ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
अपर लिप हेअर (Upper Lip Hair) पासून सुटकेसाठी करा 7 सोपे घरगुती उपाय

अपर लिप हेअर (Upper Lip Hair) पासून सुटकेसाठी करा 7 सोपे घरगुती उपाय

आपल्या ओठांच्यावर येणारे केस कोणत्याही महिलेला आवडत नाहीत. कारण दिसायला ते अतिशय खराब तर दिसतातच पण बऱ्याचदा तुमचा लुक बिघडवायला हे केस कारणीभूत असतात. पण तुम्हाला सतत थ्रेडिंग अथवा वॅक्सिंग हे पर्याय अपर लिप हेअर करण्यासाठी वापरणं अगदी कंटाळवाणं वाटतं असेल. कारण या अपर लिप्स हेअरमुळे तुमचा आत्मविश्वासही कमी होत असतो. तुम्हाला जर या केसांपासून सुटका हवी असेल आणि सतत पार्लरमध्ये जाणंही टाळायचं असेल तर आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्ही Upper Lip Hair पासून सुटका मिळवू शकता. 

अपर लिप हेअर काढून टाकण्याचे उपाय – Upper Lips Hair Removal Tips in Marathi

1. हळद पावडर आणि बेसन

Shutterstock

एक चमचा हळद पावडर आणि बेसन हे पाण्यामध्ये मिक्स करून पेस्ट करून घ्या. ही पेस्ट तुम्ही अपर लिप्सवरील नको असलेल्या केसांना लावा. ही पेस्ट जेव्हा सुकेल तेव्हा हाताने रगडून हे काढून टाका. तुम्ही नेहमी असं करत राहिलात तर तुमच्या ओठांवरील हे केस कायमचे निघून जाण्यास मदत होईल. त्यामुळे तुमचा पार्लरचाही खर्च आणि वेळ वाचेल हे लक्षात ठेवा. 

ADVERTISEMENT

2. इंडियन नेटल पानं

Shutterstock

इंडियन नेटलची पानं घेऊन पहिले धुवा आणि मिक्सरमध्ये वाटा. यामध्ये थोडी हळद मिसळा. काही तास हे वाटलेलं मिश्रण तसंच ठेवा आणि थोड्या वेळाने तुमच्या अपर लिप्सला लावा. इंडियन नेटल तुमच्या केसांना मुळापासून कमजोर करतं. त्यामुळे केस गळून जातात. काही महिने असं करत राहिल्यास, तुम्हाला नको असलेले हे अपर लिप्स हेअर कायमस्वरूपी निघून जातील. ही वनस्पती अगदी सहज मिळते. इतकंच नाही तर याच्या पानांची पावडरही तुम्हाला बाजारामध्ये मिळते. तुम्हाला पानं कुटून हे करायचं नसल्यास, तुम्ही पावडर आणूनदेखील याचा वापर करू शकता. 

3. मध आणि हळद मिश्रण

ADVERTISEMENT

Shutterstock

मध आणि हळद एकत्र करून तुम्ही हे मिश्रण अपर लिप्सला लावा आणि साधारण तुम्ही 30 मिनिट्ससाठी तसंच हे लावून ठेवा. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. असं रोज केल्यास, तुमच्या ओठांवरील नको असलेले केस निघून जातील. 

4. बीट आणि गाजर

बीट आणि गाजराचा रस एकत्र करून अपर लिप्स वरील केसांवर तुम्ही लावा. हे लावून साधारण एक मिनिट तसंच ठेवा आणि नंतर हलक्या हाताने 3 ते 4 मिनिट्स मालिश करा. त्यानंतर हे साधारण 10 मिनिट्स तसंच राहू द्या. मग तुम्ही तुमचा चेहरा धुवा. तुम्हाला लवकरच तुमच्या ओठांच्या वरच्या भागावरील फरक दिसून येईल. 

5. मध, लिंबू आणि साखर

ADVERTISEMENT

Shutterstock

मध, लिंबू रस आणि साखर घालून एक मिश्रण तयार करा. हे मिक्स्चर हलकंसं गरम करून घ्या आणि मग ओठांवर आलेल्या केसांना हे मिश्रण लावा. केसांच्या वाढीच्या दिशेने हलक्या हाताने हे लावून साधारण 15 मिनिट्सपर्यंत तुम्ही मसाज करा आणि मग धुवा. 

6. बेसन आणि दही

Shutterstock

ADVERTISEMENT

बेसन आणि दही मिसळून पेस्ट करून घ्या. ही पेस्ट तुम्ही तुमच्या ओठांच्या वरच्या भागावर आलेल्या केसांना लावा. हलकंसं सुकल्यावर ही रगडून साफ करा आणि मग धुऊन घ्या. रोज असं केल्याने तुम्ही तुमच्या ओठांंवरील केस गायब होतील. 

7. फक्त हळद

Shutterstock

तुम्ही फक्त हळदीचा पॅक बनवून आपल्या ओठांवरील केसांना लावा. हे करूनही तुम्हाला नको असलेल्या केसांपासून सुटका मिळू शकते. हळद ही तुमच्या चेहऱ्याचा रंग उजळवते. शिवाय याचा वापर उत्कृष्ट Antiseptic म्हणूनही करता येतो. तुम्ही ओठांच्या वरच्या भागाला लावा अथवा संपूर्ण चेहऱ्याला याचा परिणाम तुम्हाला चांगलाच दिसून येणार.

ADVERTISEMENT

हेदेखील वाचा – 

अप्पर लीपवरील केस काढताय, मग तुम्ही अशी घ्यायला हवी काळजी

चेहऱ्यावरील केस हटवा ‘या’ 6 घरगुती उपायांनी

केस आणि त्वचेच्या सौंदर्यासाठी दही आहे उपयुक्त

ADVERTISEMENT

 

 

 

30 Jun 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT