पावसाने जोर धरला आहे त्यामुळे सगळीकडे आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. पावसाळा आणि निसर्गरम्य परिसर सर्वांना भुरळ घातल असला तरी या दिवसांत आरोग्याप्रमाणेच त्वचेचीदेखील विशेष काळजी घेण्याची गरज असते. कारण हवामानामध्ये होणाऱ्या बदलांचा त्वचेवर परिणाम होत असतो. पावसात भिजल्यामुळे अथवा रस्त्यावरील साठलेल्या पाण्यातून फिरण्याने तुम्हाला त्वचा समस्या निर्माण होऊ शकतात. पावसात हवामानामध्ये दमटपणा वाढलेला असतो. असे वातावरण जीवजंतूसाठी पोषक असते. सहाजिकच अशा वातावरणात जंतूसंसर्ग झाल्यास तुम्हाला अंगाला खाज येणे, त्वचेवर पुरळ उठणे, पायांवर खरूज, नायटा होणे, त्वचा कोरडी आणि रूक्ष होणे अशा समस्या निर्माण होतात. यासाठीच पावसाळ्यात त्वचेची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. शिवाय यासाठी त्वचेची काळजी घेणारी सर्वात्तम उत्पादने वापरणं नक्कीच योग्य ठरेल.
पावसाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी दररोज स्किन केअर टिप्स फॉलो करण्याची गरज आहे. ज्यामुळे तुम्ही पावसाळ्यातदेखील सुंदर आणि आकर्षक दिसू शकता.
पावसाळ्यात त्वचेची काळजी घेताना नियमित क्लिंझिग करणे गरजेचे आहे. यासाठी सकाळी उठल्यावर, झोपण्यापूर्वी आणि मेकअप काढल्यावर त्वचेला क्लिंझिंग करावे. बाजारात उत्तम प्रकारचे क्लिंझिंग मिल्क उपलब्ध असतात. मात्र तुम्ही कच्चे दूध, बटाट्याचा रस, काकडीचा रस वापरून तुमची त्वचा स्वच्छ करू शकता. यासोबतच मेकअप काढण्यासाठी तुम्ही नारळाचे तेल, बदाम तेल नक्कीच वापरू शकता. क्लिंझिंग केल्यामुळे त्वचेच्या आतील छिद्रे मोकळी आणि स्वच्छ होतात. शिवाय यामुळे त्वचेवरील डेड स्किनदेखील निघून जाते. त्वचेची छिद्रे मोकळी झाल्यामुळे त्वचेला मुबलक प्रमाणात ऑक्सिजनचा पूरवठा होतो. ज्यामुळे चेहरा फ्रेश आणि नितळ दिसू लागतो.
टोनिंग केल्यामुळे तुमच्या त्वचेवर जमा झालेलं धुळ आणि प्रदूषण कमी होतं. मात्र पावसाळ्यात एखादं विकतचं टोनर वापरण्यापेक्षा घरातच ग्रीन टी, गुलाबपाणी अथवा काकडीच्या रसाने तुम्ही तुमची त्वचा टोन करू शकता. सर्वात बेस्ट टोनर म्हणजे साधं पाणी. पाण्याने त्वचा टोन करण्यासाठी एखाद्या स्प्रेच्या बाटलीत साधं पाणी घ्या आणि दिवसभरातून दोन ते तीन वेळी ते तुमच्या चेहऱ्यावर स्प्रे करा.
त्वचेची काळजी घेण्यामधील एक सर्वात महत्वाची स्टेप म्हणजे त्वचेला मॉश्चराईझर लावणं. त्वचेला नियमित मॉश्चराईझ केल्यामुळे तुमच्या त्वचेचे योग्य पोषण होते. त्वचेला देखील पोषणाची फार गरज असते. मॉश्चराईझरमुळे त्वचेमधील नैसर्गिक ओलावा कायम टिकतो. ज्यामुळे त्वचा मऊ आणि मुलायम दिसते. त्वचेला नैसर्गिक पद्धतीने मॉश्चराईध करण्यासाठी तुम्ही बदामाचे तेल अथवा ऑलिव्ह ऑईल लावू शकता. शिवाय यामुळे तुमची त्वचा तेलकट दिसणार नाही.
पावसाळ्यात वातावरण ढगाळ असलं तरी याचा अर्थ मुळीच नाही की तुमच्या त्वचेचे संरक्षण होईल. कारण या दिवसातदेखील तुमच्या त्वचेला सुर्याच्या अतीनिल किरणांचा धोका असू शकतो. यासाठीच पावसाळ्यात घराबाहेर पडताना एखादे चांगल्या दर्जाचे सनस्क्रिन लोशन जरूर लावा. ज्यामुळे तुमच्या त्वचेवर बाहेरील वातावरणाचा दुष्परिणाम होणार नाही.
पावसाळ्यातील थंड वातावरणामुळे तुमचे ओठ निस्तेज आणि कोरडे पडू शकतात. यासाठीच पावसाळ्यात ओठांना लिप बाम लावण्यास विसरू नका. नैसर्गिक पद्धतीने ओठांना मऊ ठेवण्यासाठी तुम्ही ग्लिसरीन अथवा दुधाची साय तुमच्या ओठांना लावू शकता.
पावसाळ्यात डेली रूटीन टिप्स फॉलो करण्यासोबत आणखी काही गोष्टींची काळजी घेतल्यास तुमचे सौंदर्य अधिक खुलून येऊ शकते.
पावसाळ्यात वातावरण थंड असल्यामुळे तुम्ही पाणी कमी प्रमाणात पिता. ज्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. आपलं शारीरिक कार्य सुरळीत चालण्यासाठी शरीराला मुबलक पाण्याची गरज असते. शिवाय पाण्यावाटे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकण्यास मदत होते. शरीरातील विषद्रव्ये बाहेर टाकली गेल्यामुळे तुम्हाला अॅक्ने अथवा पिंपल्सच्या समस्या होत नाहीत. यासाठी दिवसभरात कमीत कमी आठ ग्लास पाणी जरूर प्या. वातावरणातील थंडाव्यामुळे तुम्हाला पाणी पिण्याची आठवण अथवा तहान लागत नसेल तर काही ठराविक काळाचे अर्लाम लावा. ज्यामुळे तुम्ही दिवसभरात पुरेसे पाणी नक्कीच प्याल.
पावसाळ्यात तुमची त्वचा अतीशय नाजूक आणि संवेदनशील होऊ शकते. म्हणूनच पावसाळ्यात अती मेकअप करू नये. मात्र अनेकजणी या दिवसांमध्ये वॉटरप्रूफ मेकअप करतात. वॉटरप्रूफ मेकअप पावसातदेखील टिकत असला तरी त्यामुळे तुमच्या त्वचेचे नुकसान होऊ शकते. दिवसभर असा मेकअप त्वचेवर राहील्याने तुमच्या त्वचेची छिद्रं बंद होतात. ज्यामुळे त्वचेला पुरेसे ऑक्सिजन मिळत नाही आणि तुम्हाला त्वतेच्या समस्या निर्माण होतात.
पावसाळा आणि गरमागरम भजी अथा वडा याचे एक अजब कॉंम्बिनेशन आहे. ज्यामुळे पावसाला सुरूवात झाली की सर्वांनाच असे तेलकट पदार्थ खावेसे वाटतात. मात्र अशा पदार्थांच्या अती सेवनामुळे तुमच्या त्वचेचं नुकसान होऊ शकतं.
पावसाळा असो वा कोणताही ऋतू धुम्रपान आणि मद्यपान नेहमी टाळणेच योग्य आहे. कारण या दोन्ही गोष्टींचा तुमच्या संपूर्ण आरोग्यावरच वाईट परिणाम होऊ शकतो. जर तुम्हाला पावसाळ्यातदेखील फ्रेश आणि सुंदर दिसायचं असेल तर या व्यसनांपासून शक्य तितकं दूर रहा.
