तुळशीच्या पानांचा वापर करून मिळवा असे लांबसडक केस

तुळशीच्या पानांचा वापर करून मिळवा असे लांबसडक केस

भारतातील प्रत्येकाच्या घरात तुळशी वृंदावन हे असतंच. कारण भारतात तुळशीला एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. सकाळी स्नान केल्यावर तुळसीला पाणी वाहणे, तिची पुजा करणे ही भारतीय परंपरा आहे. मात्र यासोबतच तुळशीच्या रोपाला आयुर्वेदातही मानाचं स्थान आहे. कारण तुळशीमध्ये अनेक औषधी गुणधर्म दडलेले आहेत. पावसाळ्यात वारंवार होणाऱ्या सर्दी-खोकल्यापासून ते अगदी त्वचेचं इनफेक्शन कमी करण्यापर्यंत तुळस तुमच्या फायदयाची आहे. त्वचा समस्यांना दूर करण्यासाठी तुळशीची पानं एखाद्या सौंदर्य प्रसाधनासारखं काम करू शकतात.  एवढंच नाही तर तुळशीच्या पानांचा वापर करून तुम्ही तुमच्या केसांचे गळणेदेखील कमी करू शकता. ज्यामुळे तुमचे केस निरोगी आणि लांबसडक होतात. यासाठीच वाचा तुळशीच्या पानांचे हे सौंदर्य फायदे

सौंदर्य खुलवण्यासाठी तुळशीच्या पानांचा असा करा वापर

चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो येण्यासाठी

तुळशीच्या रोपामध्ये अॅंटि ऑक्सिडंट गुणधर्म भरपूर प्रमाणात असतात. ज्यामुळे तुळशीच्या पानांचा रस अथवा पेस्ट त्वचेवर लावल्यास त्वचेच्या आत खोलवर असलेली विषद्रव्ये बाहेर टाकली जातात. त्वचा डिटॉक्स झाल्यामुळे त्वचेच्या समस्या आपोआप कमी होऊ शकतात. त्वचा आणि शरीरातील रक्त शुद्ध झाल्यामुळे तुमच्या त्वचेला एक प्रकारचा नैसर्गिक ग्लो येतो. यासाठी आठवड्यातून दोनदा चेहऱ्यावर तुळशीच्या पानं वाटून त्याचा पॅक लावा.

वाचा - पीपल म्हणजे काय

पिंपल्स कमी करण्यासाठी

चेहऱ्यावर पिंपल्स, काळे डाग, चट्टे असण्याचं प्रमुख कारण तुमच्या रक्तातील विषद्रव्ये असतात.पण जर तुम्ही नियमित तुळशीची पानं वाटून तुमच्या चेहऱ्यावर त्याचा पॅक लावला तर तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो. या फेसपॅकमध्ये काही थेंब मध अथवा लिंबाचा रस टाका ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील डाग, पिंपल्स, काळे चट्टे हळूहळू कमी होऊ लागतात. 

Shutterstock

त्वचा चमकदार होण्यासाठी

तुळशीच्या पानांमुळे तुमच्या त्वचेवरील आर्द्रता टिकण्यास मदत होते. त्वचा हायड्रेट राहील्यामुळे त्वचा मऊ आणि तजेलदार दिसू लागते. यासाठी तुळशीच्या पानांसोबत काकडीचा एखादा तुकडा वाटून घ्या. या मिश्रणामध्ये दही टाका आणि चेहऱ्यावर एकसमान लावा. सुकल्यावर कमीत कमी वीस मिनीटांनी चेहरा कोमट पाण्याने धुवून टाका.

वाचा - पीपल पानांचा वापर

त्वचेवर येणारी खाज कमी करण्यासाठी

जर तुम्हाला त्वचेवर पुरळ अथवा खास येत असेल तर या समस्येला दूर करण्यासाठी तुळशीची पाने तुमच्यासाठी वरदान ठरू शकतात. कारण तुळस ही एक नैसर्गिक अॅटि सेप्टिक गुणधर्म असलेली वनस्पती आहे. ज्यामुळे तुळशीच्या पानांचा लेप लावल्यामुळे तुमची ही समस्या दूर होऊ शकतेच. शिवाय यामुळे तुम्हाला कोणताही साईड इफेक्ट सहन करावा लागत नाही. 

केसांचे गळणे कमी करण्यासाठी

केस गळत असतील तर त्यामागे अनेक कारणे कारणीभूत असू शकतात. केसांंमधील कोंडा, कोरडे आणि निस्तेज केस, केसांना फाटे फुटणे अशी त्यामागची अनेक कारणे असू शकतात. यासाठी  केसांचे योग्य पोषण होणे फार गरजेचे आहे. केसांचे आरोग्य वाढवण्यासाठी आणि लांबसडक केस मिळवण्यासाठी तुम्ही केसांना तुळशीचे पानांचा रस लावू शकता. यासाठी वाटीभर तुळशीच्या पानांचा रस काढून घ्या. या रसात काही थेंब लिंबाचा रस टाका. हा रस केसांच्या मुळांना लावा आणि वीस ते तीस मिनीटांनी केस स्वच्छ धुवून टाका. आठवड्यातून एकदा हा उपाय केल्यामुळे तुमच्या केसांचे आरोग्य नक्कीच चांगले होऊ शकते. 

 

तोंडाची दुर्गंधी दूर करण्यासाठी

तोंडाची दुर्गंधी दूर करण्यासाठी तुळशीची पानं खूप मदत करतात. ही एक प्रकारे नैसर्गिक माऊथ फ्रेशनरचं काम करतात. जर तुमच्या तोंडातून दुर्गंधी येत असेल तर तुळशीची काही पान पाण्यात उकळून घ्या आणि मग पाणी थंड करून त्याने चूळ भरा. असं केल्यास तोंडाची दुर्गंधी दूर होईल.

अधिक वाचा

कलियुगातही वरदान ठरणारी तुळशीची पानं

जाणून घ्या तुळशीच्या रोपाविषयी या '7' गोष्टी

कडूलिंबाचे फायदे आणि औषधीय गुण ऐकून तुम्हीही व्हाल चकीत!

फोटोसौजन्य - शटरस्टॉक