ADVERTISEMENT
home / आरोग्य
डोळ्यांचे दुखणे कमी करण्यासाठी सोपे डोळे दुखणे घरगुती उपाय (Home Remedies For Eye Pain)

डोळ्यांचे दुखणे कमी करण्यासाठी सोपे डोळे दुखणे घरगुती उपाय (Home Remedies For Eye Pain)

दिवसभर सतत लॅपटॉपवर काम करणं, टीव्ही पाहणं, सतत मोबाईल पाहणं या सगळ्या गोष्टींमुळे आजकाल डोळ्यांवर अधिक ताण येऊ लागला आहे. यामुळे डोळे लाल होणे, डोळ्यांची जळजळ वाढणे, डोळ्यांवर ताण येणे, डोळ्यांच्या नसा दुखणे अशा अनेक समस्या जास्त प्रमाणात उद्भवू लागल्या आहेत. कधी कधी वेगवेगळ्या कारणांनी डोळ्यांची जळजळ होते. तणाव अथवा अलर्जीमुळेही असं होऊ शकतं. तसंच सध्याचे वाढते प्रदूषण हेदेखील त्यासाठी कारणीभूत ठरते. पण डोळ्यांचे हे दुखणे घरच्या घरीदेखील तुम्ही बरे करू शकता.  त्यासाठी घरगुती कोणते उपाय करता येतील ते आपण या लेखातून जाणून घेणार आहोत. डोळे दुखणे, डोळे लाल होणे, डोळ्यातून सतत  पाणी येणे, डोळ्यांची जळजळ होणे ही डोळे  दुखायला लागण्याची लक्षणं आहेत. अशी लक्षणं जाणवू लागल्यावर घरगुती उपाय नक्की काय करायचे हे आपण समजून घेऊया पण तत्पूर्वी याची नक्की काय कारणं आहेत ते पाहूया.  

डोळे दुखण्याची कारणं (Causes of Eye Pain In Marathi)

डोळे दुखण्याची कारणं

Shutterstock

वाढते प्रदूषण आणि सतत लॅपटॉप आणि  मोबाईवर पाहण्याने अर्थात डोळ्यांवर परिणाम होतो आणि सतत डोळ्यातून पाणी येणं, डोळे दुखणे आणि डोळे लाल होणे ही लक्षणं  जाणवू लागतात.  पण त्याव्यतिरिक्त अशी काही कारणं आहेत ज्यामुळे डोळ्यांचे दुखणे वाढते. त्यापैकी काही कारणं खालीलप्रमाणे – 

ADVERTISEMENT

डोळ्यांना होणारी अलर्जी – डोळ्यांना बरेचदा धुळीची अथवा अन्य अलर्जी असले तर डोळ्यांचे दुखणे वाढते. तसंच काही जणांना चुकून जरी तिखटाचा हात डोळ्यांना लागला तरी जास्त प्रमाणात डोळ्यांचे दुखणे वाढते. अशा प्रकारच्या अलर्जीमुळे डोळेदुखी अधिक वाढते आणि त्रास होतो.

डोळ्यांना होणारे इन्फेक्शन – कोणत्या ना कोणत्या कारणाने डोळ्यांना झालेले इन्फेक्शनदेखील डोळेदुखीसाठी कारणीभूत ठरते. या इन्फेक्शनपासून नक्कीच घरगुती उपायांनी सुटका करून घेता येते. 

डोळ्यांची जळजळ – सतत काम केल्याने डोळ्यांची जळजळ होऊन डोळे लाल होतात. हे  असं बऱ्याच जणांच्या बाबतीत होतं. 

डोळेदुखीवर घरगुती उपाय (Home Remedies For Eye Pain In Marathi)

dokedukhi var upay marathi

ADVERTISEMENT

Instagram

 

डोळेदुखी बऱ्याचदा केवळ डोळे लाल राहण्यावरही थांबते. अगदी डोळा ठुसठुसत नाही. कोणत्याही प्रकारची डोळेदुखी असू शकते. मग अशावेळी तुम्ही घरच्या घरीही डोळ्यांच्या या दुखण्यावर इलाज करू शकता. डोळे दुखणे घरगुती उपाय सोपे आहे (Dokedukhi Var Upay Marathi). असे कोणते सोपे आहेत आणि कशा प्रकारे हे घरच्या घरी करायचे याची विस्तृत माहिती आम्ही तुम्हाला देत आहोत. 

मध (Honey)

 

मध हे जीवाणूविरोधी आणि नैसर्गिक घटक असणारे औषध आहे. मधामध्ये आढळणारे घटक हे डोळ्यांमध्ये  लालसरपणा कमी करून डोळ्यांना अधिक थंडपणा देतात. तसंच मध हे सर्वांच्या घरातील एक अविभाज्य भाग असतो. त्यामुळे प्रत्येक घरामध्ये मध उपलब्ध असते. अतिशय सोपा आणि खिशाला परवडण्याजोगा हा उपाय आहे. डोळे दुखणे घरगुती उपायांमधील हा सोपा उपाय आहे.

कसे वापरावे 

ADVERTISEMENT
  • डोळ्याच्या प्रभावित क्षेत्रामध्ये मधाचा एक थेंब टाकावा
  • सुरूवातील जळजळ झाल्यासारखे वाटेल पण नंतर तुम्हाला त्याचा योग्य परिणाम दिसून येईल 
  • डोळ्याला त्वरीत आराम हवा असेल तर तुम्ही मधाचा वापर करून घेऊ शकता 
     

गुलाबपाणी (Rose Water)

 

 

गुलाबपाणी

Shutterstock

ADVERTISEMENT

डोळ्यांची जळजळ, डोळे दुखणे आणि डोळ्यांमध्ये खाज येत असेल तर गुलाबपाणी हा त्यावरील उत्तम उपाय आहे. यामध्ये विटामिन ए आणि सी चे प्रमाण आढळते.  तसेच डोळ्यांची जळजळ कमी करण्यासाठी लागणारे अँटीइन्फ्लेमेटरी घटक फायदेशीर ठरतात. डोळ्यांचा लालसरपणा पटकन कमी करायचा असेल तर गुलाबपाणी हा सोपा आणि उत्तम उपाय  आहे. तसंच याचा कोणताही दुष्परिणाम होत नाही. केवळ तुम्ही ज्या भांड्यात गुलाबपाणी घ्याल ते भांडे स्वच्छ असायला हवे.  

कसे वापरावे 

  • आयड्रॉपर घेऊन गुलाबपाण्याचे साधारण 3-4 थेंब तुम्ही डोळ्यात घाला 
  • थोडा वेळ डोळे बंद करून बसा 
  • काही वेळानंतर पुन्हा साधे पाणी आणि गुलाबपाणी मिक्स करून डोळ्यांवर पाण्याचा हबका मारून डोळे  स्वच्छ धुवा 
  • दोन ते तीन दिवस तुम्ही ही प्रक्रिया केल्यास, तुम्हाला डोळ्याचे दुखणे जाणवणार नाही 

टी बॅग्ज (Tea Bags)

 

डोळ्यांखाली आलेली काळी वर्तुळं काढण्यासाठी टी बॅग्ज उपयोगी पडतात याची सर्वांनाच माहिती आहे. पण डोळ्यांचे दुखणे कमी करण्यासाठीही याचा उपयोग करून घेता येतो. ग्रीन टी अथवा कॅमोमाईल टी चा यासाठी उपयोग करून घेण्यात येतो. डोळ्यांची जळजळ होत असल्यास टी बॅग्जचा वापर करणे फायदेशीर ठरते. 

कसे वापरावे 

ADVERTISEMENT

चहासाठी वापरण्यात आलेल्या टी बॅग्ज फेकून न देता फ्रिजमध्ये ठेवा 
तुम्हाला जेव्हा डोळ्यांना जळजळ जाणवेल तेव्हा फ्रिजमधील चहाची ही बॅग काढा आणि डोळ्यावर ठेवा 
ही थंड बॅग तुम्ही डोळ्यांवर ठेऊन काही वेळ तसेच पडून राहा
दोन ते तीन दिवस हा उपाय केल्यावर तुम्हाला डोळ्यात अजिबात जळजळ जाणवणार नाही

काकडी (Cucumber)

काकडी

Shutterstock

काकडी ही त्वचेसाठी थंडावा निर्माण करते हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. काकडीचा उपयोग डोळ्यांची जळजळ कमी करण्यासाठी आणि लालसरपणा घालविण्यासाठीही होतो. त्वचा सुंदर राखण्यासाठी जितका काकडीचा उपयोग होतो तितकाच डोळ्यांचे दुखणे कमी करण्यासाठीही होतो. काकडीमध्ये असणारे अँटिऑक्सिडंट्स आणि  फ्लेवोनॉईड्स हे डोळे दुखणे आणि डोळ्यांची जळजळ कमी करण्यासाठी  फायदेशीर ठरतात. तसंच यातून लवकरात लवकर बरं होण्यासाठी काकडीचे तुकडे  मदत करतात. याचा कोणताही दुष्परिणाम डोळ्यांवर होत नाही. 

ADVERTISEMENT

कसे वापरावे 

  • काकडीचे स्लाईस कापून घ्या आणि ते काही वेळ बर्फाच्या पाण्यात ठेवा 
  • त्यानंतर डोळ्यांवर साधारण 10 मिनिट्स ठेवा 
  • असं साधारण अर्धा तास करत राहा 
  • तुम्हाला त्वरीत डोळ्यांवर परिणाम जाणवेल

बटाट्याचा रस (Potato Juice)

डोळ्यांवरील काळी वर्तुळं अथवा त्वचेवर कुठेही काळपटपणा असेल तर बटाटा हा त्यावरील उत्तम उपाय आहेत. मात्र डोळ्यांची जळजळ आणि लालसरपणा आणि डोळ्यांचे दुखणे कमी करण्यासाठी तुम्ही बटाट्याच्या रसाचा अथवा बटाटा स्लाईसचा वापर करून घेऊ शकता. त्वरीत उपाय हवा असल्यास हा उपाय योग्य आहे. बटाट्यामध्ये अँटिऑक्सिडंट्स असून डोळे दुखणे, डोळ्यामधील जळजळ कमी करण्यावर फायदेशीर ठरते. तसंच बटाट्याच्या वापराने कोणताही चुकीचा परिणाम  होत नाही. डोळा हा शरीराचा अत्यंत नाजूक भाग असतो. त्यामुळे डोळे दुखणे घरगुती उपाय करताना अत्यंत सावधपणाने करावा लागतो.

कसे वापरावे 

  • बटाट्याचे स्लाईस कापून घ्या आणि ते काही वेळ बर्फाच्या पाण्यात ठेवा 
  • त्यानंतर डोळ्यांवर साधारण 10 मिनिट्स ठेवा 
  • असं साधारण अर्धा तास करत राहा 
  • तुम्हाला त्वरीत डोळ्यांवर परिणाम जाणवेल
  • दुसरी पद्धत म्हणजे बटाट्याचा रस काढून घ्या 
  • आयड्रॉपरने त्याचे 3-4 थेंब डोळ्यात आला आणि काही वेळ पडून राहा
  • थोड्या वेळाने थंड पाण्याने डोळे धुवा
  • दोन ते तीन दिवसांनी तुम्हाला फरक जाणवेल

कोरफड (Aleo Vera)

कोरफड

ADVERTISEMENT

Shutterstock

कोरफड जेल ही अत्यंत उपयुक्त ठरते. अगदी त्वचेपासून ते सौंदर्यापर्यंत सर्व गोष्टींसाठी कोरफड जेलचा उपयोग करून घेता येतो. नैसर्गिक मॉस्चराईजर म्हणून काम करणारी कोरफड जेल ही डोळ्यांवरही उपयुक्त ठरते. यामध्ये 18 अमिनो अॅसिड्स आढळतात. तसंच यामध्ये विटामिन्स आणि  मिनरल्सचाही भरणा  असतो. त्यामुळे फ्री रॅडिकल्सपासून सुटका आणि डोळ्यांच्या दुखण्याशी  लढा देण्यासाठी ही उत्तम आहे. घरगुती उपायांपैकी उत्तम उपाय म्हणून कोरफडकडे  तुम्ही पाहू शकता. त्वरीत डोळ्यांचे दुखणे बरे होण्यासाठी तुम्ही कोरफड जेलचा वापर करून पाहा. 

कसे वापरावे 

  • कोरफडचे जाड पान आणावे.  त्याची साल काढून टाकावी
  • त्यातून स्वच्छ जेल काढून घ्यावे आणि स्वच्छ  भांड्यामध्ये काढून ठेवावे
  • तुमचे हात साबणाने धुवा आणि ग्लोव्ह्ज घाला
  • त्यानंतर बोटाला कोरफड जेल लावा आणि त्याने डोळ्यांना ती जेल हलक्या  हाताने लाऊन घ्या
  • साधारण एक तास तसेच बसून राहा 
  • नंतर स्वच्छ  पाण्याने  डोळे धुवा आणि कोरड्या टॉवेलने डोळे पुसा
  • आठवडाभर ही प्रक्रिया करा आणि सुंदर आणि जळजळमुक्त डोळे मिळवा

वेलची, चंपक फूल आणि केशर (Cardamom, Champak Flower & Saffron)

नैसर्गिक अँटिपायरेटिक असणारे चंपकचे फूूल हे अँटिइन्फ्लेमेटरी आणि अँटिमायक्रोबायल आहे. यामध्ये वेलची आणि केशराचे गुण मिसळून तुम्ही डोळ्यांचे दुखणे कमी करू शकता. डोळ्यांची जळजळ, डोळे दुखणे आणि खाज कमी करण्यासाठी याचा उपयोग करून घेता येऊ शकतो.  चंपक फूल, वेलची आणि केशर एकत्र करून उत्तम उपाय करता येतो. कोणताही चुकीचा परिणाम  होत नाही. तसंच तुम्ही याचा प्रयोग लहान मुलांसाठीही करून घेऊ शकता. मात्र गरोदर महिलांवर उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांकडून जाणून घ्यावे. 

ADVERTISEMENT

कसे वापरावे 

  • एक ताजे चंपक फूल घ्यावे आणि त्याच्या पाकळ्या काढाव्यात, त्यामध्ये  एक चमचा लिकोराईस रूट पावडर मिक्स करावी,एक वेलची आणि चिमूटभर केशर मिक्स  करून त्यात थोडेसे पाणी घालून पेस्ट करा 
  • ही पेस्ट तुम्ही डोळ्याच्या वरच्या भागाला आणि पापण्यांच्या खालीदेखील लावा
  • एक तास तसंच राहू द्या
  • दिवसातून दोन वेळा ही प्रक्रिया किमान 2-3 दिवस करा आणि परिणाम पाहा

तिळाची फूलं (Sesame Flowers)

तिळाची फूलं

Shutterstock

अगदी किडनी स्टोनपासून ते त्वचेसाठी तिळाचे तेल वापरले जाते. हे अत्यंत औषधी असते याची आपल्याला कल्पना आहे. मुळात केसांच्या वाढीसाठी  याचा जास्त उपयोग करण्यात येतो. मात्र डोळ्याचा कोरडेपणा, डोळ्यात होणारी आग आणि  जळजळ कम करण्यासाठीही याचा उपयोग होतो. तिळाच्या  फुलांचा तुम्ही यासाठी उपयोग करून घेऊ शकता. डोळ्यांची खाज पटकन कमी करायची असेल तर हा उत्तम घरगुती उपाय आहे. 

ADVERTISEMENT

कसे वापरावे 

  • साधारण 3-4 तिळाची फूलं  घ्या आणि चांगली स्वच्छ धुवा आणि त्याची पेस्ट तयार करा 
  • एक ग्लास गाईचे दुध उकळून घ्या 
  • तिळाच्या फुलांच्या पेस्टमध्ये हे दूध मिक्स करा
  • आठवड्यात रोज एक ग्लास हे दूध तुम्ही प्या 
  • अथवा तिळाच्या  फुलांची पेस्ट तुम्ही डोळ्यांच्या वरही लाऊ शकता 

कडिपत्ता पाने (Curry Leaves)

कडिपत्ता पाने वाचून  तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटलं असणार. कारण डोळे हा अत्यंत नाजूक भाग आहे आणि आपण कडिपत्ता हा केवळ मसाला म्हणून  वापरतो. पण कडिपत्त्यामध्ये असणारे विटामिन ए हे डोळ्यासाठी उपयुक्त ठरते. कडिपत्त्याची फळेही डोळ्यांचे दुखणे कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते. खाज कमी करणे, डोळे दुखणे अथवा लालसरपणा कमी करण्यासाठी याचा उपयोग करून घेता येतो. याचा कोणताही दुष्परिणाम होत नाही. कसे वापरायचे ते जाणून घेऊया. 

