ADVERTISEMENT
home / DIY लाईफ हॅक्स
कानांचा मसाज करुन काहीच मिनिटात घालवा तुमचा stress

कानांचा मसाज करुन काहीच मिनिटात घालवा तुमचा stress

हल्ली आयुष्य इतकं धकाधकीचं झालं आहे की, stress free होण्यासाठी आपण अनेक गोष्टी करत असतो. मसाज हा त्यापैकीच एक आहे. ज्यांना मसाज परवडतो ते मसाज पार्लरमध्ये जाऊन मसाज घेतात. पण प्रत्येकवेळीच मसाज घेणे शक्य नसते.पण जर तुम्हाला तुमचा stress पटकन घालवायचा असेल तर तुम्ही तुमच्या कानांना मसाज करुन तुमचा stress घालवू शकता. आता हा मसाज करणे अगदी सोपे आहे. तुम्ही घरी, ऑफिसमध्ये बसल्या जागी किंवा झोपताना हा मसाज करु शकता आणि stressfree होऊ शकता. जाणून घेऊया कसा करायचा हा मसाज

5 दिवसात तुमच्याही पापण्या होतील लांब, करा हे उपाय

कानांच्या पाळीचा करा मसाज

shutterstock

ADVERTISEMENT

मसाजची सुरुवात तुम्ही तुमच्या कानांच्या पाळीपासून करु शकता. अंगठ्याने कानाची पाळी दाबा. तुम्हाला जितका दाब सहन होईल तितक्या जोराने तुम्ही कानाची पाळी दाबा. तुम्हाला कानाची पाळी दाबल्यानंतर बरे वाटेल. कानांच्या पाळीला दाबताना तो दाब हलका करत तुम्हाला तो दाब कमी करत करत बाहेर यायचे आहे. असे तुम्हाला 5 ते 10 वेळा करायचे आहे. 

*कानांच्या पाळी दुखेपर्यंत मसाज करु नका. कारण काहींच्या कानाच्या पाळी फारच पातळ असतात. 

कानांच्या पाठी करा मसाज

shutterstock

ADVERTISEMENT

कानांच्या पाळीला मसाज करुन झाल्यानंतर तुम्हाला कानांच्या पाठी मसाज करायचा आहे. कानांच्या पाठी मसाज करताना तुम्हाला कानांच्या पाठीमागे मसाज करायचा आहे. तुमच्या तर्जनीने तुम्हाला तुमच्या कानांमागे मसाज करायचा आहे. हा मसाज केल्यानंतर तुम्हाला अगदी रिलॅक्स झाल्यासारखे वाटेल. हेडमसाज करताना अनेकवेळा या तुमच्या कानांच्या पाठीमागे असाच मसाज केला जातो. 

पार्लरमध्ये फेशिअल करताना आवर्जून असा मसाज केला जातो. त्यावेळीही तुम्हाला हा मसाज केल्यानंतर रिलॅक्स वाटते. झोपही येते.

आरोग्यासंबंधित ‘हे’ 10 फॅक्ट्स माहीत आहेत का – Facts About Health

कान ओढा

ADVERTISEMENT

shutterstock

कानांच्या मसाजमध्ये  कान ओढणे हा प्रकारदेखील येतो. वरील दोन मसाज तुम्ही केल्यानंतर तुम्हाला हा मसाज तर करायलाच हवा. तुम्हाला तुमचे कान हळूहळू ओढायचे आहे. त्यामुळे तुम्हाला थोडासा ताण जाणवेल. त्यामुळे कान ओढताना अगदी अलगदपणे ओढा. कारण कान ओढताना तो दुखावला जाता कामा नये. जर तुम्हाला हे करणं शक्य नसेल तर तुम्ही हा पर्याय टाळू शकता. त्या ऐवजी तुम्ही कानांच्या कडा दाबू शकता.

कान चोळा

shutterstock

ADVERTISEMENT

कानांचा मसाज करुन झाल्यानंतर तुम्हाला थोडं आणखी रिलॅक्स व्हायचे असेल तर तुम्ही तुमचा कान चोळा. कान चोळताना अंगठा कानाच्या मागे तर्जनी दुमडून कानाला मसाज करुन घ्या. तुम्हाला आणखी शांत वाटेल. तुम्ही ऑफिसमध्ये बसल्याजागी अशाप्रकारचा मसाज करु शकता.

हा ही होईल फायदा

  • कानांचा मसाज केल्यामुळे तुमच्या कानातील मळ निघण्यास मदत होते.  
  • डोकेदुखी, थकवा असे काही तुम्हाला जाणवत असेल तर कानांचा मसाज केल्यामुळे ते कमी होते. 
  • जर तुम्हाला मायग्रेनचा त्रास असेल तर तुम्ही शांतपणे मसाज केला तर तुम्हाला बरं वाटेल.
  • रक्ताभिसरण क्रिया देखील कानांचा मसाज केल्यामुळे सुधारते.
  • कानांसोबतच तुमच्या चेहऱ्यालाही या मसाजमुळे आराम मिळतो.

Flat Belly हवी आहे, तर मग आजपासूनच ट्राय करा हे 5 Detox Drinks

23 Jul 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT