Yoga For Weight Loss In Marathi - वजन कमी करण्यासाठी सूर्य नमस्कार पायऱ्या आणि योगासनं | POPxo

वेटलॉससाठी करून पाहा 'ही' योगासनं (Yoga For Weight Loss In Marathi)

वेटलॉससाठी करून पाहा 'ही' योगासनं (Yoga For Weight Loss In Marathi)

न जमणाऱ्या गोष्टी करूनही जर वजन कमी होत नसेल तर आपला भारतीय योगा आणि सूर्यनमस्कार आहेत ना. हे दोन्ही प्रकार तुमच्या दैनंदिन लाईफस्टाईलमध्ये सामील करून तुम्हीही फिट राहू शकता आणि मनासारखं फिगर मिळवू शकता. योगाने फक्त वजन कमी होत नाही तर व्यक्तीचा आत्मविश्वासही वाढतो. योगाची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे यामुळे तुमच्या शरीराला कोणत्याही प्रकारचा साईड इफेक्ट होत नाही आणि तसंच आपल्या शरीरावर जमा झालेलं एक्स्ट्रा फॅट बर्न करायलाही मदत होते. आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत काही सोपी योगासनं जी वेटलॉससाठी बेस्ट मानली जातात.


सूर्य नमस्कार (Surya Namaskar Steps In Marathi)


जर तुम्ही रोज सूर्य नमस्कार करत असाल तर फिट राहण्यासोबत तुमचे अनेक आजारही दूर होतील. जर तुम्हाला जाडेपणाची समस्या असेल तर रोज कमीत कमी 10 वेळा सूर्य नमस्कार केल्यास तुमचं वजन कमी होईल. कारण सूर्यनमस्काराचे एक नाही अनेक फायदे आहेत. रोज सूर्य नमस्कार केल्यास मनाची एकाग्रता वाढते. तसंच शरीराची लवचिकता वाढते, त्वचा उजळते, हाडं मजबूत होतात, पचनशक्ती वाढते आणि डोक्यातील तणावही दूर होतो.   


surya namskar
भारतात सूर्यनमस्काराची परंपरा अनेक पिढ्यांपासून सूरू आहे आणि योगासनांमध्ये याला सर्वोत्कृष्ट मानलं जातं. पण अनेकांना सूर्यनमस्काराचे फायदे माहीत नाहीत. त्यामुळे जाडेपणामुळे वैतागलेली लोकं योगा सोडून जिम आणि साईड ईफेक्ट्स होणाऱ्या औषधांचा वापर करतात. तज्ज्ञ सांगतात की, जर तुम्ही रोज सूर्य नमस्कार केले तर तुम्ही फिट तर राहताच पण अनेक आजारांपासूनही दूर राहता. जर वेटलॉस करायचा असेल तर रोज कमीतकमी 10 वेळा सूर्य नमस्कार करा आणि वजन कमी करा. करून पाहा हे सोपे 12 सूर्यनमस्कार.


तसेच योग कसे करावे याबद्दल देखील वाचा


स्टेप 1 - प्रणाम आसन


step 1


सर्वात आधी दोन्ही हात जोडून (नमस्कारच्या पोझिशनमध्ये)सरळ उभे राहा. आपलं पूर्ण वजन दोन्ही पायांवर समानपणे ठेवून आणि खांदे सैल सोडा.


स्टेप 2 - हस्तउत्तानासन


step 2


आता दूसऱ्या स्टेपमध्ये दीर्घ श्वास घ्या आणि दोन्ही हात वर उचला. दोन्ही हाता कानाच्या दिशेने मागे नेत कमरेकडे वाकवा. या दरम्यान पूर्ण शरीर दोन्ही टाचांपासून हाताच्या बोटांपर्यंत सर्व अंग वरच्या दिशेकडे स्ट्रेच करायचा प्रयत्न करा.


Also Read 7 Days Diet Plan To Reduce Weight Quickly In Marathi


स्टेप 3 - हस्तपाद आसन


step 3


आता तिसऱ्या स्टेपमध्ये श्वास बाहेर सोडत हात सरळ ठेवत आणि पुढे वाका. दोन्ही हातांना पायाच्या उजव्या आणि डाव्या बाजून जमिनीला टच करायचा प्रयत्न करा. लक्षात ठेवा या दरम्यान पाठीचा कणा सरळ असला पाहिजे.


स्टेप 4 - अश्व संचालन आसन


step 4


आता चौथ्या स्टेपमध्ये श्वास घेताना जेवढं शक्य असेल तेवढं आपला उजवा पाय मागच्या बाजूला न्या. मग उजवा गुडघ्याला जमिनीवर ठेवत आणि नजर वर आकाशाकडे ठेवा. या दरम्यान प्रयत्न करा की, तुमचा डावा पाय दोन्ही हाताच्यामध्ये असेल.


स्टेप 5 - दंडासन


step 5


आता पाचव्या स्टेपमध्ये दीर्घ श्वास घेत डावा पाय पाठीमागे घेत आणि पूर्ण शरीर सरळ रेषेत ठेवा. या दरम्यान तुमचे हात जमिनाला लंबाकार असले पाहिजेत.


वजन कमी करण्याचे घरगुती उपचारही वाचा


स्टेप 6 - अष्टांग नमस्कार


step 6


आता पुढच्या स्टेपमध्ये आरामात दोन्ही गुडघे जमीनीवर आणा आणि श्वास बाहेर सोडा. आपलं शरीर जमिनीपासून उचलत शरीर पुढे सरकवा. या दरम्यान तुमची छाती आणि हनुवटी जमिनीला टच करेल. पण लक्षात ठेवा की, या परिस्थितीत तुमचं पोट जमिनीला लागता कामा नये.


स्टेप 7 - भुजंगासन


step 7


आता सातव्या स्टेपमध्ये श्वास घेत आपल्या शरीराचा वरील भाग मानेच्या बाजून पाठी करत उठा. असं करताना थोड्या वेळासाठी याच स्थितीत थांबा आणि खांदे कानांपासून दूर नजर आकाशाच्या दिशेने ठेवा.


स्टेप 8 - पर्वत आसन


step 8


आता आठव्या स्टेपमध्ये श्वास बाहेर सोडत पाठीचा मणका आणि पार्श्वभाग वर उचलायचा प्रयत्न करा. छाती खाली वाकवून उलट्या व्ही चा आकार करा.


स्टेप 9 - अश्वसंचालन आसन


step 9


आता नवव्या स्टेपमध्ये श्वास घेत उचवा पाय दोन्ही हातांच्या मधोमध घ्या आणि डाव्या गुडघा जमिनीवर ठेवायचा प्रयत्न करा. या दरम्यान नजर वर ठेवा आणि स्ट्रेचिंगचा अनुभव घ्या.


स्टेप 10 - हस्तपाद आसन


step 10


आता दहाव्या स्टेपमध्ये श्वास बाहेर सोडा आणि सोडताना डावा पाय पुढे घ्या आणि हाताचे तळवे जमिनीवरच राहू द्या. हळूहळू दोन्ही गुडघ्यांना सरळ करा.


स्टेप 11 - हस्तउत्थान आसन


step 11


आता अकराव्या स्टेपमध्ये श्वास घ्या आणि पाठीच्या मणक्याला हळूहळू वर घ्या आणि हातांना वरच्या बाजून मागे न्या. या दरम्यान पार्श्वभागाला पुढच्या बाजूला करायचा प्रयत्न करा.


स्टेप 12 - ताडासन


step 12


आता बाराव्य स्टेपमध्ये श्वास बाहेर सोडा आणि सोडताना शरीर सरळ करा, मग हात खाली घ्या. या दरम्यान एकचित्त होऊन शरीरात होणारी हालचाल जाणवायचा प्रयत्न करा.


वेटलॉससाठी उपयुक्त ठरणारी योगासनं (Yoga For Weight Loss)


वक्रासन


vakrasna


वक्रासन केल्यामुळे शरीरातील चरबी काही दिवसातंच विरघळू लागते. तसंच तुमचं शरीर लवचिक होतं आणि जाघांमध्येही मजबूती येते. लक्षात ठेवा की, वक्रासन करताना हाताचा आणि पायाचा ताळमेळ असणं गरजेचं आहे.


नौकासन


naukasna


जर तुम्ही नित्यनेमाने नौकासनाची प्रॅक्टीस केली तर विश्वास ठेवा की, तुमचं पोट कधीच बाहेर येणार नाही. तसंच पोटावरची चरबी कमी करण्यासाठी हे सर्वोत्तम आसन आहे. हे जाडेपणाला कंट्रोल करतं आणि पोटासोबतच पूर्ण शरीरावरही चरबी जमा होऊ देत नाही. याशिवाय किडनीसाठी ही खूपच फायदेशीर आहे. याचा रोज सराव केल्यास तुमच्या पोटांशी निगडीत सर्व समस्या दूर होतील.  


सेतुबंधासन


setubandhna


जर तुम्हाला कमरेशी निगडीत एखादी समस्या असेल तर सेतूबंधासन हा एकदम योग्य ऑप्शन आहे. तसंच पोटावरील एक्स्ट्रा चरबीही आरामात कमी होते या आसनामुळे. या आसनामुळे तुमच्या पाठीच्या कण्याचं हाडं मजबूत आणि सरळ होतं. नियमितपणे हे आसन केल्यास थायरॉईड ग्लँडलाही चांगला मसाज होतो आणि थायरोक्सिन हार्मोनची निर्मिती होते जे थायरॉईड रोखण्यास मदत करते.


पवनमुक्तासन


pawanmukta


हे आसन केल्याने पोट सुडौल होते आणि कणा मजबूत होतो. पवनमुक्तासन हे एकमेव असं योगासन आहे जे पचन क्रिया दुरूस्त करतं आणि पोटाचे आजारही दूर करतं. मेटाबॉलिजम वेगाने करत शरीरातील अतिरिक्त चरबीही कमी करतं. तसंच गॅसच्या समस्यापासूनही सुटका करतं.


मग योगाचा समावेश तुमच्या रुटीनमध्ये करा आणि बघा वजन नक्की कमी होईल.  


तुम्हाला कदाचित या गोष्टी आवडतील:


जलद वजन करायचं असेल कमी, तर ‘या’ 10 सवयी आवश्यक


कमी वेळात वजन करण्यासाठी पुढील 10 गोष्टी रोज करा


परफेक्ट फिगरसाठी करा ‘हा’ परफेक्ट डाएट आणि पाहा तुमच्यातील बदल


वजन घटवण्यासाठी उत्कृष्ट आहेत हे बाबा रामदेवचे घरगुती उपाय


योगासने करून पाठ दुखीतून मिळवा सुटका