पावसाळा आला की, केसांच्या नेमक्या कोणत्या हेअरस्टाईल करायच्या या कळतच नाही. केस मोकळे सोडले तर भिजण्याची भीती असते. बांधले तर केसात पाणी राहण्याची भीती असते. त्यामुळे आज आपण पावसाळ्यात तुम्हाला कोणत्या झटपट पण चांगल्या दिसणाऱ्या हेअरस्टाईल करता येतील त्या पाहुयात
तुमचेही केस कुरळे आहेत मग आता काळजी घेणे अगदीच सोपे
हाय लुझ बन (high loose bun)
जर तुम्हाला सकाळी कामावर जाण्याची फारच घाई असेल तर ही हेअर स्टाईल तुमच्यासाठी फारच उत्तम आहे. कारण तुम्ही ती अगदी पटकन करु शकता. यासाठी तुम्हाला रबर बँड आणि काही पिना लागतील. जर तुमचे सिल्की, स्मुथ असतील तर ही हेअरस्टाईल करताना कदाचित तुम्हाला थोडी अडचण येऊ शकते.
असे बांधा केस: केसांचा गुंता अगदी सावकाश सोडवून घ्या. केस ब्रशने विंचरल्यास उत्तम. कारण त्यामुळे तुमच्या केसांना चांगला व्हॉल्युम मिळतो.आता तुम्हाला केस एकत्र करुन वरच्या बाजूला एक बन बांधायचा आहे. हल्ली तयार बन मिळतात.जे लावायला फार सोपे असतात. पण तुम्ही केवळ तुमच्या केसांचा उपयोग करुन बन बांधा . हा बन थोडा लूझ असू द्या. केस जास्त बाहेर येत असतील तर ते केस बॉबी पिन्स लावून आत घाला.
साईड लुझ ब्रेड
तुमचे केस लांब असतील तुम्हाला ते पूर्ण मोकळे सोडायचे नसतील शिवाय ते बांधायचेही नसतील अशावेळी तुम्ही साईड लुझ ब्रेड बांधू शकता. अगदी कोणत्याही वेस्टर्नवेअरवर ही हेअरस्टाईल चांगली दिसते. यासाठी तुम्हाला हवे फक्त रबर बँड
असे बांधा केस: आता ही साईड लुझ वेणी आहे. म्हटल्यावर तुम्हाला ती बांधताना थोडी काळजी घ्यायची आहे. म्हणजे जर तुमचे केस मोठे- तोकडे असे असतील तर अशी वेणी बांधताना केस बाहेर येणारच. जर तुम्हाला 5 पेढ्यांची किंवा 7 पेढ्यांची वेणी बांधता आली तर उत्तम ही वेणी थोडी मेस्सीच चांगली वाटते.
प्रवासादरम्यान तुमचेही केस होतात खराब, मग नक्की करुन पाहा हे
पफ विथ पोनी टेल
जर तुम्हाला पोनी टेलला थोडासा ट्विस्ट द्यायचा असेल तर तुम्ही ही हेअर स्टाईल पावसाळ्यात करु शकता. काहींना त्यांचा रोजचा पोनी टेल अगदीच फ्लॅट वाटतो.अशावेळी तुम्ही थोडा वेगळेपणा देण्यासाठी ही हेअरस्टाईल करु शकता. यासाठी तुम्हाला टिक टॅक पिन आणि हेअर फ्रेंडली रबर बँड लागेल
कसे बांधाल केस: आता तुम्हाला केस केस विंचरुन पुढील केसांचा पफ काढून घ्यायचा आहे. जास्त मोठा पफ काढू नका. याचे कारण असे की, तुम्ही तो टिकावा यासाठी अधिक पिनचा वापर कराल जे आम्हाला नको आहे. त्यामुळे अगदी हलकासा पफ बांधून तुम्ही केस एकत्र करुन केसांचा पोनीटेल बांधा. हा पोनीटेल थोडावर बांधा. असे केस तुम्हाला फॉर्मल्सवर चांगले दिसतात.
या ट्रिक्समुळे तुमचे केस दिसतील लांब
ट्विस्टेट हेअर पीन अप
आता तुम्हाला केस सोडायचे आहेत. पण थोडं स्टाईलिश दिसायचे असेल तर ही हेअरस्टाईल तुमच्यासाठी आहे. यासाठी तुम्हाला लागेल फक्त बॉबी पीन आणि तुमचे छान केस
कसे बांधाल केस: केस विंचरुन घ्या. मध्ये किंवा साईड पार्टीशन करुन केसांची बट घेऊन तुम्हाला तुमचे केस ट्विस्ट करायचे आहे. आणि मागच्या बाजूला केसांच्या मागे पीन लावून केस सिक्योर करायचे आहेत.
या काही सोप्या हेअरस्टाईल करुन तुम्ही या पावसाळ्यात ट्रेंडी आणि स्टायलिश दोन्ही दिसू शकता.