जाड आयब्रोज आणि लांब पापण्या आवडत नाही असे फारच कमी असतील. डोळ्यांकडील भाग जितका आकर्षक असतो तितका तो अधिक चांगला दिसतो. म्हणूनच आज आपण पापण्या लांब कशा कराच्या ते पाहणार आहोत. म्हणजे अगदी 5 दिवसात तुम्ही तुमच्या पापण्या लांब आणि जाड करु शकता. अगदी घरच्या घरी तुम्हाला तुमच्या पापण्या जाड करता येतील.
अनेकांच्या पापण्या लांब जन्मत:च लांब आणि जाड असतात. तर काहींना अगदी नावाला पापण्या असतात. पण पापण्या म्हणजे केसच आहेत. त्या तुम्हाला अगदी कधीही वाढवता येऊ शकतात. आता पापण्यांची ही वाढ प्रत्येकांच्या केसांच्या वाढीवर अवलंबून आहे. काहींच्या पापण्या अगदी 3 ते 4 दिवसातही वाढतात.तर काहींच्या पापण्या वाढायला आठवडाही लागू शकतो. त्यामुळे ही वाढ प्रत्येकावर अवलंबून आहे. पण हे उपाय नक्कीच कामी येतील यात काही शंका नाही.
पापण्यांच्या वाढीवर ऑलिव्ह ऑईल अगदी बेस्ट आहे. रात्री झोपताना तुम्हाला कॉटन बड्सचे टोक या तेलात बुडवायचे आहे. डोळा अलगद हाताने वर करुन तुम्हाला आतल्या बाजूने ऑलिव्ह ऑईल लावायचे आहे. डोळ्यांच्या खाली आणि वर तुम्हाला दोन्ही बाजूने हे तेल लावायचे आहे.
ऑलिव्ह ऑईल लावायला जड असते. त्यामुळे ते अगदी थोडेच लावा. सकाळी उठल्यानंतर तुम्हाला तुमचे डोळे जड वाटतील. त्यामुळे सकाळी उठल्या उठल्या तुम्ही मेकअप क्लिनझरने तुम्ही तुमचे डोळे स्वच्छ करुन घ्या.
नारळाचे तेल केसांवरील उत्तम उपाय आहे. प्रत्येकाच्या घरात ते सहज उपलब्ध असते. जर तुम्हाला तेलाचा त्रास होत नसेल तर तुम्ही नारळाचे तेल कोमट करुन तुमच्या डोळ्याभोवती फिरवून मसाज करा.जर तुमचा चेहरा तेलकट प्रकारातील असेल तर मात्र तुम्ही कापसाने किंवा बड्सने तुमच्या पापण्यांना खोबरेल तेल लावा.ऑलिव्ह ऑईलच्या तुलनेत हे तेल पातळ असते.त्यामुळे हे काढताना त्रास होत नाही. तुमच्याकडे घरी काढलेलं नारळाचं तेल असेल तर फारच उत्तम
जर तुम्हाला वरील कोणतेही तेल वापरायचे नसेल तर तुम्ही बेबी ऑईलचा पर्यायदेखील निवडू शकता. बेबी ऑईल लावायला फारच सोपे असते. तुम्हाला रात्रीच बेबी ऑईल तुमच्या पापण्यांना लावायचे आहे. या तेलाचे कोणतेही दुष्परिणाम नाही. उलट त्यामुळे तुमच्या चेहऱ्याला आवश्यक असलेले व्हिटॅमिन मिळते. त्यामुळे तुम्ही हे लावल्यास काहीच हरकत नाही.
व्हिटॅमिन E ऑईलचे टॅबलेट बाजारात मिळतात. हे तेलही केसांसाठी फार चांगले असते. त्यामुळे तुम्ही याचा वापर देखील करु शकता. रात्री झोपताना तुम्ही तुमच्या पापण्यांना हे तेल लावा. त्यामुळे तुमच्या पापण्या वाढतील.
जर तुम्हाला तेल लावायचे नसेल तर तुमच्यासाठी अगदी सोपा पर्याय म्हणजे कापसाचा बोळा. अगदी फावल्या वेळात तुम्हाला तुमच्या पापण्यांवरुन कापसाचा बोळा किंवा इअर बड्स विरुद्ध दिशेला फिरवायचे आहे. कापसाच्या बोळ्यामुळे तुमच्या पापण्यांना एक वेगळा आकार येतो. त्या पापण्या मोठ्या दिसू लागतात.
Kitchen Tips : पावसाळ्यात मसाले खराब होऊ नये म्हणून घ्या ही काळजी