सौंदर्य

सध्या हॉट आहे !

arrow icon redirect

खुलवायचे असेल सौंदर्य तर मिळवा इत्यंभूत माहिती

आपल्या त्वचेचे सौंदर्य खुलविण्यासाठी आपण बऱ्याच सौंदर्य प्रसाधनांचा वापर करत असतो. त्याशिवाय निरोगी जीवनशैली आणि पोषक आहाराचे सेवन केल्यास नक्कीच नैसर्गिकरित्या सौंदर्य खुलविता येते. घरच्या घरी आपण वेगवेगळ्या ट्रिक्स आणि घरातीलच वस्तू वापरून आपल्या सौंदर्याची कशी काळजी घ्यायची आणि कशा प्रकारे आपण केस, त्वचा आणि स्वतःला अधिक सुंदर बनवायचे याची इत्यंभूत माहिती तुम्हाला या विभागात मिळेल. आपल्याला केसांच्या आणि त्वचेच्याही वेगवेगळ्या समस्या असतात. मग त्यापासून सुटका मिळविण्यासाठी आपण नक्की कशाचा उपयोग करू शकतो हे बऱ्याचदा आपल्याला माहीत नसतं. अशावेळी आपण बऱ्याचदा पार्लरच्या वेगवेगळ्या ट्रीटमेंट्सना बळी पडतो आणि पैसेही घालवून बसतो. मग अशावेळी तोच उपाय तुम्ही घरी करूनही तुमच्या त्वचेची आणि केसांची काळजी घेऊ शकता. 

विविध लिपस्टिक्सची माहिती 

तुमच्या कलेक्शनमध्ये कोणत्या लिपस्टिक हव्यात इथपासून ते ओठांवरील लिपस्टिक काढण्यासाठी कोणते रिमूव्हर वापरावे आणि त्याचा कसा उपयोग करावा. आपल्या सध्याचे कोणते लिपस्टिकचे ट्रेंड्स आहेत इथपासून रेड लिपस्टिक, न्यूड लिपस्टिक, लिक्विड लिपस्टिक या सगळ्यांची तुम्हाला हवी असलेली माहिती तुम्हाला अनेक लेखातून मिळेल. तुम्हाला कोणत्या रंगाची लिपस्टिक लावता येईल अथवा लिपस्टिक कशा प्रकारे हाताळायची याची माहितीही तुम्हाला इथून मिळते. केवळ लिपस्टिकच नाही तर लिपबाम आणि त्याचा वापर याबद्दलही तुम्हाला जाणून घेता येईल. तसंच भारतीय स्किन टोनसाठी कोणत्या लिपस्टिक शेड्स उत्तम आहेत याबाबातही तुम्ही जाणून घेऊ शकता. 

त्वचेची काळजी घेण्यासाठी लागणारी माहिती 

तीव्र सूर्यप्रकाश, प्रदूषण, ताणतणावामुळे खराब झालेल्या त्वचेचे सौंदर्य खुलविण्यासाठी तुम्हाला काही सोप्या टिप्सचा वापर करता येऊ शकतो. या सोप्या उपायांचा वापर करून त्वचेचे तारुण्य टिकवण्यासाठी वेगवेगळ्या तज्ज्ञांचा सल्ला, अगदी त्वचेवर येण्याऱ्या मुरूमांपासून ते त्वचेवर येणाऱ्या लालिमेपर्यंतचे सर्व उपाय तुम्हाला इथे सापडतील. स्किन केअर अथवा त्वचेची काळजी हा प्रत्येकीसाठी नेहमीच एक संवेदनशील विषय असतो. मात्र ज्यांची त्वचाच अती संवेदनशीलअसते त्यांच्यासाठी तर हा विषय नक्कीच गंभीर असू शकतो. वास्तविक तुमची त्वचा कोणत्याही प्रकारची असो तुम्हाला तिची नियमित काळजी घेणं गरजेचं आहे. शिवाय त्यासाठी डेली स्कीन रूटीन पाळणं, आहाराबाबत दक्ष राहणं, नियमित व्यायाम करणं आणि त्वचा डिटॉक्स करण्यासाठी भरपूर पाणी पिणं हे ओघाने आलंच. 

केसांची सुंदरता जपणं 

केस हा आपल्या प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा विषय. केसगळती, केस तुटणे, केसांमध्ये कोंडा होणे, केसांच्या विविध समस्या हा सतत उद्भवत असतात. मग अशावेळी काय करायचं? असा प्रश्न पडतो. डॉक्टरांचा सल्ला घेण्याआधी आपण घरातच केसांची काळजी घेण्याची सुरूवात करतो. मग झटपट केस वाढविण्यासाठी असो अथवा लांब केसांसाठी गुणकारी उपाय हे सर्व तुम्ही या लेखांमधून जाणून घेऊ शकता. आमचे रायटर्स तुमच्यासाठी उत्तमोत्तम उपाय या लेखांमध्ये सांगतात. त्याशिवाय याचा वापर कसा करायचा याचीही माहिती तुम्हाला यातून मिळते. 

नखांसाठी कौशल्य 

सुंदर नखं कोणाला नको असतात? पण त्याची काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं असतं. नेलपेंट्सने नखांचे सौंदर्य अधिक खुलते. तर काही जणांना नखं न वाढण्याचीही समस्या असते. मग अशावेळी या सगळ्यावरील माहिती मिळण्यासाठी तुम्ही ‘POPxo मराठी’ हा पर्याय नक्कीच वापरू शकता. लांब आणि सुंदर नख प्रत्येक मुलीला आवडतात. व्यवस्थित सेट केलेली आणि नेलपॉलिश लावलेली नख ही हाताची शोभा आहे असंच मानलं जातं. तसंच नखं चांगली असणं ही तुमचं शरीर स्वस्थ असल्याचं चिन्हदेखील आहे. मात्र आपल्यापैकी काही मुलींना नखं नीट वाढवण्यासाठी खूपच त्रास होत असतो. बऱ्याचदा स्वयंपाकघरात काम करताना किंवा शरीरात व्यवस्थित ऊर्जा नसल्यास, नख कमजोर होतात आणि तुटून जातात, त्यानंंतर ती वाढण्यासाठीदेखील कष्ट घ्यावे लागतात. त्यामुळे तुमचे हात सुंदर दिसण्यासाठी तुम्हाला खूपच प्रयत्न करावे लागतात. या सर्वांची इत्यंभूत माहिती इथे मिळेल. 

मेकअपसाठी लागणारी सौंदर्य उत्पादने

मेकअप करताना अनेक सौंदर्य उत्पादने लागतात. पण त्याची पूर्ण माहिती प्रत्येकाकडे  नसते. अगदी बीबी क्रिम, सीसी क्रिम, फाऊंडेशन, लिपस्टिक,  काजळ, लायनर या सगळ्यापासून ते अगदी बारीक सारीक सौंदर्यासाठी लागणाऱ्या गोष्टींची त्यांच्या किमतीपासून सर्व माहिती इथे तुम्हाला मिळते. कोणत्या सौंदर्य प्रसाधनांचा नक्की काय फायदा आहे आणि त्याचा कसा वापर करावा. त्याचे कोणते तोटे आहेत. या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळते. मेकअपसाठी कोणते ब्रश वापरायचे हेदेखील काही जणांना माहीत नसते. तुम्हाला तुमच्या नियमित वापरासाठी याबाबत सर्व माहिती इथे मिळते आणि अगदी सोप्या आणि सहज शब्दातील ही माहिती तुमच्या शंकानिरसन करण्यास उपयुक्त ठरते.