आपल्यापैकी बऱ्याच जणांना पोटावर झोपायची सवय असते. झोपेत कधी आपण पोटावर उपडी होतो हे कळतही नाही. काही जणांना तर पोटावर झोपल्याशिवाय झोपच येत नाही. तुम्हीदेखील यापैकी एक असाल तर त्वरीत ही सवय तुम्ही बदला. ही सवय असल्यामुळे तुम्हाला पुढे बऱ्याच समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. पोटावर झोपल्यामुळे सर्वात महत्त्वाची समस्या निर्माण होते ती म्हणजे तुमचं ब्लड सर्क्युलेशन नीट होत नाही. त्यामुळे दिवसभर तुम्हाला काही ना काही आजाराने त्रस्त राहावं लागतं. नक्की पोटावर झोपल्यामुळे तुम्हाला काय समस्यांना सामोरं जावं लागतं ते जाणून घेऊया –
1 – सतत डोकेदुखी
तुम्ही जर पोटावर झोपत असाल तर, तुम्हाला सतत डोकेदुखीचा त्रास होत राहातो. कारण तुम्ही या प्रकारात झोपल्यामुळे तुमची मान मुरगळते आणि त्यामुळे तुमच्या डोक्याला व्यवस्थित रक्ताचा पुरवठा होत नाही. त्यामुळे तुम्हाला दिवसभर डोकं जड झाल्यासारखं वाटत राहतं.
2 – सांधेदुखी
पोटावर झोपल्यामुळे सर्वात मोठा परिणाम हा शरीरातील हाडांवर होत असतो. तुमची झोपण्याची ही पद्धत योग्य नाही. त्यामुळे तुम्हाला सांधेदुखीचा त्रासही उद्भवतो. वेळेवर तुम्ही याकडे लक्ष न दिल्यास, तुमचा हा आजार वाढू शकतो. त्यामुळे ही सवय असल्यास, लवकरात लवकर बदला.
3 – चेहऱ्यावरही होतो परिणाम
पोटावर झोपल्यामुळे तुमचा चेहराही खालच्या बाजूला येतो. त्यामुळे चेहरा दबून राहतो आणि तुमच्या त्वचेला पुरेसं ऑक्सीजन मिळत नाही आणि तुमच्या अंथरूणावर असलेले बॅक्टेरियादेखील चेहऱ्याला लागतात. त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर अधिक प्रमाणात डाग येतात. तुम्ही जर पाठीवर झोपलात तर तुमची त्वचा ही नैसर्गिकरित्या चमकते आणि तुमचं आरोग्यही चांगलं राहातं.
4 – पाठदुखीचा त्रास
पोटावर झोपण्याचं एक नुकसान हेदेखील आहे की, यामुळे तुम्हाला पाठीचा त्रासदेखील सुरु होतो. कारण तुमच्या पाठीची हाडं ही नैसर्गिकरित्या आकारात राहू शकत नाहीत. कधीतरी ही पाठदुखी खूपच त्रासदायक ठरते, ज्यामुळे तुम्हाला बसायलाही त्रास होऊ शकतो.
5 – पोट खराब राहातं
पोटावर झोपल्यामुळे आपण खाल्लेलं अन्न नीट पचत नाही आणि तुमची पचनक्रिया बिघडते. कायमस्वरूपी अन्नपचन न झाल्यामुळे पोट दुखत राहातं. बऱ्याचदा लोक साधारण पोटदुखी समजून याकडे दुर्लक्ष करतात. पण असं करणंं योग्य नाही. त्यामुळे तुम्हाला नेहमी डाव्या कुशीवर झोपायला हवं. अशा प्रकारे झोपणं हे योग्य आहे.
नक्की कसं झोपावं?
नेहमी पाठीवर झोपणंच योग्य आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसारही चांगल्या आरोग्यासाठी हीच पद्धत योग्य आहे. वास्तविक पाठीवर झोपल्याने तुम्हाला डोकेदुखील, मानदुखी अथवा सांधेदुखी यापैकी कोणत्याही समस्येला सामोरं जावं लागत नाही. तसंच तुम्हाला यामुळे चांगली झोप येते आणि तुमच्या आरोग्यालादेखील याचा फायदा होतो. तुम्हाला चांगली झोप लागते. तसंच तुम्ही डाव्या कुशीवर झोपल्यासही तुमची पचनक्रिया चांगली राहाते. त्यामुळे तुम्ही नेहमी याच दोन पद्धतीत झोप घ्यावी. ज्यामुळे तुम्हाला यापैकी कोणताही आजार होणार नाही. शिवाय तुमची झोप पूर्ण होऊन तुम्ही नेहमीच ताजेतवाने दिसाल. तुमच्या डोक्याला योग्य तऱ्हेने रक्तपुरवठा होत राहील. पोटावर झोपणं टाळणंच तुमच्या आरोग्यासाठी योग्य आहे. त्यामुळे अशी सवय असल्यास, वेळच्या वेळी ही सवय बदला.
फोटो सौजन्य – Shutterstock
हेदेखील वाचा –
पोट आणि पाठीवरच्या केसांपासून सुटका मिळवा 6 पद्धतीने
पिरेड्सच्या दिवसांमध्ये दुखतं पोट, जाणवतो थकवा मग हे नक्की करा