मुंबईचे कौतुक करावे तितके कमीच आहे. वेगवेगळ्या कारणांसाठी मुंबईत लोक येत असतात. काहीजण पोटाची खळगी भरण्यासाठी तर काही जण प्रसिद्धी मिळवण्यासाठी मुंबईकडे येतात. मुंबई ही मायानगरी नावाने ओळखली जाते. अनेक कलाकारांचे करिअर या मायानगरीने घडवले आहे. त्यांना ओळख मिळवून दिली आहे. आज मुंबईत अशाच कलाकारांचा दबदबा आहे. मुंबईतील या कलाकारांची मोठी मोठी घरे आता मुंबईत येणाऱ्या पर्यटकांसाठी आकर्षणाचा विषय झाले आहेत. आज आपण अशाच काही सेलिब्रिटींची मुंबईतील घरं पाहणार आहोत. हे असे सेलिब्रिटी आहेत. ज्यांनी आपला दबदबा बॉलीवूडमध्ये निर्माण केला आहेच. पण त्यांचे आलिशान घर पाहण्यासाठी लोकांची त्यांच्या घराबाहेर गर्दी असते. तुम्ही मुंबईत येणारा आहाता आणि तुम्हाला मुंबईतील सेलिब्रिटींची घरे पाहायची असतील तर आम्ही तुमच्यासाठी त्यांच्या घरांची नावं,पत्ते आणि वैशिष्ट एकत्र केले आहेत.
मुंबईत राहणाऱ्या बॉलीवूड अभिनेत्यांच्या घराची नावं आणि पत्ते (Bollywood Celebrity Living In Mumbai, House Name And Address)
1.अमिताभ बच्चन ( Amithabh Bachchan)
बॉलीवूडमध्ये सगळ्यात आधी ज्यांचं नाव घेतलं जातं ते म्हणजे बीग बी अमिताभ बच्चन यांचे. शहनशाह अमिताभ बच्चन यांचे मुंबईमध्ये खूप मोठे घर आहे. आजही ते त्यांच्या घराबाहेर येऊन फॅन्सना भेटतात. त्यांच्या बंगल्याबाहेर म्हणूनच त्यांच्या फॅन्सची गर्दी असते. अमिताभ बच्चन यांनी सिनेजगताला भरपूर काही दिले आहे. अपयशापासून सुरुवात करत त्यांनी अनेक हिट चित्रपट दिले आहेत. शोले, कुली, सूर्यवंशी, डॉन, सुहाग,दिवार, कभी खुशी कभी गम, अग्निपथ, बदला, पा अशा कित्येक चित्रपटांची नावे घेता येतील.
*घराचे नाव (House name): जलसा, प्रतिक्षा
*पत्ता (Address): B/2, कपोल हाऊसिंग सोसायटी, वी. एल. मेहता रोड, जुहू, मुंबई- 400049
*घराचे वैशिष्टय(House description):अमिताभ बच्चन यांचे जुहूमध्ये जलसा आणि प्रतिक्षा हे दोन बंगले आहेत. जलसामध्ये ते राहतात. त्यांचा जलसा हा बंगला 5स्टार हॉटेलपेक्षा कमी नाही. हा बंगला 10 हजार125 स्केवअर फुटाचा असून याचे इंटेरिअरही खास आहे. हे घर जया बच्चन यांच्या नावावर आहे. हा बंगला रमेश सिप्पी यांनी अमिताभ बच्चन यांना भेट म्हणून दिला. ‘सत्ते पे सत्ता’ या चित्रपटात काम केल्याबद्दल त्यांनी हा बंगला अमिताभ यांना दिला होता. अमिताभ यांनी नुकताच या बंगल्याशेजारी असलेली जागाही विकत घेतली आहे.
*घराची किंमत (Price (approx)): 160 कोटींच्या घरात
2. शाहरुख खान (Shaharukh Khan)
अमिताभ बच्चन यांच्यानंतर जर कोणाचं नाव घेतलं जातं असेल तर किंग खान शाहरुख खानचं. शाहरुख खान मुळचा दिल्लीचा असून त्याने केवळ चित्रपटात काम करण्यासाठी राहतं घर सोडून मुंबई गाठली. तो आला त्याने पाहिलं आणि त्याने जिंकलं. ‘दिलवाले दुल्हनया ले जाएंगे’, ‘मोहब्बते’, ‘दिल तो पागल है’, डर, ‘कुछ कुछ होता है’ असे त्याचे काही गाजलेले चित्रपट आहेत.
*घराचे नाव (House name): मन्नत
*पत्ता (Address): HWG/ 181/1,कार्टर रोड, पालिका पंपिंग हाऊस, वांद्रे (प.), मुंबई- 400050
*घराचे वैशिष्टय (House description): शाहरुख खान याचा वांद्रे येथील ‘मन्नत’ हा बंगला फारच प्रसिद्ध आहे. 1995 साली हा बंगला शाहरुखने विकत घेतला. या बंगल्याचे त्याने मन्नतमध्ये रुपांतर केले. शाहरुखचा बंगला हा सगळ्या आधुनिक गोष्टींनी युक्त आहे. दोन मजले लिव्हिंग रुम, स्टोरी टेलिंगसाठी स्वतंत्र रुम, मुलांना खेळण्यासाठी फ्लोअर, जीम आणि प्रश्स्त किचन आणि प्रशस्त बेडरुम असा त्याचा हा बंगला आहे. या बंगल्यामध्ये शाहरुखचे ऑफिससुद्धा आहे.
*घराची किंमत (Price (approx)): 200 कोटींहून अधिक
घरीच फ्रेंच मेनिक्युअर करण्यासाठी फॉलो करा या सोप्या टिप्स
3. सलमान खान (Salman Khan)
बॉलीवूडमधील आणखी एक खान म्हणजे सलमान खान. दबंग खान सलमान खाननेसुद्धा बॉलीवूडला अनेक चांगले चित्रपट दिले आहेत. हम दिल दे चुके सनम, हम आपके है कौन,जुडवा, मैने प्यार किया, जुडवा,टायगर,रेडी, ट्युबलाईट, टायगर जिंदा है, प्यार किया तो डरना क्या, गर्व, दबंग असे काही चित्रपट त्याने केले आहेत.
*घराचे नाव (House name): गॅलक्सी अपार्टमेंट
*पत्ता (Address): गॅलक्सी अपार्टमेंट,BJ रोड, बँडस्टँड, वांद्रे( प) मुंबई- 400050
*घराचे वैशिष्ट्य (House description): सलमान खान या घरात गेल्या 40 वर्षांपासून राहत आहे. सलमान खान या घरात त्याच्या कुटुंबासोबत राहतो. सलमान तळमजल्यावरील घरात राहतो. सलमानचे लिव्हिंग रुम हे L आकारातील आहे. या ठिकाणी बेडरुम आणि लॅवीश किचन आहे.
*घराची किंमत (Price (approx)): साधारण 60 कोटी
4.आमीर खान (Aamir Khan)
मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून आमीर खानचे ना घेतले जाते. आमीर खानने अनेक चित्रपटांतून उत्तम कला सादर केली आहे. बॉलीवूडमध्ये तीन खानांचे नाव आवर्जून घेतले जाते. त्यापैकी आमीर खान एक आहे. आमीर खानने अंदाज अपना अपना, हम हे राही प्यार के, दिल चाहता है, गजनी, 3 इडियट्स, जो जिता वही सिकंदर मंगल पांडे अशा चित्रपटांमधून काम केली आहेत.
*घराचे नाव (House name):फ्रिदा अपार्टमेंट
*पत्ता (Address): फ्रिदा अपार्टमेंट, कार्टर रोड, वांद्रे (पश्चिम),मुंबई 400050
*घराचे वैशिष्टय (House description): आमीर खानचे हे घर 5 हजार चौ. फुट इतके मोठे आहे. आमीर खानच्या घराचे इंटेरिअर अनुराधा पारेख यांनी केले आहे. आमीर खानला साधेपणा आवडतो. म्हणूनच त्याचे घरह अगदी साधे पण तितकेच सुंदर आहे. आमीर खानच्या या प्रशस्त घरात सगळ्या सुविधा आहेत.
*घराची किंमत (Price (approx)): 60 कोटींच्या पुढे
5.राजेश खन्ना (Rajesh Khanna)
80 च्या काळातील प्रसिद्ध अभिनेता म्हणजे राजेश खन्ना… राजेश खन्ना यांना काका देखील म्हटले जात. राजेश खन्ना हे त्याकाळातील सुपरस्टार होते. त्यांनी अनेक हिट चित्रपट केले आहेत. हाथी, अमरप्रेम, आराधना, आनंद, रोटी असे काही त्यांचे गाजलेले चित्रपट आहे.
*घराचे नाव (House name): आशीर्वाद
*पत्ता (Address): कार्टर रोड, मुंबई
*घराचे वैशिष्ट्य (House description):राजेश खन्नाचा हा बंगला आयकॉनिक बंगला म्हणून ओळखला जातो. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या या बंगल्याच्या हक्कावरुन अनेक वादही झाले. हा बंगला एका व्यावसायिकाला 90 कोटी रुपयांना विकण्याता आला.
*घराची किंमत (Price (approx)): 100 किंवा त्याहून अधिक
तुला पाहते रे मालिकेचा असा असेल शेवट, शनिवारी मालिका घेणार निरोप
6.अक्षय कुमार (Akshay Kumar)
खिलाडी अक्षय कुमारही या क्षेत्रात फार नावाजलेलेा आहे. त्याने अनेक उत्तम चित्रपट केले आहेत. अक्षय कुमारने अनेक हिट चित्रपट दिले आहेत. नुकताच तो सारागढीच्या युद्धावर आधारीत असलेल्या केसरी या चित्रपटात दिसला होता. आता त्याता सूर्यवंशी हा चित्रपट लवकरच फ्लोअरवर येणार आहे.
*घराचे नाव (House name): प्राईम बीच बिल्डींग
*पत्ता (Address): प्राईम बीच, जुहू बीच, मुंबई
*घराचे वैशिष्ट्य (House description): अक्षय कुमारचे जुहू मधील घर मोठे असून या इमारतीत ह्रतिक रोशनही राहतो. सी फेसिंग असलेले हे घर रॉयल आहे.
*घराची किंमत (Price (approx)): अंदाजे 80 कोटी
त्या मोटरमनचं नेमकं चुकलं काय?,नेचर्स कॉल कोणीच चुकवू शकत नाही
7. अनिल कपूर (Anil Kapoor)
बॉलीवूडचा चिरतरुण अभिनेता अनिल कपूर याने अनेक चित्रपटातून पुढे येत स्वत:ला सिद्ध केले आहे. आजही अनेक चित्रपटातील त्यांच्या भूमिका या वाखणण्यासारख्या असतात. आजही त्यांच्यातील एनर्जी पाहून ते किती तरुण आहेत याचा अंदाज येतो.
*घराचे नाव (House name): श्रीनगर रेसिडन्सी सोसायटी
*पत्ता (Address): 31, श्रीनगर रेसिडन्सी सोसायटी, नॉर्थ साऊथ रोड क्रमांक 7, JVPD रोड, मुंबई
*घराचे वैशिष्टय (House description): अनिल कपूर यांचे घर त्यांची पत्नी सुनिता कपूर यांनी डीझाईन केलेले आहे. घर शांत आणि प्रसन्न वाटावं असं त्याचं इंटेरिअर करण्यात आले आहे. या घरात अनिल कपूर यांचे संपूर्ण कुटुंब राहते.
*घराची किंमत (Price (approx)): 50 ते 60 कोटींच्या घरात
8.सैफ अली खान (Saif Ali Khan)
छोटे नवाब म्हणून ओळखला जाणारा सैफ अली खानही काही कमी नाहीए. पतौडी खानदानातील सैफ जन्मत:च सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आला आहे. दिल चाहता है, सलाम नमस्ते. सेक्रेड गेम्स यामधील त्याचे काम वाखाणण्यासारखे आहे.
*घराचे नाव (House name):फॉर्च्युन हाईट्स
*पत्ता (Address): फॉर्च्युन हाईट्स, वांद्रे (पश्चिम)
*घराचे वैशिष्टय (House description): सैफ अली खानचा बिल्डींगमध्ये फोर प्लेक्स घर आहे. म्हणजे चार मजले हे त्याचे आहेत. करिना कपूरसोबत तो या घरात राहतो.
*घराची किंमत (Price (approx)): साधारण 55 कोटी
9.रणबीर कपूर (Ranbir Kapoor)
रणबीर कपूर हा नीतू सिंह आणि ऋषी कपूर यांचा मुलगा आहे. बॉलीवूडमध्ये त्याने आपली ओळख सिद्ध केली आहे. त्याने अनेक चित्रपटांमधून काम केली आहेत. त्याच्या बॉलीवूड करिअरपेक्षाही तो अफेअर्ससाठी जास्त चर्चेत राहिला आहे. तो सध्या त्याच्या आई-वडिलांसोबत या घरात राहतो.
*घराचे नाव (House name): वास्तू
*घराचा पत्ता (Address): पाली हिल, वांद्रे (पश्चिम)
*घराचे वैशिष्टय (House description): रणबीर कपूर त्याच्या आई-वडिलांसोबत राहायचा. पण तो आता पाली हिलमधील वास्तू या बिल्डींगमध्ये राहतो.कतरिनासोबत नात्यात असताना तो घरात शिफ्ट झाला
*घराची किंमत (Price (approx)): साधारण 50 कोटी
10.संजय दत्त (Sanjay Dutta)
संजय दत्तने त्याच्या आयुष्यात अनेक चढ- उतार पाहिलेले आहेत. त्याने अनेक चांगले चित्रपट केले आहेत. त्याची मुन्नाभाई मधील भूमिका चांगलीच गाजली. त्याने अभिनेत्री मान्यता दत्तसोबत तिसरे लग्न केले असून त्याला तिच्यापासून त्याला एक मुलगा आणि एकम मुलगी आहे.
* घराचे नाव (House name): इंपेरियल हाईट्स
*घराचा पत्ता( Address): नरगीस दत्त रोड, पाली हिल, वांद्रे
*घराचे वैशिष्टय (House description): संजय दत्तचे घर आलिशान असून या अपार्टमेंटमधील त्याचे घर छान सजवण्यात आले आहे. या घरात तो त्याची बायको मान्यता दत्त हिच्यासोबत राहतो.
*घराची किंमत Price (approx): साधारण 30 कोटी
11.जॉन अब्राहम (John Abraham)
बाईक प्रेमी आणि अॅडव्हेचर्स अॅक्टर म्हणून जॉन अब्राहमची ओळख आहे. नुकताच तो ‘अकबर, वॉल्टर, रॉबर्ट’ या चित्रपटात दिसला होता. त्याचे घरही अगदी वेगळे आणि खास आहे.
*घराचे नाव (House name): व्हिला इन द स्काय (नव्या घराचे नाव)
*घराचा पत्ता (Address): 7 वा आणि 8 वा मजला, रेसिडेन्शिअल कॉम्प्लेक्स, वांद्रे (पश्चिम)
303, VIP प्लाझा, वीरा इंडस्ट्रीयल इस्टेट, ऑफ अंधेरी लिंक रोड, अंधेरी (पश्चिम) मुंबई -400053
*घराचे वैशिष्टय (House description): जॉन अब्राहम नुकताच या घरी राहायला आला आहे. या घराचा एक व्हिडिओ देखील समोर आला होता. त्याचे घर अनेक आधुनिक सुविधांनी सज्ज आहे. 4 हजार स्केअर फुटाचा त्यांचे हे पेंटहाऊस असून हा पेंटहाऊस त्याच्या भावानेच डीझाईन केला आहे.
