ADVERTISEMENT
home / आरोग्य
sleep

म्हणून महिलांना पुरुषांपेक्षा जास्त झोपेची गरज असते…

तुम्ही कधी विचार केला आहे का? जर दिवसभर तुमची झोप 8 तास पूर्ण झाली नसेल तर तुम्ही दिवसभर चिडचिड करता आणि तुमचं डोकं सतत दुखत राहातं. असं होण्याचं कारण आपल्या डोक्याला जितका जास्त आराम मिळायला हवा तितका तो मिळत नाही. मुख्यत्वे महिलांच्या बाबतीत हे जास्त घडताना दिसून येतं. त्यांना नेहमीच आपल्या झोपेशी तडजोड करावी लागते. आधी शिक्षणासाठी, मग मुलांच्या मागे आणि ऑफिसमुळे. बऱ्याच महिला सकाळी घरात सर्वात आधी उठतात आणि झोपतातही सर्वात नंतर. त्यामुळे त्यांच्या झोपेची वेळ ही अत्यंत कमी होते. पण हे महिलांच्या आरोग्यासाठी चांगलं नाही. जितकं काम तितकाच आराम करण्याची गरज प्रत्येकाला असते. एका रिसर्चमध्ये हे महिलांना पुरुषांपेक्षा जास्त झोपेची आवश्यकता असते हे सिद्ध झालं आहे. 

रिसर्च नक्की काय सांगतो?

पुरुषांच्या तुलनेत महिलांचा मेंदू हा जास्त जटील असतो आणि त्यामुळेच महिलांना पुरुषांपेक्षा किमान 20 मिनिट्स अधिक झोपेची गरज भासते. हा रिसर्च साधारण 210 पुरुष आणि महिलांवर करण्यात आला होता. त्याच्या परिणामामध्ये हे सिद्ध झालं आहे.

ही आहेत महत्त्वाची कारणं

GIPHY

ADVERTISEMENT

– महिलांचा मेंदू हा पुरुषांच्या मेंदूच्या तुलनेत जास्त कार्यरत असतो

– मुलांची काळजी, घरातील महत्त्वाची कामं, जोडीदाराचं घोरणं या सगळ्यामुळे महिलांच्या झोपेवर परिणाम होत असतो

– पुरुषांंच्या तुलनेत महिला पाचपटीने सूचनेचं आदान प्रदान करतात

– मल्टीटास्किंग असल्यामुळे महिलांचा मेंदू हा जास्त थकतो

ADVERTISEMENT

कोणत्या वयात किती हवी झोप

GIPHY

  • 18 से 25 वर्षाच्या दरम्यान मुलींना साधारण 7 ते 9 तासांची झोप गरजेची असते
  • 26 ते 45 वर्षांपर्यंत असलेल्या महिलांना किमान 8 तासांच्या झोपेची गरज असते. कारण या वयात तुमची झोप सावध असते. लक्षात ठेवा तुम्ही जर झोप कमी घेतलीत तर त्याचा वाईट परिणाम हा तुमच्या वजनावर होतो. तुमचं वजन यामुळे वाढायला सुरुवात होते. 
  • 45 ते 60 वर्षाच्या महिलांना किमान 7 तासांच्या झोपेची आवश्यकता असते
  • 60 पेक्षा अधिक वय असणाऱ्या महिलांना 7 ते 8 तासांची झोप योग्य आहे

चांगल्या आणि गाढ झोपेसाठी खास टिप्स

Shutterstock

ADVERTISEMENT

– कधीही रात्री आंघोळ केल्या केल्या झोपू नका. आपल्या शरीराचं तापमान हे सामान्य असतं. त्यामुळे तुम्ही सामन्य तापमान असतानाच झोपलात तर तुम्हाला चांगली आणि गाढ झोप लागते. 

– झोपण्यापूर्वी कधीही चहा, कॉफी अथवा कोणत्याही प्रकारचं एनर्जी ड्रिंक तुम्ही पिणं योग्य नाही. तर त्याऐवजी तुम्ही गरम दूध पिऊ शकता. त्यामुळे तुम्हाला चांगली झोप लागते. 

– मोबाईल फोन अथवा टीव्ही बघत झोपायची सवय तुम्हाला असेल तर ही सवय लगेच सोडा. कारण यामुळे तुमची झोप उडते. तुमच्या डोळ्याला त्रास होण्याची शक्यता असते. 

– जेव्हा तुम्ही झोपण्यासाठी बेडवर आडवे व्हाल तेव्हा दिवसभराच्या गोष्टींंचा विचार मनात आणू नका. कारण या विचारांनी तुम्हाला सतत तुटक झोप लागते. नेहमी झोपताना चांगल्या आणि सकारात्मक गोष्टीचा विचार करा. 

ADVERTISEMENT

महिलांना आपला मेंदू तल्लख ठेवण्यासाठी झोप मिळणं अत्यंत गरजेचं असते. त्यामुळे या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही वागा. पुरुष हे एकावेळी एकच काम करू शकतात. पण महिलांमध्ये एका वेळी अनेक काम करण्याची क्षमता असते. त्यामुळे महिलांचा मेंदू जास्त प्रमाणात काम करत असतो आणि त्याचमुळे महिलांना पुरुषांपेक्षा झोपेची जास्त आवश्यकता असतं असं रिसर्चमधून सिद्ध झालं आहे.

हेदेखील वाचा 

दिवसभर झोप येत असेल तर नक्की ट्राय करा ‘या’ टिप्स

तुम्हालाही होतोय का अपुऱ्या झोपेचा त्रास

ADVERTISEMENT

तुम्हाला पोटावर झोपायची सवय असल्यास, त्वरीत बदला ही सवय

 

22 Jul 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT