ADVERTISEMENT
home / Diet
लाल भोपळा खाण्याचे फायदे

जाणून घ्या लाल भोपळा खाण्याचे फायदे | Benefits Of Pumpkin In Marathi

भोपळा (Pumpkin) हा शब्द ऐकताच डोळ्यासमोर येते ती “चल रे भोपळ्या टुणूक टुणूक” म्हणणारी लहानपणीच्या गोष्टीमधली, लेकीकडे जाणारी म्हातारी आणि जंगली प्राण्यांपासून तिला लपवणारा भलामोठा भोपळा… पण भोपळ्याचं महत्त्व या गोष्टींपुरतंच मर्यादीत नक्कीच नाही. काही सणसमारंभ अथवा पूजाविधींमध्ये भोपळ्याची भाजी करणं बंधनकारक असतं. पावसाळ्यात लाल भोपळा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतो. लाल भोपळ्याचा वापर भाजी, सांबर, पुऱ्या, पछडीमध्ये केला जातो. चवीला उत्कृष्ठ असलेला लाल भोपळा पचायला हलका असल्यामुळे या भाजीला पथ्याची भाजी असंही म्हणतात. आजारपणापासून दूर राहण्यासाठी आणि निरोगी जीवनशैलीसाठी आहारात भोपळ्याचा समावेश असणं फायद्याचं ठरू शकतं. यासाठीच जाणून घ्या भोपळ्याची माहिती (Pumpkin Information In Marathi) आणि लाल भोपळा खाण्याचे फायदे (Pumpkin Benefits In Marathi).

आरोग्यासाठी लाल भोपळा खाण्याचे फायदे | Health Benefits Of Pumpkin In Marathi

Benefits Of Pumpkin In Marathi
Benefits Of Pumpkin In Marathi

भोपळ्यामध्ये (Pumpkin In Marathi)  भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ए, सी आणि ई असतं. शिवाय यातील अॅंटि ऑक्सिडंट्समुळे अनेक आरोग्य समस्या दूर राहतात. जाणून घ्या लाल भोपळा खाण्याचे फायदे

डोळ्यांसाठी उत्तम

लाल भोपळ्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ए असते. व्हिटॅमिन ए मुळे तुमच्या डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते. डोळ्यातील रॅटीना सुरक्षित राहण्यासाठी आणि दृष्टी सुधारण्यासाठी शरीराला व्हिटॅमिन ए गरजेचं असतं. नियमित आहारात लाल भोपळ्याचा समावेश केल्यास मोतीबिंदू आणि वाढत्या वयामुळे होणाऱ्या डोळ्यांच्या समस्या नियंत्रणात राहण्यास मदत होते. डोळ्यांचे आरोग्य आणि दृष्टी उत्तम राहावी असं वाटत असेल तर आहारात लाल भोपळ्याचा समावेश जरूर करा. यासोबतच वाचा डोळ्यांचे दुखणे कमी करण्यासाठी डोळे दुखणे घरगुती उपाय (Home Remedies For Eye Pain)

रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते

जर तुम्ही सतत आजारी पडत असाल तर तुम्हाला रोगप्रतिकार शक्ती वाढविण्याची गरज आहे. मात्र त्याआधी जाणून घ्या प्रतिकारशक्ती कमी असण्याची लक्षणे ज्यामुळे उपाय करणं जाईल सोपं… रंगीत फळं, व्हिटॅमिन युक्त फळं आणि ताज्या भाज्यांमुळे तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. लाल भोपळ्यामध्ये व्हिटॅमिन ए, ई आणि सी मुबलक प्रमाणात आढळतात. लाल भोपळा खाणं तुमच्या आरोग्यासाठी लाभदायक ठरतं. सहाजिकच आजारपणांपासून दूर रहायचे असेल  आणि रोग प्रतिकार शक्ती वाढवायची असेल तर आहारात लाल भोपळा असायलाच हवा.

ADVERTISEMENT

अस्थमाचा त्रास कमी होतो

वातावरणात होणारे बदल आरोग्यावर परिणाम करत असतात. वाढते प्रदूषण अनेक आरोग्य समस्यांना आमंत्रण देते. आजकाल प्रदूषित वातावरणामुळे अस्थमाची समस्या वाढताना दिसत आहे. तुम्हाला जर अस्थमाचा, दम्याचा त्रास असेल तर तुम्ही नियमित लाल भोपळ्याचे सेवन करायला हवे. कारण लाल भोपळ्यामध्ये भरपूर प्रमाणात अॅंटि ऑक्सिडंट असतात. ज्यामुळे तुमच्या श्वसनमार्गाचे इनफेक्शनपासून संरक्षण होते. अस्थमा अटॅक टाळण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे. 

