ADVERTISEMENT
home / Fitness
वजन कमी करण्यासाठी जमिनीवर बसून जेवणे ठरेल फायदेशीर

वजन कमी करण्यासाठी जमिनीवर बसून जेवणे ठरेल फायदेशीर

भारतीय संस्कृतीत जमिनीवर मांडी घालून बसून जेवण करण्याची पद्धत आहे. पूर्वीच्या काळी  पंगतीत बसून जेवण केले जात असे. वास्तविक मांडी घालून खाली बसण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे असतात. मात्र आजकाल बदलेली जीवनशैली आणि कामाचा वेग यामुळे अनेक लोक डायनिंग टेबलवर नास्ता आणि जेवण करतात. प्रेस्टिज इश्यूमुळेदेखील अनेकांना जमिनीवर बसून जेवण करण्यास संकोच वाटतो. मात्र पूर्वीपासून चालत आलेल्या या पद्धतीमध्ये अनेक आरोग्यदायी फायदे दडलेले आहेत.  घाईघाईत आणि खुर्चीवर बसून जेवण्याची सवय लागल्यामुळे आज अनेक आरोग्यसमस्या माणसाच्या पाठी लागल्या आहेत. या समस्यांना दूर करण्यासाठी कमीतकमी एकवेळचं जेवण तरी आणि शांतपणे जमिनीवर बसून करण्यास काहीच हरकत नाही.

sitting on the floor and eating

पचनक्रिया सुधारते

जेव्हा आपण जमिनीवर मांडी घालून जेवतो तेव्हा खाल्लेल्या अन्नाचे पचन चांगले होते. कारण जमिनीवर मांडी घातल्यामुळे पचनक्रिया सुधारते. या पद्धतीमुळे तुमचे सहज योगासन घडते ज्यामुळे तुमच्या आतड्यांवर चांगला ताण येतो. जमिनीवर वाकणे, बसणे आणि पुन्हा उठणे या प्रकारात शारीरिक हालचाल झाल्यामुळे अपचन होत नाही. त्यामुळे जर तुम्हाला वारंवार अपचन, बद्धकोष्ठता अथवा मुळव्याध अशा समस्या असतील तर जमिनीवर बसून जेवणाचा तुम्हाला नक्कीच चांगला फायदा होऊ शकतो.

Also Read About संत्रा फळाची पूड कशी करावी

पाठदुखी कमी होते

जमिनीवर बसण्याच्या सवयीमुळे तुम्हाला पाठीचा त्रास होत नाही. कारण जेवणासाठी जमिनीवर बसताना तुमच्या पाठीचा कठा ताण राहतो. पाठीच्या कण्यावर यामुळे चांगला ताण येतो. जर तुम्हाला सतत पाठदुखी जाणवत असेल तर त्यामुळे खुर्चीवर बसण्याची सवय करण्यापेक्षा पुन्हा जमिनीवर बसण्याची सवय करा. कारण यामुळे तुमच्या शरीराला योग्य व्यायाम मिळेल आणि तुमची पाठदुखी कमी होऊ लागेल.

ADVERTISEMENT

रक्तदाब सुधारतो

जमिनीवर वाकून खाली बसताना तुमचा श्वास मंद होतो आणि पुन्हा जमिनीवरून उठताना  श्वासाचा वेग वाढतो. या प्रक्रियेमध्ये तुमच्या रक्तदाबावर चांगले नियंत्रण राहते आणि रक्तप्रवाह सुधारतो. म्हणूनच जर तुम्हाला सतत अती रक्तदाब अथवा कमी रक्तदाबाचा त्रास होत असेल तर जमिनीवर बसून जेवण्याची सवय लावा.

वजन आणि पोट कमी होते

health benefits of sitting on floor

जमिनीवर खाली बसून जेवताना आपल्या खाण्याचा वेग कमी असतो. भरभर खाण्यामुळे अती कॅलरीज घेतल्या जातात. मात्र खाली बसल्यामुळे आपण भुक भागेल एवढंच जेवतो. शरीरात कमी कॅलरीज गेल्यामुळे आणि उठबस केल्यामुळे योग्य व्यायाम झाल्यामुळे तुमचे वजन नियंत्रणात राहते. शिवाय खाली बसण्याच्या सवयीमुळे पोटावर योग्य दाब पडतो आणि  बेली फॅटदेखील कमी होते.

सांधेदुखी होत नाही

आजकाल बदलेल्या जीवनशैलीमुळे अनेकांना सांधेदुखीचा त्रास होत असतो. तुम्हाला देखील कंबर अथवा गुडघेदुखीचा त्रास होत असेल तर यासाठी वर बसून जेवणाची सवय लावून घेऊ नका. त्याऐवजी खाली बसून जेवण्याचा प्रयत्न करा. कारण या प्रकियेत तुमच्या सांध्यांना व्यायाम मिळतो. व्यायामामुळे तुमच्या सांध्याची चांगली हालचाल होते. सांध्यांना योग्य हालचाल मिळाल्यामुळे त्यांच्या वेदना कमी होतात. यासाठी जमिनीवर बसून जेवणे हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो.

जमिनीवर बसण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. जमिनीवर बसण्यामुळे तुमच्या ह्रदयाचे कार्य सुधारते.  ह्रदय मजबूत असेल तर अनेक आरोग्य समस्या आपोआप कमी होतात. यामुळे तुमचे मन आणि शरीर दोन्ही निरोगी राहते. मग करताय ना… जमिनीवर बसून जेवायला पुन्हा सुरूवात.

ADVERTISEMENT

मिठी मारण्याचे ‘हे’ आहेत आश्चर्यकारक आरोग्यदायी फायदे

प्रवासाला जाताना सोबत न्या ‘हे’ घरगुती खाद्यपदार्थ

कोकणातील या पदार्थांमुळे येईल तुम्हाला ‘गावची आठवण’

जाणून घ्या लुसलुशीत इडली कशी बनवतात

ADVERTISEMENT
22 May 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT