तुमचं किचन स्वच्छ असेल तर तुमचं घर सुंदर असणारचं असा अंदाज बांधला जातो. किचनमध्ये पाहण्यासारख्या बऱ्याच गोष्टी असतात. म्हणजे तुमचे डबे, तुमच्या ट्रॉली, तुमची भांडी किती स्वच्छ आणि नीटनेटकी आहेत. हे पाहिले जाते. पण त्यासोबतच तुमचे किचन सिंकही पाहिले जाते, का? असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर याचे कारण असे आहे की, किचनचा हाच भाग सगळ्यात जास्त स्वच्छ असणे आवश्यक आहे. कारण दिवसभरात कितीतरी भांडी सिंकमध्ये घासली जातात. त्यामुळे त्यात उष्ट साठून राहणे आलेच. जर ते योग्य वेळी साफ झाले नाही तर मग किचनच्या सिंकमधून एक घाणेरडा वास येऊ लागतो. तुमच्याही किचन सिंकमधून येतोय का वास? किंवा किचन सिंक अस्वच्छ वाटत आहे मग तुम्ही आम्ही सांगितलेल्या सोप्या पद्धतीने सिंक स्वच्छ करुन पाहा.
कपड्यांचा रंग निवडताना तुमचाही उडतो गोंधळ, मग तुमच्यासाठी खास टीप्स
लिंबू अगदी कोणत्याही गोष्टीसाठी चांगले आहे. लिंबू हे कोणताही चिकटपणा काढून टाकण्यासाठी अगदी उत्तम आहे.
काय कराल: सिंंकमधील सगळे उष्ट काढून घ्या. साधारण तुमच्या सिंकचा तळ भरेल इतके कोमट पाणी घ्या. सिंकमधून पाणी जाणार नाही यासाठी मिळणारी जाळी लावा. पाणी ओतून त्यात एक लिंबू पिळून किंवा त्याच्या चकत्या करुन टाका. काही वेळ सिंकमध्ये ते तसेच राहू द्या. लिंबाचे तुकडे घातले असतील. तर त्याचाच उपयोग करुन तुम्ही सिंक हाताने स्वच्छ करुन घ्या. तुम्हाला सिंकवरील चिकटपणा गेलेला जाणवेल. त्यानंतर स्वच्छ पाण्याने सिंक धुवून घ्या. याचा तुमच्या हातांनाही कोणता त्रास होणार नाही. लिंबामुळे तुमच्या सिंकला चांगला सुगंधही येईल.
तुमचे सिंक तुम्हाला झटपट स्वच्छ करायचे असेल तर तुम्ही व्हिनेगरचादेखील वापर करु शकता. व्हिनेगरमुळे तुमच्या सिंकचा वास तर निघून जातोच. शिवाय तुमच्या सिंकचा चिकटपणाही कमी होतो. त्यामुळे तुम्हाला झटपट काही करायचे असेल तर व्हिनेगरचा वापर करा. एका ग्लासात अर्धे व्हिनेगर आणि पाणी घेऊन सिंकमध्ये टाका. साधारण 5 ते 10मिनिटं ठेवून द्या. नंतर स्वच्छ पाणी आणि डिश वॉशिंग सोपने सिंक स्वच्छ करा. जर तुम्हाला व्हिनेगरचा वास सहन होत नसेल तर तुम्ही हा उपाय टाळा.
जर तुमच्या फ्रिजमध्ये फार दिवसापासूनचे कोल्ड्रींग किंवा सोडा असेल तर तुम्ही थेट तो तुमच्या सिंकमध्ये घाला आणि तुमचे सिंक स्वच्छ करुन घ्या. तुम्हाला याच्या वापरानंतर तुमचे सिंक स्वच्छ झालेले दिसेल.
अनेक जण वॉशरुम क्लिनझरचा वापरदेखील सिंक स्वच्छ करण्यासाठी करतात. पण याचा वापर करताना तुम्हाला थोडीशी काळजी घेणे गरजेचे असते. तुम्ही याचा वापर करुन तुमचे सिंक इन्स्टंटली स्वच्छ करु शकता. पण तुम्हाला याचा वापर करताना ग्लोव्हज वापरता आले तर फारच चांगले आहे. पण त्याचा अधिक वापर करु नका. तुम्हाला अगदी कमीत कमी याचा वापर करता आले तर उत्तम
जर तुम्हाला रोजच्या रोज तुमचे सिंक साफ करायचे असेल आणि फार कष्ट घ्यायचे असेल बाजारात हल्ली सिंक साफ करण्यासाठी पावडर विकत मिळते. ती पावडर तुम्हाला सिंकमध्ये टाकून ठेवायची असते. साधारण 5 मिनिटांनी तुम्ही सिंकमध्ये पाणी सोडून द्या. किचन सिंकमधील चिकटपणा निघून जातो.
अशाप्रकारे तुम्ही तुमचे किचन सिंक स्वच्छ करु शकता आणि मिळवू शकता सुंदर किचन