ADVERTISEMENT
home / Hair Removal
*बिकिनी वॅक्ससंदर्भात A To Z माहिती जी प्रत्येक महिलेला माहीत हवी

*बिकिनी वॅक्ससंदर्भात A To Z माहिती जी प्रत्येक महिलेला माहीत हवी

प्रायव्हेट पार्ट / व्हजायना (Vagina)च्या जागेवरील केस अनेकांना काढायची इच्छा असते. पण हे केस नेमके काढायचे कसे असा प्रश्न अनेकांना पडतो.त्याला कारणही आहे म्हणा कारण या संदर्भात आपण फार काही बोलायला पाहात नाही.शिवाय ज्या पद्धती आपल्याला माहीत असतात त्या पद्धती त्या ठिकाणी चालतील का? उदाहरणादाखल सांगायचे झाले तर रेझर आणि हेअर रिमुव्हल क्रिम या दोन पद्धतींचा वापर करणे सगळ्यांना सोयीचे आणि माहितीतले असते. पण वॅक्स हा पर्याय कोणीच अवलंबताना दिसत नाही. कारण तो सगळ्यांनाच दुखवणारा वाटतो. पण तुम्हाला माहीत आहे का? बिकिनी वॅक्स हाच या वरील उत्तम पर्याय आहे…. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला बिकिनी वॅक्ससंदर्भात   A To Z माहिती देणार आहोत. ही अशी माहिती आहे जी सगळ्या महिलांना माहीतच हवी. करुया सुरुवात

बिकिनी वॅक्स म्हणजे काय? (What is Bikini wax?)

bikini waxing 1

सगळ्यात आधी तुम्हाला माहीत हवे ते म्हणजे बिकिनी वॅक्स म्हणजे काय? तर तुमच्या पब्लिक एरियामधील केस हे वॅक्सच्या मदतीने काढणे म्हणजेच बिकिनी वॅक्स. वॅक्सने एका फटक्यात हे केस या ठिकाणावरील केस काढले जातात. बिकिनी वॅक्सिंगमध्ये तुमच्या पँटीच्या बाहेर येणाऱ्या केसांना काढले जाते. हॉट किंवा कोल्ड वॅक्सच्या मदतीने या भागावरील केस काढले जातात.हे करताना तुमच्या व्हजायनाखालील जागा देखील स्वच्छ केली जाते.

तुमची ही ती त्वचा इतर भागांपेक्षा अधिक काळवंडली आहे मग तुम्ही अशी घ्या काळजी

ADVERTISEMENT

*आता तुम्हाला बिकिनी वॅक्स म्हणजे नेमंक काय हे नक्की कळलं असेल.

बिकिनी वॅक्सचे वेगवेगळे प्रकार (Types of bikini waxing)

brazilian wax

ज्या पद्धतीने केस काढण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. अगदी त्याच पद्धतीने बिकिनीवरील केस काढण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. यामध्ये रेझर, हेअर रिमुव्हल क्रिम, एपिलेटर्स, लेझर ट्रिटमेंट आणि वॅक्सिंगचा समावेश होतो. पण या वॅक्सिंगमध्येही 3 प्रकार आहेत.

  • अमेरिकन वॅक्सिंग (American waxing)

बिकिनी वॅक्सिंगमधील पहिला प्रकार आहे तो म्हणजे अमेरिकन वॅक्सिंग.. अशा प्रकारच्या वॅक्सिंगमध्ये तुमच्या व्हजायनावरील ठराविक केस काढले जातात. यामध्ये विशेषत: तुमच्या पँटीबाहेर येणार केल काढले जातात. त्यालाच बिकिनी लाईन वॅक्सिंग (bikini line waxing) असे म्हटले जाते. या वॅक्सिंगच्या प्रकारामुळे तुम्हाला स्विमिंग कॉश्च्युम घालायचे असेल तर असे वॅक्सिंग केल्यानंतर तुम्ही हे कपडे घालू शकता.

ADVERTISEMENT
  • फ्रेंच वॅक्सिंग (French waxing)

बिकिनी वॅक्सिंगमधील दुसरा प्रकार आहे फ्रेंच वॅक्सिंग.. यामध्ये वेगळेपणा सांगायचा झाला तर तुमचे केस व्हर्टिकल पद्धतीने काढले जातात. म्हणजे वॅक्स केल्यानंतर तुमचे फक्त मधले केस राहतात.  अगदी शास्त्रसुद्ध पद्धतीने हे वॅक्सिंग केले जाते. हे वॅक्सिंग अमेरिकन वॅक्सिंगपेक्षा जास्त डीप असते. त्यामुळे अनेकदा बिकिनी मॉडेल्स अशा प्रकारचे वॅक्सिंग करतात. कारण त्यामध्ये व्हजायनाजवळील भाग अधिक स्वच्छ केला जातो.

  • ब्राझिलियन वॅक्सिंग (Brazilian waxing )

सगळ्यात जास्त सध्या चर्चा होत असेल तर अशा प्रकारच्या ब्राझिलियन वॅक्सिंगची. या प्रकारच्या वॅक्सिंगमध्ये तुमची संपूर्ण व्हजायना वरील केस काढले जातात. इतकेच नाही. तर अगदी खाली देखील वॅक्स केले जाते. या वॅक्समध्ये तुमचा व्हजायना आणि  नितंबाची जागा स्वच्छ केली जाते असे म्हणायला हवे.त्यामुळे अशाप्रकारचे वॅक्सिंग केल्यानंतर तेथील जागा अधिक स्वच्छ दिसते. अशा प्रकारचे वॅक्सिंग करायला थोडा जास्त वेळ जातो. साधारण 30 ते 45 मिनिटे या प्रकारासाठी लागतात. सगळ्यात आधी याचा शोध ब्राझीलमध्ये लागला म्हणून याला ब्राझिलियन वॅक्सिंग असे म्हणतात. 1978 सालापासून अशा प्रकारचे वॅक्सिंग केले जाते.

घामाच्या दुर्गंधीमुळे आहात हैराण मग करा हे घरगुती उपाय

भारतात ब्राझिलियन वॅक्सची चलती (Brazilian waxing most demanded in india)

ब्राझिलियन वॅक्स हे अधिक त्रासदायक आहे. फार दुखते, रडू कोसळते असे कितीही म्हटले तरी या वॅक्सिंगच्या प्रकाराबद्दल तरुणींना अधिक आकर्षण आहे. त्यामुळे हल्ली चांगल्या सलोन आणि स्पामध्ये ब्राझिलियन वॅक्स एक्सपर्टच्या मदतीने केले जाते. साधारण 500 रुपयांपासून  वॅक्सिंगचा हा प्रकारा सुरु होतो. ते अगदी 3,000 रुपयांपर्यंत हे वॅक्सिंग केले जाते. सध्या अनेक मोठ्या शहरांमध्ये महिला या प्रकारच्या वॅक्सिंगला महत्व देतात.

ADVERTISEMENT

कसे केले जाते ‘ब्राझिलियन’वॅक्स ( procedure of brazilian wax)

clear vagina

आता वळूया या वॅक्सिंगच्या प्रक्रियेकडे…इतर वॅक्सिंगपेक्षा थोडी वेगळी अशी या वॅक्सिंगची प्रक्रिया आहे.जर तुम्ही पहिल्यांदाच ब्राझिलियन वॅक्स करणार असाल तुम्हालाही वॅक्सिंग करण्याची ही पद्धत माहीत हवी.

तुम्हाला ब्राझिलियन वॅक्स करण्याआधी एक पेपर थाँग (Paper thong) दिले जाते. हे पेपर थाँग तुम्हाला तुमच्या व्हजायनावर ठेवायला सांगितले जाते.

तुमच्या व्हजायच्या आजुबाजूचा परिसर स्वच्छ केला जातो आणि त्यावर टाल्कम पावडर लावली जाते.
अशा प्रकारच्या वॅक्सिंगसाठी वेगळे वॅक्स वापरले जाते. हे वॅक्स रिका वॅक्स असते. पील ऑफ प्रकारात हे वॅक्स वापरले जाते.

ADVERTISEMENT

तुमच्या व्हजायनाच्या केसांना वॅक्स लावण्यासाठी वापरण्यात येणारी स्टिक प्रत्येकवेळी बदलली जाते. तुम्हाला त्रास होणार नाही. अशापद्धतीने वॅक्स स्ट्रिप किंवा पील ऑफ वॅक्स ओढले जाते.

वॅक्स केल्यानंतर तुम्हाला त्रास होऊ नये यासाठी विशेष क्रिम देखील लावले जाते.

हे माहीत असण्याची आवश्यकता (You should know this also)

आता तुम्ही वॅक्स करताय म्हटल्यावर यात काहीतरी गोष्टी या नक्कीच आल्या जे तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे.

व्हजायना हा तुमच्या शरीरावरील अत्यंत खासगी भाग आहे. पण वॅक्स करताना तुम्हाला न लाजता तो एक्सपर्टसमोर दाखवणे गरजेचे असते.

ADVERTISEMENT

तुम्ही कुठे अशा प्रकारचे वॅक्स करणार आहात याचा देखील जाणीवपूर्वक विचार करा. तुम्ही वॅक्स करत असलेली जागा सेफ आहे का ते देखील पाहा.

तुमची त्वचा जर नाजूक असेल तर त्याची माहिती आधीच तुम्ही तुमच्या ब्युटी एक्सपर्टला द्या.

तुमच्या ब्युटीएक्सपर्टला अशा प्रकारचे वॅक्सिंग करण्याचा अनुभव आहे का हे विचारायला विसरु नका.

वॅक्सिंग करण्यासाठी आणखी महत्वाची गोश्ट आहे ती म्हणजे वॅक्स करताना तुमचे केस जास्त वाढलेले नको. अगदी तांदळाच्या दाण्याइतकीच तेथील केसांची वाढ वॅक्सिंग करताना अपेक्षित असते. त्यामुळे याची काळजी घ्या.

ADVERTISEMENT

पहिल्यांदा ब्राझिलियन वॅक्स केल्यावर काय वाटेल?

tight cloths

  • जर तुम्हाला येथील केस काढण्याची अजिबात सवय नसेल तर तुम्हाला अशाप्रकारचे वॅक्सिंग केल्यानंतर थोडे वेगळे वाटू शकते. म्हणे तुम्हाला अगदीच हलके वाटेल.
  • तुम्हाला त्या ठिकाणी थोडे दुखल्यासारखे वाटेल. पण वॅक्स करताना ते फार असह्य होत असेल तर तुम्ही ते वॅक्सिंग तेथेच थांबवा.
  • वॅक्सिंग पहिल्यांदाच करत असाल तर केसांची ग्रोथ कदाचित मागे-पुढे होऊ शकते. त्यामुळे त्या ठिकाणी पुळ्या किंवा रॅशेश येऊ शकतात.
  • जर तुम्हाला हा त्रास झाला तर तुम्ही तुमच्या ब्युटी एक्सपर्टकडून चांगले क्रिम किंवा सल्ला घेऊ शकता.
  • बिकिनी वॅक्स केल्यानंतर कधीच टाईट कपडे घालू नका. तुमची छिद्र मोकळी वॅक्सिंगमुळे मोकळी होतात. त्यांना थोडावेळ मोकळे राहणे गरजेचे असते. त्यामुळे तुम्ही शक्यतो स्कर्ट किंवा तत्सम मोकळे, सैल कपडे घाला.

 वॅक्सिंगनंतर कशी घ्याल काळजी (Post waxing care)

आता तुम्ही वॅक्स केल्यानंतर तुम्हाला काळजीसुद्धा घ्यायला हवी नाही का? त्यासाठीच काही सोप्या टीप्स आहेत.

वॅक्स केल्यानंतर तुम्हाला जर त्या ठिकाणी जळजळ वाटत असेल तर तुम्ही बाजारात मिळणारे इंटिमेट क्रिम लावू शकता.
या दिवसामध्ये तुम्ही वाईल्ड सेक्स, हॉट योगा आणि खूप घाम आणणारा वर्कआऊट करु नका.

जर त्या जागेवर तुम्हाला पुळ्या आल्या असतील. किंवा काही केसांच्या ग्रोथमुळे तुम्हाला त्रास होत असेल तर तुम्ही त्या ठिकाणी एखादे माईल्ड स्क्रब वापरु शकता.

ADVERTISEMENT

वॅक्स केल्यानंतर काही दिवस तरी घट्ट किंवा त्रास देणारे कपडे घालू नका.

व्हजायनाची जागा स्वच्छ करायला विसरु नका.

तुम्ही अजूनही वापरत नाही का पँटी लायनर मग तुम्ही हे वाचाच

 कधी करावे ब्राझिलियन वॅक्स? (Right time to do brazilian wax)

एकदा ब्राझिलियन वॅक्स केल्यानंतर तुम्ही साधारण दोन ते तीन आठवड्यांनी वॅक्स करा. लक्षात ठेवा तुम्हाला तुमच्या केसांची तांदळा एवढीच ग्रोथ वाढू द्यायची आहे.

ADVERTISEMENT

साधारण 4 आठवड्यांनी तुमच्या केसाची ग्रोथ वाढते त्यामुळे तुम्ही बरोबर 4 आठवड्यांनी वॅक्सिंगची appointment  घ्या.

वॅक्सिंग करताना दिला जातो शेप (Differnt shape given during waxing)

vaginal cleaning

आता तुम्हाला ही गोष्ट माहीत आहे का?  अशाप्रकारचे शेप व्हजायना वॅक्सिंग करताना  दिले जातात. त्रिकोण,हार्ट शेप असे काही आकार दिले जातात. त्यामुळे तुम्ही तुमच्या एक्सपर्टला देखील अशा प्रकारचे शेप देण्यासाठी सांगू शकता.

 FAQ

  • अशा प्रकारचे वॅक्सिंग सुरक्षित आहे का?

तसे पाहायला गेले तर तेथील केस काढण्याची कोणतीच पद्धत सुरक्षित आहे असे सांगू शकत नाही. पण तुम्ही जर एक्सपर्टचा सल्ला घेऊन ते वॅक्सिंग केले तर तुम्हाला त्याचा त्रास कमी होईल.

ADVERTISEMENT
  • केस वाढले असेल तर नक्की काय करायला हवे?

आता आम्ही वर म्हटल्याप्रमाणे तुम्हाला तुमचे केस जास्त वाढवायचे नाहीत. कारण केस जास्त वाढले तर वॅक्स करताना जास्त दुखापत होऊ शकते. जर तुमचे केस वाढले असतील तर तुम्ही आधी कात्रीने ट्रिम करा ते करताना तुम्ही अधिक काळजी घ्या.

  •  त्वचा नाजूक असेल तर काय करावे?

जर तुमची त्वचा नाजूक असेल तर तुम्ही ब्राझिलियन प्रकारातील वॅक्सिंग लगेच करु नका. त्या आधी तुम्ही केवळ बिकिनी लाईन वॅक्स करा. म्हणजे तुम्हाला ते किती दुखते ते कळेल. त्यानंतर तुम्ही तुमची व्हजायना क्लिअर करु शकता.

  • कोणत्या वयोगटातील महिलांनी वॅक्स करायला हवे? 

जर तुम्ही 18 वर्षांच्या वर असाल तर तुम्ही या पद्धतीचे वॅक्सिंग करु शकता. पिरेड्समध्ये ही तुम्ही वॅक्सिंग केले तर चालू शकते. फक्त गरोदर महिलांनी वॅक्सिंग करताना डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

(सौजन्य- shutterstock)

ADVERTISEMENT

 

 

03 May 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT