बॉलीवूड चित्रपट आणि टीव्ही सीरीयल्समध्ये खोट्या अश्रूसाठी ग्लिसरीनचा वापर केला जातो, हे तुम्हाला माहीत असेलच. पण जेव्हा ग्लिसरीनच्या ब्युटी बेनिफीट्सबद्दल तुम्ही जाणून घ्याल, तेव्हा नक्कीच आश्चर्यचकित व्हाल. ग्लिसरीन हे दिसायला पांढरं आणि घट्ट असतं. तुमच्या त्वचेवर ग्लिसरीन अगदी औषधांसारखं काम करतं. चेहऱ्यावरील सुरकुत्या, कोरडे चट्टे, वाढत्या वयाच्या खुणा, त्वचेचं इन्फेक्शन आणि कोणत्याही प्रकारची त्वचेसंबंधीची तक्रार असो ग्लिसरीनला पर्याय नाही. ग्लिसरीनमधील अनेक उत्तम गुणांमुळे याचा वापर साधारण प्रत्येक ब्युटी प्रोडक्टमध्ये केला जातो. ग्लिसरीन हे प्रत्येक प्रकारच्या त्वचेसाठी अनुकूल आहे. खासकरून ज्यांची त्वचा कोरडी आहे त्यांच्यासाठी.
चेहऱ्यावर कसं वापरावं ग्लिसरीन
ग्लिसरीनचा वापर करताना या गोष्टी लक्षात ठेवा
ग्लिसरीन (किंवा ग्लिसरॉल) हे एक संयंत्र-आधारित लिक्वीड आहे, ज्याचा शोध एका स्वीडीश रसायन तज्ञाने 1779 मध्ये योगायोगाने एका दुसऱ्या चाचणीच्या दरम्यान लावला. जेव्हा हा तज्ञ ऑलिव्ह ऑईल गरम करत होता. तेव्हा ग्लिसरीनचा शोध लागला. भौतिकरित्या ग्लिसरीन हा चवीला गोड आणि पारदर्शक पातळ पदार्थ आहे. हे पाणी आणि मद्य या दोन्हींमध्ये विरघळू शकते. याचा उपयोग कॉस्मेटीकमध्ये त्वचेसंबंधातील उपाचारासाठी केला जातो. खरंतर शुद्ध ग्लिसरीन हे त्वचेच्या खोलवर जाऊन आर्द्रता शोषून ती डीहायड्रेट करतं आणि वातावरणातील आर्द्रता स्कीनच्या आत शोषून घेतं.
तसं तर गुलाबपाणी आणि ग्लिसरीन दोन्ही त्वचेसाठी फारच फायदेशीर आहे. पण दोन्ही जर एकत्र करून वापरल्यास जास्त फायदेशीर ठरतं. हे मिश्रण त्वचेला लावल्याने त्वचेचा कोरडेपणा, डेड स्कीन, एजिंग, पिंपल्स आणि इतर समस्या दूर होतात. हे मिश्रण ना फक्त त्वचेला कोमल आणि डागविरहीत बनवतं तर त्वचेला हायड्रेटही करत. याच कारणामुळे लोक ग्लिसरीन आणि गुलाबपाण्याचा वापर दोन्ही घटकांचं मिश्रण करून करतात. खासकरून हिवाळ्याच्या दिवसात ग्लिसरीन आणि गुलाबपाणी तुमच्या त्वचेवर कमाल करून दाखवतं.
ग्लिसरीन हवं असल्यास तुम्ही सरळ ते चेहऱ्यावर लावू शकता किंवा फेस पॅक / फेस मास्कमध्ये मिक्स करून त्याचा वापर करू शकता. एक्सपर्टनुसार ग्लिसरीन हे शुद्ध रूपात वापरण्याऐवजी इतर घटकांसोबत मिक्स करून केल्यास त्याचा वापर जास्त फायदेशीर ठरतो.
क्लीजिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायजिंग स्किनकेअर हे तीन मुख्य नियम आहेत. चेहऱ्याला क्लींज केल्याशिवाय त्यावर कोणतंही क्रिम किंवा मॉइश्चरायजर लावू नये. हे तुम्हाला माहीत असेलच. पण तुम्हाला हे माहीत आहे का की, ग्लिसरीन तुम्ही या तिन्ही रूपात वापरू शकता. चला जाणून घेऊया कसं -
जर तुम्ही रोज त्वचेला क्लींज केलं नाहीतर त्वचेवर धूळीचे थर चढतात. ज्यामुळे तुम्हाला पुढे जाऊन कोणतंही स्कीन इन्फेक्सन होण्याची शक्यता असते. यासाठी आवश्यक नाही की, तुम्ही बाजारात मिळणाऱ्या क्लींजरचाच वापर करावा. तुम्ही नैसर्गिक घटकांपासून बनवलेल्या क्लींजरचा वापरही करू शकता. जे तुमच्या त्वचेला निरोग ठेवण्याचा उत्तम पर्याय आहे. ग्लिसरीनपासून बनवलेलं क्लींजर तुम्ही मेकअप, त्वचेवरील घाण, प्रदूषण आणि इतर अशुद्धी दूर करण्यासाठी तुम्ही वापरू शकता. ज्यामुळे तुमची त्वचा स्वच्छ राहील. हे तुमच्या त्वचेवरील छिद्र बंद करण्यातही मदत करत.
असा करा वापर - क्लींजिंग पेस्ट बनवण्यासाठी एक अर्धा चमचा मध, एक चमचा ग्लिसरीन आणि अर्धा चमचा केस्टाईल साबण मिक्स करून घ्या. आता ही क्लींजिंग पेस्ट एखाद्या डब्यात ठेवून द्या. मग सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही वेळी ही क्लींजिंग पेस्ट चेहऱ्यावर लावून स्वच्छ करून घ्या.
जर तुम्हाला डागविरहीत त्वचा हवी असल्यास तुम्ही ग्लिसरीनला नैसर्गिक टोनरच्या रूपातही वापरू शकता. खरंतर, ग्लिसरीन हे त्वचेच्या पीएच स्तराला संतुलित करण्यात मदत करतं. यामुळे तुमच्या त्वचेला पोषणासोबतच डागविरहीत राहण्यासही हे फायदेशीर ठरतं.
असा करा वापर - चेहरा चांगला स्वच्छ करून घ्या आणि मग त्यावर ग्लिसरीन आणि गुलाबपाणी यांचं मिश्रण करून चेहऱ्यावर लावा. जर तुमची त्वचा तेलकट असेल तर दिवसातून 2 वेळा ग्लिसरीनला तुम्ही टोनरच्या रूपात वापरू शकता.
जर तुम्हाला तुमची त्वचा नैसर्गिकरित्या ग्लो करावी असं वाटत असेल तर रोज ग्लिसरीनचा वापर करा. हो, ग्लिसरीनपेक्षा उत्तम मॉईश्चरायजर असू शकत नाही. हे त्वचेवरील कोरडेपणा आणि डाग कमी करतं व त्वचेला डागविरहीत आणि चमकदार बनवतं. जेव्हा तुम्ही ग्लिसरीनचा वापर गुलाबपाण्यासोबत करता तेव्हा याचा दुहेरी फायदा होतो. ज्यामुळे तुमच्या त्वचेवर नैसर्गिक ग्लो येतो आणि त्वचा मुलायम राहते.
असा करा वापर - जेव्हा तुम्हाला वाटेल की तुमची त्वचा शुष्क आणि निर्जीव दिसत आहेत तेव्हा तुम्ही कापसाच्या बोळ्यावर ग्लिसरीन घेऊन चेहऱ्यावर लावा. काही सेंकदातच तुमची त्वचा ग्लो करू लागेल.
या प्रश्नाचं उत्तर हो असं आहे. आता तुम्ही म्हणाल की ग्लिसरीन तर कोरडी त्वचा असणाऱ्यांसाठी योग्य आहे. तर मग तेलकट त्वचा असणारे कसे वापरू शकतात ? तुमच्या माहितीसाठी ग्लिसरीन हे सर्वात जास्त तेलकट त्वचेवर परिणामी ठरतं. कारण या प्रकारच्या त्वचेला काळजीची खूपच गरज असते. अशा त्वचेवर जास्त काळ मेकअप टीकत नाही. तसंच तेलकट त्वचेवर पिंपल्सही खूप असतात. ज्यामुळे चेहरा वाईट दिसतो. ग्लिसरीन आणि गुलाबपाण्याच्या वापराने तुम्हाला तेलकट त्वचेपासून मुक्ती मिळेल. हे मिश्रण करून चेहऱ्यावर मसाज करा. चेहऱ्यावरील एक्स्ट्राचं तेल आरामात निघून जाईल आणि चेहऱ्यावर मस्त ग्लो येईल.
जर तुम्ही रोज ग्लिसरीन आणि गुलाबपाण्याचा वापर केल्यास तुम्हाला एक नाही अनेक फायदे होतील. त्वचेला मुलायम आणि चमकदार बनवण्याशिवायही ग्लिसरीनचे अनेक फायदे आहेत. चला जाणून घेऊया त्याबाबत -
ग्लिसरीनसोबत तुम्ही गुलाबजलचं मिश्रण केल्यास ते तुमच्या त्वचेला आर्द्रतेसोबतच उजळपणाही देतं. थंडीच्या दिवसात तुम्ही रूक्ष त्वचेमुळे त्रासला असाल तर ग्लिसरीन आणि गुलाबपाणी मिक्स करून झोपताना तुमच्या त्वचेवर लावा. काही दिवसातच तुमच्या त्वचेचा टोन उजळलेला दिसू लागेल.
जर तुमच्या चेहऱ्यावर ब्लॅक हेड्स असतील तर ग्लिसरीन, मुलतानी माती, बदामची पावडर मिक्स करून त्याचा फेस पॅक बनवून घ्या आणि जवळपास 30 मिनिटांपर्यंत तुमच्या चेहऱ्यावर लावून ठेवा. जेव्हा सुकेल तेव्हा हलक्या हाताने स्क्रब करा आणि कोमट पाण्याने धूवून टाका.
ग्लिसरीनची सर्वात वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे हे त्वचेवरील डाग आणि पिंपल्स कमी करत. जर तुम्ही याचा वापर रोज केलात तर तुमच्यावर चेहऱ्यावर एकही डाग दिसून येणार नाही. जर तुम्हाला असा काही त्रास असेल तर लिंबाच सालावर ग्लिसरीन लावून ते चेहऱ्यावरील डागांवर चोळा. डाग हळूहळू कमी होतील.
जर तुम्ही रोज ग्लिसरीन आणि गुलाबपाण्याचा वापर केलात तर तुम्हाला कधीच कोणत्याही अँटी एजिंग प्रोडक्ट्सची गरज भासणार नाही. ग्लिसरीनमध्ये असलेल्या अँटी एजिंग गुणामुळे त्वचेचं पोषण होतं. यामुळे तुमची त्वचा बऱ्याच काळासाठी तारुण्यमय राहते.
ग्लिसरीनमध्ये असलेल्या अँटी फंगल गुणांमुळे तुम्हाला केसांतील कोंड्यापासून तुम्हाला सुटका मिळण्यात मदत होते. यासाठी ग्लिसरीनमध्ये काही थेंब नारळ किंवा सरसो तेल मिक्स करा. केसांना लावा आणि दोन तासाने धूवून टाका. तुम्हाला दोन आठवड्यातच फरक जाणवेल.
स्प्लीट एंड्सची समस्या तशी तर गंभीर नाही. पण जास्तकरून ज्या महिलांचे केस लांब असतात त्यांना स्प्लीट एंड्सची समस्या असते. यापासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही पपई कुस्करून त्यात थोडं दही आणि दोन थेंब ग्लिसरीन घाला. ही पेस्ट 30 मिनिटं केसांना लावून ठेवा. हा पॅक तुमच्या केसांना देईल चमक आणि स्प्लीट एंड्सपासून सुटकाही होईल.
- जर तुमचे ओठ फुटल्यास किंवा ओठ काळे झाले असल्यास ग्लिसरीन ओठांवर लावा. हे ओठांवरील कोशिकांना उत्तेजित करते आणि त्यांना पुन्हा जीवनदान देते.
- मानेचा काळसरपणा दूर करायचा असल्यास बेसनात हळद, लिंबाचा रस, गुलाबपाणी आणि ग्लिसरीनचं मिश्रण बनवून घ्या आणि ब्रशच्या मदतीने मानेला वरून खाली अशा स्ट्रोक्सने लावा. सुकल्यावर पाण्याने धुवून टाका.
- कोपराच्या काळ्या पडलेल्या भागाला लिंबाच्या सालीवर ग्लिसरीन लावून चोळा. यामुळे तुमच्या हाताच्या कोपरांचा काळेपणा दूर होईल.
- नख चमकदार आणि मजबूत बनवण्यासाठी कोमट पाण्यात लिंबाचा रस आणि ग्लिसरीनचे काही थेंब मिक्स करा आणि नख त्या पाण्यात बूडवून ठेवा. यामुळे तुमची नखं एकदम चमकरदार आणि सुंदर दिसू लागतील.
- पायाच्या फुटलेल्या टाचांपासून सुटका करण्यासाठी एक चमचा ग्लिसरीन, एक चमचा लिंबाचा रस आणि हवं असल्यास एक चमचा गुलाबपाणी असं मिश्रण करून घ्या आणि टाचांना लावून सुकू द्या. मग थोड्यावेळाने मोजे घालून रात्रभर असंच राहू द्या. सकाळी टाचा कोमट पाण्याने धुवून घ्या. काही दिवसांतच तुम्हाला फरक जाणवेल आणि टाचाही मऊ दिसू लागतील.
- शेव्हींग करताना जर स्कीन कापली गेली किंवा त्वचेवर काही जखम झाल्यास त्यावर ग्लिसरीन लावा म्हणजे जळजळ होणार नाही.
- ग्लिसरीनचा वापर तुम्ही तुमचे केस चमकदार आणि नीट ठेवण्यासाठी करू शकता.
- डायपर घालणाऱ्या मुलांना स्कीन रॅशेसचा त्रास होतो. अशावेळी या रॅशेसवर ग्लिसरीन लावल्यास त्यांना आराम मिळेल.
ग्लिसरीन हे खूपच चिकट असतं. त्यामुळे कोणत्याही दुसऱ्या चिकट लोशन किंवा क्रीमसोबत हे लावू नका. ग्लिसरीन लावण्याआधी पॅच टेस्ट नक्की करा.
त्वचेवर जास्त वेळ ग्लिसरीन लावून ठेऊ नका कारण ग्लिसरीन चिकट असल्यामुळे त्वचेवर अजून धूळ जमा होऊ शकते.
जर तुमची त्वचा कोरडी असेल तर याचा वापर उन्हाळ्याच्या दिवसात करा.
ग्लिसरीनचा वापर करण्याआधी ते नेहमी थोडं पातळ करून घ्या. जसं ग्लिसरीन पातळ करण्यासाठी तुम्ही त्यात गुलाबपाणी मिक्स करू शकता.
ग्लिसरीनचा वापर हा आत्ता नाहीतर अगदी जुन्या काळापासून केला जात आहे. ग्लिसरीनच्या वापराने जास्त करून नुकसान होत नाही. पण ब्युटी एक्सपर्टनुसार जर ग्लिसरीनचा वापर योग्य पद्धतीने केला नाहीतर तुमच्या चेहऱ्यावर लाली, जळजळ, खाज येऊ शकते. याशिवाय ग्लिसरीनवर हवामानाचा परिणामही बरेचदा होतो. उन्हाळ्याच्या तुलनेत थंडी किंवा कमी तापमानात याचा वापर केल्यास चांगलं असतं.