कसे वापरावे 

  • कडिपत्त्याचा एक जुडा घ्या आणि 3-4 फळं घ्या 
  • हे सर्व वाटून त्याची  पेस्ट करा
  • एक ग्लास ताकामध्ये ही पेस्ट मिक्स करा 
  • दिवसातून हे मिश्रण तुम्ही दोन वेळा प्या
  • आठवडाभर तुम्ही हे केल्यास तुम्हाला डोळ्यांचे दुखणे जाणवणार नाही

गाजराचा रस (Carrot Juice)

गाजराचा रस

ADVERTISEMENT

Shutterstock

डोळ्यांसाठी गाजर हा नेहमीच घरगुती उपायांमध्ये  उत्कृष्ट उपाय समजला जातो. गाजराचा रस नियमित प्यायल्याने तुमची दृष्टीही उत्तम राहाते. गाजरामध्ये  विटामिन के, बी6, रिबोफ्लेविन, थियामिन,  नियासिन आणि फोलेट हे गुण आढळतात. तसंच गाजरामध्ये विटामिन ई चे प्रमाण अत्यंत जास्त आहे. जे डोळ्यातील खाज आणि जळजळ कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त  ठरते. गाजराचा ज्युस अर्थात रस नियमित प्यायल्याने डोळे अत्यंत चांगले राहतात. डोळ्याचे दुखणे होत नाही आणि झाले तरी गाजराचा वापर केल्यास त्वरीत दूर होते. 

कसे वापरावे 

  • 3-4 ताजे गाजर घ्या. 
  • धुवा आणि कापून त्याचा रस काढा
  • दिवसातून तुम्ही रोज दोन वेळा हा रस प्या
  • तीन आठवडे तुम्ही हे नियमित केल्यास, तुम्हाला डोळ्यांना कोणताही त्रास होणार नाही

प्रश्नोत्तरे (FAQs)

1. डोळे गुलाबी झाल्यास, घरच्या घरी उपचार करता येतात का?

ADVERTISEMENT

अर्थात याचं उत्तर हो असं आहे. तुम्ही वर दिलेल्या घरगुती उपयांपैकी कोणताही उपाय वापरून डोळे गुलाबी झाल्यास त्याचा उपयोग करून घेऊ शकता. 

2. डोळ्याच्या जळजळीपासून वाचण्यासाठी कोणता घरगुती उपाय आहे?

बाहेर पडताना नेहमी गॉगलचा वापर करा. डोळे स्वच्छ धुत राहा. उन्हात निघताना डोळे व्यवस्थित कव्हर होत आहेत की नाही ते पाहा. यापासून तुम्ही वाचू शकता. 

3. डोळ्यांच्या दुखण्याने डोकेदुखीदेखील होते का?

ADVERTISEMENT

डोळ्यांच्या आणि दातांच्या नसा या डोक्याशी बऱ्याच प्रमाणात जोडलेल्या असतात. त्यामुळे डोळे दुखायला लागल्यावर त्याचा सर्वात पहिला परिणाम होतो तो डोक्यावर. डोकंदुखीदेखील यामुळे सुरू होते. 

4. डोळ्यांवरील ताण कसा कमी करावा?

शक्यतो लॅपटॉपवर तासनतास काम असेल तर दर अर्ध्या तासाने डोळ्यांना ताण येऊ नये यासाठी डोळ्यांचा व्यायाम करावा. आठवड्यातून दोन वेळा तरी किमान काकडीचे स्लाईस डोळ्यांवर ठेवावेत.  जेणेकरून डोळ्यांना थंडावा मिळेल. 

5. डोळेदुखी अत्यंत गंभीर आहे हे कसे कळते?

ADVERTISEMENT

घरगुती उपाय करूनही डोळ्यांची जळजळ, डोळेदुखी अथवा लालसरपणा कमी होत नसेल तर नक्कीच डोळ्यांच्या आजार हा गंभीर आहे हे तुम्ही वेळेवर लक्षात घ्या  आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

18 Oct 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT