‘मेहंदी हे रचनेवाली हातो मे गहरी लाली’… ‘मेहंदीच्या पानावर… मन अजून झुलतेय गं..’ अशी मेहंदीची कित्येक गाणी तुम्ही ऐकली असतील. असं म्हणतात तुमच्या जोडीदाराच्या प्रेमावर तुमच्या मेहंदीचा रंग अवलंबून असतो. म्हणून जेव्हा नवरीची मेहंदी डिझाइन लावतात. तेव्हा मेहंदीच्या चढलेल्या रंगावरुनच नवऱ्याचे प्रेम किती ते ओळखले जाते. पण हा मस्करीचा किंवा मानण्या न मानण्याचा भाग वगळला तर तुम्ही लावलेली मेहंदी जर गडद रंगली तरच तुम्हाला मेहंदी लावल्याचे समाधान मिळते नाही का? आज आपण मेहंदीचा रंग तुमच्या हातावर कसा गडद करता येईल याच्या काही सोप्या आणि घरगुती tricks पाहणार आहोत. पण त्या आधी मेहंदीविषयी अधिक गोष्टी जाणून घेऊया.
भारत आणि मेहंदीची परंपरा (India And Mehndi Culture)
जगभरातील मेहंदीचा विचार केला तर मेहंदी काढण्याची सुरुवात ही इजिप्तमधून सुरु झाली असे म्हणतात. येथील कलांमध्ये या कलेचा समावेश होतो. त्यामुळे इजिप्त याचे मूळ स्थान मानले जाते. साधारण मुस्लिम राष्ट्रांमध्ये मेहंदी आवर्जून काढली जाते. त्यांच्याकडे मेहंदी काढणे हे अगदी अगत्याचे असते. आजही भारतातसुद्धा तुम्हाला अनेक महिला कायम त्यांच्या हातावर मेहंदी काढताना दिसतील. मेहंदी नुसती हातावर काढण्यासाठी म्हणजेच शोभेसाठी काढली जात नाही तर तिचे आरोग्यासाठीही अनेक फायदे आहेत. अनेक कारणांसाठी मेहंदी वापरली जाते. त्यामुळे जगभरात मेहंदीचा वापर वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो.
चेहरा उजळवण्यापासून ते वजन कमी करण्यापर्यंत कॉफीचे आहेत फायदे – Benefits Of Coffee
जगभरात मेहंदीची काय परंपरा आहे ?(Mehndi Around The World)
जगभरातील मेहंदीचा विचार केला तर मेहंदी काढण्याची सुरुवात ही इजिप्तमधून सुरु झाली असे म्हणतात. येथील कलांमध्ये या कलेचा समावेश होतो. त्यामुळे इजिप्त याचे मूळ स्थान मानले जाते. साधारण मुस्लिम राष्ट्रांमध्ये मेहंदी आवर्जून काढली जाते. त्यांच्याकडे मेहंदी काढणे हे अगदी अगत्याचे असते. आजही भारतातसुद्धा तुम्हाला अनेक महिला कायम त्यांच्या हातावर मेहंदी काढताना दिसतील. मेहंदी नुसती हातावर काढण्यासाठी म्हणजेच शोभेसाठी काढली जात नाही तर तिचे आरोग्यासाठीही अनेक फायदे आहेत. अनेक कारणांसाठी मेहंदी वापरली जाते. त्यामुळे जगभरात मेहंदीचा वापर वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो.
बिकिनी शेव्ह करायचं असेल तर पहिले ‘या’ 6 महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या
मेहंदी गडद करण्याची सोपी आणि योग्य पद्धत (Easy Tricks To Make Your Mehndi Darker)
मेहंदी लावल्यानंतर ती गडद करण्यासाठी तुम्हाला काही सोप्या tricks आहेत या tricks कोणत्या ते देखील पाहुयात.
1. साखरेचे पाणी ( Sugar Water )
shutterstock
मेहंदी सुकल्यानंतर तुम्हाला सुकलेल्या मेहंदीवर तुम्हाला साखरेचे लावायचे आहे. एका भांड्यात तुम्हाला साखर घ्यायची आहे. साखर विरघळल्यानंतर तुम्हाला तयार पाणी तुम्हाला कापसाने तुमच्या मेहंदीच्या हातावर लावायचे आहे. यामुळे तुमची मेहंदी हाताला अधिक काळ चिकटून राहते आणि मेहंदी रंगण्यास मदत होते. म्हणूनच तुम्ही पार्लर किंवा बाहेरुन मेहंदी लावून आल्यानंतर तुम्हाला साखरेचे पाणी लावायला सांगतात.
2,लवंग (Cloves)
shutterstock
लवंगाच्या वाफेने तुमची मेहंदी हमखास रंगणारच. जर तुमची मेहंदी केशरी रंगापर्यंतच रंगली असेल आणि तुम्हाला तिला गडद करायची असेल तर त्यावर लवंग लावले जाते. मेहंदी हातातून काढून टाकल्यानंतर तुम्हाला एका तव्यावर लवंगाच्या कळ्या तव्यावर टाकायच्या आहेत. लवंग गरम झाल्यानंतर त्यातून निघणारी वाफ तुम्हाला तुमच्या मेहंदीच्या हातावर घ्यायची आहे. अगदी काहीच वेळात तुमच्या मेहंदीचा रंग तुम्हाला गडद झालेला दिसेल.
3. नारळाचे तेल (Coconut Oil)
shutterstock
मेहंदी रंगण्यासाठी हातावर नारळाचे तेल देखील चोळले जाते. तेलाच्या घर्षणामुळे तुमच्या मेहंदीला रंग चढतो. ज्यावेळी तुम्ही हातावर सुकलेली मेहंदी काढायला जाता. त्यावेळी तुम्हाला तुमच्या हातावर नारळाचे तेल घ्यायचे आहे. आणि तुम्हाला तुमचा हात चोळायचा आहे. हातावर तेल असल्यामुळे तुम्हाला तुमच्या हातावर थोडे गरम झाल्यासारखे वाटेल. या उष्णतेमुळेच तुमची मेहंदी रंगेल.
4. काथा (Catechu (Kattha))
shutterstock
पानात वापरला जाणारा काथा हा मेंहदीला रंग आणण्यासाठीही वापरा जातो. खायच्या पानामध्ये काथा वापरला जातो. हा काथाच तुमचे तोंड लाल करत असतो. म्हणूनच काथ्याचा उपयोग मेहंदीमध्ये करतात. मेहंदी भिजवताना त्यामध्ये काथा टाकला जातो. त्यामुळे मेहंदी आपसुकच लाल होते.
5. बाम (Balm)
shutterstock
बामाच्या उष्णतेमुळेही तुमच्या मेहंदीचा रंग हा गडद होतो. मेंहदी लावल्यानंतर म्हणजे ती काढून टाकल्यानंतर तुम्हाला तुमच्या हाताला कोणताही चांगला बाम लावायचा आहे. पण हा बाम लावताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे तुम्हाला जळजळ जास्त वाढवतील असे बाम लावायचे नाहीत. तर तुम्हाला तुमच्या त्वचेला शोभेल असा एखादा माईल्ड बाम निवडायचा आहे.
6. चुना (Calcium Hydroxide (Chuna))
shutterstock
मेहंदीचा रंग गडद करण्यासाठी चुन्याचा वापर देखील केला जातो. अगदी हलकासा चुना घेऊन त्यात पाणी मिसळून तुम्हाला तुमच्या हाताला अगदी काहीच सेकंदासाठी तुम्हाला तुमच्या हातावर हे पाणी लावायचे आहे. जर तुमची त्वचा नाजूक असेल तर मात्र तुम्ही हा प्रयोग अजिबात करु नका कारण त्यामुळे तुमच्या हाताची त्वचा जळण्याची शक्यता आहे.
7.विक्स (Vicks)
shutterstock
अनेक ठिकाणी बामासोबतच विक्स लावण्याचा सल्ला दिला जातो. ज्याप्रमाणे बाम तुमच्या हातांमध्ये उब निर्माण करते.त्यामुळे तुमच्या मेहंदीला चांगला रंग चढतो. त्यामुळे तुम्ही हा पर्यायही करुन पाहू शकता.
8. निलगिरीचे तेल (Eucalyptus Oil)
shutterstock
मेहंदी भिजवताना त्यात निलगिरीचे तेल अगदी आवर्जून घातले जाते. त्यामुळे तुमच्या मेहंदीला चांगला रंग तर येतोच. शिवाय निलगिरीच्या तेलाचे अन्यही खूप फायदे आहेत. निलगिरीचे तेल मेहंदी कालवताना त्यात घातले जाते कारण त्यामुळे सर्दीचा त्रासही होत नाही.
मेहंदी काढल्यानंतर या गोष्टी लक्षात ठेवा (Things To Keep In Mind After Applying Mehndi )
shutterstock
मेहंदी लावल्यानंतर ती छान गडद व्हावी आणि ती जास्त काळ टिकावी असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही काही गोष्टीही पाळायला हव्यात. या गोष्टी कोणत्या ते देखील पाहुया.
पाण्याचा वापर (Avoid Water)
shutterstock
जर तुम्ही अगदी नुकतीच मेहंदी लावून काढली असेल तर या दिवसांमध्ये पाण्याचा वापर टाळा. कारण पाण्याच्या वापरामुळे तुमच्या मेहंदीचा चढलेला रंगही उतरु शकतो. शिवाय तुमची मेहंदी लगेच जाऊ शकते. त्यामुळे या दिवसात तुम्ही पाण्याचा कमीत कमी वापर करा किमान तुम्हाला मेहंदी टिकवायची आहे. त्या दिवसापर्यंत तरी पाणी वापरु नका.
पार्लर टाळा (No Beauty Treatment)
shutterstock
जर तुम्ही काही विशेष कारणासाठी हातांवर मेहंदी लावली असेल तर मेहंदी लावण्याआधी तुम्ही वॅक्सिंग,डिटॅन या गोष्टी किंवा हाताशी संबधित सगळ्या गोष्टी आधीच करुन घ्या. कारण जर तुम्ही मेहंदी काढून टाकल्यानंतर जर वॅक्सिंग केले तर डेट स्किन काढताना मेहंदी निघू शकते.
वेळ द्या (Invest Hours)
मेहंदी लावणे हे फार सबुरीचे काम आहे. ती हातावर काढताना जितका वेळ घेते. तितकाच वेळ मेहंदी सुकण्यासाठी लागू शकतो. मेहंदी सुकण्यासाठीचा वेळ हा जास्त वाटत असला तरी तुम्हाला चांगली मेहंदी रंगलेली हवी असेल तर ही गोष्ट पाळावीच लागेल. त्यामुळे मेहंदी काढल्यानंतर वेळ द्या.
सतत प्रयोग करुन पाहू नका (Avoid more Trials For Color)
तुमच्या मेहंदीला गडद रंग मिळावा म्हणून आम्ही तुम्हाला काही सोप्या ट्रीक्स सांगितल्या आहेत. पण याचा अर्थ असा नाही की, तुम्ही सगळे प्रयोग एकाचवेळी करुन पाहाल.तर त्याचा उपयोग तुम्हाला काहीही होणार नाही. उलट तुमच्या त्वचेला त्यामुळे त्रास होईल.
नैसर्गिकपद्धतीने सुकू द्या (Let It Dry Naturally )
नेलपेंट वाळवणे आणि मेहंदी वाळवणे यात फरक आहे. तुम्हाला मेहंदीचा रंग चांगला हवा असेल तर तुम्ही तुमची मेहंदी नैसर्गिकपद्धतीने वाळवा. जर तुम्ही तुमची मेहंदी नीट वाळवली तर तुम्हाला मेहंदीचा रंग चांगला मिळेल.
मेहंदी संदर्भात तुम्हालाही पडतात का हे प्रश्न FAQ
मेहंदी आणि हीनामध्ये काय फरक आहे? (What is difference between mehndi and heena? )
मेहंदी आणि हीनामध्ये तुम्ही जर काही फरक विचारत असाल तर शब्दांचा फरक वगळता यात काहीच फरक नाही. भारतामध्ये मेंहदी हा शब्द वापरला जातो. तर अरेबिक भाषेत मेहंदीला ‘हीना’ असे संबोधले जाते त्यामुळे या दोघांमध्ये काहीही फरक नाही. आता प्रत्येक ठिकाणी मेहंदी वापरण्याची पद्धत ही वेगळी आहे. पण मेहंदीचे झाड सगळीकडे सारखे असते. याच पानांपासून मेहंदी तयार केली जाते.
मेहंदीचा रंग चढण्यासाठी किती तास लागतात ? (How long does it take to get color on mehndi? )
मेहंदीला रंग चढण्याचा कालावधी हा प्रत्येकासाठी वेगळा असू शकतो.ज्याच्या शरीरात अधिक उष्णता असते त्याची मेहंदी अधिक गडद होते असे म्हटले जाते. सर्वसाधारणपणे सलग 5 ते 6 तास मेहंदलीला रंग होण्यासाठी लागतात. पण मेहंदीला रंग चढण्याचा कालावधीही वेगळा असू शकतो. पण तुम्हाला मेहंदी चांगली रंगावी असे वाटत असेल तर तुम्ही किमान 5 ते 6 तास मेहंदी तरी हातावर ठेवाच.
मेहंदीचा रंग काळा कसा होतो? (Why does mehndi turn into black color?)
मेहंदीचा रंग साधारण गडद लाल म्हणजेच आपण त्याला मरुन म्हणतो. साधारण मेहंदीचा रंग तसा असतो. मेहंदी गडद झाल्यानंतर ती काळी सुद्धा दिसते.आता मेहंदीचा उपयोग केवळ हातावर काढण्यासाठी केला जात नाही. तर केस रंगवण्यासाठीही मेहंदीचा उपयोग केला जातो. केमिकलयुक्त रंगांचा वापर करण्यापेक्षा अनेक जण मेहंदी लावणे पसंत करतात. मेहंदीला काळा रंग मिळावा म्हणून ती लोखंडाच्या कढईवर ठेवली जाते.काही काळानंतर लोखंडाचा काळा रंग त्या मेहंदीमध्ये उतरतो आणि तुमच्या केसांना काळा रंग मिळतो.
सगळ्यात चांगली मेहंदी कोणती? (Which is the best mehndi ?)
भारतात खूप वेगवेगळ्या प्रकारच्या मेहंदी मिळतात. सध्या प्रमुख शहरांमध्ये राजस्थानी मेहंदी ही फारच प्रसिद्ध आहे. खास राजस्थानी लोकं अशा प्रकारच्या मेहंदीची विक्री करतात. तेच मेहंदीचे कोन बनवून पटापट मेहंदी काढतात. कोणतेही मेहंदी घेताना जर नैसर्गिक असेल तर नक्कीच चांगले. मेहंदीमध्ये निलगिरीचा खूप मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येतो. त्यामुळे त्याचा वासही छान येतो. हल्ली तर वेगवेगळ्या ब्रँडने नैसर्गिक मेहंदी आणली आहे. जर तुम्हाला कोणती मेहंदी घेऊ असा प्रश्न पडला असेल तर तुम्ही ब्रँडेड मेहंदी घेऊ शकता.
पावसाळ्यात केसांमधून येणारी दुर्गंधी टाळण्यासाठी वाचा टिप्स
दुल्हन मेहंदी आणि साध्या मेहंदीमध्ये काय फरक आहे? (Is dulhan mehndi different from normal mehndi?)
मेहंदीमध्ये तसा पाहायला गेला तर काही फरक नाही. हा पण जर तुम्ही डिझाईन्सचा विचार करत असाल तर यामध्ये नक्कीच फरक आहे. म्हणजे दुल्हन मेहंदीही बारीक बारीक काढली जाते. तिच्या डिझाईन्समध्ये फरक असतो.तिचा कोन तयार करताना त्याचे टोक हे बारीक कापले जाते. त्यामुळे मेहंदी अगदी बारीक बारीक निघते आणि त्यामुळे त्याची डिझाईन हातावर चांगली दिसते. दुल्हन मेहंदीसाठी फारच मेहनत घ्यावी लागते. तुलनेनं साधी मेहंदी काढताना इतकी मेहनत घेतली जात नाही.