पावसाळ्यात नेहमी चांगल्या दर्जाची सौंदर्यप्रसाधने वापरा. कारण पावसामुळे तुमची त्वचा नाजुक आणि संवेदनशील झाली असते. कोणतेही सौंदर्यप्रसाधन वापरण्याआधी त्याच्यावरील लेबल जरूर वाचा.
तेलकट त्वचेच्या लोकांच्या त्वचेवर अतिरिक्त तेलाचा थर जमा होत असतो. ज्यामुळे अशी त्वचा अती तेलकट आणि चमकणारी असते. तेलकट त्वचेवर लवकर धुळ आणि प्रदूषण जमा होते. ज्यामुळे अशा त्वचेच्या लोकांना पिंपल्स आणि त्वचेच्या समस्या फार लवकर जाणवतात. म्हणूनच पावसाळ्यात या त्वचेला अधिक काळजीची गरज असते.
कडूलिंब हा सौंदर्य वाढवण्यासाठी अतिशय गुणकारी आहे. कारण कडूलिंबांमध्ये अॅंटिऑक्सिडंट गुणधर्म आढळतात. ज्यामुळे तुम्हाला त्वचेच्या इनफेक्शनचा धोका कमी असतो. तेलकट त्वचेवर अती तेलामुळे जंतूसंसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे तुम्हाला या फेसफॅकचा नक्कीच फायदा होऊ शकतो. आठवड्यातून एकदा हा फेसपॅक लावल्यामुळे तुमच्या सर्व समस्या दूर होतील. हा पॅक तुम्ही चेहऱ्याप्रमाणेच संपूर्ण शरीरावरील त्वचेच्या संरक्षणासाठी वापरू शकता.
स्टेप 1 - कडूलिंबाची पाने वाटून घ्या अथवा कडूलिंबाची कोरडी पावडर घ्या
स्टेप 2 - कडूलिंबाच्या मिश्रणामध्ये एक चमचा मध टाका
स्टेप 3 - हे मिश्रण एकजीव करून चेहऱ्यावर लावा आणि अर्धा तासाने चेहरा धुवून टाका.
चंदन पावडर आाणि गुलाबपाणी तुमच्या त्वचेसाठी नक्कीच फायदेशीर ठरू शकेल. कारण चंदन पावडचा हा फेसपॅक लावल्यामुळे तुमच्या त्वचेवरील अतिरिक्त तेल आणि डेडस्किन निघून जाईल. शिवाय यामुळे तुमच्या त्वचेला नैसर्गिक नितळपणा आणि चमकदेखील येईल.
स्टेप 1- दोन चमचे चंदन पावडर आणि एक चमचा गुलाबपाणी घ्या
स्टेप 2 - हे मिश्रण एकजीव करून एक फेसपॅक तयार करा
स्टेप 3 - हा फेसपॅक चेहऱ्यावर लावा आणि वीस मिनीटांनी धुवून टाका.
मुलतानी माती तुम्ही कोणत्याही प्रकारच्या त्वचेसाठी वापरू शकता. मात्र जर तुमची त्वचा तेलकट असेल तर तुम्ही गुलाबपाणी आणि मुलतानी मातीचे मिश्रण तुमच्या त्वचेसाठी बेस्ट ठरेल. हा पॅक तुम्ही महिन्यातून कमीत कमी दोन ते तीन वेळा वापरावा.
स्टेप 1- दोन चमचे मुलतानी माती, दोन चमचे गुलाबपाणी आणि चिमुटभर हळद घ्या
स्टेप 2 - हे मिश्रण एकत्र करून चेहऱ्यावर लावा आणि काही मिनीटांनी चेहरा स्वच्छ करा.
काही लोकांची त्वचा ही कोरडी आणि रुक्ष असते. अशी त्वचा पातळ असल्याने या त्वचेवर बाहेरील बदलेल्या हवामानाचा परिणाम लवकर जाणवतो. हिवाळयात आणि पावसाळयात कोरड्या त्वचेची विशेष काळजी घेण्याची गरज असते.
जोजोबा ऑईल त्वचेसाठी एक उत्तम पर्याय आहे. कारण यामुळे तुमच्या त्वचेचे योग्य पोषण होते. जोजोबा ऑईल इतर तेलांच्या मानाने अतिशय हलके आणि कमी तेलकट असते. जोजोबा ऑईल तुमच्या त्वचेच्या मुळांशी जातं आणि त्वचेला मऊ आणि मुलायम ठेवतं. शिवाय यामुळे तुमचा कामाचा आणि मनावरचा ताणदेखील कमी होतो. यासाठीच कोरड्या त्वचेच्या लोकांनी पावसाळ्यात जोजाबा ऑईल जरूर लावावं.
स्टेप 1 - एका वाटीत जोजोबा ऑईलचे काही थेंब घ्या
स्टेप 2 - चेहरा स्वच्छ करून कोरडा करून घ्या
स्टेप 3 - जोजोबा ऑईलने चेहऱ्यावर हलक्या हाताने आणि बोटांनी मसाज करा.
पपईमध्ये व्हिटॅमिन ए आणि सी चे प्रमाण अधिक असते. ज्यामुळे तुमच्या त्वचेचं योग्य पोषण होऊ शकतं. पावसाळ्यात हवामानात झालेल्या बदलांमुळे तुमची त्वचा कोरडी दिसू लागते. अशा वेळी तुम्ही दोन ते तीन दिवसांनी पपईचा गर चेहऱ्यावर नक्कीच लावू शकता. पपई आणि मध एकत्र चेहऱ्यावर लावल्यानेदेखील तुम्हाला चांगला फरक दिसून येऊ शकतो. पपईमुळे तुमच्या चेहऱ्यावरील काळे डाग आणि डेडस्किन कमी होतात. ज्यामुळे तुमच्या त्वचेवर नैसर्गिक तजेलपणा आणि ग्लो येतो.
स्टेप 1 - एका वाटीत पपईचा गर घ्या
स्टेप 2 - पपईचा गर मिक्सरमध्ये लावा.
स्टेप 3 - पपईच्या गरात मध मिसळा आणि चेहऱ्यावर लावा
स्टेप 4 - चेहरा अर्धा तासाने स्वच्छ करा
मध हे कोरड्या त्वचेवर एक रामबाण उपाय आहे. मध आणि दुधाचे मिश्रण त्वचेला लावल्यामुळे तुमच्या त्वचेला एक प्रकारचा नैसर्गिक ओलावा मिळतो. पावसाळ्यात त्वचेतील आर्द्रता कमी झाल्यामुळे ती कोरडी आणि निस्तेज दिसू लागते. मात्र हा फेसपॅक लावल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर नैसर्गिक चमक दिसू लागते.
स्टेप 1 - एका वाटीत मध घ्या
स्टेप 2 - मधाचा फेसपॅक चेहऱ्यावर लावा आणि काही मिनीटांनी चेहरा धुवून टाका.
सर्वसामान्यपणे अनेकजणींची त्वचा ही नॉर्मल असते. नॉर्मल त्वचा ही मऊ आणि गुळगुळीत असते. जी जास्त कोरडी अथवा जास्त तेलकट नसते. मात्र पावसाळ्यात नॉर्मल त्वचेचीदेखील विशेष काळजी घेणं नक्कीच गरजेचं आहे.
टोमॅटोचा गर चेहऱ्यावर लावल्यामुळे चेहऱ्यावर चमकदारपणा येतो. कारण टोमॅटो एक नैसर्गिक सौदर्योपचार आहे. शिवाय प्रत्येकीच्या स्वयंपाकघरात टोमॅटो सहज मिळू शकतो. यासाठी एका टोमॅटोचा गर घ्या त्यात थोडं मध टाकून तो गर चेहऱ्यावर लावा. अर्धा तासाने चेहरा स्वच्छ धुवून टाका.
स्टेप 1 - टोमॅटोचा गर काढून त्यामध्ये थोडंसं मध टाका
स्टेप 2 - हा फेसपॅक चेहऱ्यावर लावून काही मिनीटांनी चेहरा धुवून टाका.
गुलाबाचे पाणी आणि पावडर दोन्ही सौंदर्य खुलविण्यासाठी उत्तम आहेत. गुलाबपाण्याने चेहरा नियमित टोन केल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर एक तजेलदारपणा येतो. याशिवाय तुम्ही गुलाबाच्या पाकळ्या सुकवून त्याची पावडर मधासोबत नियमित चेहऱ्यावर लावू शकता. असे केल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर लवकर एजिंगच्या खुणा दिसणार नाहीत. शिवाय पावसाळ्यात त्वचेवर दिसणारा कोरडेपणा कमी करण्यासाठी हा एक उत्तम उपाय असू शकतो.
स्टेप 1 - दोन ते तीन चमचे गुलाबाच्या सुकलेल्या पाकळ्यांची पावडर घ्या.
स्टेप 2 - या पावडरमध्ये दुधाची साय टाकून एक मिश्रण तयार करा
स्टेप 3 - फेसपॅक चेहऱ्यावर लावून कोमट पाण्याने चेहरा धुवा.
गाजराचा रस आरोग्यासाठी तर गुणकारी आहेच पण त्यामुळे तुमच्या त्वचेचे सौदर्यदेखील वाढू शकते. जर तुम्हाला पावसाळ्यात सुंदर दिसायचंअसेल तर चेहऱ्यावर गाजराचा रस जरूर लावा. गाजराच्या रसामुळे चेहऱ्यावरील काळे डाग कमी होतात आणि त्वचा कायम चिरतरूण दिसू शकते.
स्टेप 1 - गाजराचा किस काढा
स्टेेप 2 - गाजराचा किस अथवा रस चेहऱ्यावर लावा आणि अर्धा तासाने चेहरा धुवून टाका.
पावसाळ्यात चेहऱ्यावर सनस्क्रिन लावणं अत्यंत गरजेचं आहे. कारण जरी पावसाळ्यात वातावरण ढगाळ असलं. तरी वातावरणातील ओझोनचा थर कमी झालेला असल्यामुळे सुर्याची अतीनील किरणं तुमच्या त्वचेचे नुकसान करू शकतात. यासाठीच पावसाळ्यात सनस्क्रीन लावणं फार गरजेचं आहे.
पावसाळा म्हटलं की सर्वानांच पिकनिकला जाण्याचे आणि भिजण्याचे वेध लागतात. मात्र पावसात भिजल्यामुळे तुमच्या त्वचेचं नुकसान होऊ शकतं. यासाठी पावसात भिजण्यापूर्वी आणि भिजल्यानंतर वर दिल्याप्रमाणे त्वचेची काळजी घ्या आणि मनसोक्त पावसात भिजण्याचा आनंद लुटा. शक्य असल्यास भरपुर पाणी प्या आणि तेलकट पदार्थ खाणे टाळा.
पावसाळ्यातील थंड वातावरणामुळे आणि हवामानात आर्द्रतेचे प्रमाण वाढल्यामुळे आपण पाणी कमी प्रमाणात पितो. मात्र शारीरिक क्रिया सुरळीत चालण्यासाठी मुबलक प्रमाणात पाणी पिणं गरजेचं असतं. पावसात पाणी कमी पिण्याने तुमच्या शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. ज्यामुळे त्वचा कोरडी होते आणि त्वचेच्या समस्या निर्माण होऊ शकतात. शिवाय पाण्यावाटे शरीरातून बाहेर पडणारे टॉक्सिन्स बाहेर न पडल्यामुळे तुम्हाला आजारपणांना सामोरं जावं लागू शकतं.
अधिक वाचा
#RainySpecial : असा करा पावसाळा एन्जॉय
पावसाळ्यातही त्वचेसाठी सनस्क्रिन महत्वाचे, नाहीतर होतील हे त्रास
या' कारणांसाठी पावसाळ्यात हे पदार्थ मुळीच खाऊ नका
फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम आणि शटरस्टॉक