कानात विनाकारण बोट घालून अनेकांना कानातील मळ घालण्याची सवय अनेकांना असते.कानात मळ असणे हा अगदी सगळ्यांना होणारा त्रास आहे. पण त्यासाठी अनेक जण असा अघोरी उपाय करतात की, कानाचे पडदे फाटतील अशी भीती वाटू लागते. तुमच्यापैकी कित्येकांना कानात सेफ्टीपीन,हेअरपीन किंवा मिळेल ते अणुकुचीदार कानात घालून मळ काढता? तर तुम्ही हे करणे आताच थांबवा कारण ते तुमच्या कानांच्या आरोग्यासाठी हानीकारक आहे.
तुम्हाला काही सोप्या पद्धतीने कानातील मळ काढता येऊ शकतो. त्यासाठी तुम्हाला कदाचित थोडावेळ लागेल. पण कानदुखीसाठी हे उपचार तुमच्या कानाच्या आरोग्यासाठी हानिकारक नाहीत.मग करायची सुरुवात
कोमल मुलायम पायांसाठी अशी घ्या पायाची काळजी
-
बेबी ऑईल, ऑलिव्ह ऑईल (Baby oil, olive oil)
कानांमध्ये मळ झाला असेल आणि तो नैसर्गिकरित्या तुम्हाला बाहेर काढायचा असेल तर तुम्ही तो काढण्यासाठी कानात बेबी ऑईल किंवा ऑलिव्ह ऑईलचे काही थेंब घालू शकता. तुमच्या कानात जर मळ सुकला असेल तर तो तुम्हाला अगदी सहजपणे तुमच्या कानातून तेलामुळे बाहेर येतो.
-
कांद्याचा रस (Onion water)
कांद्याचा रस हा देखील तुमच्या कानातील मळ काढू शकतो. कांदा चिरुन तो वाफेवर शिजवून घ्यावा. त्याची पेस्ट तयार करुन त्यातील पाणी काढून घ्यावे.कापसाने कांद्याचे पाणी कानात घालावे. त्यामुळे तुमच्या कानातील मळ निघण्यास मदत होईल.
कांद्याचे पाणी कानात फार वेळही ठेवू नका. जर तुम्हाला कानात पाणी गेल्यामुळे त्रास होत असेल तर अजिबात करु नका.
-
हायड्रोजन पेरॉक्साईड (Hydrogen peroxide)
आता तुम्हाला वाटेव हायड्रोजन पेरॉक्साईडचा वापर यासाठी कसा करता येईल. पण ज्याप्रकारे तुमच्या नखातील घाण काढण्यासाठी हायड्रोजन पेरॉक्साईडचा वापर केला जातो. अगदी त्याच प्रकारे तुम्ही याचा वापर करु शकता. पण तुम्हाला अगदी कमी प्रमाणात हायड्रोजन पेरॉक्साईड आणि जास्त पाणी घेऊन कानात टाकायचे आहे. तुम्हाला तुमच्या कानातून मळ बाहेर आलेला दिसेल.
चेहऱ्यावर ग्लो आणायला या आर्युवेदीक टीप्स करतील मदत
-
इअर ड्रॉप (Ear drop)
हल्ली बाजारात कानातील मळ विरघळवणारे इअर ड्रॉपदेखील मिळतात.जर तुम्हाला तसे इअर ड्रॉप उपलब्ध असतील तर तुम्ही कानातील मळ काढण्यासाठी त्याचा वापर अगदी हमखास करु शकता.
कान साफ करताना
अनेक जण सोयीस्कर म्हणून इयर बड्स वापर करतात. पण ते करत असताना तुम्ही ते कानात खोलवर घालत नाही याची काळजी घ्या. तुम्ही कानाच्या आत घातल्यामुळे तुमच्या कानाच्या पडद्याला दुखापत होण्याची शक्यता जास्त असते.
वरील कोणत्याही उपायांचा अवलंब करताना फार फार तर महिन्यातून एकदा करा.काहींना कान सतत स्वच्छ करण्याची सवय असते तसे करु नका. त्यामुळे तुमच्या कानात आवश्यक असणारे वंगण कमी होऊन तुमचा कान कोरडा पडेल. जे चांगले नाही.
कानात पीन किंवा कोणती अणुकुचीदार वस्तू घालू नका. त्यामुळे तुमच्या कानाला अधिक नुकसान होऊ शकते.
जर तुमचा कान खूप दुखत असेल तर आधी डॉक्टरांचा सल्ला घ्या. पण तुमचा कान जर कानातील अतिरिक्त मळामुळे दुखत असेल तर तो काढण्यासाठीही घरगुती गोष्टींचा अवलंब करा पण जपून
चेहऱ्यावरील पिंपल्स गेले पण डागांचे काय?अशी घ्या काळजी
कानात मळ असणेही अगदी स्वाभाविक गोष्ट आहे. पण तुमच्या कानात खूपच जास्त मळ सतत होत असेल अशावेळी मात्र डॉक्टरांचा सल्ला घ्या