*घराची किंमत Price (approx): 60 कोटी
12. रणवीर सिंह (Ranveer Singh)
सध्याच्या घडीला रणवीर हा आघाडीचा अभिनेता आहे. त्याने सध्या बॅक टू बॅक असे हिट चित्रपट दिलेले आहेत. सध्या 83 या वर्ल्ड कपवर आधारीत असलेल्या चित्रपटाची तयारी करत आहे. रणवीर सिंह काहीच महिन्यांपूर्वी आघाडीची अभिनेत्री दिपिका पदुकोणसोबत विवाहबंधनात अडकला आहे.
*घराचे नाव (House name): ब्ले मोंडे
*घराचा पत्ता (Address): ब्लू मोंडे, प्रभादेवी, मुंबई
*घराचा पत्ता (House description): रणवीर आधी त्याच्या पालकांसोबत वांद्रे येथे राहत होता. पण तो आाता दीपिकाच्या घरी शिफ्ट झाला आहे. ती या इमारतीच्या टॉप फ्लोअरवर राहते.
*घराची किंमत (Price (approx)): 50 कोटी
13. शाहीद कपूर (Shahid Kapoor)
कबीर सिंह शाहीद कपूरही सध्या यशाच्या वेगळ्या उंचीवर आहे. पद्मावत या चित्रपटात त्याच्या अभिनयाची एक वेगळी झलक पाहायला मिळाली.त्यामुळे शाहीद कपूरचे सध्या अच्छे दिन आहेत असे म्हणायला हवे.
घराचे नाव (House name): थ्री सिक्स्टी वेस्ट
घराचा पत्ता (Address): वांद्रे-वरळी सी लिंक
घराचे वैशिष्ट्य (House description): शाहीद आणि मीराला अलिप्त राहायला आवडते. त्यांनी त्यांच्या घराचे इंटेरिअरही अगदी तसेच केले आहे. तब्बल 8 हजार स्क्वेअर फुटाचे हे घर असून या घरात सगळ्या गोष्टी आहेत. नुकताच तो या घरात शिफ्ट झाला आहे.
घराची किंमत (Price (approx)): अंदाजित 56 कोटी
14.अजय देवगण (Ajay Devgan)
अजय देवगण गेली कित्येक वर्ष इंडस्ट्रीमध्ये असून त्याने अनेक चांगले चित्रपट केले आहेत. नुकताच आलेला त्याचा रेड, टोटल धमाल आणि दे-दे प्यार दे हा चित्रपट चांगलाच गाजला.
*घराचे नाव (House name):शिवशक्ती
*घराचा पत्ता (Address): ⅚,शीतल अपार्टमेंट, तळमजला, चंदन सिनेमाच्या समोर, जुहू, मुंबई
*घराचे वैशिष्ट्य (House description): अजय देवगण याचे घर हे जुने आहे.त्याच्या घरात अनेक सोयी-सुविधा आहेत. आपल्या कुटुंबियांसोबत तो या घरात राहतो.
*घराची किंमत (Price (approx)): 40 ते 50 कोटी
बॉलीवूड अभिनेत्रीच्या घरांची नावं आणि पत्ते ( Bollywood Actress Living In Mumbai, House Name,Address)
1. जॅकलीन फर्नांडीस (Jacqueline Fernandez)
जॅकलीन फर्नांडीस ही श्रीलंकन ब्युटी बॉलीवूडमध्ये चांगलीच चर्चेत आहे. तिच्या अभिनयापेक्षा तिचा फिटनेस अनेकांना जास्त प्रेरणा देणारा वाटतो. ती मिस युनिव्हर्स असून तिने बॉलीवूडमधील ट्युबलाईट, कीक, जुडवा, मर्डर2 या चित्रपटात तिने काम केली आहेत.
*घराचे नाव (House name):कोणतीही माहिती नाही
*घराचा पत्ता (Address): वांद्रे, मुंबई
*घराचे वैशिष्ट्य (House description): जॅकलीनचे मुंबईमधील हाऊस हे मिनी पॅरिस म्हणून ओळखले जाते. आशिष शहा यांनी तिच्या घराचे इंटेरिअर केले असून तिच्या घराचा प्रत्येक कोपरा तिच्या आठवणींनी सजला आहे.
*घराची किंमत (Price (approx)): साधारण 30 ते 40 कोटी
2.शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty)
बाजीगर या चित्रपटातून शिल्पा शेट्टीने तिच्या करिअरला सुरुवात केली.त्यानंतर तिने अनेक चांगल्या चित्रपटातून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे.सध्या ती अनेक रिअॅलिटी शो मध्ये जज म्हणून कामही पाहत आहे. तिने बिझनेसमॅन राज कुंद्रा याच्याशी लग्न केले. तिला एक मुलगा असून ती मुंबईत राहते.
*घराचे नाव (House name): किनारा
घराचा पत्ता (Address):
*घराचे वैशिष्टय (House description):शिल्पा शेट्टी हिचा बंगला जुहू येथे आहे. तिचे घर आलीशान असून तिने तिचे घर स्वत:सजवले आहे. जगभ्रमंती करताना तिला जिथे काही नव्या वस्तू मिळाल्या त्याचा उपयोग तिने घरसजावटीसाठी केला आहे.तिला अॅनिमल प्रिंटची आवड असल्यामुळे तिच्या घरात या गोष्टींचा उपयोग करण्यात आला आहे.
घराची किंमत (Price (approx)): 100 कोटींच्या पुढे
3.हेमा मालिनी (Hema Malini )
हेमा मालिनी यांची ओळख कोणालाच करुन द्यायची गरज नाही. ड्रिम गर्ल म्हणून त्यांना ओळखले जाते. सीता और गीता, शोले, ज्वेल थीफ, घरजमाई अशा चित्रपटांमधून त्यांनी काम केलेली आहेत. त्यांनी सुपरस्टार धर्मेंद्र यांच्यासोबत लग्न केले. त्यांना ईशा आणि आहान या दोन मुली आहेत.
*घराचे नाव (House name): गोकुलधाम आणि जुहू
*घराचा पत्ताAddress: गोरेगाव, पूर्व, जुहू
घराचे वैशिष्टय (House description): हेमा मालिनी यांचा हा सुंदर बंगला गोरेगाव पूर्वेला आहे. त्यांनी हे घर वीकेंड होम म्हणून घेतले होते. या ठिकाणी धर्मेंद्र आणि हेमा मालिनीच्या अनेक आठवणी आहेत. सध्या त्या त्यांच्या जुहू येथील घरात राहतात.
*घराची किंमत (Price (approx)): साधारण 30 ते 40 कोटी
4.सुष्मिता सेन (Sushmita Sen)
मिस युनिव्हर्स म्हणून प्रसिद्ध असलेल्या सुष्मिता सेनने हिंदी चित्रपटातही आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. ती पहिली भारतीय महिला असून तिने मिस युनिव्हर्सचा किताब जिंकला आहे. मै हू ना, बीवी नंबर 1, सिर्फ तुम यासारख्या अनेक चित्रपटांमधून तिने कामं केली आहेत.
*घराचे नाव (House name): बीच क्वीन
घराचा पत्ताAddress: 6 वा मजला, बीच क्वीन, यारी रोड, वर्सोवा, अंधेरी (पश्चिम)
*घराचे वैशिष्टय (House description): सुष्मिता सेन या घरात कित्येक वर्षांपासून राहत आहे. तिच्या या घरात ती कित्येक वर्षांपासून राहत असून ती तिच्या दोन मुलींसोबत ती या ठिकाणी राहते. तिने तिच्या घरात मुलींसाठी सगळ्या अत्याधुनिक सुविधा करुन ठेवल्या आहेत. ती मूळ कोलकात्यातील असून तिने चित्रपटांमधून काम सुरु केल्यानंतर मुंबईत राहणे पसंद केले आहे.
5.विद्या बालन (Vidya Balan)
जाहिराती आणि चित्रपटांमधून काम करत विद्या बालनने आपले स्थान निर्माण केले आहे. डर्टी पिक्चर हा सिल्क स्मिताच्या आयुष्यावर गाजलेला तिचा चित्रपट खूपच गाजला. यासाठी तिला अनेक पुरस्कारही मिळाले. आता मिशन मंगल या चित्रपटात दिसणार आहे.
*घराचे नाव (House name): नाव कळू शकले नाही.
*घराचा पत्ताAddress: जुहू तारा रोड,मुंबई
*घराचे वैशिष्टय (House description): विदया बालन सध्या पती आदित्य रॉय कपूरसोबत त्याच्या जुहू येथील घरात राहते. लग्नाआधी ती चेंबूर येथे राहत होती. पण लग्नानंतर ती जुहू तारा रोड येथील एका खासगी इमारतीत राहते. 2012 साली ती या घरात राहायला आली
*घराची किंमत (Price (approx)): साधारण 30 कोटी
6.प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra)
प्रियांका चोप्रा भारताची विश्वसुंदरी . तिने बॉलीवूडमध्येही तिच्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. काहीच महिन्यांपूर्वी तिने अमेरिकन पॉप सिंगर निक जोन्ससोबत लग्न केले. सध्या ती अमेरिकेला राहत असली तरी तिचं एक घर मुंबईमधील जुहू येथे आहे.
*घराचे नाव (House name): कर्मयोग अपार्टमेंट
*घराचा पत्ता (Address): जुहू, मुंबई
*घराचे वैशिष्टय (House description): प्रियांका चोप्राचा रोका याच घरी झाला होता. हे घर डुप्लेक्स असून ती या घरात हल्लीच शिफ्ट झाली आहे. ती या आधी अंधेरी येथील घरात राहत होती.
*घराची किंमत (Price (approx)): 30 ते 40 कोटी
FAQ
बॉलीवूड सेलिब्रिटींमध्ये कोणाच्या घराची किंमत सर्वाधिक आहे.Which bollywood celebrity have most expensive house?
पाहायला गेलं तर सध्या तरी किंग खान शाहरुख खान याचे मुंबईतील घर सगळ्यात महागडे घर आहे. त्याने घरामध्ये सगळ्या सोयी-सुविधा करुन ठेवल्या आहेत.200कोटींहून अधिक त्याच्या घराची किंमत आहे. त्या खालोखाल अमिताभ बच्चन यांच्या बंगला आहे. त्यांच्या बंगल्याची किंमत 120 कोटी रुपये आहे.
मुंबई इतकी प्रसिद्ध का आहे (Why is mumbai so famous?)
मुंबईचे आकर्षण सगळ्यांनाच आहे. मुंबईचे आकर्षण मुंबईचे सेलिब्रिटी आहेत. मुंबईत त्यांची असलेली घरं ही अनेकांसाठी आकर्षण आहे. या शिवाय मुंबईमध्ये बऱ्याच गोष्टी आहेत ज्या प्रसिद्ध आहेत ते पाहण्यासाठी मुंबई प्रसिद्ध आहे.
मुंबईत सेलिब्रिटी कुठे भेटतील? (Where can we can meet bollywood celebs?)
मुंबईत अनेक कार्यक्रम सतत होत असतात या इव्हेंटमध्ये अनेकदा सेलिब्रिटी येत असतात.मुंबईतील अनेक ठिकाणी सेलिब्रिटींचे नेहमीचे येणे-जाणे असते. या शिवाय सेलिब्रिटी हे त्यांच्या फॅन्सना भेटण्यासाठी त्यांच्या घराबाहेर येतात. त्यावेळीही तुम्हाला त्यांची भेट होऊ शकते.
हायली पेड अॅक्टरमध्ये कोणत्या अॅक्टरचा समावेश होतो. (Who is the highly paid actor in Bollywood?)
सलमान खान हा हायली पेड अॅक्टर असून तो एका चित्रपटासाठी साधारण 60 कोटी घेतो. त्याखालोखाल आमीर खानचे नाव घेतले जाते.
कोणत्या बॉलीवूड सेलिब्रिटीचे घर सगळ्यात लॅविश आहे (which Bollywood celebrity have lavish home?)
शाहरुख खानचे घर हे सगळ्यात लॅविश आहे. त्याचा मन्नत हा बंगला खूप छान सजवण्यात आला आहे.या शिवाय सगळ्याच सेलिब्रिटींची घरं ही खूप खास आणि वेगळी आहेत.