ह्रदय विकाराचा त्रास कमी होतो

भोपळ्यामध्ये असलेले पोषक घटक ह्रदयाच्या आरोग्यासाठीदेखील उत्तम असतात. भोपळ्यामुळे तुमच्या रक्तवाहिन्यांचे कार्य सुरळीत होते. ज्यामुळे ह्रदयविकाराचा धोका कमी होतो. भोपळ्यामध्ये असलेल्या अॅंटि ऑक्सिडंट्समुळे रक्तवाहिन्या कठीण होण्यापासून बचाव होतो. ज्यामुळे तुमचा रक्तदाब नियंत्रित राहतो. कोलेस्ट्रॉल जमा न झाल्यामुळे ह्रदयाचे कार्य व्यवस्थित सुरू राहते आणि ह्रदयाचे आरोग्य सुधारते. 

ताणतणाव आणि नैराश्य कमी होतो

आजकालची धावपळीची जीवनशैली जीवनात  ताणतणाव आणि नैराश्य निर्माण करते. सतत एखाद्या गोष्टीच्या मागे धावणे, कामाची चिंता काळजी, नात्यामधील दूरावा, स्वतःची वेळ नसणे अशा अनेक गोष्टी यासाठी कारणीभूत असू शकतात. जीवनातील ताणतणावाला नियंत्रणात ठेवायचे असेल तर संतुलित आहार,  पोषक जीवनशैली, ध्यान आणि पुरेसा व्यायाम यांची उत्तम सांगड घालता यायला हवी. आहारात भोपळ्याचा योग्य प्रमाणात समावेश करूनही तुम्ही तुमच्या ताणतणावाला कमी करू शकता. कारण भोपळ्यामुळे तुम्हाला शांत झोप लागते आणि मन शांत राहते. 

मधुमेहाची समस्या कमी होते

भोपळ्याची चव थोडी गोडसर असते. ज्यामुळे मधुमेहींसाठी भोपळा उपयुक्त आहे की नाही हा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होऊ शकतो. मात्र तुम्ही मधुमेही असाल तर याबाबत मुळीच चिंता करू नका, कारण लाल भोपळा खाण्यामुळे तुमच्या रक्तातील साखर नक्कीच नियंत्रित राहते. लाल भोपळ्यामध्ये भरपूर प्रमाणात अॅंटि ऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन्स आणि फायबर असते. ज्यामुळे तुमच्या रक्तातील साखर वाढत नाही.

ADVERTISEMENT

वंधत्त्वावर उपाय

आजकालच्या जीवनशैलीत झालेले बदल आरोग्यावर घातक परिणाम करतात. या जीवनशैलीमुळेच आजकाल वंधत्त्वाचे प्रमाण वाढलेले दिसून येते. जर तुम्ही बाळासाठी प्रयत्न करत असाल आणि तुम्हाला गर्भधारणेत अडचणी येत असतील तर तुम्ही आहारात भोपळ्याचे प्रमाण नक्कीच वाढवू शकता. कारण भोपळ्यामध्ये झिंक मोठ्या प्रमाणात असते. झिंकमुळे पुरूषांमधील स्पर्मची गुणवत्ता सुधारते.

वजन नियंत्रित राहते

लाल भोपळ्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स असतात. ज्यामुळे तुम्हाला लवकर भूक लागत नाही. शिवाय भोपळ्यात कॅलरीजचे प्रमाणही कमी असते. पाव किलो भोपळ्यामधून जवळजवळ 60 ते 70 कॅलरीज मिळतात. ज्यामुळे तुमच्या शरीराचे योग्य पोषण होते आणि शरीरात फॅट्स वाढत नाहीत. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल अथवा वजन नियंत्रणात ठेवायचे असेल तर तुमच्या आहारात भोपळा असायलाच हवा.

त्वचा आणि केसांसाठी लाल भोपळा खाण्याचे फायदे | Skin And Hair Benefits Of Pumpkin In Marathi

भोपळा खाण्याचे फायदे
भोपळा खाण्याचे फायदे

लाल भोपळा खाण्याचे फायदे फक्त आरोग्यावर होतात असं नाही. यामुळे तुमच्या केस आणि त्वचेवरही चांगला परिणाम होतो. जाणून घ्या फायदे

कोरड्या त्वचेसाठी उत्तम

हिवाळ्यात कोरड्या त्वचेच्या समस्या अधिकच वाढत जातात. अशा वेळी त्वचेला योग्य पोषण देणाऱ्या आणि त्वचेला मऊ ठेवणाऱ्या घटकांची जास्त गरज असते. लाल भोपळा तुमच्या कोरड्या त्वचेसाठी अतिशय लाभदायक ठरू शकतो. कोरड्या त्वचेवर उपाय करण्यासाठी तुम्ही दोन चमचे लाल भोपळ्याचा गर, अर्धा चमचा मध आणि एक चमचा दही एकत्र करून तुमच्या त्वचेवर याचा फेसपॅक लावू शकता. हा फेसपॅक सुकला की चेहरा कोमट पाण्याने धुवून टाका. ज्यामुळे त्वचेवर नैसर्गिक चमक येईल. यासोबतच करा कोरड्या त्वचेसाठी घरगुती उपाय (Dry Skin Care Tips In Marathi)

ADVERTISEMENT

अॅंटि एजिंग फायदे

लाल भोपळ्यामध्ये बीटा कॅरोटीन भरपूर असते. ज्यामुळे तुम्हाला लवकर एजिंगच्या समस्या होत नाहीत. चेहऱ्यावर वाढत्या वयामुळे दिसणाऱ्या सुरकुत्या अथवा इतर एजिंगच्या खुणा नको असतील तर आहारात लाल भोपळ्याचा समावेश नक्की करा. तुम्ही लाल भोपळ्यापासून एक मस्त फेसपॅक देखील तयार करू शकता. यासाठी पाव वाटी पिकलेल्या लाल भोपळ्याचा गर घ्या. गर काढण्यासाठी लाल भोपळ्याच्या बिया काढून तो मिक्सरमध्ये वाटून घ्या. या गरात अंड्याचा पांढरा भाग, मध आणि चमचाभर दूध मिसळा. या मिश्रणाचा एक फेसपॅक तयार करा आणि चेहरा आणि मानेवर लावा. वीस ते तीस मिनीटांनी चेहरा कोमट पाण्याने स्वच्छ धुवा.

डार्क स्पॉटवर उपचार

त्वचेवरील काळे डाग आणि व्रण तुमच्या सौंदर्यामध्ये बाधा आणतात. यासाठी वेळीच त्वचेवर योग्य ते उपचार करून काळे डाग कमी करायला हवेत. त्वचेवरील डार्क स्पॉट कमी करण्यासाठी तुम्ही एक चमचा लाल भोपळ्याच्या गरामध्ये थोडं मध आणि लिंबाचा रस मिसळू शकता. हे मिक्षण त्वचेवरील काळ्या डागांवर लावा आणि वीस मिनीटांनी तो भाग कोमट पाण्याने धुवून टाका.

केस मजबूत होतात

भोपळ्यामध्ये पोठॅशिअम आणि झिंक सारखे मिनरल्स मोठ्या प्रमाणावर असतात.ज्यामुळे तुमच्या केसांची वाढ होते आणि मुळं मजबूत होतात.झिंकमुळे कोलेजीनच्या निर्मितीला चालना मिळते. भोपळ्यामधील फॉलेट आणि व्हिटॅमिन बी त्वचेमधील रक्ताभिरसण सुधारण्यास मदत करतात. ज्यामुळे केसांच्या  मुळांना अधिक चालना मिळते आणि केस गळणे कमी होते.

कोरड्या केसांसाठी उत्तम कंडिशनर

केस कोरडे असतील तर त्यांना अधिक पोषणासाठी कंडिशनरची गरज असते. कारण कोरड्या केसांचे योग्य पोषण झाले नाही तर ते निस्तेज दिसतात आणि लवकर पांढरे होतात. लाल भोपळा तुमच्या कोरड्या केसांसाठी उत्तम कंडिशनर म्हणून काम करतो. यासाठी एक चमचा लाल भोपळ्याचा गर, अर्धा चमचा नारळाचे तेल, थोडं दही एकत्र करा आणि केसांना लावा. वीस मिनीटांनी केस कोमट पाण्याने धुवून टाका. ज्यामुळे केसांना नैसर्गिक चमक आणि मऊपणा मिळेल. 

ADVERTISEMENT

लाल भोपळ्याचे फायदे आणि निवडक प्रश्न – FAQ’s

1. भोपळ्याचे दुष्परिणाम काय आहेत ?

भोपळा आरोग्यासाठी अतिशय उत्तम असतो. त्यामुळे भोपळा खाण्यामुळे आरोग्यावर दुष्परिणाम होत नाहीत. पण अती प्रमाणात कोणतीही गोष्ट खाल्ली तर ती शरीरासाठी बाधक धरू शकते. त्यामुळे प्रमाणात भोपळा खा. शिवाय जर तुम्हाला भोपळ्यातील एखाद्या घटकाची अॅलर्जी असेल तर भोपळा खाताना सावध राहा. 

2. भोपळा कसा निवडावा आणि साठवून ठेवा ?

बाजारात भोपळा विकत घेताना तो नेहमी ताजा आणि कोवळा विकत घ्यावा. कारण असा भोपळा सामान्य तापमानावर कमीत कमी एक महिना आणि फ्रीजमध्ये कमीत कमी तीन महिने साठवता येतो. 

3. भोपळ्याच्या बियाचा वापर कसा करावा ?

भोपळ्याच्या बियांचे फायदे खूप आहेत. भोपळ्याच्या बियांमध्ये ओमेगा 6 फॅटी अॅसिड असते. यासोबतच या बियांमध्ये अनेक व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असल्यामुळे या बिया खाणं तुमच्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरू शकतं. यासाठी भोपळ्याच्या बिया सुकवून त्या सोलून खा अथवा त्याची पावडर करून स्वयंपाकात वापरा.

18 Jun 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT