तुम्हालाही होतोय का अपुऱ्या झोपेचा त्रास

तुम्हालाही होतोय का अपुऱ्या झोपेचा त्रास

सध्याची जीवनशैली अतिशय बदललेली आहे. सतत कामाचा ताण आणि अपुरी झोप या गोष्टी आता रोजच्याच झाल्या आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का? मुंबईकरांना पुरेशी झोप मिळत नसल्याचं एका सर्व्हेमधून सिद्ध झालंय. मुंबईकरांना पुरेशी झोप मिळत नसून त्याचं परिवर्तन निद्रानाश, असंतुलित झोप यांसारख्या समस्यांमध्ये वाढीमध्ये होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. देशातील झोपेसंबंधी माहिती गोळा करण्यासाठी भारतातील मॅट्रेस आणि झोपेशी संबंधित उत्पादनांचे प्रवर्तक वेकफिट.को यांनी केलेल्या ग्रेट इंडियन स्लीप स्कोअरकार्ड 2019 मध्ये स्पष्ट झाली आहे. पुरेशी झोप मिळत नसल्याचा परिणाम मुंबईकरांच्या आरोग्यासह कामावरदेखील होत आहे. 81% मुंबईकर निद्रानाशाच्या विकाराने ग्रस्त असून अपु-या झोपेमुळे 78 टक्के मुंबईकरांना आठवड्यातून 1 - 3 वेळा कामावर झोप येत असल्याचे सर्व्हेमधून निदर्शनास आले आहे.


अपुऱ्या झोपेचे काय होतात परिणाम


sleep


सातत्यपूर्ण अपु-या झोपेचे आपल्या मन आणि शरीरावर नेहमीच वाईट परिणाम होतात. आपल्याला सतत थकल्यासारखे वाटते आणि त्याचा त्रास होतो. अपु-या झोपेमुळे 52 टक्के लोकांना पाठदुखीच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. झोपेच्या कमतरतेमुळे उच्च रक्तदाबापासून ते चिंता वाढण्यापर्यंत अनेक प्रकारच्या आरोग्यविषयक समस्या उद्भवू शकतात. तसंच दिवसभर अपुऱ्या झोपेमुळे आळस येणे. काम करताना चिडचिडेपणा येणं, नैराश्य, एका गोष्टीवर लक्ष केंद्रीत न करू शकणं. याशिवाय तुमची झोप जर पूर्ण होऊ शकली नाही तर रक्तदाबामध्ये चढउतार होतात. विस्मरणाचा अधिक परिणाम जाणवू लागतो. इतकंच नाही तर, मधुमेहातील साखर वाढणं, चेहऱ्यावर थकवा जाणवणं, लठ्ठपणा वाढणं, अंगदुखी, डोकेदुखी, पोटाचे विकार या गोष्टीही वाढत जातात. इतका वाईट परिणाम अपुऱ्या झोपेचा आपल्या शरीरावर होत असतो.


आपल्या शरीराच्या रचनेनुसार रात्री 10 किंवा 10.30 ही झोपण्याची नियमित वेळ असावी असा सल्ला दिला जातो. पण सर्वसाधरणतः असं होत नाही. सर्वेक्षणातून दिसून आलं आहे की 36 टक्के लोक 7 तासांपेक्षाही कमी झोपतात. तर 90 टक्के लोकांना रात्री 1-2 वेळा जाग येते.


स्मार्टफोन आणि टीव्ही कारणीभूत


smartphone


मुंबईकरांना रात्रभर जागवणा-या गोष्टींमध्ये स्मार्टफोन्सपासून टीव्हीपर्यंत सातत्याने मनोरंजन करणाऱ्या वस्तू जास्त जबाबदार आहेत. सुमारे 90 टक्के लोक झोपण्यापूर्वी आपला फोन वापरतात. 24 टक्के लोकांनी सांगितले की लॅपटॉपवर किंवा स्मार्टफोनवर काही कार्यक्रम पाहत पाहिल्याने ते जागे राहतात. तर कामाबाबत किंवा पैशांची चिंता सतावत असल्याने झोप न येणा-यांची संख्या 23 टक्के इतकी आहे. वास्तविक झोपण्यापूर्वी अर्धा तास कोणत्याही प्रकारचे गॅझेट्स अर्थात स्मार्टफोन, टीव्ही अथवा लॅपटॉप या गोष्टींचा वापर करणं चुकीचं आहे. त्यातील किरणांमुळे तुमच्या डोळ्यातील झोप निघून जाते आणि त्यामुळे नंतर अपुऱ्या झोपेचा त्रास सुरू होतो.


अपुऱ्या झोपेसाठी काय करणं आवश्यक आहे?


1. सर्वात महत्त्वाचं म्हणजे झोप अपुरी का होत आहे याची कारणं जर आपल्याला माहीत असतील तर त्या कारणांपासून दूर राहणं जास्त गरजेचं आहे. जसं आपल्याला प्रत्येकाला स्मार्टफोन आणि टीव्ही झोपेआधी बघायचा नाही हे माहीत आहे. त्यामुळे त्यावर वेळीच अंमलबजावणी करायला हवी.


2. बहुतांशी लोक हे झोपेच्या समस्येला विकारच मानत नाही त्यामुळे अशा लोकांमध्ये जनजागृती करणं आवश्यक आहे.


3. दिवसातून आठ तास झोप महत्त्वाची आहे. त्यामुळे वेळेवर झोपावं


4. झोपेच्या वेळी दिवसभर घडलेल्या आणि मनाला त्रास देणाऱ्या गोष्टींचा विचार करू नका


5. निद्रानाशासाठी झोपेच्या गोळ्या घेण्याचं टाळा


फोटो सौजन्य - Instagram


हेदेखील वाचा 


#WorldSleepDay : ‘या’ कारणामुळे महिलांना पुरूषांपेक्षा जास्त झोपेची असते गरज


Hormonal Imbalance : महिलांमधील हॉर्मोन्स असंतुलनाची कारणे


वाढतं वय लपवायचंय तर नक्की वाचा या एँटीएजिंग टीप्स