असं म्हणतात everything is fair in love and war … पण प्रत्येकवेळी ही उक्ती लागू पडत नाही. प्रेमात आलेले काही अडथळे असे असतात की, ते काही केल्या दूर होत नाही. तर बांडगुळासारखे वाढत जातात. प्रेमात त्रिशंकु परिस्थिती निर्माण झाली की, नात्यात नको असलेल्या गोष्टी होऊ लागतात. मृणालच्या आयुष्यातही सगळं काही अगदी चांगलं सुरु होतं. प्रेमाचं नातं बहरत होतं. पण अचानक त्यांच्या नात्यात ती आली आणि सगळं काही बदलून गेलं. आज खास तुमच्यासाठी मृणालची ही पेचात सापडलेली लव्हस्टोरी…
मला जसा मुलगा माझा लाईफ पार्टनर म्हणून हवा होता अगदी तसाच मुलगा मला निनादच्या रुपाने फायनली मिळाला. आयुष्यात इतके चढं उतार पाहिल्यानंतर निनाद सारखा इतका चांगला मुलगा मिळेल असं मला कधीच वाटलं नव्हतं. माझ्या प्रत्येक दिवसाची सुरुवात ही फक्त निनादपासून होते. मी माझे डोळे उघडते तेव्हाही निनादचे नाव एकदा तरी माझ्या ओठी येते. फोन चाचपडून त्याला Good morning चा मेसेज करते आणि मगच मी माझ्या दिवसाची सुरुवात करते. मी आणि निनाद दिवसभर कितीही कामात असलो आम्हाला एकमेकांना फोन करता आला नाही तरी आम्ही मेसेज करुन एकमेकांची विचारपूस करतो. मला माझ्या प्रत्येक गोष्टी त्याला सांगायला आवडतात आणि त्यालाही मला प्रत्येक गोष्टी सांगितल्याशिवाय चैन पडत नाही. सगळं काही सुरळीत सुरु असताना एकदा असं काही झालं की, मला काय कराव हे कळतं नव्हतं. ज्या गोष्टीची मला आधीपासून भीती होती. ती गोष्ट घडली होती. आमच्या नात्यात ती आली होती. ही अशी तिसरी व्यक्ती होती की, तिचा त्रास आपल्या नात्यात कधी तरी अडथळा आणेल याची मला कल्पना होती आणि मी ती निनादलासुद्धा दिला होती. पण निखळ मैत्रीशिवाय निनादच्या मनात मोनिकाबद्दल काहीच नव्हते.
#Mystory… लग्नानंतर असं प्रेम मिळेल असं कधीच वाटलं नव्हत
एक दिवस मला निनादचा फोन मला आला… ‘कुठे आहेस? घरी आली का? कधी येणार आहेस?’ फोन उचलल्यानंतर लागोपाठ इतके प्रश्न विचारल्यानंतर मला कळलं काहीतरी बिनसलंय. निनादचा आवाज रडवेला थोडा घाबरलेला आणि थोडा गोंधळलेला असा मला वाटला. त्याच्या आवाजावरुन त्याच्या मनात काय सुरु आहे हे कळून घेण्याची मला सवय झाली आहे. मी दीर्घ श्वास घेत त्याला विचारल ‘काय झाल? सगळं ठिक आहे? काही सांगायचं आहे का मला?’ एक सेकंदभर थांबत निनाद म्हणाला, ‘तू घरी ये मग बोलू’. मला माहीत होतं की, ही अशी गोष्ट आहे जी तो मला सांगितल्याशिवाय राहू शकणार नाही. मी त्याला विचारलं काय झाल? त्याने फक्त ‘मोनिका’ असं नाव घेतलं आणि मला सगळा प्रकार कळला.
मोनिका ही निनादची मैत्रीण. आमचे नाते सुरु होण्याआधीपासूनच ती मैत्रीण आहे हे मला माहीत होते. पण ती आमच्या दोघांमध्ये असा काही गोंधळ निर्माण करेल असे मला कधीच वाटले होते. तर झालं असं की, निनादची मैत्रीण त्याच्या प्रेमात होती. आधी ती असं कधीच वागली नव्हती. पण आताच तिला माझा निनाद अचानक का आवडू लागला होता हे मला माहीत नव्हते. सवयीप्रमाणे झालेला सगळा प्रकार मला निनादने सांगितला कारण तो माझ्यापासून कधीच काही लपवून ठेवत नाही. पण तिच्या अचानक अशा वागण्यामुळे निनाद पुरता हादरुन गेला होता. एका बाजूला मी आणि दुसऱ्या बाजूला त्याची मैत्रीण त्याला काय करावे हे कळतं नव्हते. मला आठवत त्यानुसार ज्यावेळी मला काही गोष्टी खटकल्या होत्या.त्यावेळी मी निनादला त्या सांगत होते. पण त्यावेळी त्याला असं काही घडेल असं वाटलं नव्हत पण आता त्याला माझं पटलं होतं.
#Mystory आजही साखरपुड्याचा तो क्षण मला आठवला की..
निनादचे मोनिकावर प्रेम नव्हते. पण आपल्या कुठल्या वागण्याचा मोनिकावर असा विपरीत परिणाम झाला हे त्याला कळत नव्हतं. घरी आल्यानंतर झालेला सगळा प्रकार मी त्याला विचारला. त्याच्या मनात मोनिकामुळे आमच्या नात्यावर काही परिणाम होईल अशी भिती होती. ती भीती त्याने मला बोलून दाखवली. त्यामुळे आता निनादला यातून बाहेर काढायचे मी ठरवून टाकले.
निनादने मोनिकासोबत काही चुकीचे कधीच केले नव्हते. पण मैत्रीच्या पलीकडे जाऊन तिने त्याची केलेली मदत ही तिला प्रेमाचा भाग वाटली. मोनिका मला ओळखत नव्हती. त्यामुळे तो एकटा आहे आणि निनादला माझी गरज आहे ही भावना तिच्या मनात येणं स्वाभाविक असल्याचे मला वाटले. मोनिकाचे काही दिवसांपासून बदललेल्या स्वभावाच्या प्रत्येक गोष्टी मला निनादने सांगितल्या. त्यामुळे आता मलाच माझ्या नात्यातील सगळ्या गोष्टी नीट करायच्या होत्या. कोणतीही मन न दुखवता मला या अडचणीतून निनादला आणि मोनिकाला बाहेर काढायचे होते.
त्यामुळे आता मलाच काहीतरी करावे लागणार होते. मी निनादकडून त्याच्या भावना जाणून घेतल्या. त्याला निखळ मैत्रीशिवाय काहीच नको होते. पण आता त्याला ती मैत्रीही आता नकोशी झाली होती. पण मोठ्या धीराने मी त्याला मैत्री जपून ठेव असा सल्ला दिला आणि तिला समजावून सांग असे सांगितले. त्याने तिला अगदी तसेच समजावून सांगितले. आता या समजावण्याचा काही गैर अर्थ काढायला नको, अशी भीती निनादला होती. पण सुदैवाने तसे झाले नाही. ती तात्पुरती का असेना त्यांच्यातील नाते खराब होऊ नये यासाठी समजून घ्यायला तयार झाली. पण एक मुलगीच दुसऱ्या मुलीची भावना समजू शकते. म्हणूनच निनादला वेळ देणं हेच त्यावेळी मला योग्य वाटलं. काही दिवस त्याच्याशी या विषयाबाबत बोलणे कमी केले. त्याला त्याच्या कामाकडे लक्ष देण्यासाठी जास्त प्रवृत्त केले.
निनादला वेळ देताना त्याला आमच्यात दुरावा आला असे वाटू लागले. पण प्रत्यक्षात त्याने त्याच्या मनाची झालेली घालमेल थांबवावी आणि योग्य निर्णय घ्यावा असेच मला वाटत होते. याला साधारण आठवडा लोटला. आमचे बोलणे पूर्वी सारखे होत नव्हते. आमच्या बोलण्यात एक तणाव होता. तो दोघांना जाणवत असला तरी नात्यात आलेली हा दुरावा आम्हाला कायमचा दूर करायचा होता. अनेक विनवण्या करुन निनादने अखेर मोनिकाला फोन केला. आणि त्याने मैत्रीशिवाय आपल्यात कधीच काही होणार नाही हे स्पष्ट केले.शिवाय माझ्या वागण्यातून तुला काही गैरसमज झाले त्याबद्दल मी माफी मागतो म्हणत त्याने तिचे म्हणणे ऐकून फोन ठेऊन दिला. सुटकेचा नि: श्वास सोडून निनादने माझ्याकडे पाहिले आणि मला एक मिठी मारली. तिढा सुटला होता.
virgin असाल तर तुम्हाला या गोष्टी जाणून घेण्याची गरज
तुम्हाला काय वाटतं मृणाल जसं वागली. ज्या समजूतदारपणे तिने नात्यातला हा तिढा सोडवला. अगदी तसाच तुम्ही देखील तुमच्या नात्यातील तिढा सोडवू शकता. प्रत्येकवेळी नात्यात तिसरा आल्यानंतर तुमचे नाते संपणार हा विचार करायची काहीच गरज नाही. तुमचा तुमच्या प्रेमावरचा विश्वास असण्याची गरज असते नाही का?