ADVERTISEMENT
home / Mental Health
ताण-तणावामुळे तरूण महिलांमध्ये वाढतोय सध्या ‘अल्झायमर’चा धोका

ताण-तणावामुळे तरूण महिलांमध्ये वाढतोय सध्या ‘अल्झायमर’चा धोका

अल्झायमर आजाराचा विळखा सध्या वाढतच चालला आहे. या आजाराचा त्रास रूग्ण आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाला सहन करावा लागतो. अल्झायमरमुळे हळूहळू रूग्णाची स्मरणशक्ती कमी होत जाते. रूग्णाची विस्मरणशक्ती इतकी वाढते की त्याला त्याचे नाव-गावदेखील लक्षात राहत नाही. ज्यामुळे रूग्णाचे आणि त्याच्या नातेवाईकांचे जीवन असह्य होत जाते. धक्कादायक बाब म्हणजे नुकत्याच करण्यात आलेल्या एका संशोधनानुसार आजकाल तरूण महिलांमध्ये अल्झायमरचा धोका वाढत चालला आहे. यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे महिलांमध्ये वाढत असलेला ताण-तणाव आहे. नात्यातील ताण-तणाव, घटस्फोट, जवळच्या व्यक्तीचं दूर जाणं, नोकरी जाण्याची भिती यामुळे तरूण महिलांना आजकाल हा आजार होण्याचे प्रमाण वाढले आहे. या संशोधनानुसार पुरूषांपेक्षा महिलांना अल्झायमरचा धोका अधिक असल्याचं दिसून आलं आहे. 

काय सांगते अल्झायमर विकाराबाबत ही आकडेवारी

सामान्यतः वृद्ध लोकांमध्ये अल्झायमर आजाराचे प्रमाण अधिक असते. अल्झायमर असोशिएशनच्या मते 60 वय पार केलेल्या सरासरी 6 महिलांपैकी एक महिला आजकाल अल्झायमर आजाराने पिडीत आहे. पुरूषांमध्ये मात्र हे प्रमाण 11 पैकी एक असे आहे. त्याचप्रमाणे 85 पेक्षा जास्त वय  असलेल्या वृद्ध लोकांमधील पन्नास टक्के लोकांमध्ये अल्झायमरची समस्या जाणवते. सध्या तरी या आजारावर योग्य उपचार उपलब्ध नाहीत त्यामुळे याबाबत तरूण वयातच काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे.  

shutterstock

ADVERTISEMENT

अल्झायमर म्हणजे नेमकं काय ?

अल्झायमर हा मेंदूशी निगडीत आजार आहे. या आजारात रूग्णांच्या मेंदूच्या कार्यक्षमतेवर परिणाम होत जातो. ज्यामुळे रूग्ण दैनंदिन गोष्टी करणं विसरतो. सामान्यतः रूग्ण या आजारात विचार करण्याची क्षमता, आठवणी, वागण्याची पद्धत, स्वतःचे नाव आणि व्यक्तिमत्व, घर आणि घरातील माणसं विसरतात. शिवाय या परिस्थितीत त्यांना जेवणे, अंघोळ करणे, शौचविधी, स्वयंपाक करणे, लिहिणे, बोलणे या गोष्टीदेखील नीट करता येत नाहीत. अल्झायमरची लक्षणे लगेच दिसून येत नाहीत. प्राथमिक लक्षण दिसू लागल्यानंतर जवळजवळ दहा वर्षांनी रूग्णाला अल्झायमर झाल्याचे समजते. या आजाराचा शोध अल्झेमर नावाच्या जर्मन डॉक्टराने लावला होता ज्यावरून या आजाराला अल्झायमर असे नाव पडले. अल्झायमर या आजारावर उपाय करणं आजही कठीण आहे. त्यामुळे रूग्णाची योग्य काळजी घेऊन फक्त त्याचा बचाव करता येऊ शकतो. आजार पहिल्या टप्प्यात समजल्यास काही वैद्यकीय उपचार करून या आजाराचा वेग नक्कीच कमी करता येऊ शकतो. 

वाचा – हर्निया होण्याची कारणं (Causes Of Hernia In Marathi)

भविष्यात अल्झायमर होऊ नये यासाठी काय करावे ?

अल्झायमर वाढण्यामागचं कारण दिवसेंदिवस स्ट्रेसमध्ये होणारी वाढ आहे. तज्ञांच्या मते आयुष्यातील ताण-तणाव कमी करणं शक्य नसलं तरी त्याला योग्य पद्धतीने हाताळणं गरजेचं आहे. तुम्ही तुमच्या जीवनातील चिंता आणि काळजीला कसं तोंड देता यावर सारं काही अवलंबून आहे. तुम्ही कठीण परिस्थितीत कशी प्रतिक्रिया देता याचा परिणाम तुमच्या मेंदूवर होत असतो. जर तुम्ही एखाद्या गोष्टीला चिडून अथवा रागावून प्रतिक्रिया दिली तरी त्याचा वाईट परिणाम तुमच्या शरीर आणि मनावर होतो. ज्यामुळे हळूहळू तुमचा ताण-वाढत जातो आणि मेंदूवर परिणाम होऊ लागतो. यासाठीच एखाद्या गोष्टीवर लगेच प्रतिक्रिया देण्याऐवजी त्यावर शांतपणे विचार करा आणि मगच एखादी कृती करा. शिवाय गरज नसेल तर विनाकारण एखाद्या गोष्टींची काळजी चिंता करत बसून नका. कारण बिनकामाच्या या चिंतेमुळे भविष्यात अल्झायमर सारखा भयंकर आजार होण्याची शक्यता आहे. तेव्हा वेळीच सावध व्हा आणि चिंता-काळजीपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. मेंदूची कार्यप्रणाली सुरळीत चालावी असे तुम्हाला वाटत असेल स्मरणशक्ती वाढविणारे उपाय करा. सोप्या व्यायामांनी अल्झायमर सारख्या आजाराला दूर ठेवता येते

अधिक वाचा

ADVERTISEMENT

मानसिक आजार म्हणजे काय आणि त्याचे काय आहेत प्रकार

पहिल्यांदाच आई होणाऱ्या महिलांमध्ये मानसिक ताणाच्या समस्येत पाच वर्षांत 10% वाढ

मानसिक ताणाला दूर ठेवण्यासाठी करा ‘हे’ सोपे उपाय

फोटोसौजन्य – शटरस्टॉक

ADVERTISEMENT
08 Aug 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT