कोणत्याही लग्नात अथवा घरच्या कार्यक्रमात आपलं कपड्यांमध्ये प्राधान्य असतं ते साडी. साडी नेसण्यासाठी असे कार्यक्रम खूपच महत्त्वाचे असतात. साडी असली तरी आपल्याला ग्लॅमरस दिसायचं असतं. त्यामुळे त्यासाठी फक्त साडी सुंदर असणं गरजेचं नाही तर त्याबरोबर तुम्हाला हवेत साडीला शोभून दिसणारे ब्लाऊज. साडीबरोबर तुमचे ब्लाऊजही तितकेच ट्रेंडी आणि स्टायलिश असणं महत्त्वाचं आहे. पण तुम्हाला जर कळत नसेल की, नक्की कोणत्या साडीवर कोणता ब्लाऊज चांगला दिसेल आणि स्टायलिश दिसेल तर त्यासाठी आम्ही काही Sexy आणि स्टायलिश ब्लाऊज बद्दल तुम्हाला सांगणार आहोत. तुम्ही तुमच्या पारंपरिक साडीमध्येही या कट्स ब्लाऊजसह तितक्याच ग्लॅमरस दिसू शकता. मग अगदी घरचा कार्यक्रम असो अथवा कॉलेजमधील कोणताही विशेष समारंभ.
1. फुल स्लीव्ह्ज (Full Sleeves)
फुल स्लीव्ह्ज शनील ब्लाऊज हा एक खूपच चांगला प्रकार आहे. तुम्ही या प्रकारच्या ब्लाऊजवर तुमच्या आवडीची रंगसंगती आणि एम्ब्रॉयड्रीदेखील करू शकता. कोणत्याही मॅचिंगच्या टेन्शनशिवाय सिल्क अथवा क्रेप कोणत्याही साडीवर तुम्ही असा ब्लाऊज घालू शकता. तुम्हाला असा ब्लाऊज वेगळाच लुक मिळवून देईल.
2. फिटेड लाँग कोटी ब्लाऊज (Fitted Long Koti Blouse)
या ब्लाऊजसह तुम्हाला तुमच्या लुकला बुस्ट करावं लागेल. या ब्लाऊजसाठी कट्स आणि फिटिंग दोन्ही योग्य असणं अत्यंत गरजेचं आहे. अन्यथा तुमचा लुक बिघडू शकतो. त्यामुळे तुम्ही जर असा ब्लाऊज वापरणार असाल तर त्यासाठी तुम्ही माप योग्य द्यायला हवं.
3. शिमर ब्लाऊज (Shimmer Blouse)
या ब्लाऊजकडे लगेचच लक्ष वेधलं जातं. या ब्लाऊजमुळे प्रत्येक महिला खूपच सुंदर दिसते. कारण हा ब्लाऊज अतिशय आकर्षक दिसतो. तुम्ही तुमच्या लुक आणि स्टाईलनुसार शिमर ब्लाऊज अगदी सहजतेने घालू शकता. फक्त उन्हाळ्यात या ब्लाऊजमध्ये जास्त गरम होतं त्यामुळे जर कार्यक्रम उन्हाळ्यात असेल तर विचारपूर्वक ब्लाऊज निवडा आणि हिवाळ्यात असल्यास, तर प्रश्नच नाही. पण शिमर ब्लाऊज कधीही तुमची निराश होऊ देणार नाही. तुम्हाला नेहमीच आकर्षक लुक देईल.
4. फुल स्लीव्ह्ज विथ नेट एम्ब्रॉयडरी (Full Sleeves with Net Embroidery)
शनील, वेलवेट आणि शिमर कोणत्याही फॅब्रिकसह तुम्ही फुल स्लीव्ह्ज लाऊन हा ब्लाऊज तयार करून घेऊ शकता. यावर तुम्हाला सितारा वर्क करायचं आहे किंवा त्यावर एम्ब्रॉयडरी करून घ्यायची आहे हे तुम्ही स्वतः ठरवायचं आहे.
5. चोळी ब्लाऊज (Choli Blouse)
चोळी ब्लाऊजला ग्लॅमरस लुक देण्यासाठी तुम्ही एक गोष्ट नक्की करू शकता ती म्हणजे शिमरची चोळी आणि वेलवेटचे स्लीव्ह्ज. यावर तुम्हाला प्लेन ठेवायचं आहे की, वर्क करून घ्यायचं आहे तुम्हालाच ठरवायचं आहे. कारण प्रत्येक मुलीची आवड ही वेगळी असते. पण विश्वास ठेवा तुम्ही असा ब्लाऊज वापरल्यास, तुम्ही सगळ्याचं लक्ष नक्की वेधून घ्याल.
6. हाफ स्लीव्ह्ज (Half Sleeves)
उन्हाळ्याच्या दिवसात कोणत्याही कार्यक्रमाला जायचं म्हणजे आधी आपण शोधतो ए.सी. हॉल आहे की, नाही मगच ठरवतो साडी नेसायची की नाही. पण अशा वेळी तुम्ही हाफ स्लीव्ह्ज ब्लाऊजचा वापर करू शकता. पण यामध्ये थोडा लो बॅक ब्लाऊज ठेवल्यास, तुमच्या साडीची शोभा हा ब्लाऊज अधिक वाढवतो.
7. क्रोशिया (Crochet)
क्रोशिया फ्रंट ओपन कोटी तुम्ही तुमच्या ब्लाऊजवर पण कॅरी करू शकता आणि नुसतीदेखील. फक्त हा ब्लाऊज तुम्ही थंडीच्या दिवसामध्ये घातला तर तुम्हाला जास्त चांगला दिसेल. कारण उन्हाळ्याच्या दिवसात तुम्हाला यामध्ये जास्त गरम होईल. पण यामुळे तुम्ही नेसलेल्या साडीला शोभा येईल.
फोटो सौजन्य – Instagram
हेदेखील वाचा –
पाहा.. साडी किंवा पार्टी ड्रेससाठी टॉप 10 ट्रेंडी स्टायलिश ब्लाऊज बॅक डिझाईन्स
फॅशन – लग्न आणि रितीरिवाजांसाठी बेस्ट 41 वेडिंग ड्रेसेस
साडीचे नव्या ट्रेंडमधील 5 प्रकार – कशी नेसावी साडी