ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
अमिताभ बच्चन यांचा चेहरे’ चित्रपटातील लुक व्हायरल

अमिताभ बच्चन यांचा चेहरे’ चित्रपटातील लुक व्हायरल

अमिताभ बच्चन यांनी वयाची 60 जरी पार केली असली ते आजही अभिनयाच्या बाबतीत नवे प्रयोग करतात. सध्या ते ‘चेहरे’ नावाच्या एका चित्रपटाच्या शुटींगमध्ये व्यग्र आहेत. या चित्रपटाच्या सेटवरील त्यांचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये अमिताभ बच्चन यांच्या चेहऱ्यावर पांढरीशुभ्र दाढी दिसत असून त्यांनी डोक्यावर अॅपल कॅप घातली आहे आणि त्यांच्या डोळ्यावर चष्मा दिसत आहे.

छपाकच्या सेटवर दीपिकाच्या भावनांचा सुटला बांध

कोणत्या चित्रपटाची करत आहेत तयारी?

chehre cast %281%29

सध्या अमिताभ बच्चन एकाच वेळी अनेक चित्रपटांच्या शुटींगमध्ये व्यग्र आहे. पण आता हा फोटो व्हायरल होत आहे या चित्रपटाचे नाव ‘चेहरे’ आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबत इम्रान हाश्मी आणि किर्ती खारबंदा या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटातील अमिताभ बच्चन यांचा लुक आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या चित्रपटाचे शुटींग नुकतेच सुरु झाले असून अमिताभ बच्चन सेटवर आल्यानंतरचा हा फोटो आहे. त्यांच्या या नव्या लुकमध्येही ते हँडसम दिसत आहेत अशीच प्रतिक्रिया अनेक जण देत आाहेत.

ADVERTISEMENT

BigBoss 13 मध्ये असणार हे सेलिब्रिटी स्पर्धक

गेल्याच आठवड्यात केली होती चित्रपटाची घोषणा

chehre cast

सोशल मीडियावर अमिताभ बच्चन नेहमीच अॅक्टिव्ह असतात. ते त्यांच्या फॅन्सना कायमच अपडेट ठेवत असतात. गेल्याच आठवड्यात त्यांनी त्यांच्या या चित्रपटाची घोषणा केली होती. हा चित्रपट कसा असणार या बाबत अजून काही माहिती नाही. पण हा चित्रपटही खास असणार एवढे मात्र नक्की!

आणखीही चित्रपटाच्या तयारीत आहेत व्यग्र

 

ADVERTISEMENT

अमिताभ यांच्याकडे हा एकच चित्रपट नाही. तर ते अन्य काही बीग बजेट चित्रपटातही काम करत आहेत. धर्मा प्रोडक्शनचा ‘ब्रम्हास्त्र’ या चित्रपटातही त्यांची प्रमुख भूमिका आहे. त्यांच्या आवाजातील एक टीझर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित करण्यात आला तो त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. या चित्रपटात रणबीर कपूर, आलिया भट यांच्यासोबत डिंपल कपाडिया, नागार्जुन अक्किनी आणि मौनी रॉय यांच्यादेखील महत्वपूर्ण भूमिका आहेत. 2020मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे

बॉलिवूडमधील ही नवी जोडी तुम्हाला माहीत आहे का?

फॅन्सशी नेहमीच शेअर करतात आनंद

fan amitabh

बीग बी अमिताभ बच्चन यांचा या क्षेत्रातील वावर इतका आहे की त्यांचे देशभरातच नाही तर जगभरात चाहते आहे. ते त्यांच्या अभिनयातून आणि सामाजिक कार्यातून लोकांच्या मनात नेहमीच राहतात. ज्या फॅन्समुळे आपण घडलो त्या फॅन्सना ते कधीच विसरत नाही.ते त्यांच्या बंगल्याबाहेर येऊन अनेकदा त्यांच्या फॅन्सना भेटतात. त्यामुळे एक चांगली व्यक्ती म्हणून त्यांना अधिक ओळखले जाते.

ADVERTISEMENT

 आजारपणातही केले काम

अमिताभ बच्चन यांनी कामाला नेहमीच महत्त्व दिले आहे. त्यांनी सुरुवातीच्या काळात केलेला स्ट्रगल ते या स्थानापर्यंत पोहोचताना त्यांना अनेक गोष्टींचा सामना करावा लागला.त्यामुळे त्यांनी कामाला नेहमीच महत्त्व दिले आहे. काही दिवसांपूर्वी त्यांची तब्येत खालावली होती. पण तरीही त्यांनी कामाला अग्र स्थानी ठेवून आराम न करता ‘चेहरे’ या चित्रपटाचे स्क्रिप्ट रिडिंग पूर्ण केले.

(सौजन्य- Instagram)

30 May 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT