ADVERTISEMENT
home / निरोगी जीवन
‘या’ सवयींमुळे वाढू शकतो मधुमेहाचा धोका

‘या’ सवयींमुळे वाढू शकतो मधुमेहाचा धोका

मधुमेह हा एक सायलेंट किलर विकार आहे. आजकाल मधुमेह होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. एका संशोधनानुसार जगभरात दर पाच व्यक्तींमागे एका व्यक्तीला मधुमेह असू शकतो. भारतात तर याचे प्रमाण सर्वात जास्त आहे. वास्तविक मधुमेह होण्यामागे आपली चुकीची जीवनशैली आणि अयोग्य आहार कारणीभूत असतात. त्यामुळेच जीवनशैली आणि आहार-विहारात बदल करून तुम्ही मधुमेहापासून स्वतःचे आणि कुंटुंबियांचे रक्षण करू शकता. यासाठीच मधुमेह होण्यामागे कारणीभूत असलेल्या या चुकीच्या सवयी बदलण्याचा जरूर विचार करा.

shutterstock

या चुकीच्या सवयींमुळे वाढू शकतो मधुमेहाचा धोका

सुर्यप्रकाशात बाहेर न जाणे

व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे तुम्हाला मधुमेह होण्याचा धोका वाढतो. मेनचेस्टर युनिर्व्हसिटीच्या एका संशोधनानुसार सकाळच्या कोवळ्या उन्हात सनक्रीनशिवाय फिरल्यामुळे तुम्हाला व्हिटॅमिन डीचा पूरवठा होतो. त्यामुळे कमीतकमी सकाळच्या कोवळ्या उन्हात फिरणं गरजेचं आहे.

ADVERTISEMENT

ऑफिसमध्ये बसून काम करणे

बऱ्याचदा ऑफिसमध्ये तासनतास खुर्चीवर बसून काम केलं जातं. जेव्हा तुमची जीवनशैली बैठी असते तेव्हा तुम्हाला मधुमेह होण्याचा धोका अधिक असतो. कारण बैठ्या जीवनशैलीमुळे तुमची शारीरिक हालचाल कमी होते. शिवाय ऑफिसमध्ये कामाच्या दगदगीमुळे घरी गेल्यावरदेखील तुम्ही व्यायाम अथवा नाईटवॉकचा कंटाळा करता. ज्यामुळे तुम्हाला मधुमेहाचा धोका अधिक असू शकतो.

shutterstock

वेळेवर नास्ता न करणे

बऱ्याचदा ऑफिसमध्ये वेळेत जाण्याच्या घाई गडबडीत तुम्ही सकाळचा नास्ता करणे टाळता. फार वेळ उपाशी राहिल्यामुळे तुमच्या इन्सुलिनच्या पातळीत बदल होतो. यासाठीच सकाळी वेळेत आणि पौष्टिक नास्ता करणे गरजेचेचे आहे. आम्ही दिलेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली आणि त्याचा तुम्हाला काय फायदा झाला ते आम्हाला कंमटे बॉक्समध्ये जरूर कळवा.

ADVERTISEMENT

मायक्रोवेव्हमध्ये आणि प्लास्टिकच्या भांड्यात जेवण गरम करणे

अनेकांना अन्न गरम हवे यासाठी ऑफिस अथवा घरी प्लास्टिकच्या भांड्यात आणि मायक्रोवेव्हमध्ये अन्न गरम करण्याची सवय असते. मायक्रोवेव्हमध्ये अन्न गरम केल्यामुळे अन्नाची गुणवत्ता कमी होते. शिवाय प्लास्टिकचा वापर अती केल्यामुळे अन्नात केमिकल्स मिसळले जातात. अशा प्रकारचे अन्न खाण्यामुळे आजकाल किशोरवयीन मुले आणि लहान बाळांमध्ये मधुमेहाचा धोका वाढत आहे.

आहारात रिफांईड कार्बोहायड्रेडचा समावेश

आजकाल रिफांईड केलेले तांदूळ, बेकरी प्रॉडक्टस् अती प्रमाणात खाल्ले जातात. ज्यामुळे शरीराचे योग्य पोषण होत नाही. शिवाय असे पदार्थ खाण्यामुळे पुन्हा पुन्हा भुक लागते. सहाजिकच यामुळे तुम्ही अती आहार घेता आणि तुम्हाला मधुमेह होण्याचा धोका वाढू लागतो. म्हणून मधुमेहमध्ये चांगला आहार घ्या स्वस्त राहण्यासाठी

जागरण आणि अपुरी झोप

आजकालच्या जीवनशैलीत लोक रात्री उशीरा झोपतात आणि सकाळी उशीरा उठतात. कधी कधी यामुळे पुरेशी झोप मिळत नाही. आयुर्वेदशास्त्रानुसार सकाळी लवकर उठणे आणि रात्री लवकर झोपण्यामुळे आरोग्य चांगले राहते. मात्र आजकाल या बदलेल्या सवयीमुळे तुमचे बॉडीक्लॉक चुकते आणि ज्याचा परिणाम तुम्हाला आजारपणांना सामोरे  जावे लागते.

ADVERTISEMENT

shutterstock

सुट्टीच्या दिवशी घरात लोळत पडणे

आठवडाभर काम केल्यामुळे अनेकांना सुट्टीच्या दिवशी घरात लोळत पडणे आवडते. दिवसभर टिव्ही अथवा मोबाईल वेळ घालवत अनेकजण सुट्टी घालवतात. ज्यामुळे तुमची कोणतीच शारीरिक हालचाल होत नाही. याऐवजी सुट्टीच्या दिवशी घरातील कामे करावीत  अथवा बाहेर फिरण्यास जावे. ज्यामुळे तुमच्या शरीराची योग्य व्यायाम मिळू शकतो.

छोट्या छोट्या गोष्टीचा त्रास करून घेणे

आयुष्यात प्रत्येकाला नवनवीन आव्हानांना सामोरे जावे लागते यालाच जीवन असे म्हणतात. मात्र काही लोकांना छोट्या छोट्या गोष्टींची अती चिंता, काळजी करण्याची सवय असते. नको त्या गोष्टींचा अती विचार आणि काळजी केल्यामुळे तुमचे मानसिक स्वास्थ बिगडते. मानसिक ताणाचा तुमच्या शरीरावर परिणाम होतो. ताणामुळे मधुमेह होण्याचा धोका अधिक वाढू शकतो. 

अधिक वाचा

ADVERTISEMENT

 

फोटोसौजन्य – फोटोसौजन्य

 

 

ADVERTISEMENT
25 Jun 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT