आपल्यापैकी जवळजवळ सगळ्याच्यांच टिपिकल नाश्ता म्हणजे इडली-सांबार (Idli-Sambhar). पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, इडली-सांबार खाल्ल्यास तुम्हाला वजन कमी (Weight Loss) करण्यात मदत होईल. आहे ना खूषखबर.
इडली तर पचायला हलकी असते हे सर्वांना माहीत आहेच. कारण इडलीही तांदळापासून बनवलेली असते. त्यामुळे इडलीत कार्बोहायड्रेट, प्रोटीन, व्हिटॅमीन्स आणि मिनरल्स असतात. इडलीमधील कॅलरीजसुद्धा कमी असतात पण ती तेवढीच एनर्जी देणारी असते. याचमुळे इडली खाल्ल्याने वजन नियंत्रित राहतं. तसंच पचण्यासाठीही इडली हलकी असते. असं असूनही इडली खाल्ल्यावर तुम्हाला लगेच भूक लागत नाही. त्यामुळेच इडली भारतीयांच्या आवडत्या नाश्त्याच्या पर्यांयापैकी एक आहे.
उडीद डाळ, तांदूळ आणि रवा अशी विविध प्रकारे बनवली जाणारी इडली अनेकांना आवडते. आपल्या उच्च न्यूट्रिशन व्हॅल्यूमुळे इडलीला नाश्त्यासाठी सर्वात जास्त पसंती दिली जाते. वाफवलेली, टम्म फुगलेली आणि पचायला हलकी असणारी इडली आरोग्य आणि फिटनेस प्रती जागरूक असणाऱ्या लोकांमध्ये सर्वाधिक पसंत केली जाते. त्यामुळेच असं म्हणण्यात येतं की, इडली सांबार खाल्ल्यास तुमचं वजन कमी होण्यास मदत होते.
इडली ही नेहमी नारळाची चटणी आणि सांबारसोबत खाल्ली जाते. इडली सांबारसोबत खाणं फायदेशीर मानलं जातं. कारण यामध्ये असलेल्या भाज्या आणि डाळींमुळे तुम्हाला आवश्यक पोषण मिळतं. यात मसाले असले तरी सांबारमुळे कधीही अॅसिडीटी वाढत नाही.
जशी इडली पौष्टीक आहे तसंच सांबारही आहे. सांबारमध्ये भरपूर फायबर प्रोटीन आणि अँटीऑक्सीडंट्स असतात. हे पचन सुधारतं आणि त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. वजन घटवण्यासाठी तुम्ही सांबार बनवताना जास्तीत जास्त भाज्या घालून अजून पौष्टिक बनवू शकता.
बरेचदा आजारी असलेल्या किंवा आजारातून बरं होणाऱ्या पेशंट्सनाही इडली-सांबारचा नाश्ता देण्यासाठी डॉक्टर सांगतात. कारण इडली आणि सांबारमुळे तोंडाला चवही येते आणि पचनही सहज होतं. तसंच वजन कमी करतानाही जीभेवर नियंत्रण राहण्यासाठी इडली-सांबार उपयुक्त ठरतं. त्यामुळे तुमच्या रोजच्या आहारात इडलीचा समावेश करून तुम्ही वजनावर नियंत्रण आणू शकता.
हेही वाचा -
वजन कमी करण्यासाठी जमिनीवर बसून जेवणे ठरेल फायदेशीर