ADVERTISEMENT
home / DIY लाईफ हॅक्स
पावसाळ्यात कपडे वाळवण्यासाठी फॉलो करा या सोप्या टिप्स

पावसाळ्यात कपडे वाळवण्यासाठी फॉलो करा या सोप्या टिप्स

 

पावसाने चांगलाच जोर धरल्यामुळे सगळीकडे मुसळधार पाऊस पडट आहे. पाऊस आणि पावसाळा कितीही हवाहवासा वाटत असला तरी पावसाळ्यात काही गोष्टींची फारच अडचण होत असते. पावसाळ्यातील सर्वात मोठी समस्या म्हणजे पावसात कपडे लवकर वाळत नाहीत. घराबाहेर गेल्यावर पावसाची छोटी सरदेखील पूर्ण भिजवून टाकते, चिखल आणि पाण्यामुळे कपडे वारंवार खराब होतात. ज्यामुळे सतत कपडे धुवून वाळत घालावे लागतात. मात्र पावसाळ्यात हवामानातील आर्द्रता वाढलेली असल्यामुळे कपडे लवकर वाळत नाहीत. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी या काही सोप्या टिप्स जरूर फॉलो करा.

Shutterstock

कपडे हाताने धुण्याऐवजी वॉशिंगमशीनमध्ये धुवा

 

वॉशिंग मशीन हे कपडे धुण्याचे आणि वाळवण्याचे एक सोपे माध्यम आहे. मात्र काही जणांना वॉशिंग मशीन कपडे धुतलेले आवडत नाहीत. असे असल्यास हाताने धुतलेले कपडे वाळवण्यासाठी  मशीनच्या ड्रायरचा वापर करा. दोन वेळा ड्रायर मोडवर मशीन ठेवल्यामुळे कपडे पूर्णपणे कोरडे होऊ शकतात. कारण त्यामुळे कपड्यांमधील पाणी पूर्णपणे निथळले जाते. कापडामधील पाणी निघून गेल्यामुळे असे कपडे लवकर सुकू शकतात.

हॅंगरचा वापर करा

 

पावसाळ्यात वारंवार कपडे धुवावे लागत असल्यामुळे एकाच वेळी प्रमाणापेक्षा अधिक कपडे धुवावे लागतात. ज्यामुळे ते वाळत घालण्यासाठी जास्त जागा लागते. कपडे वाळवण्यासाठी ते हॅंगरवर अडकवा. ज्यामुळे कमी जागेत जास्त कपडे वाळत घालता येतील. शिवाय असे कपडे सुकवताना ते मोकळे राहील्यामुळे लवकर वाळतात. 

ADVERTISEMENT

Shutterstock

कपडे वाळत घालण्यासाठी स्टॅंडचा वापर करा

 

कपडे बाल्कनी अथवा ड्राय बाल्कनीत वाळत घालण्यापेक्षा कपडे सुकत घालण्याच्या स्टॅंडवर वाळत घाला आणि ते स्टॅंड फॅनखाली ठेवा. ज्यामुळे कपडे लवकर वाळतील.

ओलसर कपडे कपाटात ठेऊ नका

 

बऱ्याचदा कपडे पूर्णपणे वाळले तरी त्यांच्यामध्ये ओलरसपणा कायम असतो. असे कपडे लगेच घडी घालून कपाटात अथवा बास्केटमध्ये ठेऊ नका. कारण ओलसर कपडे तसेच कपाटात ठेवल्यामुळे कपाटाला आणि इतर कपड्यांना कुबट आणि कोंदट वास येऊ लागतो. 

खोलीत जाडे मीठ ठेवा

 

जाडे मीठ अथवा खडे मीठ हवामानातील आर्द्रता शोषून घेते. जर तुम्ही खिडकीत अथवा खोलीच्या कोपऱ्यांमध्ये एखाद्या वाटीत ठेवले तर त्यामुळे तुमच्या घरातील वातावरण कोरडे राहण्यास मदत होऊ शकते. 

ADVERTISEMENT

इनरवेअर्स इस्त्रीने सुकवा

 

इनरवेअर्स वॉशिंगमशीनमध्ये धुता येत नाहीत. कारण मशीनमध्ये धुतल्यामुळे ते खराब होऊ शकतात. ज्यामुळे असे कपडे हातानेच धुवावे लागतात. शिवाय इतर कपड्यांपेक्षा अंर्तवस्त्रे जाड असल्यामुळे ती लवकर सुकत नाहीत. यासाठी जर तुमची अंर्तवस्त्रे लवकर सुकत नसतील तर ओलसर कपड्यांना कोरडे करण्यासाठी त्यांना इस्त्री करा. ज्यामुळे तुमचे कपडे लवकर सुकतील. इनरवेअर ओलसर असल्यास ते कोरडे केल्याशिवाय मुळीच परिधान करू नये कारण त्यामुळे तुम्हाला त्वचेच्या समस्या निर्माण होऊ शकतात. 

घरात धूप घाला

 

घरात धूप घालल्यामुळे कपड्यांच्या ओलसरपणामुळे घरात येणारा कुबट वास कमी येतो. शिवाय यामुळे कपड्यांनादेखील चांगला वास येऊ शकतो. नियमित घरात धुप घातल्यामुळे तुम्हाला प्रसन्नदेखील वाटेल.

हलक्या रंगाचे कपडे आणि रंगीत कपडे निरनिराळे वाळत घाला

 

कपडे वाळत घालताना सफेद अथवा हलक्या रंगाचे कपडे रंगीत कपड्यांसोबत वाळत घालू नका. कारण जर कपडे ओलसर राहीले तर रंगीत कपड्यांचा रंग तुमच्या सफेद अथवा इतर हलक्या रंगाच्या कपड्यांना लागू शकतो.

अधिक वाचा

ADVERTISEMENT

जाणून घ्या पँटीज धुण्याची योग्य पद्धत

अस्वच्छ किचन सिंक स्वच्छ करायचे आहे.. मग सोप्या टीप्स येतील कामी

घरात सकारात्मक ऊर्जा येण्यासाठी करा हे ‘5’ सोपे उपाय

How To Remove Stains From Clothes

ADVERTISEMENT
29 Jul 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT