुम्ही डॉक्टरांकडून समजून घ्या. कारण तुम्हाला त्याचा दुष्परिणामही होऊ शकतो. हे अतिशय पॉवरफुल असल्यामुळे तुम्ही ओरली घेणं धोकादायक आहे. त्यामुळे याचा वापर नक्की कसा करायचा हे विचारूनच तुुम्ही करू शकता.
दही (Plain Yogurt)
दह्यामध्ये बॅक्टेरिया आढळतात. दही तुमच्या व्हजायनामध्ये मायक्रोबायोम वाढवतात आणि यीस्टचं प्रमाण कमी करतात. त्यामुळे याचा नियमित खाण्यामध्ये वापर करावा. हा एक नैसर्गिक उपचार आहे. यामधून तुमच्या शरीरात प्रोबायोटिक्स जातात.
इसेन्शियल ऑईल ऑफ ओरॅगॅनो (Essential Oil of Oregano)
इसेन्शियल ऑईल तुम्ही कधीही ओरली घेणं हे धोकादायक ठरेल. यामध्ये यीस्ट इन्फेक्शनला मात देणारे गु असतात. हा अरोमाथेरपीचा एक भाग आहे. कॅरिअर ऑईलमध्ये याचे 2-3 थेंब मिक्स करा. तुमच्या यीस्ट इन्फेक्शच्या भागात तुम्ही मसाज करा.
अॅपल साईड व्हिनेगर (Apple Cider Vinegar)
अॅपल साईड व्हिनेगरने आंघोळ करणं हा व्हजायनल यीस्ट इन्फेक्शनवरील एक उत्तम उपाय आहे. तुम्ही गरम पाण्यामध्ये साधारण 20 मिनिट्स एक कप अॅपल साईड व्हिनेगर घालता. त्यानंतर तुम्ही आंघोळ करता तर तुम्हाला याचा फायदा नक्कीच मिळतो. तुमच्या व्हजायनामधील चांगले आणि वाईट सर्व बॅक्टेरिया साफ करण्याचं काम अॅपल साईड व्हिनेगर करतं.
हायड्रोजन पॅरोक्साईड (Hydrogen Peroxide)
नाव वाचल्यानंतर आधी भीती वाटते. पण याचा योग्य उपयोग तुम्हाला यीस्ट इन्फेक्शन घालवण्यासाठी करता येतो. यामधील अँटिसेप्टिक तुमच्या व्हजायनाधील यीस्ट इन्फेक्शन घालवण्यास फायदेशीर ठरतं. तुमच्या आंघोळीच्या पाण्यात तुम्ही हे घातल्यानंतर तुम्हाला त्याचा योग्य उपयोग करून घेता येईल.
व्हिटामिन सी (Vitamin C)
व्हिटामिन सी हे इम्युन सिस्टिम बुस्टर आहे. यामुळे तुमच्या त्वचेचं संतुलन व्यवस्थित होण्यास मदत मिळते. यामध्ये अँटिमायक्रोबायल गुण आढळतात जे तुम्हाला यीस्ट इन्फेक्शन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात. तसंच व्हिटामिन सी तुमच्या शरीराची क्षमता वाढवण्याचंही काम करतं.
प्रोबायोटिक सप्लिमेंट्स (Probiotic Supplements)
तुम्हाला व्हजायनल यीस्ट इन्फेक्शन असल्यास, दहा दिवसात तुम्ही यामुळे बरे होऊ शकता. यामुळे तुम्हाला लवकर परिणाम मिळतो. इतर कोणत्याही गोष्टी करत राहण्यापेक्षा तुम्ही याचा वापर करू शकता. तसंच तुम्हाला ऑनलाईन याची खरेदी करता येते.
व्हजायनल यीस्ट इन्फेक्शन उपचार (Vaginal Yeast Infection Treatment)
व्हजायना यीस्ट इन्फेक्शनवर आपण घरगुती उपचार काय करता येईल ते तर जाणून घेतलं. इतरही उपचार तुम्हाला करता येतात. ते म्हणजे डॉक्टरांकडे जाऊन व्यवस्थित टेस्ट करून घेणं. कोणत्याही प्रकारचं त्यावर इतर इन्फेक्शन होऊ न देण्यासाठी हा पर्याय जास्त चांगला आहे. तुम्हाला जाणवत असलेल्या लक्षणांमधून नक्की तुमच्या त्वचेसाठी कोणता उपचार योग्य आहे हे डॉक्टर ठरवून योग्य सांगू शकतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे याकडे तुम्ही दुर्लक्ष करणं योग्य नाही. तुम्हाला जर अशी लक्षणं जाणवत असतील तर तुम्ही वेळेवर त्याकडे लक्ष द्या आणि डॉक्टरांची मदत घ्या अथवा घरगुती उपचार करा. मात्र हे दुखणं तुम्ही अंगावर काढू नका.
प्रश्नोत्तरं (FAQs)
1. व्हजायनल यीस्ट इन्फेक्शन नियमित होतं का?
काही जणांना सतत घाम येत असेल अथवा कपड्यांचा वापर नीट नसेल तर अशा व्यक्तींना व्हजायनल यीस्ट इन्फेक्शन नियमित स्वरूपात होतं. त्यामुळे नेहमी स्वच्छ आणि चांगले कपडे घाला आणि घाम येत असेल तर तो भाग सतत स्वच्छ करून घ्या.
2. यामुळे काही वेगळा त्रास होऊ शकतो का?
सतत जर असा त्रास होत असेल तर त्याचा नक्कीच शरीरावर दुष्परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्ही कधीही याकडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घ्या.
3. यीस्ट इन्फेक्शन होतं म्हणजे नक्की काय होतं?
तुमच्या व्हजायनामधून पांढरा चिकट पदार्थ जास्त प्रमाणात निघत राहातो आणि त्याठिकाणी सतत खाज आणि जळजळ होत राहते. अशावेळी तुम्ही नीट स्वच्छता ठेवा.
फोटो सौजन्य – Shutterstock, Instagram
हेदेखील वाचा –
तुमच्या पार्टनरला माहीत असायला हव्या व्हजायनाबाबतच्या ’11’ गोष्टी
यीस्ट इन्फेक्शनशिवाय ‘या’ ५ कारणांनीही येऊ शकते व्हजायनामध्ये खाज
Vagina च्या बाबतीत या 10 गोष्टी प्रत्येक महिलेला माहिती हव्यातच!